The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाचा आपण खातो त्या अन्नातील कॅलरीज कशा मोजल्या जातात..!

by द पोस्टमन टीम
23 January 2026
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आजूबाजूच्या लोकांच्या टोमण्यांना कंटाळून आणि एकंदरीत माझ्या बॉडीची झालेली अवस्था बघून वजन वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हटलं आता एकदम हाय कॅलरी, हाय प्रोटीन फूड घेऊन प्रॉपर डाएट फॉलो करायचं आणि वजन वाढवायचं. मग काय, मी ‘वजन बढाओ’ मोहीम सुरू केली. डेली ॲक्टिव्हिटी मॉनिटर करणारं एक ॲप डाऊनलोड केलं. हाय प्रोटीन फूडची यादी केली. मात्र, हे सगळ करताना मी दिवसभरात किती कॅलरी कन्झ्युम केल्या पाहिजेत? कुठल्या पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत? याचं गणित मात्र, काही केल्या बसेना.

माझ्यासारखीच परिस्थिती अनेकांची असू शकते. यामध्ये वजन वाढवणाऱ्यांचाही समावेश असेल आणि वजन कमी करणाऱ्यांचा देखील. वजन कमी-जास्त करण्यात अतिशय महत्त्वाचा असणारा ‘कॅलरी’ हा नेमका काय प्रकार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात पहिल्यांदा कॅलरी हा शब्द आपल्याला माहिती पडलेला असेल. कारण, कॅलरी हे एनर्जी मोजण्याचं युनिट आहे. वजन मोजणं किंवा पोषक मूल्य मोजण्याचं नाही! तरी देखील वजन-कमी जास्त करण्यात किंवा मेंटेन ठेवण्यात ‘कॅलरी काऊंट’ला महत्त्व मिळालं आहे.

युकेतील नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, आपल्याला खाद्यपदार्थांच्या लेबलवर दिसत असलेल्या कॅलरी या प्रत्यक्षात किलोकॅलरी असतात. मात्र, बोलताना सर्रासपणे आपण कॅलरी म्हणतो. आपल्या खाद्य पदार्थांतील सर्व कॅलरीज फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स या तीनपैकी एका मॅक्रोन्यूट्रिएंट्समधून येतात. 

एखाद्या व्यक्तीनं दिवसभरात किती कॅलरीज घ्याव्यात हे, लिंग, वय, ॲक्टिव्हीटी लेव्हल अशा कितीतरी गोष्टींवर अवलंबून असतं. सामान्यपणे, पुरुषांना त्यांच्या शरीराचा आकार आणि मसल्स व्हॉल्युममुळं स्त्रियांपेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. ढोबळमनानं सांगायचं झाल्यास, पुरुषांना दिवसाला ३००० कॅलरीजची गरज असते, तर बहुतेक स्त्रियांना दररोज एक १६०० ते २००० कॅलरीजची गरज असते. हे प्रमाण परिस्थितीनुसार कमी-जास्त होऊ शकतं.



प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये कॅलरीज असतात. बाजारामध्ये जे खाद्यपदार्थ मिळतात, त्यांच्या पॅकेटवर कॅलरी काऊंट लिहिलेला असतो. १९९० पासून हा नियम सुरू झालेला आहे. १९९० मध्ये, युएस सरकारनं न्यूट्रिशनल लेबलिंग आणि एज्युकेशन कायदा पास केला होता. या कायद्यामुळं खाद्यपदार्थातील कॅलरीजसह इतर पोषण मुल्यांचं लेबल लावणं बंधनकारक केलं गेलं. याचा अर्थ, यूएसमधील कोणतंही पॅक केलेलं अन्न बाजारात येण्यापूर्वी तपासलं जाणार होतं. त्या खाद्यपदार्थातील मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि कॅलरीज मोजण्यासाठी तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले होते. हे तज्ज्ञ बॉम्ब कॅलरीमीटर नावाचं साधन वापरून खाद्यपदार्थातील कॅलरीज मोजत असत.

आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीतील फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशनचे प्रोफेसर रुथ मॅकडोनाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणं, बॉम्ब कॅलरीमीटर हे साधन अन्नामध्ये किती ऊर्जा आहे याचं थेट मोजमाप करायचं. बॉम्ब कॅलरीमीटर वापरण्याची पद्धत देखील अनोखी होती. ज्या खाद्यपदार्थातील ऊर्जा मोजायची आहे तो पदार्थ पाण्यानं वेढलेल्या सीलबंद कंटेनरमध्ये ठेवला जाई. त्यातील पदार्थ पूर्णपणे जळून जाईपर्यंत तो गरम केला जाई. त्यातील कॅलरीजची संख्या निर्धारित करण्यासाठी पाण्याच्या तापमानातील वाढ नमूद केली जाई. ती वाढ म्हणजेच त्या पदार्थातील कॅलरीची संख्या मानली जाई.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

