The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदर पूनावाला आता ऑक्सफर्डला लस संशोधनासाठी ५०० कोटी रुपये देणार आहेत..!

by द पोस्टमन टीम
18 December 2021
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


साधारण गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीनं धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी जीवदेखील गमावले आहेत. चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगभर पसरला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना जगातील मोठ-मोठ्या देशांचे देखील प्रचंड हाल झाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असूनही कोरोनासमोर सर्वजण हतबल झाले होते. जगातील प्रत्येक देशातील आरोग्य यंत्रणा जेव्हा कोरोना महामारीशी दोन हात करण्यात व्यस्त होती तेव्हा शास्त्रज्ञांनी लस तयार करण्याकडं आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं. जगभरात विविध ठिकाणी कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी आपला सर्व जोर लावला होता.

कोरोनाच्या लस निर्मितीमध्ये भारतातील एक संस्था अग्रेसर होती. या संस्थेनं यशस्वीपणे कोरोना लशीची निर्मितीचं केली नाही तर ती जगभरात वाटली देखील. सध्या जगभरात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगात सुरू आहे. त्यामुळं कोरोनाची तीव्रता कमी झाल्याचं चित्र आहे. “Progress is not only about how we grow, it is about how we make a difference in the lives of others!” हे आपलं ब्रीदवाक्य सार्थ ठरवत ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ या संस्थेनं कोरोनाकाळात आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे.

भारतातील पहिल्या क्रमांकाची बायोटेक कंपनी आणि जगातील सर्वात मोठी लस उत्पादक असलेल्या सीरमनं आतापर्यंत कोट्यवधी लोकांना आपल्या लसींच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याचं काम केलं आहे. जगभरातील १४० पेक्षा जास्त देशांना विविध लसींचा पुरवठा सीरममधून होतो.



असा अंदाज आहे की जगातील सुमारे ६५ टक्के मुलांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली किमान एक तर लस मिळतेच. याचाच अर्थ जगाच्या भविष्यात सीरमचा मोलाचा वाटा आहे. सीरममुळं वेळोवेळी जगभरात आपल्या देशाची मान उंचावली आहे. लवकरच यात आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे.

सीरमनं जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आपलं रिसर्च कॅम्पस सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सिरमनं ऑक्सफर्डला 50 दशलक्ष ब्रिटिश पाउंड देण्याचे वचन दिलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिरमला मिळालेलं हे मोठ यश आहे.

ऑक्सफर्डमधील सिरमच्या व्हॅक्सिन रिसर्च बिल्डिंगला सायरस पूनावाला यांचं नाव दिलं जाणार आहे. त्याठिकाणी एकाचवेळी 300 हून अधिक शास्त्रज्ञांना काम करता येणार आहे. यामुळं विद्यापीठातील व्हॅक्सिन डेव्हलपमेंट प्रोग्रामला मोठी मदत होणार आहे. याशिवाय सिरमनं ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका या कोविड-19 लसीचा निर्मात असलेल्या जेनर इन्स्टिट्यूटला देखील मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. सिरम जेनेरला R21/Matrix-M या मलेरिया शॉटचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विकास करण्यासाठी मदत करणार आहे. आतापर्यंत ब्रिटन वगळता इतर कुठल्याही खासगी लस उत्पादक कंपनीनं ऑक्सफर्डमध्ये आपला पाय रोवलेला नाही. मात्र, सिरमनं हे करून दाखवलं आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

१९६६ मध्ये डॉ. सायरस पूनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. आपल्या देशामध्ये जीवन-रक्षक इम्युनो-बायोलॉजिकल उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. या सर्व गोष्टी विदेशातून आयात कराव्या लागतात. त्यामुळं त्यांची किंमतदेखील प्रचंड आहे. आपल्या देशातील सामान्य जनतेला हा खर्च नक्कीच परवडणारा नाही, यासर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर घोड्यांचे फार्म सांभाळणाऱ्या सायरस पूनावाला यांनी सिरमची निर्मिती केली होती. 

