The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका दरोडेखोराचं अर्धवट जळालेलं प्रेत कामाला आलं आणि शरीरशास्त्राचा पाय रचला गेला

by Tushar Damgude
17 December 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


वेगवेगळ्या आजारांवर मात करून दीर्घकाळ जगण्याची मानवी लालसा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकशास्त्र अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. परंतु हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी शरीर शास्त्राचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे व नेमका या शरीर शास्त्राच्या अभ्यासाचा मार्ग मात्र अत्यंत खडतर प्रवासाचा होता याची जाणीव मात्र आपल्याला बऱ्यापैकी नाही हे देखील तितकेच खरे आहे.

सन १५३३ ची ती हाडं गोठवून टाकणारी पॅरिसमधील सकाळ. प्राध्यापक सिल्व्हिएस यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ‘De Usu Paritum-On The Use Of Parts’ हा ग्रंथ उघडुन शिकवण्यास प्रारंभ केला. हा ग्रंथ दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या गेलन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाचा होता. गेली बाराशे तेराशे वर्षे गेलनवर श्रद्धा ठेवून वेगवेगळ्या विद्यापीठात शरीरशास्त्र शिकवण्याचा परिपाठ त्या काळात होता.

पॅरिसमधील त्या नामांकित विद्यापीठात मानवी शरीरशास्त्र शिकवण्यासाठी एखाद्या न्हाव्याला बोलवून मृत डुकराचे किंवा कुत्र्याचे शरीर कापले जाई व त्या प्राण्यांच्या अंतर्गत रचनेवर आधारलेल्या गेलनच्या ग्रंथावरून शिकवण दिली जाई.

असे करण्यामागील कारण म्हणजे मानवी शरीराची चिरफाड करणे व चिकित्सा करणे हा ख्रिश्चन चर्चच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर धार्मिक गुन्हा होता. असे करणाऱ्यास जन्मठेप, मृत्युदंड इ. शिक्षा असल्याने तसे धाडस कोणी करत नसे.

परंतु शरीरशास्त्र क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी पॅरिस विद्यापीठात दाखल झालेल्या एंड्रीया व्हीसॅलिअस नामक विद्यार्थ्याची मात्र यामुळे घोर निराशा झाली होती. बाराशे-तेराशे वर्षांपूर्वीचा जुनाट ग्रंथ आधुनिक ज्ञानाने भरलेला आहे अशा अंधश्रद्धने शिकवणारे शिक्षक पाहून तो निराश झाला होता. शरीरशास्त्र हा वाचून शिकवण्याचा नव्हे तर प्रत्यक्ष प्रयोग करून शिकण्याचा विषय आहे असे त्याचे मत होते. काही काळ पॅरिस विद्यापीठात काढल्यावर येथून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळणार नाही याची खात्री झाल्यावर व्हीसॅलिअस पुन्हा आपल्या गावी परतला.



गावी परतल्यावर देखील त्याला स्वस्थ बसवत नव्हते, आपला गणितज्ञ मित्र गेमाबरोबर रात्री-अपरात्री हिंडून वेगवेगळ्या प्राण्यांची हाडे गोळा करण्याचा छंद त्याला जडला. अशाच एका रात्री ते दोघे फिरत असताना जणू त्यांची लॉटरीच लागली. झाले असे की गावा बाहेरील टेकडीवर एका दरोडेखोरास मृत्युदंड दिल्यावर इतरांना द*हश*त बसावी म्हणून त्याचे प्रेत लटकवण्यात आले होते. अर्धवट जळालेले ते प्रेत पाहताच खजिना सापडावा अशा आनंदाने त्या दोन मित्रांनी पुढील तीन चार रात्रीत त्या सांगाड्याची हाडं थोडी थोडी करून आपल्या घरी हलवली.

सर्व हाडं जमा झाल्यावर अत्यंत महत्प्रयासाने ती वेगवेगळी असलेली हाडं जिथल्या तिथे जोडली. सर्व हाडं जुळवून झाल्यावर गेलनवर आंधळा विश्वास ठेवणे किती धोक्याचे होते ते व्हीसॅलिअसच्या लक्षात आले. सर्व हाडे योग्य ठिकाणी जुळवून झाल्यावर मानवी इतिहासात पहिल्यांदाच एक संपूर्ण मानवी सांगाडा शेजारी ठेवून व्हीसॅलिअसने लोव्हन या त्याच्या गावी शरीर शास्त्रावरचे पहिले व्याख्यान दिले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

आता व्हीसॅलिअसला थांबायचे नव्हते, वेगवेगळ्या हाडांचे निरीक्षण करून त्याची टिपणं काढणे, आकृत्या काढणे, नोंदी ठेवणे यात तो व्यस्त राहू लागला. १५३७ पर्यंत व्हीसॅलिअसने पुष्कळ संग्रह केला व तो इटलीमधील व्हेनिस या शहरात गेला. तेथे जॅन काल्कर या चित्रकाराकडून शरीर शास्त्रावरील अनेक चित्रं काढून घेतली.

