The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

by Nitten Gokhaley
23 January 2026
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतात सेलिब्रिटींपासून सामान्य माणसापर्यंत सर्व वयोगटांमध्ये टॅटूचे आकर्षण वाढत आहे. धार्मिक असो किंवा रोमँटिक टॅटू (गोंदण), तुम्हाला दररोज कोणीतरी अंगावर टॅटू असलेली व्यक्ती दिसली तर नवल नाही. या आवडीमुळे आजकाल जवळपास प्रत्येक शहराच्या प्रमुख भागात टॅटू आर्टिस्ट स्टुडिओ असतो. अनुभवी तसेच शिकाऊ आर्टिस्ट सतत टॅटू काढताना व्यस्त दिसतात. तथापि, टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी शाई तब्येतीसाठी चक्क घातक ठरू शकते. आपण याबाबत काही महत्वाच्या पैलूंवर एक नजर टाकणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्तीवर होणारे परिणाम

भारतात, अंदाजे ३ ते १० टक्के लोकांच्या शरीरावर कोणता ना कोणता टॅटू असतो. तथापि, युरोप आणि अमेरिकेत हा आकडा ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच युरोप आणि अमेरिकेत टॅटूमुळे होणाऱ्या परिणामांवर संशोधन होते. 

स्वित्झर्लंडमधील डेला स्विझेरा इटालियाना युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी टॅटूमध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या, लाल आणि हिरव्या शाईच्या विषारीपणावर एक अभ्यास अहवाल सादर केला. हा अहवाल नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झाला. एकूण निष्कर्षांवरून टॅटू काढण्याच्या प्रक्रियेचा रोगप्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो हे दिसून येते.

टॅटू काढताना त्वचेच्या खोल थरात शाई टोचली जाते. टॅटूच्या शाईतील कण त्वचेवरच राहत नाहीत. सुया त्वचेवर लहान छिद्रे पाडतात आणि शाईचे कण आत सोडतात. शाईतील रंगद्रव्य त्वचेच्या ऊतींपर्यंत पोहोचते. रोगप्रतिकारशक्ती ही शाईमध्ये असलेली रसायने आणि कण बाह्य कण म्हणून ओळखते व त्यावर ताबा मिळवण्याची प्रतिक्रिया सुरू करते. रोगप्रतिकारक पेशी हे पकडलेले रंगद्रव्य पचवू शकत नाहीत आणि पेशींचा मृत्यू देखील होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन टॅटूच्या आसपास सूज येते.



या अभ्यासात उंदरांचा चाचणीसाठी वापर करण्यात आला. टॅटू काढलेल्या उंदरांना अनेक महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. टॅटू काढल्यानंतर असे दिसून आले की शाईचे रंगद्रव्य इम्यून सिस्टिमच्या विविध भागात किमान दोन महिने साचून राहिले. त्यानंतर, रोगप्रतिकारशक्तीवरील परिणाम तपासण्यासाठी उंदरांना लस देण्यात आली. टॅटू असलेल्या उंदरांमध्ये लसीला कमकुवत प्रतिसाद दिसून आला. म्हणून, शास्त्रज्ञांच्या मते टॅटूमुळे होणारे दुष्परिणाम निश्चित करण्यासाठी आता मानवांवर मोठ्या संख्येने चाचण्या घेणे आवश्यक आहे.

भारतात वापरली जाणारी शाई

मार्च २०२५ मध्ये कर्नाटक (एफडीए) राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत टॅटूच्या शाईमध्ये २२ हानिकारक धातू असल्याचे आढळून आले. यात सेलेनियम, क्रोमियम, आर्सेनिक, प्लॅटिनम, रंगद्रव्ये, जड धातू, जीवाणू आणि बुरशी आढळल्याचे कर्नाटक एफडीएने सांगितले.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

धक्कादायक बाब ही आहे की, शाईत असलेली काही रंगद्रव्ये प्रिंटर टोनर, वाहनांवर दिले जाणारे रंग आणि प्लास्टिकमध्येही वापरली जातात. त्यांचे औद्योगिक उपयोग आहेत आणि ते टॅटू बनवताना मानवी त्वचेत टोचण्यासाठी नाहीत. काही प्रकारच्या शाईमध्ये शिसे, कोबाल्ट, निकेल आणि इतर जड धातूंचे अंशही आढळतात. हे घटक विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, तसेच मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर प्रतिकूल परिणाम करतात.

