The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दरोडेखोरांच्या एका टोळीने सरकारला ‘ईंटेलिजन्स ब्युरो’ ची स्थापना करण्यास भाग पडले होते

by Tushar Damgude
7 May 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


प्रस्तुत लेखाबरोबर जोडलेले छायाचित्र आहे ते कुख्यात ठग बेहराम याचे. असे म्हणतात की भारतीय गुप्तहेर संघटना IB (ईंटेलिजन्स ब्युरो)चा पाया या प्रकरणाने घातला.

भारतात साहेबी राज्य नुकतेच सुरु झाले होते आणि साहेबाने भारतीय लोकांच्या धार्मिक कृत्यात ढवळाढवळ न करण्याचे धोरण अवलंबलेले होते. त्या काळात ठळक असणाऱ्या भारतीय परंपरेनुसार कित्येक गावांतून लोकांचे तांडेच्या तांडे काशी आणि अमुक तमुक यात्रेला जात असे. त्याप्रसंगी संपूर्ण गाव त्यांना शेवटचा निरोप द्यायला जमा होई कारण यात्रेसाठी गेलेले बहुतांश लोक पुन्हा परतत नसत. लग्नाच्या वराती, व्यापारांचे काफिले, यात्रेकरू असे कित्येक लोक कराची ते जबलपूर परिसरात गायब होत, अगदी त्यांची प्रेतंसुद्धा सापडत नसत.

Image result for thug behram

आणि अशा पार्श्वभूमीवर विलीयम स्लीमन नामक इंग्रजी अधिकाऱ्याचे पगार घेऊन गेलेल्या भारतीय सैनिकांची एक टोळी रहस्यमयरित्या गायब झाली. या घटनेचा छडा लावण्यासाठी स्लीमनचीच नियुक्ती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केली.



काही स्थानिक हेरांच्या मदतीने तपास करताना स्लीमनला ठगांच्या टोळीबद्दल सुगावा लागला. परंतु फक्त तेवढ्यानेच भागणार नव्हते कारण हे ठग अत्यंत विचित्र जमात होती. त्यांची रामोशी भाषा आणि चालीरीतींबद्दल अनेकांना माहिती नव्हती, कारण या गोष्टी ते कोणालाही सांगत नसत. त्यामुळे त्यांच्यात काय शिजत आहे याचा अंदाज कुणालाच लागत नसे. त्यांच्या सांकेतिक भाषेचे उदाहरण पुढील प्रमाणे

१. सराईत ठगाला म्हणत बोरा अथवा औला
२. ठगांच्या टोळी प्रमुखाला म्हणत जमादार
३. नाण्यांना म्हणत गान अथवा खार
४. ज्या जागेवर सगळे ठग एकत्र येत त्या जागेला म्हणत बाग अथवा फूर
५. सावजाच्या आसपास घिरट्या घालणाऱ्याला म्हणत सोथा
६. जो ठग सोथाची मदत करत असे त्याला म्हणत दक्ष
७. पोलीसांना म्हणत डानकी
८. जो ठग सावजाला फाशी देत असे त्याला म्हणत फाशीगीर
९. ज्या ठिकाणी सावजाला पुरुन टाकत असत त्या जागेला म्हणत तपोनी

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

स्लीमनने हरतऱ्हेने प्रयत्न करून अखेर ठगांच्या एका प्रमुखाबरोबर संधान बांधले आणि त्याला स्वतःला ठग म्हणून प्रवेश देण्याबाबत विनवले.

एखाद्याला ठग म्हणून प्रवेश देण्याचा विधी म्हणजे ‘तपोनि’वर ठगांबरोबर एकत्र बसून गुळ खाणे. तपोनि म्हणजे थडगे. त्यांचे असे मत होते की ज्याने थडग्यावर बसून गुळ खाल्ला त्याची दुनिया वेगळी होऊन जाते. अशा रीतीने स्वतः स्लीमन ठग बनला व त्यांची भाषा-चालीरीती शिकला, त्यांच्या खाचाखोचा, श्रद्धा-अंधश्रद्धा माहिती करून घेतल्या.

आणि त्यानंतर त्याला उलगडले आजवरचे असंख्य क्रु*र गुन्हे.

या ठगांचा एक महत्त्वाचा टोळीप्रमुख होता बेहराम (बेरहम). त्याच्या टोळीत अंदाजे २०० लोक सामील होते. ते अत्यंत उत्तम प्रकारचे गाणी बजावणी करणारे आणि दगडाच्या काळजाचे म्हणावे असे जातभाई होते. डाकू ह*त्यारांच्या मदतीने दरोडा घालून लोकांना लुटत असत तर ठगांची लुटमारीची पद्धत वेगळी होती.

ठग लांबुनच प्रवास करणाऱ्या लोकांचा जथ्था हेरत आणि विविध बहाण्याने ५०/१०० ठग त्या प्रवासी जथ्थ्यात सामील होत. प्रवाशांचा विश्वास संपादन करून मौल्यवान चीजवस्तू कुठे कुठे लपवली आहे याची माहिती करून घेत.

