The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातल्या विविध देशात असलेल्या या ‘विचित्र टॅक्सेस’बद्दल वाचून तुम्हीही हैराण व्हाल

by Heramb
24 October 2024
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, तेथील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने विविध विकास प्रकल्पांसाठी निधी उभा करायचा म्हटल्यावर तेथील सरकारे कर गोळा करतात. देशांमध्ये कर लावण्याचा सरकारचा अधिकार त्या त्या देशाच्या राज्यघटनेतून सरकारला प्राप्त झालेला असतो. देशामध्ये आकारण्यात येणाऱ्या सर्व करांना संसदेने संमत केलेल्या कायद्याने पाठिंबा देणे आवश्यक आहे.

राष्ट्राचा विकास, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, समाजाची उन्नती आणि अगदी राष्ट्रासाठी कल्याणकारी कार्यांसह अनेक स्तरांवर कर भरणे फायदेशीर असते. करांच्या दोन मुख्य श्रेणी आहेत. या श्रेणी पुढे इतर वर्गांमध्ये विभागल्या गेल्या आहेत.

करांच्या दोन मुख्य श्रेणी म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. विविध उप-श्रेणींमध्ये येणारे किरकोळ सेस टॅक्सेससुद्धा असतात. आयकर कायद्यामध्ये, या करांचे नियमन करणारे वेगवेगळे कृत्य आहेत. परंतु भारतासह जगभरात काही विचित्र कर आहेत. जगभरातील अशा विचित्र करांबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

१. ऑस्ट्रियामध्ये असलेला ‘प्लास्टर टॅक्स’: ऑस्ट्रियामध्ये असलेल्या ‘आल्प्स’च्या पर्वतरांगा हे स्की प्रेमींचे अतिशय आवडीचे ठिकाण आहे, अगदी नवशिक्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत. ज्या पर्यटकांना स्कीइंग करताना पुरेसा आत्मविश्वास वाटत नाही ते सहसा फ्रॅक्चर होतात आणि ऑस्ट्रियन रुग्णालयांमध्ये दाखल केले जातात. या कारणास्तव, सरकारने वैद्यकीय सेवांवरील विशेष कर आपल्या नियमित पर्यटक करामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या करासाठी कोणतीही निश्चित रक्कम नाही कारण या कराची रक्कम पर्यटक थेट ज्या रिसॉर्टमध्ये राहतात तिथूनच गोळा केली जाते.

२. एस्टोनियामधील ‘काऊ गॅसेस टॅक्स’: जरी हा कर हास्यास्पद वाटत असला तरी, एस्टोनियामध्ये गुरांमुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायूंवरील कर अस्तित्वात आहे. वायू प्रदूषण रोखण्याचा आणि ग्रीनहाऊस गॅसेसचा प्रभाव कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न. जेव्हा एक गाय गवत पचवते तेव्हा ती गाय सरासरी ३५० लिटर मिथेन आणि १५०० लिटर कार्बन डाय ऑक्साईड तयार करते. एस्टोनियाचे सरकार ३०० पेक्षा जास्त गायी असलेल्या मोठ्या एस्टोनियन शेतकऱ्यांना ५ हजार डॉलर्सचा कर आकारते. 

३. चीनमधील चॉपस्टिक कर: चीन म्हटलं की चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे जाचक प्रशासन आलेच. चीनचे सी.सी.पी. सरकार नागरिकांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखे हक्क प्रदान करीत नाही पण त्यांच्याकडून अनेक प्रकारचे कर मात्र वसूल केले जातात. अशाच जाचक कारांपैकी एक कर म्हणजे चीनचा ‘चॉपस्टिक टॅक्स’. दरवर्षी चीन डिस्पोजेबल चॉपस्टिक्सच्या सुमारे ४५ अब्ज जोड्या बनवतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी सुमारे २.५ करोड झाडे नष्ट करावी लागतात. २००६ साली, चीनने डिस्पोजेबल लाकडी चॉपस्टिक्सवर ५% कर लागू केला, जेणेकरून जंगलांचे संरक्षण आणि जतन करता येईल.



