The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘फॅमिली मॅन सीजन २’ बघून अमेझॉन प्राईमच्या वर्षभराच्या सब्स्क्रिप्शनचे पैसे सार्थकी लागले..!

by सोमेश सहाने
2 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“कट्टपाने बाहुबली को क्यो मारा?” नंतर सर्वाधिक व्हायरल झालेला प्रश्न होता, “लोणावळा में क्या हुआ?”

‘फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिजनची वाट बघताना खरंतर हे तर समजलं की ही सिरीज फक्त यातल्या क्लिफ हँगर्समुळेच मोस्ट अवेटेड नाहीये, कथेतले बारकावे, वास्तववादी घटना, सामान्य लोकांतला नायक, भक्कम फॅमिली ड्रामा, या सगळ्या सिरीजच्या अपेक्षित घटकांचा अनपेक्षित दर्जा यामुळे ही सिरीज कल्ट झाली होती. मनोज वायपेयीच्या दर्जेदार अभिनयामुळे ‘श्रीकांत’च्या पात्राला स्क्रीनवर बघायला प्रेक्षक आतुर होतेच आणि फायनली ४ जून २०२१ रोजी सिजन 2 प्रदर्शित झाला.

१९९१ साली धनु नावाच्या महिलेच्या मदतीने श्रीलंकेच्या एका संघटनेने सुसाईड बॉं*म्बिग करून भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची ह*त्या केली. भारताच्या गुप्तचर यंत्रणेचं हे मोठं अपयश मानलं जातं. ‘फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिजनमध्ये याच घटनेची पुनराववृत्तीसारख्याच वातावरणात पण काळ बदलून साकारली आहे.

याआधीच्या ७ दशकांमध्ये झालेल्या चुकांचं ओझं आणि त्यामुळे वाढलेली ताकद यांच्या बळावर भारतातील गुप्तचर यंत्रणा पंतप्रधान बासू यांना वाचवायचे प्रयत्न करत असतात. पाकिस्तानी द*हश*तवादी आणि श्रीलंकन उग्रवादी यांच्या एकत्र येण्याने धोका वाढलेला असतो.

आपला नायक श्रीकांत तिवारी पहिल्या सीजनमधल्या गोंधळानंतर ही नोकरी सोडून एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ९ ते ५ चा टिपिकल जॉब करत असतो. ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व प्रयत्न करूनही श्रीकांत त्याच्या परिवाराला सुखी ठेऊ शकत नाहीये आणि यातून त्याचं हे अपयश जणू लपवायला म्हणून तो पुन्हा टास्कमध्ये परत जातो.



दिल्लीतल्या अपयशाप्रमाणे इथंही श्रीकांत कमी पडेल का? एवढं सगळं होत असताना त्याचा परिवार त्याला साथ देईल का? त्याच्या परिवाराला त्याच्या कामाबद्दल समजेल का? पंतप्रधान वाचतील का? सिजन 2 म्हणजे या सगळ्या भयंकर एंगेजिंग प्रश्नांची उकल.

दुसरा सिजन बघितल्यावर पहिला सिजनमधल्या गोष्टी फक्त बिल्टअप वाटायला लागतात, इतका जास्त दुसरा सिजन हॅपनिंग आहे. मुळात सिरीज फॉरमॅटचंच हे एक वैशिष्ट आहे की पात्रांची ओळख झालेली असते त्यामुळे त्यात वेळ जात नाही आणि मुळ कथेला जास्त वळणं देता येतात. इथे फक्त नायकच नाही तर खलनायकांच्या पात्रांनाही रुळायला चांगला वेळ मिळालाय आणि म्हणून वाढणारे धोकेसुद्धा जास्त लेयर्ड दाखवता आले आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मागच्या सिजनमधील खलनायकांची भूमिका खूपच एकांगी द*हश*त पसरवणारी आणि बदला घेणारी होती. आता मात्र श्रीलंकन तमिळ लोकांवर झालेले अ*त्याचार, वेगळ्या राष्ट्रासाठी त्यांचा चाललेला संघर्ष या सगळ्यांची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या हिं*सेला, विरोधाला एक जस्टीफिकेशन मिळतं. हा विरोध द*हश*तवादासाठी नाही तर स्वातंत्र्य लढ्यासाठीची क्रांती म्हणून सुरू असतो. यामुळे लढणारे ‘क्रांतिवीर’ ठरतात.

