The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१६०० कोटींचा व्यवसाय उभा केला पण आता देश सोडून पळून जावं लागलं

by द पोस्टमन टीम
19 September 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


निरंतर गरीबी आणि कष्ट या दोन गोष्टी आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करतात. यातील काही मुलं परिस्थितीला शरण जाऊन गरिबीच्या फेऱ्यात अडकून पडतात तर काही मुलं परिस्थितीशी दोन हात करून महत्वाकांक्षा आणि स्वप्नं विकसित करतात. कष्ट करून ते अडचणींवर मात करतात आणि समाजात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतात. अगदी परिकथेप्रमाणं त्यांचं आयुष्य बदलून जातं. ‘सुदीप दत्ता’ नावाच्या भारतीय उद्योगपतीची कथा देखील अशीच एक परीकथा आहे!

पृथ्वीतलावर निर्माण होणारी कुठलीही गोष्ट निसर्गाच्या तीन नियमांमधून जाते: सुरुवात, मध्य आणि शेवट. प्रत्येक व्यक्तीला या प्रक्रियेतून जावच लागतं. फरक फक्त इतकाच असतो की, काहींसाठी हे तिन्ही नियम सन्मानाचे ठरतात तर काहींसाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणं. सुदीप दत्तांचं नशीब त्यांना दुसऱ्या गटात घेऊन गेलं. सुदीप दत्ता कोण आहेत? त्यांच्या आयुष्यात नेमक्या अशा काय घडामोडी झाल्या की, आम्ही तुम्हाला त्यांची गोष्ट सांगतो आहोत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग या प्रश्नांची आपण उत्तरं शोधुया.

सुदीप दत्ता मूळचे पश्चिम बंगालमधील दुर्गापूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील १९७१ च्या भारत-पाक यु*द्धादरम्यान भारतीय सैन्यात कार्यरत होते. दुर्दैवानं, त्या यु*द्धादरम्यान गोळ्याच्या जखमांमुळे त्यांना अर्धांगवायू झाला. त्यामुळं कुटुंब चालवण्याची जबाबदारी सुदीपच्या मोठ्या भावावर होती. मात्र, त्याचा देखील आजारपणात मृत्यू झाला. हा सुदीपच्या कुटुंबासाठी एक भयंकर धक्का होता. मोठ्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं अंथरूणाला खिळून असलेल्या वडिलांनी देखील श्वास सोडला. परिणामी घराची सर्व जबाबदारी सुदीपवर आली.

ओढाताणीत गेलेलं बालपण आणि कष्टांनी त्याला आयुष्यात महत्त्वाकांक्षी बनवलं. परिस्थितीनं सुदीपला पैशांची किंमत करण्यास शिकवलं. सुदीपच्या मित्रांनी त्याला मुंबईला जाण्यास सांगितलं. कारण त्यांच्या मते, मुंबई स्वप्नांचं शहर आहे आणि तिथे महत्त्वाकांक्षी लोकांची स्वप्नं नक्की पूर्ण होतात. जशी सुदीपचे रोल मॉडेल असलेल्या बीग बी अमिताभ बच्चन यांची झाली होती. आपलं शिक्षण अधुरं सोडून कुटुंबासाठी असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सुदीपनं मुंबई गाठली.



वयाच्या सोळाव्या वर्षी डोळ्यांमध्ये असंख्य स्वप्नं, डोक्यावर कुटुंबाच्या जबाबदारीचं ओझं घेऊन सुदीप दत्तानं देशाची आर्थिक राजधानी, मुंबईमध्ये पाऊल टाकलं. त्याच्या खिशात दमडीही नव्हती. पैसा मिळवणं ही त्याची प्राथमिक गरज होती. त्यानं एका लहानशा पॅकेजिंग युनिटमध्ये मजूर म्हणून काम सुरू केलं. त्याच्यासोबत आणखी १२ लोक काम करत होते. रोजंदारी म्हणून प्रत्येकाला १५ रुपये मिळत. पैसे वाचवण्यासाठी सुदीप मीरा रोडवरील त्याच्या खोलीपासून जोगेश्वरी लोकलपर्यंत ४० किलोमीटरचं अंतर पायी पार करत असे.

मीरा रोडवर एका खोलीत सुदीप २० जणांसह राहायचा. त्या खोलीत इतक्या दाटीवाटीनं रहावं लागत होतं की पाय पसरण्यासाठी देखील जागा नसायची. पॅकेजिंग फर्ममध्ये कर्मचारी म्हणून सुदीपनं पॅकर, लोडर आणि डिलिव्हरी बॉय अशा विविध भूमिका पार पाडल्या. या अनुभवामुळे त्याला पॅकेजिंग उद्योगातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती झाली.

काही दिवसातचं पॅकेजिंग फर्म तोट्यात गेली आणि ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यात व्यवस्थापनाला अपयश आलं. शेवटी, १९९१ साली फर्म बंद करून युनिट विकण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनी बंद पडणार म्हटल्यावर कामगारांचं निराश होणं साहजिक आहे. मात्र, महत्त्वाकांक्षी सुदीप दत्तानं निराश न होता या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिले.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

त्यानं युनिट विकत घेण्याचा विचार केला. पण, त्याला माहित होतं की युनिटची किंमत त्याला परवडणारी नाही. यावर पर्याय म्हणून त्यानं एक साधी रणनीती आखली. पहिल्या दोन वर्षांचा संपूर्ण नफा मूळ मालकांना परत करण्याचं आश्वासन दिलं. ही गोष्ट मूळ मालकांना पटली आणि केवळ १६ हजार रुपयांमध्ये सुदीप दत्ता नावाचा १९ वर्षीय मुलगा पॅकेजिंग युनिटचा मालक झाला!

