The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीरिअल किलरवरचे सिनेमे आवडत असतील तर ही यादी खास तुमच्यासाठी

by सोमेश सहाने
17 July 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सीरिअल किलर तसा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. पण जेव्हा चित्रपटात जॉनर म्हणून वापरला जातो, तेव्हा त्याचं कारण ही प्रेक्षकांची उत्सुकता नसते. भारतात तरी सिरीयल किलर्स किंवा तत्सम थ्रिलर्सला कधीच चांगला प्रतिसाद मिळत नाही. अमानुष हिंसा, पोलिसांची कोडं सोडवण्याची धडपड असे विषय थिएटरला चालत नाहीत, पण “personal viewing” म्हणजे YouTube, Netflix, Amazon या व्यासपीठांवर मात्र या जॉनरला चांगला प्रतिसाद आहे. साहजिकच असे विषय सगळ्यांसोबत पाहणं काहीसं गैरसोइचं असतं. तरीही काही ठराविक अंतरानंतर भारतात या जॉनरचा एक तरी सिनेमा प्रदर्शित होतोच.

सिरीयल किलर्स च्या बाबतीत हे छोटे बारकावे (विकृतपणा) मोठे करून दाखवले जातात. संधी आली किंवा तशी परिस्थिती आली तर हा माणूस काय करेल हे बघून सामान्य आयुष्यात आपल्याला स्वचिकित्सा करता येते, त्या पात्रातून आपण स्वतःसाठी असं काहीतरी खूप वैयक्तिक पातळीचं realization घेत असतो. आणि हाच खरंतर सिनेमांचा हेतू असतो, आणि म्हणून हिंसा हा सिनेमांचा महत्वाचा भाग असतो.

भारतात “सिरीयल किलर” या जॉनरचे तसे कमी चित्रपट आले, त्यातल्या मुख्य तीन चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

1) माफीचा साक्षीदार



joshi abhyankar murder-the postman

पुण्यातल्या प्रसिद्ध जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत नाना पाटेकर आहेत. हे हत्याकांड पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही मुलांनी चतुरपणे आखलेला डाव होता. पुण्यात चांगलीच दहशत पसरली होती, पण पोलिसांना तपासात काही सापडत नव्हतं. अशावेळी त्यांच्यामधलाच एकजण पाश्चात्ताप होऊन माफीचा साक्षिदार झाला आणि स्वतःची सुटका करून घेतली आणि मुख्य आरोपी गजाआड गेले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अनुराग कश्यपचा “पांच” हा चित्रपट पण याच घटनाक्रमावर आधारभूत आहे, पण माफीचा साक्षिदारमध्ये घटनेचे बारकावे जास्त नीट साकारलेत तर पांचमध्ये ही प्रेरणा घेऊन एक वेगळंच सिनेमॅटिक विश्व उभारलंय.

 

maficha sakshidar-the postman

चित्रपटाचं दिग्दर्शन राज दत्त यांनी केलंय. छोट्या छोट्या भूमिकेत दिग्गज कलाकार आहेत, त्यांनी साजेसं काम केलंय. सिनेमॅटोग्राफी निर्मितीच्या काळाच्या हिशोबाने उत्तम दर्जाची झाली आहे. चित्रपट बघताना कळतं की एकाच कॅमेराचा वापर करून सगळं शूट केल्यामुळे बऱ्याच मर्यादा होत्या तरीही ब्लॉकिंग तंत्र वापरून या मर्यादेलाच एका प्रकारचं सौंदर्य सिनेमॅटोग्राफरने दिलंय. या तंत्रात एकाच कॅमेराचा वापर करून त्या फ्रेमच्या विशिष्ठ हालचालींनी वेगवेगळ्या गोष्टी फ्रेममध्ये येतात, त्यासाठी दुसरा कॅमेरा वापरावा लागत नाही.

उदा. नाना पाटेकरचं पात्रं पेंटिंग करत असताना, कॅमेरा मागे घेतला की पेंटिंग करताना नाना नंतर त्यांची प्रेयसी अशा तीन गोष्टी एकाच फ्रेममध्ये येतात. तांत्रिक बाबीत चित्रपट पुढारलेला असला तरी स्क्रीनप्ले लिहिताना परंपरागत पद्धत वापरली गेली आहे.

त्यामुळे चित्रपटातले काही सिन स्कीप करावेसे वाटतात आणि ते स्कीप केले तरी मूळ कथेत फरक पडत नाही. हा एडिटरचा ही दोष आहेच. पण त्याकाळी मेलोड्रामा जास्त दाखवण्याची पद्धत रुढ होती, तेव्हा लोकांना त्या प्रकारचा सिनेमा आवडायचा. पण एवढ्या वर्षानंतरही मूळ कथानकातले बारकावे आणि अभिनयामुळे चित्रपट धरून ठेवतो.

