The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अझीम प्रेमजींच्या विप्रोमुळे आज अमळनेर महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत गाव आहे..!

by Heramb
16 September 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


स्वातंत्र्योत्तर काळात सुमारे ३० वर्षांपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय वाढ झाली नाही. अनेक प्रयत्न केले गेले, पण अर्थव्यवस्थेला गती मिळत नव्हती. नवद्दीच्या दशकात मात्र भारत सरकारने जागतिक बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली. मात्र याआधीही अनेक बड्या कंपन्यांनी भारतात आपला पाया मजबूत केला होता. टाटा, किर्लोस्कर, बजाज, वाडिया अशी काही मोठी नवे तत्कालीन उद्योगविश्वात नावाजली जात. पण या दिग्गजांच्या गर्दीत एक असे नाव आहे, ज्याने एकविसाव्या शतकात आपली किमया दाखवली. ते म्हणजे विप्रो!

२९ डिसेंबर १९४५ रोजी महाराष्ट्रातील अमळनेर येथे मोहम्मद प्रेमजींनी “वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स” म्हणून स्थापन केली, कालांतराने त्याचे ‘विप्रो’ असे संक्षिप्त रूप बनले. विप्रो सुरुवातीपासूनच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी नाही. विप्रोची सुरुवात शेतमाल आणि शेतमालावरील प्रक्रिया करून तयार झालेल्या उत्पादनाच्या विक्रीतून झाली. ही कंपनी सुरुवातीला किसान, सनफ्लॉवर आणि कॅमल या व्यापारी नावाखाली अमळनेरमध्ये भाजीपाला आणि रिफाईंड तेलांचे मॅन्युफॅक्चरर्स म्हणून सुरु झाली होती.

१९६६ साली मोहम्मद प्रेमजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच अझीम प्रेमजी यांनी वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी कंपनीचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. १९७०-८० च्या दरम्यान कंपनीने आपले लक्ष्य नव्या संगणकीय तंत्रज्ञानावर वळवले. त्यावेळी भारतात आय.टी. क्षेत्र नवखे होते.

७ जून १९७७ रोजी कंपनीचे नामकरण ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स’ हे बदलून ‘विप्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड’ असे करण्यात आले. १९८२ मध्ये पुन्हा कंपनीचे नामकरण होऊन ते ‘विप्रो लिमिटेड’ बनले. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सेवांच्या व्यवसायाबरोबरच ‘रलक’ हे तुळशीवर आधारित कौटुंबिक साबण आणि ‘विप्रो चमेली’, टॉयलेट सोप लाँच करून विप्रोने हाऊसहोल्ड प्रोडक्ट्सच्या क्षेत्रातही विस्तार सुरू ठेवला. त्यांनतर विप्रोने आपली प्रगती अविरतपणे सुरूच ठेवली आहे. आज ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे,

पण एवढी प्रगती एका रात्रीत होत नाही, त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या असते आणि कर्मयोगी प्रेमजी कुटुंबाने आपल्या कष्टाच्या बळावर कंपनी यशस्वीरीत्या सुरु ठेवली आहे. आपण सर्वच कधी न कधी शेअर्समध्ये पैसे गुंतवतोच. विप्रोसुद्धा स्टॉक मार्केटवर लिस्टेड असलेली एक प्रमुख कंपनी आहे. विप्रो लिमिटेडचे सुमारे तीन हजारांपेक्षाही जास्त शेअर्स आज अमळनेर येथील काही गावकऱ्यांकडे आहेत. या शेअर्सची किंमत आज करोडोंमध्ये आहे. 



१९४७ मध्ये विप्रो लिमिटेडच्या तत्कालीन अध्यक्षांनी म्हणजेच मोहम्मद प्रेमजींनी अमळनेरमध्ये वनस्पती तूप, कपडे धुण्याचा साबण आणि स्वयंपाकाच्या तेलाचे उत्पादन करण्यासाठी पहिला कारखाना उभारला. अमळनेरमधील अनेक स्थानिकांना रोजगारासाठी ही मोठी संधी होती. यामुळे अमळनेरमधील अनेकांनी विप्रो लिमिटेड मध्ये नोकरी मिळवली. यामधील काही रहिवाशांना कंपनीने शेअर्स दिले. आजमितीस विप्रोचे सुमारे तीन टक्के शेअर्स काही गावकऱ्यांकडे आहेत. 

अमळनेरमधील या स्थानिकांकडे सुमारे ३४४८ कोटी रुपये किंमतीचे २५० कोटी शेअर्स असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनस्पती तुपाचा निर्माता म्हणून पूर्वीच्या वर्षांत विप्रोचा मोठा फायदा झाला नाही. १९६६ मध्ये अझीम प्रेमजींनी चेअरमन बनून कंपनीची सूत्रे हाती घेतली. १९७० मध्ये कंपनीने आपले शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. पण, १९८५ पर्यंत कोणीही ते शेअर्स खरेदी केले नाहीत. त्यावेळी जर कोणाला विप्रोमध्ये शेअर्सद्वारे व्यापार करायचा असेल तर तो फक्त अमळनेरमध्येच होऊ शकत असल्याने मुंबईचे स्टॉक ब्रोकर्स विप्रो कंपनीपासून अनभिज्ञ होते. १५-२० दिवसांतून एकदाच मुंबईच्या स्टॉक मार्केटमध्ये विप्रोचे नाव दिसत.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

अमळनेरमधील शांतिलाल जैन यांना शेअर्स मिळाले. स्टॉकची फेस व्हॅल्यू त्यावेळी १०० रुपये होती. एका वेळी तर खरेदीदारांशिवाय शेअरची किंमत ३५ रुपयांपर्यंत खाली आली. जेव्हा एका शेअरची किंमत ३५ होती तेव्हा त्यांनी ते शेअर्स विकले नव्हते. त्या १०० रुपयांच्या स्टॉक स्प्लिट्समुळे वाढलेली किंमत, विभाजन आणि बोनस सगळं मिळवून आता त्याची किंमत ५.५ कोटी रुपये आहे.

