The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्रज सरकार भारतीय आरोग्यव्यवस्थेचा अहवाल या महिलेला पाठवून तिचा सल्ला घेत असे

by द पोस्टमन टीम
12 May 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे. या महामारीच्या काळात खरी कसोटी लागली ती वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या परिचारिकांची. कोरोना हा आजार कितीतरी पटीने जास्त संसर्गजन्य आहे, हे आपण आजपर्यंत बातम्यांतून पाहत, ऐकत, वाचत आलोय. तरीही अशा रुग्णांची त्यांनी सेवा केली. त्यांची काळजी घेतली. कित्येकांना या आजारावर मात करण्याची उभारी दिली.

परिचारिका या आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहेत. यांच्याशिवाय आरोग्य व्यवस्थेची कल्पना करणेच शक्य नाही. आज परिचारिकांची अवस्था फार सुखावह नसली तरी, त्यांना सन्मान मिळतो. परिचारिकेचे काम म्हणजे अगदीच हलक्या दर्जाचे असे मानले जात नाही.

जागतिक स्तरावर त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.

१२ मे १८२० रोजी जन्मलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

फ्लॉरेन्स यांनी नर्सिंग व्यवसायाकडे सन्मानाने पाहण्याची दृष्टी दिली. फ्लॉरेन्स या नुसत्या परिचारिकाच नाही तर, लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञही होत्या. आपल्या या ज्ञानाचा वापर करून त्यांनी क्रीमिया यु*द्धात जखमी झालेल्या अनेक सैनिकांचे प्राण वाचवले.



त्यांना लेडी विथ लॅम्प या टोपण नावानेही ओळखले जाई. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्यूनंट यांनी त्यांना ही पदवी दिली होती. त्यांनी परिचारिका क्षेत्राला एक वेगळे परिमाण मिळवून दिले. रुग्ण सेवेचे त्यांचे कौशल्य आणि रुग्णसेवेला वैज्ञानिक दृष्टीकोन जोडण्याचा त्यांचा प्रयत्न यामुळेच परिचर्याशास्त्राला एक नवी दिशा प्राप्त झाली.

फ्लॉरेन्स नाईटेंगेल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्यांना कसलीच झळ बसली नव्हती. गणित विषयातील त्यांचे ज्ञानही अचंबित करणारे होते. आपल्या याच ज्ञानाचा उपयोग त्यांनी रुग्णसेवा करतानाही केला. संख्याशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी ध्रुवीय क्षेत्र आकृतीचा विस्तार केला. या आलेखला नाईटेंगेल रोझ प्लॉट म्हणूनही ओळखले जाते.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

लष्करी रुग्णालयात दर महिन्याला होणारे मृत्यू आणि त्यांची कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. नाईटेंगेल यांच्या या प्रभावी दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव झाली. त्यांच्या या प्रयत्नामुळे सैनिकांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधेचा दर्जा सुधारण्याचे काम सुरु झाले.

त्यांना रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा मानही मिळाला. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशननेही त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

फ्लॉरेन्स यांचे बालपण ब्रिटनच्या पार्थेनोप शहरात अगदी सुखात व्यतीत झाले. त्यांचे वडील सामंत होते. त्यामुळे कुठल्याही भौतिक सुखाची कमतरता अजिबात नव्हती. सामंती कुटुंबातील असल्याने त्यांना आणि त्यांच्या बहिणींना घरीच उत्तम दर्जाचे शिक्षण घेता आले.

शास्त्रीय शिक्षणासोबतच त्यांना तत्त्वज्ञान आणि विविध भाषांचेही शिक्षण देण्यात आले. लहानपणापासूनच फ्लॉरेन्स चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांची विलक्षण प्रतिभा पाहून भलेभले लोकही आश्चर्य व्यक्त करायचे. पाठांतरात तर त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही. गणितात तर त्यांना विशेष रस होता. गणिताचे धडे आणि सूत्रे पाठ करण्याचा जणू त्यांना छंदच होता.

त्याकाळातील परंपरेनुसार नाईटेंगेल परिवाराने आपल्या मुलींनाही युरोपच्या दौऱ्यावर नेले. मुलींच्या शिक्षणासाठी पर्यटन आणि प्रवास या गोष्टींना त्याकाळी महत्त्व दिले जाई. फ्लॉरेन्स यांनी या प्रवासाच्या विलाक्षण नोंदी करून ठेवल्या होत्या.

ज्या ज्या शहरात आणि देशात जाईल तिथली लोकसंख्या, त्या शहरात किती हॉस्पिटल्स आहेत. धर्मादाय संस्था किती आहेत. या सगळ्या गोष्टींची आकडेवारी त्यांनी नोंद करून ठेवली होती.

संख्याशास्त्र आणि गणितामध्ये फ्लॉरेन्स यांना किती रुची होती हे यावरून कळू शकते. त्यांना गणिताच्या अभ्यासासाठी विशेष ट्युशनदेखील लावण्यात आली होती. युरोपच्या या दौऱ्या दरम्यानच त्यांना जनसेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचा साक्षात्कार झाला.

