The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तेराव्या शतकात संजीवनी शोधून काढणारा ‘अल्केमिस्ट’

by Tushar Damgude
12 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘फॅन्टास्टीक बिस्ट- क्राईम्स ऑफ ग्रिन्डेलवाल्ड’ जादुई कथानकावरील चित्रपटात अत्यंत मोक्याच्या क्षणी एका व्यक्तीची एंट्री होते. तेराव्या शतकात जन्म घेतलेली व या काळात अवतरणारी जवळपास सहाशे वर्षांची ही व्यक्ती म्हणजे ‘निकोलस फ्लॅमेल’.

निकोलस फ्लॅमेल आपल्याला त्याआधी भेटला होता ते हॅरी पॉटर ॲंड फिलॉसॉफर्स स्टोन या पुस्तकात/ चित्रपटात. हे सांगायचे कारण म्हणजे चित्रपट किंवा जादुई पुस्तकात भेटलेली ही व्यक्ती खरोखरच तेराव्या शतकात अस्तित्वात होती. पॅरीसमध्ये याचे सातशे वर्षे पुरातन घर आजही आहे, सुप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाचा रस्ता याच्या बायकोच्या नावावर आहे. कोण आहे हा निकोलस फ्लॅमेल?

मानवाला दोन गोष्टींनी कायम आकर्षित केले आहे ते म्हणजे चिरतारूण्य असलेले अमरत्व आणि अमर्याद सोन्याची मालकी. या दोन गोष्टींच्या प्राप्तीसाठी पुरातन काळापासून माणसाने अक्षरशः जंगजंग पछाडले आहे. त्यासाठी निरनिराळे मंत्र-तंत्र , प्रयोग तो आजपर्यंत करत आला आहे.

अमरत्व अथवा कुठल्याही धातूपासून सोने बनवण्याच्या या शाखेला अल्केमी किंवा मॅग्नम ओपस असे पाश्चिमात्त्य लोक म्हणतात.

आज आपण ज्या वैज्ञानिक शाखेला केमेस्ट्री म्हणून ओळखतो त्या शाखेचा उगम अल्केमीमधूनच झाला आहे.



पाश्चिमात्त्य समजुतीनुसार निकोलस फ्लॅमेल याला हा परिसाचा किंवा अमरत्वाचा दगड/ मणी/काढा बनवण्यात यश आले होते असे म्हणतात. त्याच्याशिवाय alburtes magnus याला देखील असा दगड बनविण्यात यश आले असे म्हणतात, हा दगड पुढे त्याने त्याचा शिष्य Thomas Aquinas याला दिला अशी बोलवा आहे.

हा मणी/ दगड/ काढा फक्त पाश्चिमात्त्यच नव्हे तर अनेक धर्म व संस्कृतींमध्ये अवतरतो. ख्रिश्चन मान्यतेनुसार हा दगड बनवण्याचे रहस्य  होते. तर हाच दगड ज्यु धर्मात TEMPLE OF SOLOMAN मध्ये अवतरतो. 

मुस्लिम साहित्यात सुप्रसिद्ध जबीर इब्न हय्यान याने या कलेची विस्तृत माहिती दिली आहे. अरबी भाषेत सर्व तऱ्हेचे आजार पळवून अमरत्व देणाऱ्या या दगड/मणी/ काढ्याला अल इक्सीर हे नाव आहे. पुढे हाच शब्द इंग्रजीमध्ये Elixir म्हणून रूढ झाला. हे प्रयोग करण्याच्या कलेला किमया असा अरबी शब्द होता तर हे प्रयोग करणाऱ्यांना किमयागार म्हणतात. अरबांना या कलेची माहिती हिंदुस्थान्यांकडून मिळाली होती असे त्यांच्याच साहित्यात नोंद केलेली आढळते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हिंदू संस्कृतीमध्ये मात्र या मण्याची कथा फार पुरातन आहे.

स्यमंतक/श्यामन्तक किंवा चिंतामणी म्हणून आपण याला ओळखतो. हा स्यमंतक मणी भगवान सुर्याने सत्यभामेचा पिता सत्राजीत याला दिला होता. हा मणी रोज ८५ किलो सोने उत्पादित करत असे, त्या जोरावर सत्राजीत हा द्वारकेतील धनाढ्य असामी म्हणून ओळखला जात असे. पुढे त्या मण्याची चोरी, सप्त चिरंजीवातील एक, जांबुवान याच्याकडून तो भगवान श्री कृष्णाला पुन्हा मिळणे वगैरे कथा आपल्याला माहिती आहेत.