यातूनच घडलेलं पात्र म्हणजे राजलक्ष्मी उर्फ राजी. यातलं एक पात्रं म्हणतं की,

“तुला अ*त्याचारातून सोडवलं तेव्हापासून तुझ्या डोळ्यात पेटलेली क्रांतीची आग मला अजूनही तशीच दिसते”. प्रेक्षकांनाही ती आग तशीच अस्सल, एकसारखी, उग्र संपूर्ण ९ एपिसोड्समध्ये दिसते.

समांथा हिने या पात्राच्या तळाशी जाऊन ही आग डोळ्यात आणायला किती प्रयत्न केले असतील याची कल्पना अभिनयाचं तंत्र माहीत असणाऱ्यांनाच खरी कळेल. बॉलिवुडमधल्या कुठच्याच “ए-लिस्ट” अभिनेत्रीने असं पात्र स्वीकारण्याची हिम्मत केली नसती. समांथाने फक्त ती तीव्रताच नाही तर स्टंट, संवाद, देहबोली या सगळ्याच अंगाने इतकं उजवं काम केलंय की आपण मनोज वाजपेयी इतकंच तिलाही स्क्रीनवर मिस करायला लागतो. सिजन 2 पूर्णपणे समांथाचाच.

श्रीकांतला पहिल्या सिजनमध्ये मुलीच्या शाळेतल्या तक्रारी, व्यसनामुळे शरीराला होणारा त्रास, बायकोच्या तक्रारी यातून वाट काढत देश वाचवायचा असतो. दुसऱ्या सिजनमध्ये त्याच्या त्रासाची तीव्रता आणि क्लिष्टता अजूनच वाढते. फॅमिली लाईफसाठी जे अपेक्षित असतं ते सगळं करून देखील गोष्टी ठीक होत नसतात. देश वाचवायला केलेल्या अपरिहार्य हिं*सेतून आलेली स्वतःची घृणा, त्यातल्या चुकांचं ओझं, सहकाऱ्यांच्या बलिदानाचं ओझं यातून मुळात आपण जे करतोय त्याने खरंच काही चांगला फरक पडतोय का? इथपर्यंतचा गोंधळ घेऊन तो काम करत असतो.

देश वाचवणारा हुशार एजंट हीच त्याची कथेतली ओळख असली तरी प्रेक्षकांना त्याखाली दडलेला हा वैयक्तिक त्रासही माहीत असतो. म्हणून श्रीकांत जेव्हा फायनली खुश हसतो तेव्हा आपल्याला पण भरून येतं. त्यासोबतच त्याची बायको सूचीसुद्धा मानसिक त्रासासाठी ट्रीटमेंट घेत असते. तिची चूक नसताना आलेला अपराधीपणा, परिवाराला एकत्र खुश ठेवताना तिची वाढणारी शांतता आपल्याला बॉ*म्ब ब्लास्ट इतकीच भयानक वाटेल याची दक्षता लेखकांनी घेतलेली दिसते.

जे. के. च्या पात्राला या सिजनमध्ये खोली मिळते, त्याच्या मैत्रीचं गांभीर्य या सिजनमध्ये समजतं. ऍस्पिरंट्स या प्रसिद्ध सिरीजमधील संदीप भैय्याचा रोल साकारणारा सनी हिंदूजा यात मिलिंद या एजंटच्या रोलमध्ये दिसतो. दोन्ही सिरीजमध्ये अथक प्रयत्न आणि कसल्यातरी गिल्टचं ओझं त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं, मुळात तसे डोळे असणाऱ्या कलाकाराचंच कास्टिंग केल्यामुळे ती भावना खूप समर्पक प्रकारे पोहोचवता आली आहे. या सिरीजनंतर तर असं म्हणावं लागेल की “if guilt has eyes they belong to this artist”.