सुदीप दत्ताला ॲल्युमिनियम फॉइल बनवण्याच्या उद्योगात ‘मिड कॅप खेळाडू’चं लेबल जास्त वेळ मिरवण्याची इच्छा नव्हती. वेदान्ता आणि जिंदालप्रमाणं लार्ज-कॅप खेळाडू होण्याची तो आतुरतेनं वाट पाहत होता. लवकरचं त्याला ती संधी मिळाली. १९३६ साली आशियात फॉइल उद्योग आणणाऱ्या मात्र, आता तोट्यात असणाऱ्या ‘इंडिया फॉइल्स’वर सुदीप नजर ठेऊन होता.

सुरुवातीला, खेतान समूहानं ‘इंडिया फॉइल’ अनिल अग्रवालच्या नेतृत्त्वात असलेल्या वेदान्ता समूहाला विकली होती. अनिल अग्रवालसारखा कसलेला उद्योगपती देखील इंडिया फॉइल्सचं पुनरुज्जीवन करू शकला नाही. सुदीपनं २००८ साली वेदांन्ताकडून तोट्यात असलेली ‘इंडिया फॉइल्स’ १३० कोटी रुपयांना विकत घेण्याचा धोका पत्करला. अनेकांना हा निर्णय म्हणजे निव्वळ मुर्खपणा वाटला होता.

मात्र, सुदीप दत्ताच्या मनात काहीतरी वेगळ्या कल्पना शिजत होत्या. स्वत:च्या नावापुढे ॲल्युमिनियम फॉइल्सचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून लेबल लावणं, हे त्याचं ध्येय होतं आणि इंडिया फॉइल्सचं अधिग्रहण करून त्यानं हे साध्य केलं. इंडिया फॉइल्सचे भारतातील तिन्ही प्लँट पुन्हा सुरू करून त्यातून नफा मिळवणं सोप काम नाही, याची त्याला कल्पना होती.

एका वेळी एकच प्लांट पुनरुज्जीवीत करण्याचा त्यानं निर्णय घेतला. तळागाळातील कामगारांबरोबर काम करण्याची क्षमता आणि मूळचा बंगाली म्हणून त्याला फायदा झाला. मॅन्युफॅक्चरिंग फ्रंटवर त्यानं दमन येथून कार्यरत असलेल्या ESS DEE मध्ये हब अँण्ड स्पोक मॉडेलची निर्मिती सुरू केली. कोलकाता येथे इंडिया फॉइल्समध्ये त्यानं दुसरं स्पोक मॉडेल लागू केलं. इंडिया फॉइल्सचा कामराहाटी प्लांट आणि होएरा प्लांट १९ हजार टन फॉइल उत्पादन क्षमतेसह कार्यरत आहेत.

सुदीप दत्तानं आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली जागा निर्माण केली. चाचणी केलेले स्पोक्स मॉडेल जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये निर्यात झाले. फार्मास्युटिकल्स कंपन्या त्याचे प्राथमिक ग्राहक असले तरी त्यानं एफएमसीजी बाजारातही आपला विस्तार केला आहे. बांग्लादेश, श्रीलंका, अमेरिका, जॉर्डन, इजिप्तसारखे देश त्याचे ग्राहक झाले. नायजेरिया, इंडोनेशिया, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ, केनिया, घाना, ग्रीस, फिलिपिन्स हे ESS DEE ॲल्युमिनियमचे ग्राहक आहेत. कधी काळी खिशात दमडीही नसणारा सुदीप दत्ता नावाचा व्यक्ती १ हजार ६०० कोटी रुपयांच्या उद्योगाचा मालक झाला!

इंडिया फॉइल्सची मालकी मिळवण्यात आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचे दोन युनिट्स पुन्हा सुरू करण्यात सुदीप दत्ता यशस्वी झाला. मात्र, तरी देखील इंडिया फॉइल्ससारख्या मोठ्या माशाची खरेदीची गणना पूर्णपणे चुकीची ठरली, हे निष्पन्न झालं. अंतर्गत कारणांमुळं कंपनी दिवाळखोरीत निघाली! सध्या बंगालमधील कामरहाटी, तारातोल्ला आणि हरोआ येथील कामकाज बंद पडलं आहे.

सुदीप दत्ता कर्मचाऱ्यांना वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि इतर मोबदला देत नसल्याचे आरोप झाले आहेत. त्याच्याविरोधात पोलीस केस दाखल झाल्या असून अटक वॉरंटससुद्धा जारी करण्यात आलेले आहेत. मद्यसम्राट विजय माल्ल्या प्रमाणंच सुदीप दत्ताला देखील देश सोडून पळून जावं लागलं. दत्ता आणि त्याच्या कुटुंबानं सिंगापूरचा आश्रय घेतला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या भारतीय राजाला खुद्द हि*टल*रने कस्टम मेड मेबॅक कार भेट दिली होती

Next Post

भारतातली पहिली रेल्वे लाईन मुंबई ते ठाणे नव्हे तर ‘रेड हिल रेल्वे’ आहे

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

भारतातली पहिली रेल्वे लाईन मुंबई ते ठाणे नव्हे तर 'रेड हिल रेल्वे' आहे

अलेक्झांड्रियाच्या जगप्रसिद्ध लायब्ररीमध्ये लागलेल्या आगीनं प्राचीन साहित्याचा संपूर्ण संग्रह नष्ट झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.