The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जंगलात शिकाऱ्यांना सापडला होता खराखुरा मोगली!

by द पोस्टमन टीम
17 April 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक ,युट्युब


उत्तर भारतातील घनदाट जंगलातून शिकाऱ्यांचा एक गट फिरत होता. तेव्हा त्यांना अचंबित करणारी आणि बुचकाळ्यात टाकणारी गोष्ट दिसली. लांडग्यांचा एक कळप जंगलात फिरत होता आणि त्या कळपाच्या मागून एक भुतासारखी आकृती चार पायांवर रांगत रांगत जात होती. त्या शिकाऱ्यांनी थोडा वेळ झुडूपाआडून लांडग्यांच्या या कळपाचे निरीक्षण केले.

लांडग्याच्या कळपामागून चालणारी ती आकृती म्हणजे माणसाचे मुल होते. ही गोष्ट आहे १८७२ सालची. शिकाऱ्यांनी या लांडग्यांची शिकार केली आणि त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा त्या मुलाचे वय सुमारे सहा वर्षाचे होते. सहा वर्षांचा होईपर्यंत जंगलातील लाडग्यांच्या कळपानेच त्याचा सांभाळ केला होता. त्यामुळे ते मुलसुद्धा स्वतःला रानटी प्राणीच समजत होते.

त्या शिकाऱ्यांनी तिथून त्याला मिशनऱ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका अनाथालयात आणून सोडले. तिथे त्याचे नाव ठेवले सनीचर! सनीचर अक्षरश: वेड्यासारखा वागायचा. परंतु, कधीकधी चलाखीही दाखवायचा.

जंगलात प्राण्यांच्या सहवासात राहून मोठा झालेला सनीचर हा काही पहिला आणि शेवटचा मुलगा नव्हता. याआधीही अशी खूप मुले सापडली होती आणि त्यानंतरही सापडली. या मुलांना रानटी मुले म्हणत. पण, सनीचरचा किस्सा मात्र त्याकाळात खूपच गाजला.



रुडयार्ड किपलिंग या ब्रिटीश लेखकाने त्यावेळी जंगल बुक नावाची एक बालकथा लिहिली होती. ज्यात लांडग्याच्या सहवासात राहणाऱ्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली होती. तीच गोष्ट नंतर मोगलीच्या रूपाने घराघरात पोचली. नव्वदच्या दशकात ही कथा कार्टूनच्या स्वरुपात दूरदर्शनच्या पडद्यावर साकार झाली. या कार्टूनमधील मोगलीने ९०च्या दशकातील मुलांना अक्षरशः स्वतःच्या प्रेमात पाडले.

अर्थात, कार्टूनमधील मोगली आणि लांडगे माणसांची भाषा बोलत होते. परंतु, खऱ्याखुऱ्या मोगलीच्या म्हणजेच सनीचरच्या बाबतीत मात्र नेमकी हीच गोष्ट अगदी उलटी होती.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

सनीचरला माणसांची भाषा अजिबात येत नव्हती. तो जंगली प्राण्यांच्याच भाषेत बोलत असे.

अनाथालयात आल्यावर त्याला सुसंस्कृत माणसाप्रमाणे वर्तन करणे अतिशय अवघड जात होते. त्याला शहरात राहणाऱ्या माणसाप्रमाणे चालताबोलता तर येत नव्हते. पण, कपडे घातली की तो नीटनेटका दिसू लागेल ही आशादेखील त्याच्या बाबतीत फोल ठरली.

सनीचरला जितका माणसाळण्याचा केला जात होता तितका त्याचा रानटीपण अधिक गडद आणि भयाण होत गेला. तो माणसात राहू लागला तरी, माणसासारखे वर्तन करणे त्याला कधीच जमले नाही. पुढे त्याच्या मृत्यूपर्यंत तो माणसाच्या सहवासात राहिला तरी त्याला माणसाप्रमाणे बोलणे जमले नाही.

वयाच्या पहिल्या सहा वर्षांतच मुलं भाषा शिकतात. सनीचरच्या बाबतीत ती प्रक्रिया कधीच घडली नाही. वयाच्या या टप्प्यात भाषा अवगत झाली नाही तर, नंतर भाषा अवगत करणे कठीण जाते. तसेच सनीचरच्या बाबतीत झाले. त्याची भाषा शिकण्याची क्षमताच संपून गेली होती. तो मुका किंवा बहिरा नव्हता पण तरीही हो बोलू शकत नव्हता. जी गोष्ट बोलण्याच्या बाबतीत तीच खाण्यापिण्याच्या बाबतीत.

महत्प्रयासाने सनीचर कसाबसा बशी आणि कपाचा वापर करायला शिकला पण, त्याने कच्चे मांस खाणे सोडले नाही. खाण्यापूर्वी जेवण हुंगून पाहण्याची त्याची सवयही सुटली नाही.