प्रवास करताना तो तांडा विश्रांतीसाठी कुठेतरी थांबला की मनोरंजनासाठी गाण्याबजावण्याचा कार्यक्रम सुरु होई. त्याच वेळी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने टोळीचे सदस्य एकेका व्यापारी किंवा यात्रेकरू मागे जाऊन बसत. लोक गाण्यात रंगुन गेले की योग्य वेळ पाहून ठगांच्या टोळीचा प्रमुख मोठ्याने “तंबाखू खा लो” म्हणून इशारा करी.

त्याबरोबर टोळीचे सदस्य एक रुमाल आपल्या समोर असलेल्या सावजाच्या गळ्याला पाठीमागून आवळत आणि जोरात लाथ मारून पाठीचा मणका मोडून टाकत. लुळ्या पांगळ्या झालेल्या सावजाची प्रत्येक चीजवस्तू लुटून झाल्यावर हे लोक निर्दयीपणे त्या सावजाचे सगळे जोडसांधे मोडत आणि मेलेले किंवा अर्धमेलेले ते दुर्दैवी जीव आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये तसेच पुरून टाकत. त्या काळात विज्ञान तंत्रज्ञान आजच्यासारखे प्रगत नसल्यामुळे अशा पुरुन टाकलेल्या लोकांचा कुणालाही मागमूस देखील लागत नसे.

स्वतः बेहराम हा आजवर ९३१ लोकांच्या मृत्युला कारणीभूत होता. त्यातील १५० खू*न त्याने स्वतःच्या हाताने, त्याच्या पिवळ्या रुमालाने केलेले होते. गुन्हेगारी इतिहासातील आघाडीचा सिरियल कि*लर म्हणून त्याचे नाव आहे .

विलीयम स्लीमनने त्या ठगांशीं यासंदर्भात बातचीत केली तेव्हा त्या ठगांना या कृत्यांबद्दल अजिबात पश्चात्ताप वाटत नसल्याचे त्याला जाणवले.

कारण ते ठग असे मानत होते की, फार पूर्वी रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कालीमाता यु*द्ध करत होती तेव्हा तिच्या घामातून दोन पुरुष जन्माला आले. त्या दोन पुरुषांना देवीने त्या राक्षसाला मारण्याची आज्ञा केली. ते काम पुर्ण झाल्यावर ते पुरुष देवीजवळ गेले व ह*त्या करण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे आता कुणाची ह*त्या करू असे विचारले. यावर कालीमातेने त्या दोघांना त्यांच्या जातीचे असतील त्यांना सोडून इतर सर्वांना मारून टाकण्याची आज्ञा केली. ते दोन पुरुष म्हणजे ठगांचे आदिपुरुष असे हे लोक समजत असत व आपण करतोय ते धार्मिक काम आहे अशी त्यांची श्रद्धा होती.

स्लीमनने त्यानंतर कायद्यानुसार माफीचे साक्षीदार गोळा करून, तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून सर्व केस उभ्या केल्या.

न्यायालयासमोर सगळा साक्षीपुरावा झाल्यानंतर जवळपास १५०० ठगांना कठोर शिक्षा ठोठावली गेली. त्यातील ८००/९०० ठगांना थेट फाशीची शिक्षा सुनावली गेली.

या कामगिरीबद्दल स्लीमनला अनेक सरकारी मानमरातब प्राप्त झाले. तर भारतीय लोकांनी जबलपूर येथे त्याचे मंदिर उभारले. मध्यप्रदेशातील एका तालुक्याचे नाव स्लीमनाबाद असल्याचे आजही तुम्हाला आढळून येईल.

ठग प्रमुख बेहरामचा पिवळा रुमाल इंग्लंडमधे त्याच्या वंशजांकडे अजूनही आहे असे म्हणतात.

सर स्लीमन यांचे इतर कार्य म्हणजे त्यांनीच आशियातला पहिला डायनॉसॉरचा सांगाडा नर्मदेच्या खोऱ्यात शोधला. तसेच जंगल बुक या सुप्रसिद्ध कथानकामधील मोगलीचे पात्र स्लीमन यांच्या एका पुस्तकातील त्यांनी पाहिलेल्या जंगलातील मुलाच्या पात्रावरुन बेतलेले आहे.


अधिक कुतूहल असलेल्या वाचकांनी “Confessions of a Thug” नावाचे पुस्तक जरूर वाचावे.


लेखक: तुषार दामगुडे


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: BanditsTerrorist
ShareTweet
Previous Post

डबघाईला आलेल्या ‘ॲपल’ कंपनीला स्टीव्ह जॉब्सने कसं वाचवलं? जाणून घ्या..

Next Post

चीनची आ*ण्विक ताकद जाणून घेण्याच्या भारताच्या प्रयत्नात अमेरिकेने केली होती अभूतपूर्व मदत!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

चीनची आ*ण्विक ताकद जाणून घेण्याच्या भारताच्या प्रयत्नात अमेरिकेने केली होती अभूतपूर्व मदत!

सरपंच पदाची निवडणूक हरलेला उमेदवार ते सरपंच पदामुळेच पद्मश्री मिळालेलं व्यक्तिमत्व

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.