नानाचा अभिनय तर विशेष झालाय. त्या पात्रात असणारा निर्दयीपणा डोळ्यातुनच साकारण्यात त्याला चांगलं यश आलंय. सामान्य शरीरयष्टी असताना फक्त त्या आवेशातून आणि डोळ्यातून ती जरब निर्माण करायला लागणारी कसब नाना मध्ये होती म्हणून हा सिनेमा जास्त रंजक होतो. युट्युब वर तुम्ही हा सिनेमा बघू शकता.

2) द स्टोनमॅन मर्डरर्स

stoneman murders-the postman
IMP Awards

दिग्दर्शक मनीष गुप्ता आणि के. के. मेनन ही जोडी हे सिरीयल किलिंग हे जॉनर हाताळण्यासाठी नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतील. त्यांचा आरुषी हत्याकांडवर आधारित “रहस्य” चित्रपट प्रसिद्ध आहे, पण याच जोडीचा स्टोनमॅन मर्डरर्स ही तितकाच प्रभावशाली सिनेमा आहे जो फारसा प्रसिद्ध झाला नाही. के. के. मेननसह विक्रम गोखले, अरबाज खान आणि वीरेंद्र सक्सेना यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका बजावल्या आहेत.

एका आदिवासी जमातीत असणाऱ्या एका अंधश्रद्धेमुळे ठराविक नरबळी देण्यासाठी एका नंतर एक नऊ खून झाल्याच्या काही सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

मुंबईमध्ये हे हत्याकांड सुरू असताना एका बडतर्फ केलेल्या पोलीस अधिकाऱ्याची ही केस सोडवण्यासाठीची धडपड हा या कथेचा गाभा आहे. खुनी फुटपाथवर झोपणाऱ्या भिलऱ्यांची हत्या करून तिथं एक दगड आणि त्यावर कुंकू ठेऊन जात असतो. खूप प्रयत्नानंतरही खून करणारा सापडत नाही पण उलट याचा तपास करताना के के मेननचं पात्रच यात अडकत जातं आणि दोषी म्हणून इतर पोलीस त्याला शोधू लागतात.

अत्यंत गुंतागुंतीच्या या कथेला तितक्याच ताकदीच्या अभिनयाची जोडही आहे. दिग्दर्शकाने रस्ते, खोल्या, झोपडपट्टी, पोलीसस्टेशन, तिथल्या लोकांचं वागणं हे खूप साधं, सहज ठेवलंय यामुळं नेमकं अपराधी कोण आहे हे कळल्यावरचा शॉक जास्त प्रभावशाली बनतो. उगाच अशक्य फायटिंग करणारे पोलीस किंवा कसाही निसटू शकेल असा अपराधी असं खोटं चित्र न दाखवता सिरीयल किलर आणि त्यांचा तपास करणारे दोघेही किती सामान्य राहणीमानातले असू शकतात हे अधोरेखित केलं आहे.

चित्रपटातील प्लॉट ट्विस्ट करणारे प्रसंग खूप छान लिहिले गेलेत. “सरकार” चित्रपटाच्या स्क्रीनप्ले आणि डायलॉग साठीही मनीष गुप्ता प्रसिद्ध आहेत. त्यांची लिखाणावरची पकड आणि के के मेनन सोबतची जोडी, या चित्रपटाला रंजक बनवते. म्हणूनच २००९ पासून आतापर्यंत या पातळीचा सिनेमा बनू शकला नाही. यात हॉलिवूड मधल्या सारखे महान बारकावे नसले तरी भारतीय प्रेक्षकांना खिळून ठेऊ शकेल असे कित्येक प्रसंग आहेत.

3) रमण राघव 2.0

raman raghav-the postman
Cinestaan

अनुराग कश्यपने या चित्रपटामधून सिरीयल किलरला एका वेगळ्या प्रकारे सादर करून या जॉनरच्या सिनेमाला एका नवीन उंचीवर नेलंय. मुंबईमध्ये “सायको रमण” नावाने कुप्रसिद्ध असणाऱ्या या सिरीयल किलर विषयी आपण आतापर्यंत बऱ्याच विचित्र कथा ऐकल्यात. एका वाकलेल्या लोखंडी पाईपने फार काही विशेष कारण नसताना त्याने कित्येक खून केलेत. या पात्राला चित्रपटात सादर करताना अनुरागने त्याला फक्त माणूस म्हणून न घेता एक प्रवृत्ती म्हणून वापरलंय.

