The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MX प्लेयर वर फुकट असलेल्या या मराठी वेब सिरीज आवर्जून पाहा

by सोमेश सहाने
21 April 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


इंग्रजी आणि हिंदीनंतर मराठी भाषेतही सिरीजचं वारं पसरायला नेमकचं सुरू झालंय. युट्युबवर मराठी सिरीजला फारसं यश आलं नाही पण MX player वर या तीन सिरीजने चांगलीच लोकप्रियता कमावली. त्या तीन सिरीजविषयी काही रंजक गोष्टी खाली देतोय, त्या वाचून तुम्ही त्या बघव्यात की नाही हा निर्णय घेऊ शकाल.

1) समांतर

सतीश राजवाडे दिग्दर्शित शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित “समांतर” वेब सिरीज ही पहिली मराठी बहुभाषिक सिरीज आहे. ज्यात मुख्य भूमिकेत स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित आहेत.

नेहमीच्या हलक्या फुलक्या प्रेमकथेत आपण यांना बघितलं होतं, पण आता त्यापेक्षा थोडी वेगळी भूमिका या दोघांच्या वाटेला आलेली आहे. कपड्यांचा चकचकीतपणा जाऊन कॉमन मॅन स्क्रीनवर साकारण्याच्या सकारात्मक ट्रेंडमध्ये ही सिरीज गणली जाईल.



सतीश राजवाडे आणि स्वप्नील जोशी या जोडीने याआधी मुंबई पुणे मुंबईच्या तीनही भागात सोबत काम करून दर्जेदार मराठी चित्रपट आपल्याला दिलेत.

वेबसिरीजच्या या पूर्णपणे नव्या फॉरमॅटमध्ये मात्र त्यांना ते तितकंसं जमलेलं दिसत नाहीए. समांतरचं कथानकात आपलं मुख्य पात्र सुदर्शन चक्रपाणीच्या शोधत असतं, कारण चक्रपाणीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ असतो. आपल्या कमनशिबी आयुष्यात अजून काय वाढून ठेवलंय याचा शोध घेताना, मुख्य पात्र खरंच कमनशिबी आहे असं आपल्याला जाणवतच नाही. यामुळं आपण पात्राशी खिळून राहत नाही.

बहुतांश वेळ नोकरी धंदा सोडून पात्र जे उगाच फिरत असतं, ते खरं वाटत नाही. छोटी छोटी पात्र फक्त आहे म्हणून आहे. त्यांचा मुख्य कथानकात फार काही वाटा नाही. यामुळं सगळा भार स्वप्नील जोशीवर येऊन पडतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सगळे संवाद अगदीच सामान्य दर्जाचे लिहिले गेलेत. उदा. मनी नाही भाव अन म्हणे देवा मला पाव. मी रेल्वेचं तिकीट घ्यायला गेलो तर लंच ब्रेक म्हणून तेही दार लावून घेतात. संवादांना अजून जास्त त्रासदायक करायला कुठल्याश्या हिंदि सिरीयलचं म्युजिक वापरलंय असं वाटतं.

चित्रभाषा म्हणून असं काहीच नाहीए, सगळंच म्युजिकने करण्याचा आळशीपणा झालाय. यामुळं कथेशी आपण कनेक्ट होत नाही. Cinematography छान आहे पण त्यात नावीन्य नाहीए. एकंदर काय तर यावर वेळ आणि डेटा खर्च करू नये.

2) आणि काय हवं ?

सोप्प उदाहरण देऊन सांगायचं तर मिथिला पालकरच्या “लिटल थिंग्स” सारखी ही सिरीज आहे. दर्जाच्या बाबतीत थोडा फरक आहे पण नात्यातली ती सहजता इथे पण दिसते. या सिरीज मधलं आधुनिक वर्किंग कपल म्हणजे रियल लाईफ कपल उमेश कामत आणि प्रिया बापट त्यांच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग आपल्यासाठी खुले करतात आणि त्यातून एक हलका फुलका नात्यांचा ओलावा असणारा घटनाक्रम आपल्या वाट्याला येतो.

