The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ब्रिद इंटू द शॅडोज या वेबसिरीजचा दुसरा सिझन कसा आहे..

by सोमेश सहाने
27 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


एका चांगल्या भारतीय सिरीजमधून तुमची काय अपेक्षा असते?

“उत्सुकता शिगेला पोहोचेल असा शेवट करणारे एपिसोड, उत्तम अभिनय, वास्तविक आणि समकालीन आयुष्यातील बारकावे, धार्मिक पुस्तकातील पात्रांशी संबंध, एकमेकांत गुंतलेले बरेच आयुष्यं, एक चाणाक्ष पोलीस आणि त्याचा विनोदी सहकारी आणि काही शिव्या.”

अशा प्रस्थापित सूत्रात बसणारी, आपल्या सामान्य अपेक्षा पूर्ण करणारी एक चांगली सिरीज म्हणून “ब्रिद इंटू द शॅडोज” नक्की बघा. पण या प्रकारच्या काही सिरीज बघून झाल्यात आणि आता काहीतरी नवीन चौकटी तोडणार, भन्नाट असं बघायचं असेल तर ही सिरीज तुमची निराशा करेल. थोडक्यात लई काय विशेष नाहीये! पण मजा येते.

आता जरा सविस्तर बोलूयात. ब्रिथचा पहिला सिजन प्रेक्षकांना खूपच आवडला होता, ऍमेझॉनचा भारतातील प्रेक्षकवर्ग वाढवायला या सिरीजचा खूप फायदा झाला.



हार्ट ट्रान्सप्लांटसाठी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झगडत असलेल्या स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी खुनी बनलेल्या एका बापाची कथा आणि आपल्या मुलीच्या अपघाती मृत्यूने व्यसनाधीन झालेल्या पोलिसाचा तपास यातून आपल्या वाट्याला अत्यंत भावनिक आणि गुंतागुंतीचा असा एक थ्रिलर येतो.

दुसऱ्या सिजनमध्ये ही चौकट तशीच राहते फक्त केस बदलते. आता आपण दिल्लीमधल्या एका प्रसिद्ध सायकॅट्रीस्ट – शेफ दांपत्याच्या मुलीच्या अपहरणामागे दडलेली कथा बघतो. अपहरण करणारा मुलीला सोडण्यासाठी काही लोकांना मारण्याची अट घालतो. मग त्या पालकांकडून एकानंतर एक होणारे खून, त्याचा संबंध जोडणारे पोलीस आणि हळूहळू फ्लॅशबॅकमधून उलगडत जाणारे ट्विस्ट अशा प्रस्थापित फॉरमॅटमध्ये ही सिरीज पुढे जाते.

१२ एपिसोड असल्यामुळे खूप रेंगाळता आलं असतं पण तसं न करता पात्रं वाढवून त्यांच्या समांतर आयुष्यांना जास्त स्क्रीनस्पेस दिला आहे. यातून पात्रं नीट समजतात पण त्यांचा मूळ अपहरणाच्या दुव्याशी येणारा संबंध ओढून ताणून लावला जातोय असं वाटत राहतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

दिल्लीमध्ये ढाबा चालवणारी मराठी वर्गमैत्रीण, एक अपंग लेखिका कम इन्स्पिरेशनल स्पीकर, केसचं श्रेय लाटण्यासाठी तयार असलेली लोभी पोलीस अधिकारी, ही सगळी महिला पात्रं फक्त स्त्री-पुरुष संख्या बॅलन्स करायला आहेत असंही वाटून जातं. मूळ दुव्याशी फार संबंध नसला तरी स्वतंत्र कथा म्हणून त्यांचं अस्तित्व छान वाटतं.

आपल्या मुख्य पोलीस अधिकाऱ्याने चुकीने टेरिसवरून धक्का दिल्याने ज्या मुलीला अपंगत्व येतं तिच त्याच या चुकीचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि तिच्यामुळे त्या पात्राला आलेला एक वेगळा शेड हे बघणं पर्वणी होती.

हाच सिन अभिनयाच्या बाजूनेही खूप भक्कम बनलाय. “अमित साध”चा (पोलीस अधिकारी) अभिनय हे दोन्ही सिजन बघण्याचं एक महत्वाचं कारण आहे. मितभाषी, अकडू, व्यसनाधीन पोलीस त्या मुलीमुळं रडताना आणि हसतानाचा तो प्रसंग एखाद्या सामान्य अभिनेत्याला जमणंच शक्य नव्हतं. फक्त तेवढ्या एका सीनमधून अमित साध एक असामान्य अभिनेता आहे हे कळून येतं.

