The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

by द पोस्टमन टीम
14 October 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“Doing what needs to be done may not make you happy, but it will make you great,” जॉर्ज बर्नार्ड शॉचं हे वाक्य कदाचित अनेकांना पटणार नाही. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती करून काय फायदा? त्यातून आपल्याला आयुष्यभर समाधान मिळणारच नाही, असे विचार अनेकांच्या मनात येतील. मात्र, कधी-कधी आपली गरज आपल्या आनंदापेक्षा जास्त मोठी असते. अशा परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसली तरी गरज म्हणून ती करावी लागते.

फ्रेड डीलुका या तरुणानं देखील गरज म्हणून अशीच एक गोष्ट केली होती. त्याच गोष्टीनं त्याचं आयुष्य बदलून टाकलं. कधी काळी पैसे मिळवण्यासाठी झगडणारा फ्रेड पैशाच्या राशीत लोळू लागला. कोण होता हा फ्रेड डीलुका आणि त्यानं नेमकं असं काय केलं की, तो इतका श्रीमंत झाला.

तुम्ही ‘सबवे’ नाव ऐकलंय? नक्कीच ऐकलं असेल. विशेषत: ज्यांना सँडविच आणि आलू पॅटी खाण्याची आवड आहे, ते तर सबवे रेस्टॉरन्टमध्ये कितीतरी वेळा गेले देखील असतील. याच ‘सबवे’ची स्थापना करण्याचं धाडस फ्रेड डीलुकानं केलं होतं. फ्रेड डीलुका आणि सबवे हे समीकरण कसं तयार झालं हे आपण पाहुया..

न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथे ३ ऑक्टोबर १९४७ रोजी फ्रेड डीलुकाचा जन्म झाला. कार्मेला आणि साल्वाटोर डीलुका हे त्याचे आई-वडील इटालियन-अमेरिकन वंशाचे होते. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वयाच्या दहाव्या वर्षी फ्रेड आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्कमधील ॲम्सटरडॅम भागात राहण्यासाठी गेला. तिथे त्याच्या आणि पीटर बकच्या कुटुंबाची मैत्री झाली. नंतर, मात्र, व्यावसायिक कारणांमुळं किशोरवयीन फ्रेडला आपल्या कुटुंबासह ब्रिजपोर्टला जावं लागलं. यादरम्यान त्यानं आपलं हायस्कूल शिक्षण पूर्ण केलं.



फ्रेडला डॉक्टर होण्याची इच्छा होती. एका विद्यापीठातून त्याला प्रवेशासाठी बोलवण्यात देखील आलं होतं. मात्र, त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने ॲडमिशन घेतलंच नाही. फ्रेडनं एका हार्डवेअरच्या दुकानात काम सुरू केलं. त्यातून त्याला पैसे मिळत. पण, त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते पैसे देखील अपुरे होते.

अशातच एक दिवस फ्रेड आणि त्याच्या कुटुंबाला पीटर बकनं आपल्या घरी जेवणासाठी बोलवलं. हा दिवस फ्रेडच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. आपल्या आर्थिक अडचणीबाबत फ्रेडनं पीटरला कल्पना दिली. आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या पीटरनं फ्रेड डीलुकाला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. यासाठी उसने पैसे देण्याची तयारी देखील त्यानं दर्शवली.

पीटर बकनं फ्रेडला १ हजार डॉलर्सचं कर्ज दिलं आणि सबमरीन सँडविच विकण्याची कल्पना दिली. आपली कल्पना नक्की यशस्वी होईल याची पीटरला खात्री होती. म्हणून त्यानं फ्रेडच्या व्यवसायात भागीदार होण्याची देखील तयारी दाखवली. या गोष्टीमुळं फ्रेड डीलुकाला हुरुप आला आणि त्यानं सँडविचचा व्यवसाय सुरू केला.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

लांब आयताकृती आकाराच्या बनमुळं त्याचं सँडविच नावीन्यपूर्ण ठरलं. १९६५ साली फ्रेड डीलुका आणि पीटर बक यांनी कनेक्टिकटमध्ये त्यांचं पहिलं सँडविचविक्री आउटलेट सुरू केलं. तेव्हा त्याला ‘पीट्स सुपर सबमरीन्स’ असं नाव दिलं होतं. या नवउद्योजकांना सुरुवातीला संघर्ष करावा लागला. व्यवसाय सुरू करून फ्रेडच्या खिशात केवळ ६ डॉलर शिल्लक राहिले.

मात्र, तरीही आशावादी असलेल्या पीटर बकने दुसरं रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी फ्रेडला प्रोत्साहन दिलं. त्यांनी आणखी दोन रेस्टॉरन्टस् सुरू केले आणि आपल्या व्यवसायाचं नाव बदलून ‘सबवे’ ठेवलं. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची गाडी सुसाट धावू लागली. पहिल्या वर्षाअखेरीस या जोडीनं ७ हजार डॉलर्सचा नफा कमावला. मिळालेल्या पैशाच्या मदतीनं फ्रेड डीलुकानं आपलं शिक्षण सुरू ठेवलं.

