The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्पीकचा राजा – बदामची राणी : पत्त्यांच्या खेळात हे राजा, राणी, गुलाम कुठून आले?

by Tushar Damgude
28 June 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


वेळ जात नाही म्हणून खेळल्या जाणाऱ्या बैठ्या खेळातील सुप्रसिद्ध खेळ म्हणजे पत्ते. या पत्त्यांच्या जोडात एकूण बावन्न पत्ते असतात. या पत्त्यांना तुम्ही हजारो वेळा पाहिले असेल परंतु त्यातील कित्येक पत्त्यांना स्वतःचा इतिहास अथवा अर्थ आहे.

पत्त्यांमधे ठळकपणे समोर येणारा इस्पिकचा राजा म्हणजे बायबल मध्ये उल्लेख असलेला “डेवीड” आहे. तर चौकटचा राजा म्हणजे सुप्रसिद्ध रोमन राजा “सिझर” आहे. तर किल्वरचा राजा म्हणजे जगप्रसिद्ध राजा “अलेक्झांडर” यावरून बेतला आहे आणि बदामचा राजा म्हणजे फ्रान्सचा राजा “चार्ल्स दुसरा” आहे.

या बदामच्या राजाला ” Suicide king” म्हणतात. कारण हा पत्ता तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बदामच्या राजाच्या मस्तकात तलवार घुसलेली आहे.

त्यामागची कहाणी पुढीलप्रमाणे…

पत्त्यांच्या जोडामध्ये असलेल्या चार राजांमधे चार्ल्स दुसरा हा एकमेव असा राजा आहे ज्याच्या हयातीतच त्याला त्याचे चित्र असलेला पत्ता पहायला मिळाला.



चार्ल्स दुसरा खुप आजारी पडला तेव्हा दुर्दैवाने पुढील आयुष्य अंथरूणातच काढण्याची वेळ त्याच्यावर आली. आणि तेव्हा वेळ जाण्यासाठी म्हणून तो पत्त्यांचा black jack हा प्रकार खेळत असे. आपल्या नशीबी आलेल्या सगळ्या दुर्दैवामागे पत्त्यांमधे राजाचा क्रमांक तेरावा आहे हेच कारण असल्याची अंधश्रद्धा त्याच्या मनाने घेतली होती. या अंधश्रद्धेमुळे त्याचे वेड वाढतच गेले आणि एक दिवस त्याने स्वतःच्या डोक्यात तलवार खुपसून घेऊन आत्महत्या केली.

म्हणुनच पत्त्यांमधे बदामच्या राजाच्या डोक्यात तलवार खुपसतानाचे चित्र आपल्याला पहायला मिळते.

दुसरीकडे बदामची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं ज्युडीथ आहे. तर चौकटची राणी म्हणजे बायबल मधील आणखी एक पात्रं रॅचेल आहे. याशिवाय इस्पिकची राणी म्हणजे सुप्रसिद्ध ग्रीक देवता अथेना आहे तर किलवरची राणी म्हणजे “argine” ही आहे आणि या लॅटीन शब्दाचा अर्थ होतो “राणी”.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

याशिवाय राजा राणी बरोबर असणाऱ्या गुलामांचे पत्ते त्याकाळी असलेल्या प्रसिद्ध सरदारांचे प्रतिनिधीत्व करतात. इस्पिकचा गुलाम म्हणजे Ogier The Dane हा प्रसिद्ध सरदार आहे. तर बदामचा गुलाम La Hire या नावाचा सरदार आहे. त्याशिवाय चौकटचा गुलाम म्हणजे इतिहास प्रसिद्ध Hector आहे व किल्वरचा गुलाम म्हणजे Lancelot या आणखी एका इतिहास प्रसिद्ध शुर सरदाराचे प्रतिक आहे.

याशिवाय इस्पिकच्या एक्क्याला ” Death Card ” म्हणून ओळखले जाते. त्यामागचे कारण म्हणजे व्हिएतनामी लोक या इस्पिक एक्क्याला अशुभ मानतात. या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन अमेरिका व्हिएतनाम युद्धात अमेरिकन सैनिक मृत व्हिएतनामी सैनिकांच्या देहावर इस्पिक एक्का ठेवत असत. यामुळे व्हिएतनामी सैनिकांमधे दहशत पसरत असे. अमेरिकन सैन्याने स्पेशल ऑर्डर देऊन फक्त इस्पिक एक्क्याचे पत्ते मागवून घेतले होते.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: InfotainmentInteresting Facts
ShareTweet
Previous Post

सरपंच पदाची निवडणूक हरलेला उमेदवार ते सरपंच पदामुळेच पद्मश्री मिळालेलं व्यक्तिमत्व

Next Post

२२०० किलोमीटरचे अंतर कापत इस्त्राईली विमानांनी इराकचा आण्विक कार्यक्रम उध्वस्त केला होता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post
iraq the postman

२२०० किलोमीटरचे अंतर कापत इस्त्राईली विमानांनी इराकचा आण्विक कार्यक्रम उध्वस्त केला होता

पाकिस्तानच्या पहिल्या कायदेमंत्र्यांना 'हिंदू' असल्यामुळे पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.