The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसा आहे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’..?

by सोमेश सहाने
15 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


रेशीम किडा आयुष्यभर रेशीम स्वतःभोवती गुंडाळत राहतो आणि शेवटी त्या कोशातच त्याचा मृत्यू होतो. त्या किड्याच्या जगण्याचं कारणच त्याला त्याच्या मृत्यूच्या जवळ नेतं, पण त्याआधी तो त्याच्या अस्तित्वाचा सुंदर वारसा ठेऊन जातो. मला वाटतं या उदाहरणात “गुलाबो सिताबो”चा अर्क आहे. 

पण फक्त अर्कच आहे. यातलं जग मात्र या सिनेमाच्या शीर्षकात नीट बांधलंय. चित्रपटातील पात्र गुलाबो आणि सिताबो या भातुकलीच्या खेळातील सतत भांडणाऱ्या दोन पात्रांसारखी भांडत असतात. अर्थात त्यांच्या दोऱ्या पकडणारं पात्र एका वेगळ्याच जगातून त्यांचा हा खेळ बघत असतं. अशी बरीच रूपकं असली तरी यांची मांडणी खूप सरळ साधी आणि म्हणजेच एका अर्थाने खूप “लोकल” पद्धतीची आहे.

फातिमा महल नावाची जुनी हवेली. त्याचे मालक आणि तिथं राहणाऱ्या तितक्याच जुन्या भाडेकरूंची ही कथा लखनऊच्या अस्सल लोकजीवनाची सफर घडवतात. हवेलीच्या मालकीन बाईचे पती मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि भाडेकरू (आयुषमान खुराना) यांच्यात सतत उडणारे खटके पार पुरातत्व विभागापर्यंत जातात आणि हवेली वाचवायच्या शर्यतीत भाडेकरू आणि मिर्जा यांचे दोन गट पडतात. 

वरवर ही गोष्ट हवेली वाचवायला काही लोभी लोकांची शर्यत वाटते पण संथ गतीने यातली रूपकं उलगडत जातात आणि अधिक मोठ्या परिपेक्षात जाणारं वास्तव समोर येतं. अर्थात मूळ प्लॉटमध्ये आपल्याला नीट इंटरेस्ट यायला जरा वेळ लागतो पण तोपर्यंत सुरू असणाऱ्या घटना आणि येणारी पात्र बोर होऊ देत नाही. 



जसं बरेली की बर्फीमध्ये एका छोट्या शहरातलं लोकजीवन, तिथली संस्कृती आपल्यासमोर व्यवस्थित उलगडत जाते तसंच इथं ‘नवाबो का शहर’ लखनऊची आजवर प्रसिद्धी न मिळालेली बाजू आपल्याला दिसते. 

जुन्या हवेलीमधल्या कुजक्या भिंती, जूनं फर्निचर, अंधाऱ्या खोल्या आणि या जुन्यात नवा श्वास शोधायचा प्रयत्न करणारी तिथले लोक फार काही होत नसतानाही बघत रहावीशी वाटतात.
ट्रेलरमधून दिसणारं विनोदी वातावरण हे फक्त चित्रपट सुरू करण्यासाठी उद्युक्त करतं पण चित्रपटात खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी रूढार्थाने विनोदी नाहीत. किंबहुना चित्रपट रंगात यायला, प्लॉट गतीने पुढे जायला जरा वेळ लागतो. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सिनेमागृहात आपल्याला या “स्लो बर्न” प्रकाराचं काही वावगं वाटलं नसतं पण ऑनलाइन बघत असल्याने फास्ट फॉरवर्ड करणे किंवा तो बंद करून दुसरा सिनेमा लावणे या सहज स्वभावामुळे तुम्ही एक चांगली कथा मिस करू शकता. 

फक्त हेच नाही तर अंधाऱ्या खोल्या, लखनऊची भव्यता, हवेलीमधली सामानाची गर्दी, या सगळ्या गोष्टी मोठ्या पडद्यावर बघितल्या असत्या तर कला दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीबद्दल आपल्याला वेगळ्याने बोलावं लागलं असतं. 