या प्रवासातून परत येताच त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगून टाकले की, “ईश्वराने मला स्वतः सांगितले आहे की, मी माझे आयुष्य त्याचीच सेवा करण्यात व्यतीत कारावे. परंतु त्या दैवी आवाजाने मला हे नाही सांगितले की ही सेवा मी कशाप्रकारे केली पाहिजे.”

फ्लॉरेन्स एक उच्च शिक्षित, सुंदर आणि समजूतदार युवती असल्याने त्यांना लग्नासाठी अनेक चांगले प्रस्ताव येऊ लागले. शिवाय त्या श्रीमंत कुटुंबातील होत्या. परंतु त्यांना लग्नामध्ये अजिबात रुची नव्हती.

१८४४ साली त्यांनी आपल्याला नर्सिंग क्षेत्रातच काम करायचे असल्याचा निर्धार केला. या माध्यमातून त्यांना लोकांची सेवा करायची होती. त्यांनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी आईवडिलांकडून परवानगी मागितली पण आईवडिलांनी त्यांना परवानगी दिली नाही. आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या लंडन, रोम आणि पॅरीस येथे जाऊन तिथल्या दवाखान्यांना भेटी देत असत.

त्यांचे एक प्रेम प्रकरण बरेच काळ चालले पण, लग्न हे आपले क्षेत्रच नाही असे दिसल्यावर त्यांनी त्या मुलालाही नकार दिला. शेवटी त्यांच्या आई-वडिलांचाही आपली मुलगी कधीच लग्न करणार नाही यावर विश्वास बसला. यानंतर त्यांनी फ्लॉरेन्सला जर्मनी येथे जाऊन नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली.

फ्लॉरेन्स जर्मनीला जाताच त्यांची बहिण नर्वस ब्रेकडाऊन झाल्याने आजारी पडली. या काळातच फ्लॉरेन्स बहिणीच्या शुश्रुषेसाठी शिक्षण सोडून माघारी परतल्या.

१८५३ साली त्यांना लंडनच्या हॉल स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाची प्रमुख म्हणून नेमण्यात आले. मानवसेवेचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. याचवेळी क्रीमियामध्ये यु*द्ध सुरु झाले. वर्तमानपत्रातून त्यांना सैनिकांसाठीच्या हॉस्पिटल्सची दुरावस्था कळत होती.

ब्रिटनचे सरांक्षण मंत्री सिडनी हर्बर्ट हे फ्लॉरेन्सना जवळून ओळखत होते. त्यांनी फ्लॉरेन्स आणि त्यांच्या सहकारी नर्सेसना तातडीने तुर्की येथे हजर होण्याचे आदेश दिले.

तुर्की येथील हे हॉस्पिटल अत्यंत दयनीय अवस्थेत होते. तिथल्या फरशीवर अक्षरश: चिखल साचला होता. फ्लॉरेन्स यांनी आधी तातडीने हॉस्पिटलची स्वच्छता करण्याचे काम हातात घेतले.

हॉस्पिटलच्या स्वच्छतेपासून ते सैनिकांचे खाणेपिणे आणि कपडेलत्ते या सगळ्यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले. सैनिकांच्या मृत्यूचे कारण शोधून त्यांनी त्यावर उपाय सुचवले. ज्याचा दृश्य परिणाम लगेचच दिसू लागला.

भारतातही त्यांनी ब्रिटीश सैनिकांच्या आरोग्याची सुधारणा करण्यासाठी काम केले. भारतात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १९०६ पर्यंत त्यांना भारतातील आरोग्य व्यवस्थेचे अहवाल पाठवून त्यावर त्यांचा सल्ला घेतला जाई.

त्यांच्या सल्ल्यानुसार यात भरपूर सुधारणा करण्यात आल्या. त्यांच्या गणिती आणि सांख्यिकीतील ज्ञानाचा वापर करून सैनिकी हॉस्पिटल आणि सामान्य हॉस्पिटलमधील व्यवस्था सुधारण्यास मदत झाली.

त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळेच भारतातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली. या अर्थाने भारतावर देखील त्यांचे असंख्य ऋण आहेत. नर्सिंग क्षेत्राचा सन्मान उंचावणारी ही महिला कणखर बाण्याची होती.

वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र, नर्सिंग क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीनची राजधानी बीजिंगच्या खाली वसवण्यात आलंय एक महाकाय शहर!

Next Post

हॉकीच्या जादुगाराला शेवटच्या दिवसात स्वतःच्याच देशात उपेक्षा पदरी पडली

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

हॉकीच्या जादुगाराला शेवटच्या दिवसात स्वतःच्याच देशात उपेक्षा पदरी पडली

हे वंचितांच्या हक्कांसाठी करण्यात आलेलं पहिलं आंदोलन होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.