त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या सामान्य घटनांना विनोदाचा हलका तडका दिलाय. शेवटी पुढचा एपिसोड बघायला काहीतरी उत्सुकता शिगेला पोहोचेल असं दाखवण्याचा जो सामान्य फॉरमॅट असतो तो इथे नाहीए. उलट उत्सकता प्रसंगातून नाही तर त्या पात्रांमधून तयार होते. प्रत्येक एपिसोड नवी घटना घेऊन येतो. पहिल्या सिजनमध्ये त्यांनी छोटी सुट्टी, छोटं आजारपण असं ठेवलं तर दुसऱ्या सिजन मध्ये प्रत्येक एपिसोडला एक वेगळा जॉनर दिलाय.

कथा संगण्याची पद्धत, पात्र उभं करण्याची पद्धत यात बरेच प्रयोग केलेले दिसतात. काहीच मोठा गंभीर विषय नसताना, व्हिलन म्हणून काहीच समोर नसताना एवढं रिलेटेबल आणि एंगेजिंग विश्व उभा करण्यात दिग्दर्शक वरून नार्वेकरला चांगलं यश आलंय (याआधी मुरांबा चित्रपटासाठी आपण यांना ओळखतो.)

असं काहीतरी साकारायला तेवढ्या ताकदीचे अभिनेते असावे लागतात. प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी हे काम खूपच सहजपणे साकारलंय. “टाइम प्लिज” मधली त्यांची भूमिका जवळ जवळ अशीच आहे. अभिनेते म्हणून त्यांना या मर्यादा असल्या सारखं वाटतं, पण त्या मर्यादांचा योग्य वापर करून ते अशा साजेश्या भूमिका निवडतात आणि त्यांच सोनं करतात.

बऱ्याच जनांना सिरीज म्हणजे खूप बोल्ड सीन्स किंवा रोमांचकारी घटना अशा अपेक्षा असतात. तर तुमच्यासाठी ही सिरीज नक्कीच नाहीए. पण काहीतरी हलकं फुलकं बघून चांगल्या मुडने झोपायचं असेल तर नक्की बघा.

20 मिनिटांचे एपिसोडस आहेत त्यामुळे एकदाच बसून एक सिजन संपू शकेल. यातला कंटेंटही असा आहे की सगळा परिवार एकत्र बसून बघू शकेल. MX player च्या वेबसाईटवर ही सिरीज मोफत उपलब्ध आहे.

3) पांडू

मराठी डिजिटल विश्वात काहीतरी चांगले व्हिडीओज, शोज करणारं पाहिलं आणि किंबहुना एकमेव नाव म्हणजे “भाडीपा”. सिरीजच्या जगात निर्माते म्हणून MX Player च्या जोडीने त्यांनी पाहिलं पाऊल टाकलं ते “पांडू” सोबत.

मुंबई पोलिसांभोवती आजपर्यंत अनेक चित्रपट फिरले, त्यांच्या कामाचे वेगवेगळे पैलू उलगडले. पण या सिरीजमध्ये एकंदर व्यवस्थेबद्दल काहीतरी दाखवण्यापेक्षा किंवा पोलिसांचा पराक्रम दाखवण्यापेक्षा त्यातल्या एकालाच वेगळं काढून त्याच्या कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा आढावा घेतलाय.

आढावा हाच शब्द वापरावा लागेल कारण यात कुठल्यातरी एका मुद्याच्या भोवती कथा फिरत नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन विषय असतो. PSI कांबळेंच्या भूमिकेत सुहास सिरसाट आहेत. सुस्वभावी सामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या कांबळेंच्या आयुष्यात तेवढ्याच सामान्य घटना घडत असतात.

या घटनांना सामोर जाताना त्यांचा प्रवास इथे खूप बारकाव्यांनीशी मांडलाय. उदाहरणार्थ दंगल झाली म्हणून बातमी कळताच गाडीत आवश्यक हत्यारं आणि समान भरत असताना सगळेच आपापल्या घरी फोन करतात, आणि घरीच राहायला सांगतात.

मानवी स्वभावातील हे बारकावे आपल्याला इतर सिनेमांत किंवा मालिकेत एरवी दिसत नाही. कांबळे हे सहज वागणं तितक्याच सहजपणे साकारतात. त्यांचं थोडं जाड असणं हे त्या पात्राशी एकरूप करून त्यामुळे येणारा आळसही आपल्याला त्यांच्या देहबोलीतून दिसतो.