जहूर अहमद हाजी शेख मासूम यांच्याकडे विप्रोचे सुमारे ७०,००० शेअर्स आहेत. या शेअर्सची आजची किंमत सुमारे १० कोटी रुपये इतकी आहे. तो तंबाखू विक्रेता होता पण त्याने विप्रोचीही उत्पादने विकली. शेख मासूमने १९४७ मध्ये मोहम्मद प्रेमजींकडून प्रत्येकी १०० रुपये या भावाने विकत घेतलेले ५ शेअर्स आज बोनस, स्टॉक स्प्लिट, आणि ट्रेडींगनंतर ७० हजारांवर पोहोचले आहेत. त्यांच्या घरातील सर्व सदस्य विप्रोचे कर्मचारी होते आणि आज ते सुखी निवृत्त जीवन जगताहेत. या सदस्यांपकी कामिल अहमद आजही विप्रोसाठी काम करतात.

एक निवृत्त वाणिज्य प्राध्यापक देखील आहे. त्याने आपल्या मुलासाठी सुमारे १३ लाख रुपयांचे रुग्णालय बांधण्यासाठी विप्रोचे अनेक शेअर्स विकले. त्यांनी फक्त ५० शेअर्स आपल्याकडे ठेवले असून त्यांनी बांधलेल्या रुग्णालयाला विप्रो हाऊस हे नाव देण्यात आले आहे. हे हॉस्पिटल पूर्णतः विप्रोच्या शेअर्सच्या कमाईतून बांधले होते. घरात लहान बाळाच्या जन्माच्या वेळी ‘विप्रोचे दहा शेअर्स खरेदी करा आणि त्या बाळाच्या भविष्याची तुम्हाला काहीही चिंता राहणार नाही’ असे अमळनेरमध्ये आजही म्हटले जाते.

अमळनेरच्या लोकांसाठी, विप्रो कंपनीपेक्षाही काहीतरी अधिक आहे. विश्लेषकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आज कोणीही ते शेअर्स विकायला तयार नाही. काहींच्या वडिलांकडे असलेले शेअर्स वारसा हक्काने त्यांच्याकडे आले आहेत. 

मुळात अमळनेरच्या रहिवाशांवर आधारित प्रूडेंट इक्विटीमध्ये लिहिलेली ही एक काल्पनिक कथा आहे, मोहम्मद अन्वर अहमदच्या वडिलांची १९७० च्या दशकात मोठी शेतजमीन होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सुमारे २० हजार रुपये होते. १९८० मध्ये अहमद चहाच्या दुकानाजवळ बसला असताना, मुंबईतील एक तरुण स्टॉक ब्रोकर त्याला प्रश्न विचारण्यासाठी थांबला. ही भेट अहमदचे आयुष्य बदलून टाकेल, असा त्याने विचारही केला नसेल. मुंबईतील काही क्लायंट्सच्या वतीने जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकर्स अमळनेरला आले होते.

“त्या कारखान्यातील शेअर्सची मालकी असलेले तुम्हाला कोणी माहीत आहे का?” असा प्रश्न त्या ब्रोकरने अहमदला विचारला. त्याचा इशारा निश्चितच विप्रोच्या कारखान्याकडे होता. अहमदने उत्तर दिले, त्या कारखान्याचे मालक आता मुंबईत राहतात आणि येथील अनेक रहिवाशांनी त्या कारखान्यात काम केले आहे आणि त्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील. पुढच्या १५ मिनिटांत ब्रोकरने अहमदला कंपनीत काम न करता एखाद्या शेअरचा मालक कंपनीमध्ये एका लहानशा का होईना पण भागाचे मालक कसा बनवू शकतो हे समजावून सांगतो. अहमदलाही यात रस वाटू लागला आणि त्याने ब्रोकरसोबत घरोघरी जाऊन इच्छुक विक्रेत्यांकडून शेअर्स गोळा करण्यास मदत केली. अहमदने स्वत: साठीही १००  रूपये मूल्याचे १०० शेअर्स खरेदी केले.

या मालकीच्या मॉडेलमध्ये उतरून अहमदला ३३ वर्षे झाली आहेत. कंपनी नियमित लाभांश देणारी आहे. त्याला वर्षांमध्ये १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे लाभांश मिळाले. अशा प्रकारे १० हजार रुपयांची गुंतवणूक ५५० कोटीपेक्षा जास्तीच्या फायद्यात बदलली आहे.

संदर्भ 

Maharashtra’s Amalner’s residents hold Rs 3000-crore worth shares of Wipro – The Economic Times (indiatimes.com)


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

ShareTweet
Previous Post

बांगलादेश सीमेवर गाईंच्या त*स्करीसाठी खोदलेला ८० मीटर लांबीचा भुयारी मार्ग BSF ने शोधलाय

Next Post

रविचंद्रन अश्विन म्हणजे भारताला सापडलेला ‘परफेक्ट ऑलराउंडर’ आहे..!

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

रविचंद्रन अश्विन म्हणजे भारताला सापडलेला 'परफेक्ट ऑलराउंडर' आहे..!

सिंहासनावर हक्क सांगणाऱ्या प्रत्येकाला यमसदनी धाडून शहाजहान हिंदुस्थानाचा बादशाह बनला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.