मानसशास्त्राचा पदवीधर असलेल्या फ्रेड डीलुकामध्ये एका महत्त्वाकांक्षी उद्योजकाचे गुण होते. आपल्या व्यवसायात सुरुवातीला यश मिळवल्यानंतर १० वर्षांच्या आतच त्यानं ३० रेस्टॉरन्टस् उघडण्याची योजना आखली होती. मात्र, त्याचा अंदाज चुकला. १९७४ पर्यंत पीटर-फ्रेड जोडीनं कनेक्टिकटमध्ये १६ ‘सबवे’ रेस्टॉरन्टस् सुरू केले. सर्व १६ ठिकाणचा कारभार एकसंध ठेवण्यात आणि सेम स्टँडर्ड्स  मेंटेन करण्यात अडचणी येऊ लागल्या.

यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या बिझनेस मॉडेलची फ्रेंचाइजी सुरू करण्याचा निर्णय घेतला. फ्रेड डीलुकाला विश्वास होता की, भविष्यात ‘फ्रेंचायझिंग’ला महत्त्व येणार आहे. त्यानं आपला मित्र ब्रायन डिक्सनला न्यू हेवनमधील वॉलिंगफोर्डमध्ये पहिली सबवे फ्रँचायझी घेण्यास राजी केलं. त्याच वर्षी सबवेच्या आणखी १४ फ्रँचायझी उदयास आल्या. उच्च दर्जाचे पदार्थ, ताजे अन्न आणि ग्राहकांचं समाधान या गोष्टी सबवे फ्रँचायझी नेटवर्कचा कणा होता. फ्रेडनं आपल्या व्यवसायात KISS (कीप इट सिंपल स्टुपिड) या सिद्धांताचं पालन केलं.

फ्रँचायझी सुरू केल्यानंतर फ्रेडचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात विस्तारला. १९७८ साली सबवेचं शंभरावं स्टोअर उघडलं गेलं. फास्ट-फूड क्षेत्राच्या एका मोठ्या भागावर सबवेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. कारण त्याचं उत्पादन इतरांच्या तुलनेनं निरोगी मानलं जातं. बर्गरला पर्याय म्हणून सबवेनं आपल्या स्टोअरमध्ये ब्रेड बेक करायला सुरुवात केली. पुढे ८० आणि ९०च्या दशकात सबवेची घोडदौड वेगाने सुरूच राहिली.

१९८४ साली कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यावर असलेल्या बहरीन बेटावर सबवेनं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय आउटलेट सुरू केलं. १९८७ साली सबवेने मैलाचा दगड गाठला. त्यावर्षी सबवेचं एक हजारावं स्टोअर सुरू झालं होतं. पुढील १० वर्षांत कंपनीचे अमेरिकेत १० हजारपेक्षा जास्त स्टोअर्स होते. त्याच वर्षी सबवेने हाँगकाँग, इटली, नॉर्दर्न आयर्लंड, नॉर्वे, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये आपलं पहिलं रेस्टॉरंट उघडलं.

सबवेनं अगदी अमेरिकन नेव्हीच्या जहाजांवर देखील आउटलेट सुरू करण्याची किमया करून दाखवली. त्यासाठी फ्रेड डीलुकानं अमेरिकन नेव्हीसोबत करार केला. लष्करी तळावरील पहिले स्टोअर १९८९ साली सुरू करण्यात आलं. हवाईतील पर्ल हार्बर स्टेशनवर हे स्टोअर होतं. १९९७ पर्यंत अमेरिकन सैन्याच्या १७ तळांवर सबवे रेस्टॉरन्ट्स कार्यरत होती. 

सध्या सबवे, जगातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरन्टस् ब्रँडपैकी एक आहे. ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करते. जगभरात ४४ हजारपेक्षा जास्त आणि अमेरिकेत २६ हजारपेक्षा जास्त सबवे फ्रँचायझी आहेत.

१५ जुलै २०१३ रोजी डीलुकाला ल्युकेमिया झाल्याचं त्यानं जाहीर केलं होतं. १४ सप्टेंबर २०१५ रोजी फ्लोरिडातील लॉडरडेल लेक्स येथे फ्रेड डीलुकाचा मृत्यू झाला. फ्रेड डीलुकानं आपल्या मृत्यूपर्यंत सबवेचा कारभार सांभाळला. त्याच्या व्यवसाय कौशल्यामुळं त्यानं वयाच्या १७व्या वर्षी सुरू केलेलं सबवे जगभरात पोहचवलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

Next Post

इस्रायलमधील मुलांना १००० वर्ष जुनी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची नाणी सापडली आहेत..

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

इस्रायलमधील मुलांना १००० वर्ष जुनी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची नाणी सापडली आहेत..

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.