The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

by द पोस्टमन टीम
11 February 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

शस्त्रक्रिया हे वैद्यकीय क्षेत्राचं अविभाज्य अंग आहे. मोठे अपघात होतात तेव्हा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. कधीकधी छोट्या जखमांनासुद्धा टाके घालण्यावाचून पर्याय नसतो. हृदयासारख्या नाजूक अवयवावरच्या काही शस्त्रक्रिया तर दहा-बारा ताससुद्धा चालतात.

पेन-किलर्स आणि अनेस्थेशियाचा शोध लागण्यापूर्वी लोक शक्यतो शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करीत, कारण त्या भयानक वेदना मृत्युपेक्षाही जास्त भीतीदायक होत्या. भीक नको पण कुत्रा आवर अशी गत त्यावेळी शस्त्रक्रियेची होती. ऑलिव्हर वेन्डेड होम्स याने ॲनेस्थेशिया या शब्दाचा शोध लावला. ग्रीक भाषेत An म्हणजे without आणि aesthesis म्हणजे sensation, याचाच अर्थ वेदनारहित.

प्राचीन काळात माणसाला जेव्हा शस्त्रक्रिया करायची गरज वाटू लागली, तेव्हाच शस्त्रक्रिये दरम्यान होणाऱ्या वेदना कमीत कमी कशा करता येतील या दिशेने शोध सुरू झाला. त्यासाठी अल्कोहोल आणि नार्कोटिक पदार्थांचा वापर करण्यात येऊ लागला. पण दुर्दैवाने अनेक कारणांमुळे लोकांना अल्कोहोल किंवा नार्कोटिक यांचा वापर मान्य नव्हता त्याऐवजी शस्त्रक्रियेच्या वेदना सहन करणे त्यांना मान्य होते. ऑपरेशनच्या वेदना अक्षरशः असह्य असत, त्यामुळे पेशंटला दोन व्यक्तींनी पकडूनच ठेवावे लागे.

आधी हे सगळं वाचून आपली, ‘त्यात काय एवढं?’ अशी प्रतिक्रिया असली तरीही, काही काळापूर्वी ही शस्त्रक्रिया लहान का असेना पण लोकांना मोठं संकटच वाटत होती. त्याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी भूल देण्याची सोय उपलब्ध नव्हती. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरसुद्धा अशी भूल न देता शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व दांडगं असलं तरी, ही कल्पनाच करवत नाही! या भूलीचा प्रवास कुठून सुरू झाला आणि त्याआधी हे ऑपरेशनचे थरारनाट्य कसे रंगत असेल हे खरंच रंजक आहे!

ख्रिस्तपूर्व ४००० च्या काळात पश्चिम आशियात भूल देण्यासाठी अफूचा वापर सुरू झाला. पोटदुखी, दातदुखी यासाठी वेदनाशामक म्हणून अफूचा वापर केला जात असे.

एकदा प्राचीन इजिप्तमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा थांबवण्यासाठी म्हणून कॅरोटीन कॉम्प्रेशनचा वापर केला गेला होता आणि दुर्दैवाने त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा उपाय फक्त लहान शस्त्रक्रियांसाठी वापरला जाऊ लागला.

तेराव्या शतकात इटलीतही एका रुग्णाला अफू आणि हेमलक हुंगायला देण्यात आले, पण त्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. पंधराशे सालात पॅरासेल्सस नावाच्या शास्त्रज्ञाला ‘इथर’च्या नार्कोटिक इफेक्टचा शोध लागला. सल्फ्यूरिक ॲसिड आणि इथेनॉलचे उर्ध्वपतन करून त्याने पहिल्यांदा इथर शोधलं आणि त्याला “स्वीट ऑइल ऑफ कंट्रोल” असं नाव दिलं. पुढे १७२९ मध्ये सिगमनने त्याला इथर असं नाव दिलं.

हळूहळू भूलशास्त्रात प्रगती होत होती. पण, तरीही लोकांना  शस्त्रक्रियेच्या भयानक वेदनांपेक्षा मृत्यूच जास्त जवळचा वाटत होता.

वैद्यकशास्त्रात हळूहळू प्रगती होत गेली आणि शस्त्रक्रियांची संख्याही वाढू लागली.

आता शस्त्रक्रियेदरम्यान त्या रुग्णाला होणाऱ्या वेदना लंडनमधील एक लोकप्रिय कलाप्रकार बनला!

पेशंटला स्टेजवर झोपवले जायचे. डॉक्टर त्याची शस्त्रक्रिया करत आणि ते बघण्यासाठी लोक चक्क तिकीट खरेदी करून गर्दी करत. ऑपरेशन थिएटर हे नाव नेमकं कशावरून पडले असेल याचा अंदाज आपल्याला आलाच असेल!