“काय पो चे”नंतर सुशांत आणि राजकुमारला घवघवीत यश मिळालं पण अमित अजूनही संघर्षच करतोय. पहिल्या सिजनमध्ये असणाऱ्या आर माधवन इतकंच उत्तम काम या सिजनमध्ये अभिषेक बच्चनने केलंय. यशस्वी श्रीमंत सायकॅट्रीस्ट अभिषेकच्या वास्तविक आयुष्याशी जवळ जाणाऱ्या वातावरणातला आहे म्हणून तिथं तो शोभून दिसतो. त्यानंतर मात्र त्याचं पात्र ज्या वळणावर जातं तिथं त्याच्या अभिनयाचा कस लागतो.

पण मनमर्जीया आणि आता ब्रिथमधून अभिषेक बच्चनच्या अभिनयाचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. चेहऱ्यावरची एक रेषही हलू न देणारा “धूम”मधला पोलीस अधिकारी ते आताचे रोल यामध्ये त्याने स्वतःच्या अभिनयावर केलेलं काम जाणवतं.

निथ्या मेननचं मिशन मंगल नंतरचं हे दुसरंच हिंदी भाषेतलं काम. उथळ दाक्षिणात्य चित्रपटामध्ये जी अभिनयाची खोली कळत नाही ती या सिरीजमधून कळाली. यानंतर ती अजून महत्वाच्या पात्रासाठी निवडली जाऊ शकेल यात शंका नाही.

हृषीकेश जोशीचं पात्रं (मुख्य पोलिस अधिकाऱ्याचा सहकारी सब इन्स्पेक्टर) सेक्रेड गेम्समधल्या काटेकरची (जितेंद्र जोशी) आठवण करून देतं. त्याचं कामही छान झालंय.

क्रोध, लोभ, भीती, पश्चात्ताप, घृणा, ईर्ष्या अशा रावणाच्या दहा डोक्यात दहा भावना राहतात. याच भावना माणसाला परिपूर्ण करतात आणि याच माणसाच्या मुख्य शत्रूही आहेत. या मिथकावर या सिरीजच्या वैचारिकतेचं ओझं टाकण्यात आलं आहे.

सेक्रेड गेम्स किंवा काही विदेशी सिरीजमध्ये केलेले असे प्रयोग सुसंगतपणे वापरले गेले आहेत. इथं मात्र मानसशास्त्रीय आजार, मिथक, नाते, बालपण यांची खिचडी झाल्याने नेमका आधार काय? हे स्पष्ट होत नाही. म्हणून सामान्य कथेतून असामान्य विचाराने होणारा शेवट आपल्या वाट्याला येत नाही.

सिरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय आजाराबद्दल आता आपल्याला बरंच समजू लागलंय, आता आपण जास्तीत जास्त बारकावे आणि खरेपणा असणारं काहीतरी त्यात शोधत असतो. इथे मात्र दाखवलेल्या गोष्टी कशा खोट्या आहेत याचाच विचार आपण जास्त करत असतो.

त्याबाजूने बऱ्याच चुका आहेत. ट्विस्ट आणण्याची पद्धत चांगली वापरली असली तरी ती याआधी एवढ्या वेळेस बघितलेली आहे की थ्रिलर बघणाऱ्यांना त्यात थ्रिल वाटणार नाही.

सिरीजचा जॉनर जरी क्राईम, थ्रिल असा असला तरी यातला फक्त ड्रामाच आपल्या शेवटी लक्षात राहतो. असा हा ब्रिथचा दुसरा सिजन ते जग आवडणाऱ्यांची निराशा करत नाही पण नवं शोधणाऱ्यांना इथं काहीच सापडत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हुकुमशहा स्टॅलिन जनतेपुढे स्वतः न येता कायम तोतयाला पाठवायचा

Next Post

एका भाभाने आण्विक संशोधनाचा पाया रचला तर दुसऱ्याने एनसीपीएची वास्तू उभी केली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एका भाभाने आण्विक संशोधनाचा पाया रचला तर दुसऱ्याने एनसीपीएची वास्तू उभी केली

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे स्वप्न आयुष्यभर उराशी बाळगणारा "सरहद गांधी"

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.