अमिताभचा दिग्दर्शक सुजित सरकार बरोबर हा चौथा चित्रपट आहे. या दशकात पिकूनंतर हा बिग बी’चा सर्वोत्तम अभिनय म्हणावा लागेल. स्वतःची उंची आणि भारदस्त आवाज ही बलस्थानं सोडून त्यांनी अभिनयात एक वेगळंच बलस्थान उभारलंय. या पात्रामुळं त्यांची यंग अँग्री मॅन सोडून एक वेगळी ओळख तयार होईल. 

आयुषमान त्याच्या नेहमीच्या पात्रात आहे त्यामुळं त्यात अपेक्षित दर्जा दिसतो पण प्रत्येक पात्रात आयुषमान स्वतःच्या भाषेवर आणि देहबोलीवर जे काम करतो त्यालाही महत्व द्यावं लागेल. दिल्ली बॉय, बरेली, कोलकाता, युपी आणि लखनऊ इथल्या लहेज्यात असणारा बारीक फरक तो अभिनयात आणतो. मुळात लेखिका ‘जुही चतुर्वेदी’ स्वतःच्या सगळ्याच चित्रपटात भाषेवर विशेष लक्ष देते. फक्त त्या शहरात राहिलेले लोकच जे शब्द वापरतात ते शब्द तिच्या लिखाणात येतात आणि शुटींग दरम्यानही ती सेटवर असते त्यामुळं बरोबर लहेजा पकडण्यात ती योगदान देते. 

उगाच लखनऊ आहे म्हणून मध्येमध्ये बाजीराव मस्तानीत मराठी शब्द सांडतात तसे “मियां” वगैरे शब्द इथं सांडत नाहीत. अशात फक्त “सोनचिडीया” चित्रपटात भाषेवर एवढं काम केलेलं आठवतंय.

पण सिनेमातला मुख्य चार्म, फातिमा बेगम – फारुख जफर ही आहे. 85 वर्षीय अभिनेत्रीने या वयातही ताकदीचा अभिनय केलाय. आयुष्य संपत असताना त्यांच्या वाट्याला समाजमान्य चौकटीत न बसणाऱ्या एका स्वावलंबी स्त्रीची भूमिका आली, जी सिनेमातल्या इतर महिला कलाकारांना स्वतःच्या विशीत, तिशीतच करता आली. या विकसनशील दृष्टिकोनातून महिलांकडे बघण्याची दृष्टी सिनेमाला समृद्ध करते. यातलं प्रत्येक महिला पात्र चौकट तोडणारं आहे. निर्माते मोरल टेस्ट न देता या पात्रांचं सहज अस्तित्व दर्शवतात. 

प्लॉट होल्स बरेच आहेत. बऱ्याच घटना दाखवायचं कारण शेवटपर्यंत कळत नाही. फक्त पात्र साकारायला केलेल्या गोष्टी सोडूनही बराच भाग वगळता आला असता. हीच स्क्रिप्ट सुजित सरकार सोडून इतर कुठल्या दिग्दर्शकाच्या हातात दिली असती तर करण जोहरने रडका अंत केला असता, अनुरागने नैराश्यात नेलं असतं, किंवा अजून कोणी काही तरी भव्य एन्ड देऊन सिनेमा सुपरहिट केला असता. 

पण चांगल्या विक्रीसाठी स्वतःची कलात्मक दृष्टी सोडतील ते सुजित सरकार आणि जुही चतुर्वेदी कसले? म्हणून काहीतरी प्रचंड विनोदी, रोमांचकारी बघायची अपेक्षा न ठेवता उत्तम दर्जाचा सिनेमा, लखनऊचं वेगळं विश्व अनुभवायला हा सिनेमा नक्की बघा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गोरे विद्यार्थी माझ्याकडे जनावर असल्यासारखं पहायचे – पहिल्या अश्वेत विद्यार्थ्याची कहाणी

Next Post

अझरबैजान या मुस्लीम राष्ट्रातील एका मंदिरात संस्कृत शिलालेख कसे काय आहेत?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अझरबैजान या मुस्लीम राष्ट्रातील एका मंदिरात संस्कृत शिलालेख कसे काय आहेत?

देश कोरोनाशी लढत असताना काश्मीरमध्ये आपल्या जवानांनी एक महत्वाचं ऑपरेशन केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.