परंतु, बॉम्ब कॅलरीमीटरचा वापर जास्त किचकट आणि वेळखाऊ होता. त्यामुळं कॅलरी मोजण्यासाठी बॉम्ब कॅलरीमीटरला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली. युएस केमिस्ट विल्बर ऍटवॉटर यांनी हा पर्याय शोधून काढला. त्यांनी एक अशी पद्धत विकसित केली ज्यामध्ये अन्नपदार्थातील कॅलरीजच्या संख्येचा अप्रत्यक्षपणे अंदाज लावण्याचा मार्ग निश्चित झाला.

ऍटवॉटरनं विकसित केलेलं तंत्र ४-९-४ प्रणाली म्हणून ओळखलं जातं. उष्णतेद्वारे तसेच मूत्र आणि विष्ठेतून काही कॅलरी शरीराबाहेर जातात. याची नोंद सामान्य कॅलरीमीटरमध्ये घेतली जात नसे. ऍटवॉटरनं ही मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानं अगोदर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमधील कॅलरीजची संख्या मोजली. नंतर किती कॅलरीज बाहेर काढल्या गेल्या हे पाहण्यासाठी पूप चाचणी करून दोन्हींची एकत्रित आकडेवारी निश्चित केली. त्याच्या प्रयोगांवरून असं दिसून आलं की, एक ग्रॅम प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमध्ये सुमारे ४ कॅलरीज (०.०४ औंस) आणि एक ग्रॅम फॅट्समध्ये ९ कॅलरीज असतात. म्हणून त्याच्या संशोधनाला ४-९-४ प्रणाली असं नाव देण्यात आलं. त्याला असंही आढळलं की, अल्कोहोलमध्ये प्रति ग्रॅम ७ कॅलरीज असतात.

बदलत्या काळासोबत फूड सायंटिस्टनी ऍटवॉटर प्रणालीचं आधुनिकीकरण केलं आहे. मात्र, तरीदेखील काही तज्ज्ञांच्या मते, ऍटवॉटर प्रणाली जुनी झाली आणि त्यात अनेक त्रुटी आहेत. २०१२ साली अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, नट्ससारख्या विशिष्ट खाद्यपदार्थातील ऊर्जा सामग्रीची ऍटवॉटर सिस्टममध्ये अचूक गणना केली जाऊ शकत नाही. 

तसेच, एफडीए फूड लेबलवर कॅलरीजसह सूचीबद्ध केलेल्या पोषक घटकांसाठी २० टक्के मार्जिन त्रुटीसाठी परवानगी देतो, याचा अर्थ असा की, या कॅलरींची संख्या एकदम अचूक नाहीच. याशिवाय, जरी कॅलरी लेबलमध्ये त्रुटी नसल्या तरी ही पद्धत पचनक्रिया विचारात घेत नाही. त्यामुळं भविष्यात ऍटवॉटर प्रणालीसुद्धा हद्दपार होण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेले ट्रेडमिल आणि फिटनेस ट्रॅकरसारखी साधनं प्रत्येक एक्सरसाईज सेशनमध्ये एका व्यक्तीने किती कॅलरीज बर्न केल्या याचा ‘लाइव्ह’ डेटा दाखवतात. ही उपकरणं त्यावेळी शरीराने बर्न केलेल्या एकूण कॅलरींची संख्या प्रदर्शित करत नाहीत. ते केवळ शारीरिक श्रमामुळे बर्न झालेल्या संख्येचा अंदाज लावतात. २०१८ साली जर्नल ऑफ पॅरलल अँड डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटिंगमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, ही उपकरणं बर्न केलेल्या कॅलरींचा अंदाज घेण्यासाठी, वय, लिंग, उंची आणि वजन यांच्या माहितीच्या अल्गोरिदमचा वापर करतात. या माहितीवरून, स्मार्ट उपकरणं व्यक्तीच्या बीएमआरचा (बेसल मेटाबॉलिक रेट) अंदाज लावू शकतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!

Next Post

इलॉन मस्कने जाहीर केलेल्या मेंदूची क्षमता वाढवणाऱ्या ‘ब्रेन चिप’च्या ट्रायल्स सुरु झाल्यात

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

इलॉन मस्कने जाहीर केलेल्या मेंदूची क्षमता वाढवणाऱ्या 'ब्रेन चिप'च्या ट्रायल्स सुरु झाल्यात

आणखीन एका आफ्रिकन देशात अराजक, मिलिटरीने राष्ट्राध्यक्षांना गायब करून सत्ता काबीज केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.