नवाजुद्दिन सिद्दीकीने रमणची भूमिका साकारली आहे तर विकी कौशलने राघवची. राघव हा ड्रग्जचं व्यसन असलेला पोलीस अधिकारी असतो. निष्काळजी, उद्धट, मितभाषी पण आतून गोंधळलेला, भित्रा पुरुष साकारण्यात विकी कौशल चांगलच यश आलंय. लाल डोळे लपवायला रात्रीही तो गॉगल घालत असतो, आणि काही प्रसंगात गॉगलच्या आतला गोंधळलेला माणूस आपल्याला दिसतो तेव्हा नेमकं या पात्राला करायचंय तरी काय? असा प्रश्न पडतो.

या प्रश्नाचं उत्तर सायको रमण त्याला देतो. हे ही नीट निरीक्षण केलं तर कळतं की राघव पोलीस असून त्याचे डोळे लपवतो आणि रमण खुनी असून जाहीरपणे डोळ्यातून सांगतो की हे मीच केलंय.

रमण आणि राघव या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, दोघेही तशेच निर्दयी, हिंसेत मुक्ती शोधणारे पण रमण स्पष्ट तर राघव गोंधळलेला, जणू दोघेही एकमेकांचा शोध घेतायत. रमण एका नंतर एक खून करतो तर राघव त्याचा शोध घेताना तेवढेच गंभीर अपराध करत असतो.

या हिंसेच्या प्रसंगी मानवी हिंसेच्या आणि मानसिक आजारांच्या परम सीमा काय असू शकतील हे आपल्याला स्क्रीनवर गरजेपेक्षा जास्त स्पष्ट दाखवलंय. पण हा चित्रपट महान असण्याचं कारण म्हणजे या टोकाच्या भावना प्रत्येकात एका पडद्याआड कशा दडलेल्या आहेत, ज्या फक्त एक संधी शोधतायत हे राघवच्या पात्रामुळ आपल्या समोर येतं. हिंसेला असं सामान्य पातळीवर आणून त्याचा अंश प्रत्येक प्रेक्षकात शोधायला स्वतःत शोधायला लावणारा हा सिनेमा म्हणून विशेष आहे.

युट्युबवर सिनेमा उपलब्ध आहे. जवळपास सगळे सीन्स कमी प्रकाशात शूट केलेत, यामुळ या जॉनरला लागणारा डार्क फील येतो. पण डार्क स्टाईलचे, कमी डायलॉग असणारे चित्रपट बघण्याची आवड नसणाऱ्यांना हा चित्रपट कंटाळवाणाही वाटू शकतो. लक्ष देऊन बघितला नाही तर कदाचीत यातला मूळ अर्कही आपण विसरू शकतो, आणि म्हणून सिनेमा अर्थहीन वाटू शकतो. पण हे अडथळे टाळले तर तुमच्या वाट्याला आतापर्यंतचा या जॉनरमधला सर्वोत्तम भारतीय चित्रपट बघण्याचा आनंद येईल.

हॉलिवूडमध्ये अर्थातच या जॉनरचे अनेक उत्तमोत्तम चित्रपट आहेत. माझ्या मते डेव्हिड फिंचर या महान दिग्दर्शकाला हा जॉनर उत्तम प्रकारे हाताळता येतो. झोडीआक आणि सेव्हन या चित्रपटांमधून त्याने ते सिद्ध केलंय. झोडीआकमध्ये एका सांकेतिक भाषेतील पत्र पाठवून खून करणाऱ्या अत्यंत हुशार अपराध्याची आणि त्याचा शोध घेणाऱ्या पत्रकाराची कथा आहे.

सेव्हन या चित्रपटातही एका विशेष शैलीत अपराध्याला पकडण्याची शर्यत दाखवली आहे. यात तो अपराधी एका धार्मिक प्रथेला समोर ठेऊन त्या त्या प्रकारचे धार्मिक गुन्हा करणाऱ्या ७ लोकांना मारून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. अंधार, पाऊस असं वातावरण आणि क्रुरतेने केलेले खून यामुळे हा चित्रपट काहीसा डिस्टरबिंग सुद्धा आहे.

“Silence of the lambs” हा ऑस्कर विजेता सिनेमा तर नक्कीच बघावा. “जॅक द रिपर” या 1988 मधल्या सिरीयल किलर वर तर कित्येक चित्रपट प्रसिद्ध आहेत. भारतात सेन्सॉरशिपच्या कडक नियमांमुळेही या जॉनर चे चित्रपट बनवायला फारसा स्कोप नसतो. पण वर नमूद केलेले चित्रपट तुमची हा जॉनर बघण्याची हौस नक्की भागवतील अशी आशा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रशिया आजही चेर्नोबिल दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहे

Next Post

जगभरातील सरकारांना धडकी भरवणारा ‘द ग्रेट हॅकर’ जुलिअन असांज

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगभरातील सरकारांना धडकी भरवणारा 'द ग्रेट हॅकर' जुलिअन असांज

लॉकडाऊनमध्ये स्वतःचे दागिने गहाण ठेऊन घरोघरी राशन पोहचवत आहे तृतीयपंथी समाज

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.