त्या खाकीच्या आत असणारा माणूस दाखवणं खरतर या सिरीजचं काम होतो, आणि सुहास सिरसाट ने त्या खाकीत दबून न जाता व्यवस्थित सांभाळलय.

दीपक शिर्के इथं हवालदार गायकवाडच्या भूमिकेत दिसतात. सेवानिवृत्त होण्याच्या काही वर्ष आधी सगळ्याच सामान्य आजोबांचा असेल तसा काहीसा विनोदी आणि इरिटेटिंग स्वभाव शिर्केनी त्यांच्या अनुभवी खांद्यावर व्यवस्थित पेललाय.

शिर्के एवढे ताकदीचे अभिनेते आहेत की या वयात सुद्धा त्यांच्यापेकशा वयाने छोट्या असणाऱ्या अभिनेत्यांना ते सामावून घेतात, त्यांच्यासमोर उगाच प्रभावशाली काम करून कथेचा मूळ प्रवाह बदलत नाही.

कांबळेंच्या पत्नीची भूमिका तृप्ती खामकर या स्टँड अप कॉमेडी मुळे प्रसिद्ध असलेल्या उत्तम अभिनेत्रीने साकारली आहे. कुठेही मूळ पात्रातून निघून बॉलिवूड मधली नवऱ्याला हग करणारी बायको ती होत नाही. चिडचिडया, असमाधानी मराठी गृहिणीसाठी ती व्यवस्थित शोभते.

कांबळेंच्या मुलाचं पात्र करणाऱ्या प्रसाद रेड्डीला आपण या आधी TVF च्या “ये मेरी फॅमिली” मध्ये बघितलं होतं. असं वाटतय की आता पात्रच त्याला समोर ठेऊन लिहिली जातात. त्याचं त्याच्या वयापेक्षा जास्त शहाण असणं हे दोन्हीही सिरीजमध्ये उठून दिसतं आणि ते शोभेल असा त्याचा अभिनयही असतो.

अनुष्का नंदकुमार आणि सारंग साठ्ये यांनी ही उत्तम कलाकृती दिग्दर्शित केली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये दंगलीचा सिन सुद्धा फक्त म्युजिक आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी कॅमेरा व्हॅनच्या बाहेर न नेता व्यवस्थित साकारला. यातली प्रत्येक गोष्ट खरी वाटते. पोलिसांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ही सिरीज नक्की बघा. MX player वर फुकट आहे.

मराठी प्रेक्षकांची संख्या आणि पैसा लावणाऱ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसची कमतरता यामुळं मराठीत मोठ्या पातळीवर ऑनलाइन कंटेंट येण जरा अवघड आहे. पण या तिन्ही सिरीजच्या निर्मात्यांनी या मर्यादांचा योग्य वापर करून छोट्या कथा सांगणाऱ्या छोट्या सिरीज बनवून या क्षेत्रात मराठी पाऊल पुढे टाकलंय. काहीतरी अगदी out of this world करण्यापेक्षा त्यांनी आपल्या विश्वातील रिलेटेबल गोष्टी चित्रभाषेत आणल्या.

सिरीज बघणारे जास्तीत जास्त प्रेक्षक हे खूप चोखंदळ असतात कारण त्यांच्या कडे पर्याय खूप असतात. पण “पांडू” सारखी सिरीज त्या पर्यायातही उत्तम निवड ठरेल याची खात्री वाटते. लॉकडाऊनच्या काळात या सिरीज नक्कीच तुमचं मनोरंजन करतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: marathi web series
ShareTweet
Previous Post

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

Next Post

स्वतःचा पाय स्वतःच ‘खुकरी’ने कापणारे भारताचे गोरखा लिजेंड मेजर जनरल इयान कार्डोझो

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

स्वतःचा पाय स्वतःच 'खुकरी'ने कापणारे भारताचे गोरखा लिजेंड मेजर जनरल इयान कार्डोझो

दुसऱ्या रामसेसच्या ममीसाठी इजिप्त सरकारने पासपोर्ट इशू केलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.