देशातील सामान्य माणसाला परवडेल आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील अशी अनेक जीवरक्षक जैविक उत्पादनं त्यांनी तयार केली. सिरमची स्थापना झाल्यापासून भारत टिटॅनस अँटी-टॉक्सिन आणि ॲन्टी-स्नेक व्हेनम सीरम, डीटीपी (डिप्थीरिया, टिटॅनस) या औषधांमध्ये स्वयंपूर्ण झाला. याशिवाय गोवर, गालगुंड आणि रुबेला या लसींची देखील सिरमनं निर्मिती केली. सध्या सिरमच्या या तीन लसी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या आहेत.

सायरस पूनावाला यांनी लसनिर्मितीमध्ये आपल्या देशाला स्वयंपूर्ण होण्यास मदत केली. याशिवाय जगभरातील लहानमुलांच्या एकूण संख्येपैकी कित्येक मुलं हिपॅटायटीस-बी व्हॅक्सिन, कॉम्बिनेशन व्हॅक्सिनअभावी विविध आजारांना बळी पडत होती. आफ्रिका खंडातील अतिशय गरीब राष्ट्रांतील सरकारांनादेखील या लसी आयात करून मुलांना देणं परवडत नव्हतं. ही बाब पूनावालांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केवळ भारतीयच नाही तर जगभरातील सर्व मुलांसाठी नाममात्र किमतीमध्ये लस उपलब्ध करून दिली.

याशिवाय महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक लोककल्याणकारी काम सुरू केलेली आहेत. आदर पूनावाला क्लीन सिटी प्रोजेक्ट हा त्यापैकीच एक आहे. सध्या सिरमची जबाबदारी सांभाळत असलेल्या आदर पूनावाला यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य सुरू ठेवलं आहे. त्यांनी ‘क्लीन सिटी’ उपक्रम हा सामाजिक जबाबदारीसाठी म्हणून हाती घेतला आहे. भारतातील शहरं स्वच्छ बनवण्याची त्यांची इच्छा आहे.

भारताची प्रतिमा सुधारायची असेल तर उत्तम व्यवस्थापन, स्थानिक सरकारचं समर्थन आणि भरीव निधी आवश्यक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी २०१४मध्ये आपल्या क्षमतेनुसार क्लीन सीटी उपक्रमासाठी 100 कोटी रुपये देवू केले. आदर पूनावाला क्लीन सिटी उपक्रमानं पुणे महानगरपालिकेला पायाभूत सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सिरम इन्स्टिट्युट शिक्षण, ग्रीन एनर्जी, पाणी पुरवठा, सॅनिटेशन, हेल्थ केअर अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे. विशेषत: हेल्थ केअर क्षेत्रात सुरू असलेलं काम वाखाणण्याजोग आहे. पूनावाला कुटुंबानं पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे ‘विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटल’ या नावाचं एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. वेल्फेअर मेडिकल फाउंडेशननं हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्यानं हे हॉस्पिटल बांधलं आहे. याठिकाणी दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार देण्याचा प्रयत्न केला जातो.

बिझनेस हा पूनावालांच्या रक्तात आहे. स्वत:चा फायदा झाल्याशिवाय ते समाजासाठी पैसा देणार नाहीत, असं अनेकजण म्हणतात. मात्र, ही गोष्ट पूनावाला कुटुंबानं वेळोवेळी खोटी ठरवली आहे. आता तर ऑक्सफर्डमध्ये देखील सिरमनं पाऊल ठेवलं आहे. यानिमित्त ऑक्सफर्डमध्ये भारताचा झेंडा फडकत राहील, हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पाकिस्तानच्या कॅप्टननेच गुंडप्पा विश्वनाथ यांना मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती..!

Next Post

फिलिपिन्समध्ये आलेल्या या वादळाने अक्षरशः मृत्युचं थैमान घातलंय!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

फिलिपिन्समध्ये आलेल्या या वादळाने अक्षरशः मृत्युचं थैमान घातलंय!

नासाचं हे अवकाशयान चक्क सूर्याला स्पर्श करून आलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.