The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

by द पोस्टमन टीम
30 July 2024
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


किडनी स्टोनचा विकार हा अत्यंत वेदनादायी असतो. अगदी एखादा खडा झाला तरीही रूग्णाला त्या वेदनांनी जीव नकोसा होतो. पूर्वी हा खडा शरीरातून बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. आता तंत्रज्ञान प्रगत झालं असून लेझरद्वारे वेदनाविरहीत शस्त्रक्रिया करून हे खडे काढणं शक्य झालं आहे. पण कधी कधी एकाहून जास्त खडेही आढळतात.

कधी कधी काही घटना अशा घडतात की त्या ऐकल्यावर, ऐकावं ते नवलच असा विचार येतो. साधारण दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या धुळ्यात अशीच एक घटना घडली होती जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल –

शहरातील धनराज वाडिले हे सुपारी व्यावसायिक आहेत. त्यांना अचानक ओटीपोटात वेदना होऊ लागल्या. काही घरगुती आणि तातुरते उपाय करूनही या वेदना कमी होण्याची चिन्हं दिसेनात. उलट दिवसेंदिवस या वेदना वाढतच गेल्या. अखेर सहा महिने दुखणं अंगावर काढल्यानंतर त्यांनी तेजनाक्ष हेल्थकेअरमधील युरोलॉजिस्ट आशिष रावंदळे पाटील यांच्याकडे तपासणी करून घेतली. या तपासणीमध्ये असं आढळलं की धनराज यांच्या डाव्या मूत्रपिंडाचा पेल्वी यूरेटिक जंक्शन अडथळा आहे.

शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यानं धनराज यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. सर्व तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तपासणी केली असता मूत्रपिंडांत मोठ्या प्रमाणावर दगड असल्याचं आढळलं. ही शस्त्रक्रिया दोन डॉक्टरांनी केली आणि ती चार तास चालली. हे दगड प्रामुख्यानं ऑक्सलेट आणि कॅल्शियम फ़ॉस्पेट यापासून बनले होते आणि एक मिलीमिटर ते अडीच सेंटीमीटर इतके मोठे होते.



धनराज यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी तर झाली आणि ते लवकरच हिंडू फ़िरू लागले मात्र या एका शत्स्रक्रियेमुळे पुढे महिनाभर जास्तीचं काम करावं लागलं आणि हे काम करण्यासाठी हिरे मोजणार्‍यांना खास पाचारण करण्यात आलं होतं. असं काय घडलं होतं की धनराज यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभर हॉस्पिटलमध्ये एक विशेष काम चाललं होतं. या कामामुळे डॉ. आशिष यांची गिनिज बुकमधेही नोंद घेण्यात आली.

तर आता, साधारणपणे किडनी स्टोन असणार्‍या रूग्णांत चार पाच अगदी दहा दगडसुध्दा कधीकधी आढळतात. मात्र धनराज यांच्या मूत्रपिंडातून दहा पाच नव्हे तर तब्बल १ लाख ७२ हजार १५५ इतके खडे काढण्यात आले. हा एक प्रकारचा विश्वविक्रमच आहे.

शस्त्रक्रियेनंतर खड्यांची संख्या बघूनच डॉक्टरना अंदाज आला की हे नेहमीच्या कर्मचार्‍यांकडून होणारं काम नाही. त्यांनी हिर्‍यांची मोजणी करणार्‍या कारागिराला पाचारण केलं आणि हे खडे मोजायला सांगितले याचं कारण असं की नियमितपणे लहान मोठ्या आकरातील हिरे मोजून या कारागिरांची नजर सवयीची झालेली असते. अगदी बारीकसा खडासुद्धा यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. हॉस्पिटमधील एक डॉक्टर आणि हा कारागिर रोजचे तीन तास असा महिनाभर हा खडे मोजणीचा कार्यक्रम करत होते तेव्हा कुठे खड्यांची मोजणी संपली. यानंतर हे सर्व प्रकरण गिनिज बुक ऑफ़ रेकॉर्डकडे पाठविण्यात आलं आणि त्यांच्याकडून सर्व तपासण्या झाल्यानंतर या विक्रमाचं सर्टिफ़िकेट देण्यात आलं.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

आहे की नाही कमाल?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा माणूस इस्लामिक स्टेटच्या तावडीतून ५० हजारापेक्षा जास्त हस्तलिखितांचं रक्षण करतोय

Next Post

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.