The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

च*रस, गां*जा आणि अ*फू हे अंमली पदार्थ भारतात येतात तरी कुठून..?

by Tushar Damgude
26 October 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अंमली पदार्थांचा व्यापार हा भारतातील अत्यंत जुन्या व्यापारांपैकी एक आहे. औषधांमध्ये वापरण्याबरोबरच काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांत देखील गां*जा, अ*फु, भां*गेचे सेवन करणे पुर्वापार आहे. गेल्या काही काळापासून या व्यापारावर स्मग*लर, संघटीत गुन्हेगार आणि दह*शत*वा*दी यांच्या अभद्र युतीने नियंत्रण मिळवले आहे. गेल्या वर्षी ड्र*ग व्यापाराबद्दल पुणे शहरात जोरदार चर्चा सुरु होती.

या व्यापारातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा जवळपास १५% हिस्सा कश्मीर, नागालॅंड, पंजाब येथील दह*शत*वा*दी आणि फुटीरतावादी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे अंमली पदार्थाचा एक झुरका देशद्रोह आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

अंमली पदार्थांच्या स्मग*लिंगसाठी अजमल कसाब आणि गॅंग आली तोच समुद्री मार्ग कित्येक शतकं वापरला जातो, आणि याच मार्गावरून मुंबई स्फो*टासाठी R*DX आले.

आधी किरकोळ प्रमाणात असलेले गां*जा, चर*सचे स्म*गलिंग १९८० च्या दशकात हेरॉ*ईनवर आले तेव्हा मात्र या प्रकाराची दखल सर्व स्तरावर घेतली गेली. भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग पुढीलप्रमाणे :

भारत-पाकिस्तान सीमा

अंमली पदार्थ विशेषतः हेरॉ*ईन (हलक्या दर्जाचे हेरॉईन म्हणजे ब्राऊनशुगर) पाकिस्तानातून भारतात येण्याचे महत्वाचे मार्ग म्हणजे पंजाब ,जम्मू-कश्मीर, राजस्थान आणि गुजरात. यामध्ये थरचे वाळवंट हा सोयीस्कर मार्ग. कारण अफु*ची शेती माळवा प्रांतात चालत असे तेव्हापासून हा कराची मार्गे चीनपर्यंत माल पोहोचवणारा पारंपारिक मार्ग आहे. अत्यंत विस्तीर्ण वाळवंट, कमी सुरक्षाव्यवस्था आणि लपण्यासाठी जागेची मुबलकता यामुळे स्म*गलरांचा हा आवडता मार्ग.



पाकिस्तानच्या साहिवाल, रहिमयारखान, सक्कर, खोखरापुर येथून आलेला हा माल भारतातील चुरु, सिकार, किशनगड, रामगड, बारमेर, जैसलमेर अशा ठिकाणांवरून पुढे दिल्ली-मुंबईसाठी रवाना होतो.

पंजाबमध्ये द*हश*तवाद जोरावर असताना अंमली पदार्थाचा व्यापार उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत होता. या व्यापारासाठी लाहोर, फाजिल्का, भटींडा, दिल्ली हा मार्ग वापरला जात होता. दुसरा मार्ग म्हणजे अटारी-वाघा बॉर्डर. (समझौता एक्सप्रेसमधूनसुद्धा हा माल येतो जातो असे बोलतात.) याचा परिणाम म्हणजे अमृतसर हे अंमली पदार्थाच्या व्यापाराचे महत्वाचे केंद्र बनले होते.

याशिवाय अजनाला, गुरदासपुर यासारखी सीमावर्ती ठिकाणं देखील या व्यापाराचे केंद्र बनली कारण कुंपणाच्या आत असलेली भलीमोठी शेतं, रस्ते आणि रेल्वेचे जाळे आणि सीमेवर असल्याचा फायदा अशी योग्य वातावरण निर्मिती याठिकाणी झालेली आहे.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

जम्मू-कश्मीरमध्ये अखनुर, सांब, सुंदरबनी, रजौरी वरुन पुंच जम्मू हायवेवरून पठाणकोट, गुरदासपुर, अमृतसर, फरीदकोट, जैसलमेर, अहमदाबाद आणि शेवटी मुंबई असा माल सप्लाय होतो. सीमेवरील सुरक्षा जेव्हा वाढवली जाते तेव्हा अफगाणिस्तानातून पाकिस्तान आणि पाकिस्तानातून (कराची) भारत (कच्छचे रण) असा समुद्रीमार्गाने माल येतो. त्यासाठी छोट्या-छोट्या बोटी वापरल्या जातात.

