The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्राऊन एग्ज पौष्टिक असतात म्हणून जास्त पैसे खर्च करताय, तर हे वाचाच..!

by द पोस्टमन टीम
24 March 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हल्ली लोकांमध्ये आहाराविषयी जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आहाराच्या बाबतीत सध्या खूप पर्याय देखील उपलब्ध आहेत. पण, कधीकधी पदार्थांबद्दलची अतिचिकित्साही नुकसानकारक ठरू शकते. किती खावं, काय खावं, कसं खावं याबाबत आजकाल प्रत्येकालाच भरपूर माहिती असते. त्यात कुठल्या अन्नातून कुठले पोषक घटक मिळतात याची माहितीही आपल्याला एका क्लिकवर मिळत आहे. वाढते वजन आणि त्यामुळे होणारे विकारांचे प्रमाण वाढत असल्याने वजन आटोक्यात ठेवण्यासाठीही बरेच जण वेगवेगळ्या डाएट प्लॅनचा अवलंब करत आहेत.

एकंदरीत काय तर खाद्यपदार्थांबाबतचा चौकसपणा हल्ली वाढताना दिसतोय!

मांसाहार करणाऱ्यांचा तर एक दिवसही अंड्याशिवाय जात नाही. अंड्यापासून अगदी झटपट अशा कितीतरी रेसिपीज् बनवता येतात. त्यामुळे शक्यतो रोजच्या नाष्ट्यात अंड्याचा समावेश असतोच.

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ असं म्हणत, अंड्याला रोजच्या आहारात कधी स्थान मिळाले कळलेच नाही.

आता या अंड्यातही बरेच प्रकार पाहायला मिळतात. देशी अंडी, बॉयलर अंडी, किंवा पांढरी आणि ब्राऊन अंडी. त्यामुळे नेमकी कुठली अंडी जास्त पौष्टिक असतात? अंड्यांचा रंग आणि त्यांची पौष्टिकता यांचा काही संबंध आहे का? असे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. पांढऱ्या अंड्यापेक्षा देशी अंडी केंव्हाही चांगलीच असं म्हणणाराही एक वर्ग आहेच. ब्राऊन अंडी आणि पांढरी अंडी या दोन अंड्यापैकी नेमके कुठले अंडे अधिक चांगले हाही एक प्रश्न नेहमी विचारला जातो.



पांढरा ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड चांगला असे जे वारंवार वाचण्यात, ऐकण्यात येते कदाचित त्यामुळेच जे ब्राऊन ते चांगलं असा आपसूक ग्रह तयार होतो. पण, अंड्याच्या बाबतीत सांगायचं तर कोणते अंडे चांगले किंवा कोणते वाईट हे त्याच्या रंगावरून ठरत नाही. खरे तर पांढरे असो की ब्राऊन अंडे हे चांगलेच असते. त्यामुळे किमान अंड्यांच्या बाबतीत तरी डावं-उजवं करण्यात काही अर्थ नाही.

मग अंड्याच्या रंगामध्ये जो फरक दिसतो, तो नेमका कशामुळे?

अंड्याचा रंग हा ज्या जातीच्या कोंबडीने अंडे दिले असेल त्यावर अवलंबून आहे. ‘लेगहॉर्न’ जातीच्या कोंबडीचे अंडे हे पांढऱ्या रंगाचे असते. ‘ऱ्होड आयलँड रेड’ जातीच्या कोंबडीचे अंडे ब्राऊन असते. कोणती कोंबडी कोणत्या रंगाचे अंडे देते हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर कोंबडीच्या कानाची पाळी बघा. हो! कोंबड्यांच्या कानांनाही पाळी असते. ज्या कोंबडीच्या कानांची पाळी पांढरी असते ती कोंबडी पांढरे अंडे देते. तर कानाची पाळी गुलाबी किंवा करड्या रंगाची असेल तर अशी कोंबडी ब्राऊन रंगाचे अंडे देते.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

काही कोंबड्या निळ्या रंगाचेही अंडे देतात. ओरकॅना, ल्युशी जातीच्या कोंबड्या या निळ्या रंगांची अंडी देतात. अंड्याचा हा रंग कोंबड्यांच्या डीएनएमधे झालेल्या बदलावर अवलंबून आहे.

शास्त्रज्ञांनी देखील अंड्याचे कवच आणि त्याचा रंग यामुळे अंड्यातील घटकावर काही फरक पडतो का याची पाहणी केली. मात्र, त्यांनाही असा कुठला संबंध आढळला नाही. अंड्यातील पोषक तत्व आणि त्याच्या कवचाचा रंग यांचा तसा काहीही संबंध नाही.

खरे तर सगळीच अंडी पौष्टिक असतात. अंड्यांची पौष्टिकता ही त्यांच्या रंगावर अवलंबून नसते. तर कोंबड्या कुठल्या वातावरणात वाढतात, त्यांना किती पोषक अन्न खायला मिळते, यावर अंड्यांची पौष्टिकता ठरते. मोकळ्या जागेत, भरपूर उन्हात फिरणाऱ्या कोंबडीच्या अंड्यात डी-जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तर, बंदिस्त जागेत पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या अंड्यात ते तुलनेने कमी असते.

कोंबड्यांना कोणत्या प्रकारचे अन्न खायला दिले जाते त्यावरही अंड्याची पौष्टिकता अवलंबून असते. कोंबडीला जर ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खायला घातले तर तिच्या अंड्यातही ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच कोंबड्या जितके पौष्टिक अन्न खातील तितके अंड्यातील पोषण तत्त्वे वाढतील.

अंड्याच्या बाबतीतील आणखी एक गंमत म्हणजे, अंड्यातील आतील बल्क जर धूसर रंगाचा असेल तर अंडे ताजे असते आणि अंड्याच्या आतील पांढरा बल्क जर एकदम नितळ असेल तर असे अंडे शिळे असते. ताजे अंडे शिळ्या अंड्यांच्या तुलनेत चवीला चांगले लागते.

अलीकडेच झालेल्या एका नवा संशोधनानुसार अंड्यांचा आहारात नियमित समावेश केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. मागच्या काही संशोधनानुसार असे म्हटले जात होते की जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. पण, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रीशनने प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधानुसार नियमित अंडे खाणे हृदयासाठी घातक ठरत नाही.

थोडक्यात काय तर अंड्यांची पौष्टिकता आणि त्यांचा रंग यांचा तसा काही थेट संबंध नाही. ज्या जातीच्या कोंबडीने अंडे दिले असेल त्यावर त्या अंड्यांचा रंग ठरतो. ही एक जनुकीय प्रक्रिया आहे. उलट अंड्याची पौष्टिकता ही कोंबडीला ज्या दर्जाचे खाद्य दिले जाते यावर अवलंबून आहे. त्यामुळे इथून पुढे अंडी खरेदी करताना रंग पाहून अंडी खरेदी करू नका. तर त्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना कुठल्या दर्जाचे अन्न घातले जाते. त्यांना कसे मोठे केले जाते, हे पहा आणि मगच अंडी खरेदी करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मुस्लिम शासकांनी भारतीय संगीताला राजाश्रय देऊन भरभराटीला आणले

Next Post

हि*टल*रच्या छळाला कंटाळून ३०० फुट भुयार खोदून हे कैदी ना*झी जेलमधून फरार झाले होते

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

हि*टल*रच्या छळाला कंटाळून ३०० फुट भुयार खोदून हे कैदी ना*झी जेलमधून फरार झाले होते

या मराठी माणसाने संघर्ष करून आपल्याला आपली प्रिय रविवारची सुट्टी मिळवून दिली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.