The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुशांतचा शेवटचा ठरलेला “दिल बेचारा” हा चित्रपट कसा आहे हे जाणून घ्या

by सोमेश सहाने
25 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


कॅन्सरमुळे कधीही जीव जाऊ शकेल या भीतीने हताश आयुष्य पुढं ढकलणारी किझी बासू चित्रपटात म्हणते की, “आयुष्य रिऍलिटी शोमध्ये हरत जाणाऱ्यासारखं झालंय पण मध्येच कुठलं तरी कारण वाईल्ड कार्ड एन्ट्री मारून येतं आणि एक आठवडा जगायची इच्छा वाढवतं. मॅनी, असंच एक कारण” आणि मग तिथून पुढे आपण सुशांतला बघतो. बस्स!

खंत एकाच गोष्टीची वाटते की, सुशांत चित्रपटात जशी एन्ट्री मारून जगण्याची प्रेरणा देतो तशी वाईल्ड कार्ड एन्ट्री कोणी योग्यवेळी त्याच्या आयुष्यात मात्र मारू शकलं नाही.

तिथून पुढे सिनेमात सुशांत ते सगळं किझीशी बोलतो, जे त्याने रिअल लाईफमध्ये स्वतःला सांगून, खोटी आशा देऊन तरी जिवंत रहायला पाहिजे होतं असं कुठेतरी वाटून जातं. कदाचित त्याला अपेक्षित असणारी प्रेरणा त्याला मिळाली नसेल पण त्याने ती प्रेरणा या पात्रातुन नक्कीच साकारली आहे. असंही वाटतं की तो या भूमिकेतून स्वतःसाठी पण अशीच एखादी प्रेरणा तर शोधत नसेल ना? 

सिनेमा सुरू झाल्या झाल्या कॅन्सरमध्ये पाय गमावलेल्या पण आता कृत्रिम पायासोबत गरजेपेक्षा जास्त आनंदी आणि एनर्जेटिक आयुष्य जगणारा मॅनी उर्फ मॅन्युअल राजकुमार ज्युनिअर आपल्याला भेटतो. “जब वी मेट”मधल्या गीतपेक्षाही जास्त पॉझिटिव्ह, फुल्ल ऑफ लाईफ. अगदी त्याच्या पहिल्या सिनपासूनच सुशांतचे दुर्दैवाने व्हायरल झालेले फोटो आणि सिनेमातलं त्याचं पात्र यांना आपण नकळत एकत्र बघायला लागतो. स्वतःला सावरतो पण कितीही प्रयत्न केले तरी हा सिनेमा बघताना सुशांतची आत्महत्या आठवत नाही हे अशक्यच.



शेवटचा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सुशांत जग सोडून गेला. यातलं पात्रं असंच सगळ्यांना रडवून निघून जातं. दुसऱ्या वेळेस सुशांतला जग सोडून जातोय हे बघणं अंगावर काटा आणतं.

सुशांत काही असा स्टार सेलिब्रिटी नव्हता. सर्वश्रेष्ठ अभिनेत्यातही त्याचं नाव कोणी घेत नव्हतं. पण त्याच्या आत्महत्येने पसरलेल्या शोककळेचं कारण मला असं वाटतं की,  ‘तो आपल्या सगळ्यांच्या सकारात्मक उर्जेचं एक केंद्र होता’.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सर्वसामान्य परिवारातून येऊन संघर्ष करत स्टार बनणं. प्रेरणादायी स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करत दुसऱ्यांनाही अशीच स्वप्नं बघायला प्रेरणा देणं, हे सुशांतचं खरं अस्तित्व होतं. म्हणूनच कदाचित हे दुःख खूप जड आहे, कारण त्याच्यासोबत अनेकांच्या प्रेरणेचं एक केंद्र हरवलंय.

सुशांतच्या आठवणीत डिस्ने प्लस हॉटस्टार हा चित्रपट सगळ्यांसाठी मोफत दाखवत आहे.

24 जुलैला बरोब्बर 7.30 वाजता कितीतरी लोकांनी हा सिनेमा बघितला असेल नाही?

सुशांतला सिनेमात पहिलं काम ज्या हुशार कास्टिंग डिरेक्टरमुळे मिळालं त्या मुकेश छाब्राने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा. मुकेशने अमित साध, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी, रिचा चड्डा अशा कित्येक नवीन, इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसलेल्या पण टॅलेंट भरभरून असलेल्या चेहऱ्यांना सिनेविश्वात महत्वाचं स्थान बनवून दिलं.

गँगस् ऑफ वासेपुर, काय पो चे, चिल्लर पार्टी यासारख्या कल्ट सिनेमांचं कास्टिंग मुकेशनेच केलंय.

स्वतः एखाद्या माणसाला शून्यातुन घडवायला त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहून त्याला यशाच्या पायऱ्या चढताना बघणं आणि अचानक एके दिवशी त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकणं, हे कधीच भरता येऊ शकणार नाही असं दुःख मुकेश छाब्राच्या वाट्याला आलंय.

सुशांत आज आपल्यात नाही, पण त्याला ज्यांनी घडवलं त्या लोकांच्या मागे उभं राहणं हे खरंतर सुशांतचे फोटो स्टेट्सला टाकण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. म्हणूनच हा चित्रपट मी सगळ्यांना आग्रहाने बघायला सांगेल.

थोडं मूळ सिनेमाविषयी बोलूया. सिनेमा सुरू होतो तो जमशेदपूरच्या एका फ्युनरलमध्ये. पावसात एका अनोळखी माणसाच्या शोकसभेत स्वतःच्या मृत्यूनंतर घरच्यांचा शोक कसा असेल, त्यांना आपण प्रेरणा द्यायला नसू अशा काहीशा उद्देशाने विशीतली किझी बासू त्यांना मिठी मारत असते. ही भूमिका साकारणाऱ्या संजना सांघीला आपण याआधी “रॉकस्टार” आणि “हिंदी मिडिअम”मध्ये छोट्या पात्रात बघितलं आहे.