या व्यापारात दाऊद, नायजेरीयन, अफगाण, केनियन सिंडीकेट काम करतात. माल नेणाऱ्याला कुरीयर म्हटले जाते. शेतकरी, गावकरी, प्रवासी, उंट यांच्यामार्फत माल पाठवला जातो, तो माल अमृतसर, जयपूर, दिल्लीमध्ये नायजेरीयन किंवा केनियन सिंडीकेटकडे हस्तांतरीत केला जातो. त्यांच्याकडून देशांतर्गत तसेच अमेरिका, युरोप, कॅनडामध्ये पाठवला जातो. यासाठी पोस्टल तसेच कुरीयर सेवा देखील वापरली जाते.

नेपाळ-भूटान सीमा

चर*स आणि गां*जा यांचे स्म*गलिंग मुख्यतः नेपाळ आणि भूटानमधून चालते. येथून हा व्यापार अधिक सोप्या पद्धतीने चालतो कारण रस्त्यांचे जाळे आणि Open Border Policy. बिरगंज, रक्सॉल, मोतीहारीमधून पाटणा किंवा नेपाळगंज, बहारीच, बाराबंकिमधून लखनौ याशिवाय अजून दोन मार्गाने गां*जा, चर*स भारतात येतो. तेथून देशांतर्गत तसेच आलेला माल पुढे अमेरिका, युरोपमध्ये जातो.

म्यानमार सीमा

अ*फु भारतात येण्याचा मार्ग म्हणजे म्यानमार-भारत बॉर्डर. उपखंडात ९५% अ*फु उत्पादन करणारा देश म्हणजे म्यानमार. म्यानमारमधून न्यू सोमताल, सुगनु, चुडाचंदपुरमधून इंफाळ तसेच खिमान, बेहियांग, सिंघाट या मार्गा शिवाय होमलीन, कामजोंग मार्गाने ९०% माल भारतात येतो. याशिवाय काही माल मिझोराममध्ये देखील म्यानमार आणि बांग्लादेशातून येतो. अरूणाचल, नागालॅंड ही सीमावर्ती राज्य यातून सुटलेली नाहीत.

बांग्लादेश सीमा

बांग्लादेशातून भारतात हेरॉ*ईन, च*रस, गां*जा, अ*फुची जोरदार स्मग*लिंग चालते. भारतातील खोकल्यावरील कफ सिरपला बांग्लादेशात जोरदार मागणी आहे. पुन्हा एकदा येथेसुद्धा उत्तम वाहतुकीची साधनं, सिमेवरील लाचलुचपत वगैरे व्यवसायासाठी पोषक वातावरण जमून आलेले दिसते.

छोट्या-छोट्या बोटींचा, दळणवळणांच्या साधनांचा योग्य वापर श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशा विविध देशात कोलकत्ता, मुंबई, तमिळनाडु, कोची अशा देशांतर्गत विविध ठिकाणांवरून माल पुढे युरोप, अमेरिका खंडात पोहोचतो.

हवाई मार्गात हैदराबाद, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम, अमृतसर, दिल्ली, बेंगलोरचा वापर होतो. नायजेरीयन टोळी दिल्ली-लागोस-अदिसअबाबा तसेच मुंबई-लागोस-अदिसअबाबा रूट वापरते. बहुतांश आजारी रूग्ण म्हणून दाखल होणारे हे लोक अंमली पदार्थांचे कुरीयरच असतात.

विविध मार्गाने येणारे ७०% हेरॉ*ईन तसेच ४०% अ*फु पकडले जाते तरी त्याची देशात सर्वत्र होणारी सहज उपलब्धता यावरून एकूण येणाऱ्या मालाची आवक तुमच्या लक्षात येईल.

सद्य:परिस्थितीत गावखेड्यापर्यंत अंमली पदार्थांनी आपले जाळे टाकलेले आहे. कॉलेज, शाळा , वसतीगृहं, डिस्कोथेक आदी ठिकाणी याचे दलाल रोज नवीन गिऱ्हाईकं आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

सुरुवातीला किक देणारी ही नशा पुढे पुढे त्या माणसाला इतके बधीर करून टाकते की आपल्या वेगळ्याच विश्वात तो जगत रहातो. शारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी ही नशा सगळं कळत असून सुटत पण नाही. यासाठी आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा तुमचा परिचित, आप्त या व्यसनाच्या नादी लागलेला असू शकतो त्याला वेळीच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: DrugDrug Addiction
ShareTweet
Previous Post

हायजॅक झालेल्या विमानातील प्रवासी इस्त्राईलने सोडवून आणल्याची चित्तथरारक कथा

Next Post

ब्राह्मणाला शेतीतलं काय कळतं असं म्हणणाऱ्या समाजात शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते झाले

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

ब्राह्मणाला शेतीतलं काय कळतं असं म्हणणाऱ्या समाजात शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते झाले

नौदलाच्या अवघ्या २० सैनिकांनी सुरु केलेल्या उठावाने ब्रिटीश सत्ता खिळखिळी केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.