आदिवासी भागात देखील पिढ्यानपिढ्या अंगाच्या विविध भागांवर गोंदण काढले जाते. त्यातही रसायनांचा वापर होत असे का? पारंपरिकपणे आदिवासी जमाती नैसर्गिक शाईचाच वापर करत असत. ही शाई जळलेले लाकूड, वनस्पती किंवा राळेपासून तयार केलेली काजळी, पाणी, वनस्पतींचे अर्क, तेल किंवा प्राण्यांच्या चरबीत मिसळून तयार केली जात असे.

आरोग्याच्या इतर समस्या

टॅटूमुळे आरोग्याच्या इतर समस्या होण्याबाबत काही ठोस पुरावे आहेत का? जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थच्या ऑक्टोबर २०२१ आवृत्तीत प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात याबद्दल बरीच माहिती दिली आहे. यामध्ये इटालियन संशोधक अलेस्सांद्रो सिंदोनी, फेडरिका व्हॅलेरियानी, फ्रांसेस्का गॅले, जॉर्जियो लिगुओरी, व्हिन्सेंझो रोमानो स्पिका, मॅटेओ व्हिटाली आणि कार्मेला प्रोटानो यांचा सहभाग होता.

संशोधनाच्या निष्कर्षांवरून हे दिसून येते की अंगावर टॅटू काढलेल्या व्यक्तींना जिवाणू संसर्ग तसेच त्वचेचे रोग आणि दाहक विकारांचा (इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर्स) सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे, या दुष्परिणामांची प्रकरणे दुर्मिळ मुळीच नाहीत. अर्थात, अंगावर टॅटू काढून घेतल्यास दुष्परिणामांना सामोरे जाण्याची अधिक शक्यता असते. या अभ्यास अहवालातून लेखकांनी प्रत्येक देशातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना टॅटू कलाकार आणि ग्राहक दोघांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सांगितले आहे.

वैद्यकीय प्रक्रियांवर भविष्यात होणारे परिणाम

टॅटू कोरून घेण्याआधी भविष्यात वैद्यकीय प्रक्रियांवर होणाऱ्या परिणामांचाही विचार करणे गरजेचे आहे. टॅटूमध्ये धातूंचे अंश असलेली शाई एमआरआय स्कॅन दरम्यान अडथळा निर्माण करू शकते. शरीरावर टॅटू काढल्यानंतर संसर्गाचा धोका असल्यामुळे काही महिने रक्तदान करता येत नाही. व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार किंवा रोगप्रतिकारशक्तीशी निगडित आजार असल्यास मोठे टॅटू काढण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले जाते.

टॅटू काढल्यानंतर होणारा पश्चात्ताप

टॅटू काढल्यानंतर अनेकांना पश्चात्ताप होतो. एका अभ्यासानुसार, अमेरिकेत २३% टॅटू असलेल्या व्यक्तींना काही दिवसांत आपला टॅटू काही कारणांमुळे आवडेनासा होतो. कधी-कधी नोकरीच्या ठिकाणचे नियम, गर्ल-फ्रेंडशी भांडण, लग्न किंवा सामाजिक दबावामुळे टॅटू काढल्याचा पश्चात्ताप वाढतो. टॅटू काढून टाकण्याकरीता लागणारी लेझर ट्रीटमेंट महाग व  वेदनादायी असते.

महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होईलच असे नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्वचेवर डाग राहू शकतात. यामुळे मानसिक ताण आणि निराशा निर्माण होते.

निष्कर्ष काय?

भारतीय टॅटू मार्केट दरवर्षी पंधरा टक्के दराने वाढत आहे. आपला देश टॅटूसाठी आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणारा बाजार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे, राज्य आणि केंद्र सरकारने टॅटूमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईचे नियमन करण्यासाठी त्वरित एक धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे.टॅटू प्रेमींनी देखील नामांकित टॅटू कलाकाराची निवड करावी. तसेच, टॅटू बनवण्याआधी धोकादायक रसायनांपासून मुक्त असलेल्या शाईचा वापर होत असल्याची खात्री करणे देखील आवश्यक आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.