रक्ताच्या थारोळ्यात हा रोमन रेन्स एम स्टाइल सोहळा बघायला प्रेक्षक येत असत. त्यांच्यासमोर सर्जन पेशंटच्या पायाचे ऑपरेशन, गर्भाशयाच्या गाठीचे ऑपरेशन, किंवा अगदी स्तनाच्या कर्करोगाचे स्तनसुद्धा कापून दाखवत असतात आणि तेही भुलीशिवाय!!

या थेटरमधला, रॉबर्ट लीस्टन नावाचा सर्जन म्हणजे खास हिरो होता. त्याने केलेली शस्त्रक्रिया बघण्यासाठी लोक वाटेल ती किंमत मोजून हजेरी लावत. सर्वाधिक जलद शस्त्रक्रिया करण्यासाठी तो ओळखला जात असे. त्यावेळी  जितक्या लवकर शस्त्रक्रिया संपेल तितक्या कमी वेदना रुग्णाला होतील. त्यामुळे जो डॉक्टर लवकरात लवकर शस्त्रक्रिया संपवतो तो खरा तज्ज्ञ.

लीस्टन त्यासाठीच विख्यात होता. अनेकदा पेशंट वेदना सहन न झाल्यामुळे दगावत असत. त्यांच्यासाठी लीस्टन एक वरदान होता. पण त्याचे काही दोषसुद्धा होते. तो अजिबात स्वच्छता पाळत नसे. एवढेच नाही तर दोन्ही हात वापरण्यासाठी तो चक्क इक्विपमेंट दातातसुद्धा धरीत असे! त्याच्या या सवयीमुळे बऱ्याच लोकांना बॅक्टेरिअल इन्फेक्शनला सामोरं जावं लागलं होतं.

वेदनाविरहित सर्जरीसाठी संशोधन सुरूच होते. ३० सप्टेंबर १८४६ साली पहिल्यांदाच दात काढण्यासाठी भुलीचा वापर केला गेला. विल्यम थोमस ग्रीन असं त्या सर्जनचं नाव होतं.

या सर्जरीसाठी त्याने पहिल्यांदाच डायइथाइल इथरचा वापर केला होता. विल्यम हा वेदनाशामक औषधांचा जनक म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे वैद्यकीय इतिहासात क्रांती झाली. आजपर्यंत मरण यातना समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया सोप्या झाल्या. रुग्णांची भयानक वेदनांमधून सुटका होण्यास मदत झाली.

यथावकाश इथरची जागा इतर औषधांनी घेतली. इथरच्या अतिवापरामुळे काही पेशंट्सना साइड इफेक्ट्स जाणवू लागले. शिवाय इथर अतिशय ज्वालाग्राही पदार्थ असल्यामुळे, त्याचा वापर करणे जोखमीचे होते. हा पदार्थ अगदी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळेसुद्धा पेट घेऊ शकतो. म्हणजे घर्षणामुळेसुद्धा रुग्णालयाच्या आवारात आग लागण्याच्या शक्यता होत्या.

१९४७ मध्ये इथरला पर्याय म्हणून क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आला. बऱ्याच यु*द्धांमध्ये सैनिकांवर जलद शस्त्रक्रिया करताना क्लोरोफॉर्मचा वापर भूल देण्यासाठी केला जाऊ लागला.

१९७२ मध्ये इंग्लंडच्या जोसेफ प्रिस्टले याने नायट्रस ऑक्साईड शोधून काढले. ज्याला आपण लाफिंग गॅस म्हणूनसुद्धा ओळखतो. आजही ऑक्सिजनमध्ये मिसळलेले नायट्रस ऑक्साईड भूल देण्यासाठी प्रभावी औषध आहे.

आज ही वेदनाशामकांची यादी बरीच मोठी झाली आहे. भूल देण्याच्या बऱ्याच आधुनिक पद्धतीसुद्धा विकसित झाल्या आहेत. त्यांच्यामुळे होणारे साइड इफेक्टसुद्धा अगदी नगण्य आहेत. त्यामुळे निदान आपली सर्जरी अतिशय सुसह्य झाली, नाहीतर जुन्या पद्धतींचा विचार केला तरी अंगावर शहारे येतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


Tags: anesthesiahistory of medicine
ShareTweet
Previous Post

८०० विमानांनी एकत्रितपणे बॉ*म्बह*ल्ला करून जर्मनीचं एक अख्ख शहर बेचिराख केलं होतं

Next Post

नोकरी गेली, बायकोने सोडले, २० वर्षं पडेल ते काम केले, वयाच्या ८८ व्या वर्षी उभा केला स्वतःचा ब्रँड!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

नोकरी गेली, बायकोने सोडले, २० वर्षं पडेल ते काम केले, वयाच्या ८८ व्या वर्षी उभा केला स्वतःचा ब्रँड!

भारतात स्वर्णयुग आणणाऱ्या या सम्राटाने सिंधुपासून ब्रम्हपुत्रेपर्यंत 'अजिंक्य' साम्राज्य उभारले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.