बौद्ध साहित्यात देखील याला चिंतामणी म्हणूनच ओळखतात, जो बोधीसत्वांजवळ होता. बौद्ध संस्कृतीतून हा जपान आणि चीनमध्ये देखील पोहचला. लक्ष्मीची जपानी आवृत्ती असलेल्या Kisshōten या देवतेच्या हातात हा चिंतामणी आहे. तर बाली देशात किंतामणी हे पर्वताचे नावच चिंतामणीवरुन आलेले आहे.

चिंतामणी, Elixir, फिलॉसॉफर्स स्टोन, परिस अशा हजारो नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या मणी/दगड/काढ्याने मानवी इतिहासातील कित्येक अंगांना स्पर्श केला आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते शेक्सपिअर, डांटे यांच्या साहित्य कृतींमध्ये आपले अस्तित्व दाखवले आहे.

तर ज्यांना आज आपण शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो त्या निकोलस फ्लॅमेलपासून अगदी सर आयझॅक न्युटनपर्यंत सर्वांवर या अल्केमीने आपले गारूड घातले आहे. आयझॅक न्युटनने आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ या परिसाचा शोध घेण्यात घालवला. तर आधुनिक केमेस्ट्रीचा जनक रॉबर्ट बॉयल हा आजच्या अर्थाने शास्त्रज्ञ नसून अमरत्व तथा परिसाच्या शोधात असलेला अल्केमीस्ट आहे. नवविद्यांचा पुरस्कर्ता असलेल्या सुप्रसिद्ध रॉजर बेकनने सातशे वर्षांपूर्वी आगबोटीची व विमानांची स्वप्नं पाहिली, त्याविषयी लिहून देखील ठेवले परंतु तो देखील अल्केमीस्ट होता.

या नादाला लागून कित्येकांना दारिद्र्य आले, कुणाला फाशी झाली तर कुणाला जिवंत जाळले गेले पण या किमयागारांच्या वेडामुळेच आज आपण वापरत असलेल्या काडेपेटीपासून ते बंदुकीच्या दारूपर्यंत अनेक गोष्टींचा शोध कळत-नकळतपणे लागला आहे हे माहिती असणे गरजेचे आहे.

किमयेचे प्रयोग करता करताच नायट्रीक ॲसिड, हायड्रोक्लोरीक ॲसिड, सल्फ्युरीक ॲसिड यांचे गुणधर्म लक्षात आले. या संशोधनातूनच आजही वापरल्या जाणाऱ्या कित्येक शास्त्रीय उपकरणांचा शोध लागला हे देखील सत्य आहे.

नवलाची गोष्ट म्हणजे रसायन शास्त्रात अणुविभाजनानंतरच्या काळात किमया अथवा ‘ट्रान्सम्युटेशन ऑफ एलीमेंटस्’ ही गोष्ट सत्य सृष्टीतील आहे हे ध्यानात आले. मुळात सोने नसणाऱ्या मूलभूत पदार्थांपासुन सोने बनवण्याची किमया आज शास्त्रशुद्ध मानली गेली आहे. त्यासाठी येणारा खर्च किती ही बाब वेगळी, पण युरेनियमपासून प्लुटोनीयम , कार्बनपासून नायट्रोजन, नायट्रोजनपासून ऑक्सिजन तसेच प्लॅटीनमवर न्युट्रॉन्सचा मारा करुन त्यापासून सोने बनवणे आज शक्य झाले आहे. असो..

पुरातन काळात कुणाला परिस, फिलॉसॉफर्स स्टोन, Elixir of Life, चिंतामणी वगैरे मिळाला असेल किंवा नसेल पण या वस्तूंना प्राप्त करण्याच्या ध्येयापोटी आज आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या रसायन शास्त्राची शाखा समृद्ध झाली हे ही नसे थोडके.

जाता जाता पंधराव्या शतकात परिसाच्या शोधार्थ आयुष्यातील कवडी न कवडी खर्च करुन दरीद्री बनलेल्या इटालीयन किमयागार ट्रेव्हीसन यास आयुष्याच्या शेवटी एक महत्त्वाचा शोध लागला व त्याने मृत्युपुर्व ज्या ओळी उद्धृत केल्या त्या सांगतो,

तो म्हणतो ‘सोने सोन्यापासुनच निर्माण होईल, हीन धातुंपासुन नाही’.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: AlchemistHarry PotterHollywood
ShareTweet
Previous Post

चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून हा मराठी शेतकरी वर्षाकाठी 1 कोटींचा नफा कमावतोय

Next Post

कोरोना बद्दल तुम्हाला ही असलेली माहिती सत्य नव्हे अफवा आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कोरोना बद्दल तुम्हाला ही असलेली माहिती सत्य नव्हे अफवा आहे

ब्रिटिशांनी तिला गर्भवती असताना तुरुंगात डांबले, पण तिने माघार घेतली नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.