कपडे कसे घालावे हे शिकायला तर त्याला खूपच वेळ लागला. पण, सहा वर्षांचा होईपर्यंत तो रांगतच होता. त्यामुळे, आपण ताठ उभे राहू शकतो, उभे राहून चालू शकतो हे त्याला कधीच समजले नाही. त्यामुळे कपडे घातले तरी तो ओंगळवाणाच दिसायचा.

१९४१ साली वायन डेनिस या मानसशास्त्रज्ञाने “द सिग्निफिकन्स ऑफ फेरल मॅन” या नावाचा एक प्रबंध प्रकाशित केला होता. रानटी माणसाची जी काही वैशिष्ट्ये डेनिसने नोंदवली होती, ती सर्व वैशिष्ट्ये सनीचरमध्ये होती. डेनिसच्या मते अशी रानटी मुले उष्णता किंवा थंडीच्या बाबतीत असंवेदनशील असतात. अर्थात, त्यांच्यावर याचा काही परिणाम होत नाही. भाजेल किंवा थंडी वाजेल यापैकी त्यांना कशाचीच भीती वाटत नाही.

त्यांना माणसाविषयी फारसा जिव्हाळा वाटत नाही. माणसाशी त्यांच्या तारा जुळत नाहीत. सनीचर देखील अनाथालयात असाच जंगलातून उचलून आणलेल्या मुलाबद्दल जास्त ओढ दाखवत होता. पण, इतर व्यक्तींबद्दल त्याला फारसा जिव्हाळा नव्हता. या मुलांनी वयाची पहिली काही वर्षे जंगली प्राण्यांसोबत घालवल्यामुळे ते स्वतःला प्राणीच समजत असतात.

भारतात अशाप्रकारे जंगली प्राण्यांमध्ये वाढलेली रानटी मुले सापडण्याची संख्या इतर देशाच्या तुलनेत जास्ती आहे. सनीचर सापडल्यानंतर त्यावर्षी त्या शिकाऱ्यांच्या गटाला अशी आणखी चार मुले सापडली होती.

मानवी अनुभवाच्या केंद्रस्थानी भाषेला फार महत्व आहे. एखाद्या बेटावर माणसांचा एखादा समूह असेल आणि त्यांना कोणतीच भाषा अवगत नसेल तर ते दुसऱ्या पिढीनंतरच नवी भाषा अवगत करू शकतात. नॉम चॉम्स्कीने त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर या प्रबंधातून ही बाब स्पष्टीकरणासह समजावून दिलेली आहे.

ल्युसिअन माल्सन या मानसशास्त्रज्ञाने आपल्या वोल्फ चिल्ड्रन या पुस्तकातून हे दाखवून दिले आहे की, प्राण्यांच्या सहवासात वाढलेली मुले ही आपल्या जैविक मात्या-पित्यांऐवजी आपल्या पालनपोषण केलेल्या जंगली मात्या-पित्यांच्याच सवयी आणि लकबी उचलतात.

विशेषत: संवादाच्या बाबतीत ती त्यांच्याप्रमाणेच भुंकणे, खिंकाळणे, गुरगुरणे अशा प्रकारची भाषा शिकतात. माल्सनच्या मते हसणे आणि स्मित हास्य देणे ही फक्त मानवी वैशिष्ट्ये समजली जातात. ती वैशिष्ट्ये या मुलांमध्ये अजिबात विकसित झालेली नसतात.

सनीचर अगदी अल्पायुष्य जगला. मानवी सहवासात वीस वर्षे घालवून देखील तो अगदी तुरळक मानवी वैशिष्ट्ये आत्मसात करू शकला. तो थोडंथोडं ताठ उभा राहण्यास शिकला असला तरी चालताना मात्र तो हात आणि पाय दोन्हीचा वापर करायचा. स्वतःहून कपडे घालणे तर त्याला कधीच जमले नाही. आपले ताट किंवा प्लेट कुठे ठेवली हे देखील त्याच्या पटकन लक्षात येत नसे. 

अर्थात, माणसाकडून त्याने फक्त स्मोकिंग करण्याची सवय स्वेच्छेने स्वीकारली. स्मोकिंगचे त्याला इतके व्यसन जडले की तो चेन स्मोकर बनला. १८९५ साली तो टीबीने मरण पावला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

माउंट एव्हरेस्टची उंची अचूक मोजण्याची किमया करून दाखवणारा अज्ञात भारतीय विद्वान

Next Post

पुण्यात येताजाता दिसणाऱ्या विश्रामबाग वाड्याचा इतिहास तुम्हाला माहितीये का…?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

पुण्यात येताजाता दिसणाऱ्या विश्रामबाग वाड्याचा इतिहास तुम्हाला माहितीये का...?

अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधीनी भारतातील डिजिटल क्रांतीचा पाया रचलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.