The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पच्चीस दिन में पैसा डबल’ची सगळ्यात मोठी स्कीम या कार्यकर्त्याने केली होती

by Heramb
5 September 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजच्या युगात जीवनावश्यक वस्तूंपैकी एक म्हणजे धन. याशिवाय कोणीही आपला उदरनिर्वाह करू शकत नाही. भारतीय संस्कृतीतही मानवाच्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष या कर्तव्यांमध्ये अर्थाला विशेष स्थान दिलं आहे. कारण अर्थच नसेल तर मानवी जीवनातील या अन्य तीन गोष्टींचा समतोलही बिघडून जातो.

आजमितीस धनार्जनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कैक लोक नोकऱ्या आणि व्यवसाय करून धनार्जन करतात, तर काही व्यवसाय अथवा नोकरीसह स्टॉक एक्सचेन्जमध्ये पैसे गुंतवून मोठी परतफेड मिळवतात. जगभरात असे अनेक स्टॉक एक्सचेंज आहेत. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे काहींना जुगार जरी वाटत असला तरी तो एकप्रकारे बुद्धिबळासारखा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही.

पण कोणत्याही फायद्याच्या क्षेत्रात “शॉर्टकट” मारून यश संपादित करणारे अनेक लोक असतात. या शॉर्टकटच्या नादात अनेक बेकायदेशीर आणि असभ्य कामंही होतात. असाच एक प्रकार मुंबईत झाला होता, यावर चित्रपटही आला, स्कॅम १९९२. पण जगात असे अगणित प्रकार घडले आहेत. अशा प्रकारच्या गाजलेल्या घोटाळ्यांपैकी एक म्हणजे बर्नी मॅडॉफने केलेला घोटाळा! त्याने आजवरचा सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा केला होता.

बर्नी मॅडॉफचा ‘पॉन्झी स्कॅम’ कित्येक वर्षे चालला होता. त्याने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी डॉलर्ससाठी फसवले. पॉन्झी स्कॅम म्हणजे आधीपासूनच आपल्या कंपनीकडे असलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम नव्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून द्यायची. गुंतवणूकदारांनी मॅडॉफवर विश्वास ठेवला कारण त्याला कॉर्पोरट समाजात एक मानाचं स्थान होतं, त्याचे परतावे जास्त होते पण विश्वास न ठेवण्यासारखंही काही नव्हतं.



बर्नी मॅडॉफची बर्नी मॅडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज एल.एल.सी. ही गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणारी कंपनी त्याने १९६४ साली सुरु केली होती. या कंपनीने पेनी स्टॉक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. या छोट्या कंपन्यांची पुरेपूर माहिती आणि वार्षिक अहवाल उपलब्ध नसल्याने अशा प्रकारच्या गुंतवणुकांमध्ये मोठी आर्थिक जोखीम असते.

बर्नी मॅडॉफला अनेक या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव होता. त्याने भांडवलदारांच्या बाजारात बरीच वर्षे काम केल्याने त्याच्या अनेक उत्तम ओळखी या क्षेत्रात होत्या. याशिवाय त्याने अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज ‘नॅसडॅक’च्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली होती. तो तीन वर्षे नॅसडॅकचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

बर्नी मॅडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज एल.एल.सी.च्या व्यवहारांची सुरुवात त्याने त्याच्या अशाच काही मोठ्या आणि श्रीमंत मित्रांचे पैसे गुंतवून केली. सुरुवातीला मॅडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज एल.एल.सी.ने त्यांना जास्त आणि स्थिर परतावा द्यायला सुरुवात केली. त्याच्या याच काही मित्रांनी त्याच्या कंपनीचा प्रसार केला, कारण त्यांना उत्तम परतावा मिळाला होता.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

हळूहळू मॅडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज एल.एल.सी. च्या ग्राहकांची संख्या वाढू लागली. मॅडॉफला काही निवडक ग्राहकांचीच रक्कम गुंतवणूक म्हणून घ्यावी लागली इतकी त्याच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. त्यामुळे समाजात या कंपनीबद्दल एक आदरयुक्त मानाचं स्थान निर्माण झालं. लोक या कंपनीला “प्रीमियम” म्हणून संबोधू लागले. 