स्वतःची टिपणं व ही चित्रं घेऊन व्हीसॅलिअसने स्वित्झर्लंडमधील प्राध्यापक ओपोरीनस यांच्या छापखान्यामधून १५४३ साली ७०१ पानांचा शरीर विज्ञानावरील पहिला शास्त्रीय ग्रंथ प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं नाव होतं ‘De Humani Corporis Fabrica’ (on the structure of the human body).

आधुनिक वैद्यकाच्या प्रारंभिक काळातील हा सर्वांत मोठा ग्रंथ मानला जातो. ‘de fabrica’ ची ख्याती युरोपात झपाट्याने पसरली. एका नव्या युगाची सुरवात झाली, परंतु रुढीप्रिय ख्रिश्चनांना मात्र यामुळे अतीव दुःख झाले. कारण गेलन व बायबलप्रणित शास्त्र बाजूला सारून त्याला आव्हान देणारे नवीनच काहीतरी व्हीसॅलिअस मांडत होता.

या रुढीप्रिय मंडळीनी व्हीसॅलिअसला त्रास देण्यास सुरुवात केली. तो त्रास पुढे इतका वाढला की आलेल्या नैराश्यातून व्हीसॅलिअसने ‘de fabrica’ हा ग्रंथ सोडून केलेले इतर सर्व संशोधन जाळून टाकले व निवृत्ती घेतली.

१५६४ साली इटलीमधील पदुआ विद्यापीठातील गॅब्रिअल फॅलोपिअस याचे शरीराशास्त्रावरील पुस्तक व्हीसॅलिअसला भेट म्हणून आले. त्यात व्हीसॅलिअसच्या कामाचा गौरव होता. ते पाहून व्हीसॅलिअसला बरे वाटले आणि त्याने पदुआ विद्यापीठात खास त्याच्याच मुळे निर्माण झालेल्या शरीरशास्त्र प्राध्यापक या पदावरुन हा विषय शिकवण्याचे ठरवले.

परंतु त्याआधी त्याने प्रायश्चित्त घेणे जरुरीचे होते. ते का तर त्याने परंपरेविरुद्ध असलेले शास्त्रीय ज्ञान प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रायश्चित्त म्हणून चर्चने व्हीसॅलिअसने पवित्र भूमी जेरुसलेमची यात्रा करून येण्याचे आज्ञापत्र काढले. चर्चच्या आज्ञेनुसार व्हीसॅलिअसने जेरुसलेमची यात्रा पूर्ण केली व परतीच्या प्रवासासाठी तो बोटीत बसला.

ती बोट एका वादळात सापडली व बुडाली. तिचा शोध घेतल्यावर एका बेटापाशी अनेक मृतदेह ओळखू न येण्याच्या पलीकडील अवस्थेत गेले होते. शोधकर्त्यांना एक प्रेत मात्र लगेच ओळखू आले कारण त्या मृतदेहाने एक पुस्तक कवटाळून धरले होते व त्या पुस्तकावर ‘एंड्रीया व्हीसॅलिअस यास गॅब्रिअल फॅलोपिअसकडून सप्रेम भेट’ असे लिहिलेले होते.

अत्यंत विपरीत परिस्थितीत अत्याधुनिक शरीरशास्त्राचा पाया घालणाऱ्या व मानवी शरीराचे गूढ उकलणाऱ्या एंड्रीया व्हीसॅलिअस याचे हे अल्प शब्दातील स्मरण.

-तुषार दामगुडे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राष्ट्रगीताचा आग्रह धरला म्हणून या मुस्लीम शिक्षकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय

Next Post

फ्रेंच आणि अमेरिकन लोकांच्या क्राउड फंडिंगमधून ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ उभा राहिला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

फ्रेंच आणि अमेरिकन लोकांच्या क्राउड फंडिंगमधून 'स्टॅचू ऑफ लिबर्टी' उभा राहिला

एका वृत्तपत्रात छापलेल्या चुकीच्या ओळीमुळे महात्मा गांधींचा नोबेल हुकला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.