कॅन्सरग्रस्त किझीला कोणी मित्र नसतात, समोर दिसणाऱ्या मृत्यूचं दुःख वाढवायला सोबत हे एकटेपण असतं. हेच दुःख ती स्वतःच्या लिखाणातून व्यक्त करत असते. पण अगदी टिपिकल बॉलिवूड सिनेमात हिरो एन्ट्री मारतो तसा हा इमॅन्युअल राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनी तिच्या आयुष्यात एन्ट्री मारतो.

रजनीकांतचा फॅन, कॅन्सरने पाय गमावला तरी मित्राचा अर्धा राहिलेला भोजपुरी सिनेमा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा हसतमुख तरुण. प्रसंगी इरिटेट होईल इतका हजरजबाबी, काहीसा उद्धट पण आतून पूर्ण तुटलेला.

भावनांचा कल्लोळ आणि नवचैतन्य एकत्र अनुभवता यावं यासाठी की काय पण पूर्वार्धाचा बराचसा भाग पावसाळ्यात दाखवला आहे. सिनेमा सुशांत गेल्यावर आणि पावसाळ्यात रिलीज झालाय यातून त्या सुरुवातीच्या प्रसंगाची तीव्रता वाढते.

नव्वदच्या दशकां अक्षय कुमार किंवा गोविंदाचे सिनेमे जसं काहीतरी कारण काढून विदेशात जायचे तसं इथंही होतं. किंबहुना प्रेमकथा फुलवायला जुन्या पद्धतीला नवा मुलामा चढवल्यासारखं वाटतं. बंगाली मुलगी आणि पंजाबी वाटणारा दाक्षिणात्य मुलगा हे जमशेदपूरवरून पॅरिसला जातात तेव्हा काय होणार आहे हे आपल्याला बऱ्यापैकी कळलेलं असतं.

ज्यांनी “द फॉल्ट इन अवर स्टार्स” ही कांदबरी वाचली आहे किंवा तो सिनेमा बघितला आहे त्यांचा काहीसा इथं हिरमोड होईल. कारण दिल बेचाराचे कलाकार पात्र साकारण्यासाठी तेवढ्या खोलीत जात नाही. त्यामुळं भावनिक हाय पॉइंट देणारे प्रसंग तेवढे प्रभावी वाटत नाही.

पण जर ही कथा याआधी माहीत नसेल तर समकालीन बॉलिवूड प्रेमकथा (अर्थात गाण्यांनी भरलेली) बघायची ही एक पर्वणीच आहे. सगळ्या कलाकारांचा अभिनय, कॅमेरा, म्युजिक याबाबतीत सिनेमा एकदम चकाचक आहे. कुठेही काहीही चुकल्याचुकल्यासारखं वाटत नाही.

अगदी बेडरूममध्ये मंद उजेडातले सिनसुद्धा अत्यंत कौशल्ययपूर्ण साकारले आहेत, किझीच्या ब्लॉगच्या डिजाईनसकट.

उत्तरार्धात सिनेमातलं हसतं खेळतं वातावरण जाऊन सत्य परिस्थिती समोर येते. पावसाचा मंजुळ आवाज जाऊन त्याजागी गंभीर शांतात दाटू लागते. “जब वी मेट”मधली गीत जशी उत्तरार्धात शक्तिहीन होते, हताश होते, तसाच काहीसा इथे मॅनी मृत्यूला सामोरं जाताना होतो.

मॅनीने दिलेली उर्जा त्यालाच देताना किझी स्वतःची हरवलेली इच्छाशक्ती परत मिळवून या कठीण वळणावर खंबीरपणे त्याला साथ देताना दिसते.

पण, या शेवटच्या काही प्रसंगात मॅनीचे अश्रू हे त्याच्यापेक्षा सुशांतचेच जास्ती वाटतात. त्याच्या शेवटच्या काळात जे मित्र त्याच्यासोबत होते ते कदाचित हे सिन्स बघूच शकणार नाहीत.

तुमच्याआमच्यासारखे फॅन्स मॅनीच्या अश्रुत सुशांतचे अश्रू बघतात. किझीच्या पाठींब्यात ते सुशांतला न मिळालेलं धैर्य बघतात. त्यांना सुशांतचं जाणं बघता आलं.

सिनेमात मॅनी किझीसाठी किमान एक पत्र सोडून जातो, सुशांत मात्र कोणालाच काहीच न सांगता निघून गेला…

सुशांतच्या मृत्यूची कारणे, आरोप-प्रत्यारोप, जुने स्कोअर सेटल करणारे किंवा प्रसिद्धीसाठी संधीसाधूपणा करणारे, न्यूज, सगळंच बाजूला ठेवूया. एकदा शेवटचं सुशांतला बघूया. तो ज्या तत्वांवर जगला, ज्या संघर्षात त्याने प्रेरणा शोधली होती ती प्रेरणा अशा संघर्षाच्या वाटेवर अडकलेल्या त्याच्यासारख्या असंख्य कलाकारांना देऊयात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: dil bechara
ShareTweet
Previous Post

या पहिल्या महिला न्यायाधीशामुळे आज स्त्रियांना सरकारी नोकरीत स्थान मिळालंय

Next Post

शिवचरित्र घराघरात पोहोचवण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

शिवचरित्र घराघरात पोहोचवण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे

ख्रिस्तोफर कोलंबसने मायन लोकांच्या 'सिगार' जगभर पोचवल्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.