बर्नी मेडोफने कमी जोखमीत स्थिर आणि जास्त परतावे देण्याचे वचन आपल्या गुंतवणूकदारांना दिले होते. गुंतवणूकदारांच्या रकमेवर स्टॉक एक्सचेंजचा काहीही परिणाम होणार नाही असे त्याने दाखवून दिले, कारण मार्केटची स्थिती खराब असली तरी तो आपल्या गुंतवणूकदारांना स्थिर आणि जास्त परतावा देत असे. फक्त गुंतवणूकदारच नाही तर अनेक पेन्शन फंड्स आणि संस्थांनीही त्याच्या कंपनीकडे आपल्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी दिली होती. 

हळूहळू त्याने आपल्या या कंपनीचं स्कॅममध्ये रूपांतर केलं. विशेषतः १९८७ आणि त्यानंतरही अनेकदा आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात मॅडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज एल.एल.सी. आपल्या ग्राहकांना स्थिर आणि उत्तम परतावा देण्यास सक्षम नव्हते. तरी त्यांनी पॉन्झी स्कॅम करून त्यांना स्थिर आणि उत्तम परतावा देण्याचे सुरु ठेवले. अशा प्रकारचे पॉन्झी स्कॅम्स हे जास्तीत जास्त ४ ते ५ वर्षं चालतात, पण मॅडॉफने चालवलेला हा पॉन्झी स्कॅम सुमारे २० वर्षं चालला होता.

पॉन्झी स्कॅम म्हणजे आधीपासूनच आपल्या कंपनीकडे असलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम नव्या गुंतवणूकदारांना त्यांच्या विथड्रॉव्हल रीक्वेस्टनुसार परतावा म्हणून द्यायची. गुंतवणूक न करता गुंतवणूकदारांचे पैसे स्वतःकडे ठेऊन घ्यायचे. गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ व्हावा यासाठी गुंतवणुकीच्या खोट्या पावत्या द्यायच्या. 

बी.एन.पी. पारिबास, एच.एस.बी.सी., ए.एक्स.ए., रॉयल डच शेल, रॉयल बँक ऑफ कॅनडा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड आदी त्यांचे मोठे ग्राहक होते. या ग्राहकांमुळे त्यांना अनेक भविष्यात अनेक ग्राहक मिळाले.

पण २००८च्या आर्थिक मंदीमुळे त्यांना आपला हा स्कॅम थांबवावा लागला, आणि अखेरीस हा जगातील सर्वात मोठा घोटाळा बाहेर आला. 

जास्त आणि स्थिर परतावा मिळत असल्याने लोक या कंपनीमध्ये प्रामुख्याने पैसे जमा करीत होते, तर २००८ मध्ये आर्थिक मंदीमुळे अनेक ग्राहकांच्या विथड्रॉवल रिक्वेस्ट्स येऊ लागल्या. पण पॉन्झी स्कॅममुळे हाताशी पैसेच उरले नसल्याने कंपनी या रिक्वेस्ट्स अप्रुव्ह करू शकत नव्हती. बर्नी मेडोफने आपल्या दोन्ही मुलांना या स्कॅमबद्दल सांगितले. ते दोघेही या पासून अनभिज्ञ होते.

हा स्कॅम बाहेर आल्यानंतर अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तसेच बर्नी मेडोफच्या दुसऱ्या मुलानेही आत्महत्या केली. या गुंतवणुकांचा आणि त्यांच्या अपेक्षित परताव्यांचा हिशोब केल्यास हा घोटाळा ६५०० कोटी डॉलर्सच्या घरात जातो. या घोटाळ्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर बर्नी मेडोफला १५० वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. २०२१ साली वयाच्या ८२व्या वर्षी आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फुटबॉल टीमचे शेअर्स ‘शॉर्ट सेल’ करून नफा कमावण्यासाठी खेळाडूंचा जीव धोक्यात घातला होता

Next Post

जाहिरातीत दाखवलेल्या ‘फायटर जेट’साठी या पट्ठ्याने पेप्सीला कोर्टात खेचलं होतं

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

जाहिरातीत दाखवलेल्या 'फायटर जेट'साठी या पट्ठ्याने पेप्सीला कोर्टात खेचलं होतं

अतिशय खराब करिअर असूनही MSK प्रसादला निवड समितीचा प्रमुख नेमलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.