The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बिअर प्यायल्याने मुतखडा बरा होतो’ ही थाप ऐकली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही

by द पोस्टमन टीम
30 June 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अनेक आजारांवर आपण घरगुती उपाय करतो. त्याने काही प्रमाणात फायदा देखील होतो. मात्र, घरगुती उपाय करताना जर त्यात काही कमी जास्त झाले तर त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. मुतखडा (किडनी स्टोन) या समस्येबाबतही काही घरगुती उपाय केले जातात. या उपायांमध्ये बिअरचा क्रमांक अगदी वर लागतो. बिअरच्या सेवनाबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. मुतखडा कसा होतो आणि त्यावर बिअर कितपत फायदेशीर आहे त्याबाबत आज आपण जाणून घेऊया.

मुतखडा(किडनी स्टोन) काय आहे?

किडनी स्टोन हे आपल्या किडनीमध्ये जमा झालेले एक प्रकारचे स्फटिकं असतात. बहुधा ते कॅल्शियम किंवा यूरिक ऍसिडपासून तयार होतात. ते वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. हे स्टोन जमा झाल्याने लघवी करणे अतिशय त्रासदायक होते.

किडनी स्टोन होण्याची कारणे

किडनी स्टोन होण्याची अनेक कारणे आहेत. कुठल्याही व्यक्तीला आपल्या जीवनकाळात कधीही किडनी स्टोन होऊ शकतो.

  1. अनुवांशिकतेमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. असे स्टोन प्रामुख्याने ‘सिस्टीन’या घटकापासून तयार होतात.
  2. ऍसिडिक (जास्त क्षारयुक्त) लघवीमुळे किडनी स्टोन होऊ शकतात. लघवीतील यूरिक ऍसिडपासून हे स्टोन तयार होतात.
  3. आपण कसा आहार घेतो याचा देखील किडनीवर परिणाम होत असतो. शरिरात जर कॅल्शिअम ऑक्सलेटचे प्रमाण वाढले तर किडनीमध्ये स्टोन होतात.
  4. किडनीमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास किडनी स्टोनचा धोका असतो.
  5. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असेल तर लघवी योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी किडनीमध्ये स्टोन होतात.

किडनी स्टोनची लक्षणे

  • मळमळ आणि उलट्या होणे.
  • लघवी करताना ओटीपोटात त्रास होणे.
  • कधी-कधी लघवीवाटे रक्त येणे.
  • लघवीला तीव्र वास येणे.
  • ओटीपोटात आणि कंबरेमध्ये तीव्र वेदना होणे.

मानवी शरीरातील किडनीचे कार्य आणि महत्त्व

प्रत्येक व्यक्तीला दोन किडन्या असतात आणि त्यांची कार्ये देखील समान असतात. मात्र, सर्वसाधारणपणे बहुतेक लोक केवळ एका किडनीसह देखील जगू शकतात.



आपल्या शरीरातील सुमारे २५ टक्के द्रवपदार्थ हे हानिकारक असतात. आपले रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये स्थित आहे. किडनी आपल्या रक्तातून विषारी आणि हानिकारक रसायने फिल्टर करतात. आपल्या किडनी जर निरोगी असतील तर रक्तप्रवाहामधून योग्य प्रमाणात विषारी घटक वेगळे होतात.

किडनी स्टोनवर बिअर खरचं उपयुक्त आहे का ?

काही तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात, असे दिसून आले आहे की योग्य प्रमाणात बिअर पिल्याने किडनी स्टोनवर फायदा होतो.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

बिअर हा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ती पिल्याने आपल्याला लघवी होण्यास मदत होते आणि लघवीवाटे किडनीतील लहान स्टोन बाहेर पडतात.

आता यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बिअरचे योग्य प्रमाण किती असावे? प्रत्येकासाठी याच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात. मध्यम प्रमाणात मद्यपान करणे म्हणजे काय याची जाणीव असणे आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्यामते स्त्रियांनी दिवसातून एकापेक्षा जास्त आणि पुरुषांनी दोनपेक्षा जास्त ड्रिंक्स घेऊ नयेत. बिअरचा सर्व्हिंग आकार सुमारे १२ औंस (बिअर मोजण्याचे एकक) असावा.

किडनी स्टोन असेल तर जास्तीत जास्त द्रव पदार्थ सेवन करणे आवश्यक असते. बिअर काही प्रमाणात मदत करते मात्र, याच्या अतिसेवनाचे मोठे दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात. कारण बिअरमुळे किडनीवरती प्रेशर येऊन जास्त लघवी होते. जर अतिजास्त प्रमाणात लघवी झाली तर व्यक्तीच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. असे वारंवार झाल्यास उलट परिणाम होऊन किडनीमध्ये आणखीन स्टोन होण्याची देखील शक्यता असते.

बिअरच्या अतिसेवनामुळे अनेकांना लठ्ठपणाचा देखील सामना करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला किडनी स्टोन नसेल मात्र, भविष्यात स्टोन होऊ नये यासाठी जर तुम्ही मद्यपान करत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते.

बिअरमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड असते. त्यामुळे अनेकदा हार्टबर्नची देखील स्थिती उद्भवते.

बिअरमधील घटक

सगळ्या प्रकारची बिअर धान्य, हॉप्स (मादक फुल), यीस्ट आणि पाण्यापासून बनविली जाते. साधारणपणे बिअरमध्ये काही विशिष्ट बी जीवनसत्त्वे, खनिजे, पॉलीफेनोल्स आणि फायबर असतात. या घटकांचे प्रमाण वेगवेगळ्या बिअरमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालावर आणि ती कशी तयार केली जाते यावर अवलंबून असते. यामुळे योग्य प्रमाणात बिअर सेवन केल्यास त्याचे काही आरोग्यदायी फायदे नक्कीच आहेत.

मात्र, केवळ बिअरच्या सेवनाने किडनी स्टोन बरा होत नाही. त्यासाठी डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन आणि औषधांची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे किडनी स्टोन झालाय म्हणून नुसती बियर पिण्याचा विचार करत असाल तर तिथेच थांबा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या डेड सेलिब्रिटीजची अजूनही चालू असलेली कमाई ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील

Next Post

कुष्ठरोगावर औषध बनवणाऱ्या संशोधिकेपासून तिच्या कामाचं श्रेय हिरावून घेतलंय

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

कुष्ठरोगावर औषध बनवणाऱ्या संशोधिकेपासून तिच्या कामाचं श्रेय हिरावून घेतलंय

या कारणासाठी ऑलम्पिकमधून क्रिकेटला वगळलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.