सगळ्याच पात्रांना काही न काही डबल स्टोरी, गुंता आहेच. पण “रॉ”चे प्रमुख, द*हश*तवाद्यांचा सूत्रधार मेजर समीर आणि पंतप्रधान बासू या पात्रांना अजून एक लेयर जोडायला हवी होती.

सिजन 2 चं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे यात फक्त कथा दाखवली नाहीये तर छोट्या छोट्या मोमेंट्समधून मानवता, देशभक्ती, क्रांती, राजकारण, शारीरिक अ*त्याचार अशा विषयांवर एक सॉफ्ट समीक्षा केली गेली आहे. दुखापतग्रस्त बेशुद्ध एजंटच्या खिशातला मोबाईल मारणारा माणूस, वैयक्तिक बदला घेण्यात क्रांतीची ‘प्रेरणा’ देणारे नेते, मोठ्या हितासाठी छोटे बलिदान देणारे राजकारणी, कसलीच चिंता न करता देशासाठी प्राण देणाऱ्या एजंट्सला देशातर्फे मिळणारा अत्यंत कमी मोबदला, निर्वासितांना माणूस म्हणून जगायला करावा लागणारा संघर्ष, असं खूप काही यात कौशल्यपूर्णपणे आणि योग्य संवेदनानांसह दाखवलं आहे.

Extraction या भयंकर सुंदर हॉलिवूड ऍक्शन थ्रिलरमध्ये एक अभूतपूर्व सिंगल टेक आहे. अगदी फायरिंगपासून तर हँड टू हँड काँबॅक्ट ते पार पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारेपर्यंत सगळं एकाच टेकमध्ये होतं. फॅमिली मॅन सिजन 2 मध्ये या हॉलिवूडच्या स्मार्ट मूव्हला तितकंच भारी भारतीय उत्तर दिलं आहे.

एका गावातल्या पोलीस स्टेशनमधून आपल्या नेत्याला वाचवायला गावातील समर्थक अद्ययावत ह*त्यारं घेऊन ह*ल्ला करतात. पोलीस स्टेशनमध्ये श्रीकांतसोबत 2 एजंट्स आणि काही कॉन्स्टेबल्स असतात. इथे पोलीस स्टेशनच्या आतून बाहेर, मग बाहेरून आत, वरच्या मजल्यावर आणि मग तिथल्या गॅलरीतून सरळ खाली आणि पुन्हा वर असा संपूर्ण 5.30 मिनिटांचा हा ह*ल्ला सिंगल टेकमध्ये शूट केला गेलाय. तितकाच सुंदर क्ल्यायमॅक्सचा सिंगल टेक.

फॅमिली मॅनच्या टीमने फक्त कथा, अभिनय, बारकावे, संवेदना हेच नाही तर तांत्रिक बाबतीतही जगभरात अव्वल ठरेल अशी सिरीज बनवली आहे. सगळं काही वर्ल्ड क्लास असणारी ही सिरीज तुम्ही अमेझॉनवर बघाच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चारमिनारकडे पाहून मार्लबोरोला त्यांची जाहिरात स्ट्रॅटेजी बदलायला लागली होती

Next Post

काकाचा घात करून अल्लाउद्दीन सुलतान बनला आणि जगभर त्याच्या क्रौर्याचं तांडव सुरु झालं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

काकाचा घात करून अल्लाउद्दीन सुलतान बनला आणि जगभर त्याच्या क्रौर्याचं तांडव सुरु झालं

परदेशी खेळाडू आपल्याकडे येऊन IPL खेळतात पण आपले खेळाडू बाहेरच्या लीगमध्ये का खेळत नाहीत?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.