४. इंग्लंडमधील शेल नट टॅक्स: इंग्लंडमध्ये, शेलसह नट्स खरेदी केल्याने तुमचे पैसे वाचू शकतात. कारण शेल, भाजलेल्या आणि खारट नट्सवर २०% मूल्यवर्धित कर (व्हॅट) आहे. पण, शेंगदाण्याबद्दल थोडा वेगळा कायदा आहे – जर शेंगदाणे खारट किंवा भाजलेले नसतील तर त्यांच्यावर कर आकारला जात नाही.

५. हंगेरीमधील जंक फूड टॅक्स: मीठ आणि साखरेपासून तयार केलेले चिप्स, बिस्किटे, केक, अगदी एनर्जी ड्रिंक्स आणि सोडा यांसारख्या विविध पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर २०११ साली हंगेरीमध्ये कर लागू झाला. याला अधिकृतपणे, ‘सार्वजनिक आरोग्य उत्पादन कर’ म्हणतात आणि या वस्तूंच्या किंमतीत सुमारे २० सेंट अधिक रक्कम घेतली जाते. हा कर लागू करण्याचा मुख्य हेतू म्हणजे हंगेरियन सरकारला निरोगी आहाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यांना आपल्या नागरिकांनी निरोगी अन्न खावे यासाठी हा कर लागू केला. आश्चर्याची बाब म्हणजे याचा फायदा होताना दिसून येत आहे. सुमारे ५९ ते ७३% ग्राहकांनी कर आकारलेल्या उत्पादनांचे सेवन कमी केले.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

६. जपानमधील फॅट टॅक्स: जपानमधील प्रसिद्ध “मेटाबो लॉ”द्वारे दरवर्षी ४० ते ७५ या वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या कंबरेचे माप घ्यावे लागते. जर त्यांच्या कंबरेचा आकार एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त असेल (पुरुषांसाठी ८५ सेमी आणि महिलांसाठी ९० सेमी) तर त्यांना दंड भरावा लागतो. लठ्ठपणाच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्यासाठी तसेच मधुमेह आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जपानी फॅट टॅक्स लागू करण्यात आला आहे.

७. इटलीमधील शॅडो टॅक्स: इटलीच्या व्हेनेटो प्रदेशातील कोनेग्लीयानो येथील दुकानदारांना वर्षाकाठी १०० डॉलर्स टॅक्स म्हणून भरावे लागतात.  हा टॅक्स त्यांच्या सार्वजनिक रस्त्यांवर सावली पडणाऱ्या बोर्ड्स किंवा तंबूंसाठी भरावा लागतो. हा कर १९९३ साली आला होता आणि तो संपूर्ण इटलीमध्ये लागू केला जाणार होता, परंतु केवळ कोनेग्लियानो अधिकाऱ्यांनी हा शॅडो टॅक्स स्वीकारला. त्याच्या अंमलबजावणीनंतर, बहुतेक स्थानिक दुकान मालकांनी त्यांचे तंबूवजा दुकान काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

८. भारतातील एंटरटेनमेंट टॅक्स: भारतातील एखादा चित्रपट तुम्हाला कदाचित तुम्हाला थोडा महाग पडू शकतो. भारतात चित्रपट तिकिटे, मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक शो, प्रदर्शन, अम्युझमेंट पार्क्स आणि इतर मनोरंजक उपक्रमांवर विशेष कर भरावा लागतो. एंटरटेनमेंट टॅक्स प्रत्येक राज्यानुसार बदलतो आणि मनोरंजनाच्या प्रकारानुसार ५% ते २८% पर्यंत असतो.

तुम्हालाही जगातील असेच काही विचित्र कर माहित असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जपानवर अणु*बॉ*म्ब टाकणाऱ्या विमानाच्या पायलटला त्या गोष्टीचा कधीच पश्चाताप झाला नाही

Next Post

एका उदात्त कारणासाठी जर्मनीनेच ‘दोस्त राष्ट्रांच्या’ या मोहिमेला समर्थन दिलं होतं

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

एका उदात्त कारणासाठी जर्मनीनेच 'दोस्त राष्ट्रांच्या' या मोहिमेला समर्थन दिलं होतं

अजित आगरकर भारताचा आजवरचा सर्वात 'अंडररेटेड' अष्टपैलू खेळाडू आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.