The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका तळघरातून सुरू झालेली कंपनी जगातील सर्वात मोठी कुरिअर कंपनी बनली

by द पोस्टमन टीम
4 September 2025
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्यापैकी प्रत्येकजण कमी-जास्त प्रमाणात ऑनलाईन खरेदी करतोच. मध्यंतरी कोविडचा धोका आणि लॉकडाऊन यामुळं तर आपण बाहेर जायला टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदीलाच जास्त प्राधान्य देत होतो. ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू पार्सल सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून थेट आपल्या दारात मिळतात.

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, पार्सल आणि कुरियर या गोष्टींकडं व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन जगाला कधी आणि कोणी दिला? सध्या पार्सल आणि कुरियर कंपन्यांचं जगभरात जाळं पसरलेलं आहे. या जाळ्याचा पहिला धागा एका अमेरिकन व्यक्तीनं विणला होता आणि याच व्यक्तीला पहिला यशस्वी आंत्रप्रन्युअर (नवउद्योजक) म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

२८ ऑगस्ट १९०७ रोजी १९ वर्षीय जेम्स (जिम) केसीनं आपला मित्र क्लाउड रायनसह १०० डॉलर्स उसने घेतले. २०-१९ वर्षाची पोरं आहेत म्हटल्यावर कोणालाही वाटेल मौजमजा करण्यासाठी घेतले असतील पोरांनी उसने पैसे. मात्र, जिम केसी मौजमजा करणाऱ्यातला नव्हता. त्याच्या डोक्यात त्यावेळी ‘बाई आणि बाटली’ नाही तर भविष्यातील एका मोठ्या व्यवसायाची योजना शिजत होती. जिम आणि क्लाउट यांनी मिळून सिएटल सलूनच्या ‘सहा बाय सात फूट’ तळघरात एका अमेरिकन मेसेंजर कंपनीचं कार्यालय सुरू केलं. सिएटलमध्ये टेलीग्राफ व इतर संदेश देण्यासाठी आणि लोकांची इतर कामं करण्यासाठी सहा मुलांची नेमणूक केली. त्यावेळी सिएटलमध्ये त्यांना तगडे नऊ स्पर्धक अगोदरच अस्तित्वात होते.

त्यावेळी कोणी कल्पनाही नव्हती केली. एका तळघरापासून सुरू झालेली ‘युनायटेड पार्सल सर्व्हिस’ नावाची कंपनी भविष्यात एक मोठा ब्रँड बनेल. हो, ही तिच पार्सल कंपनी आहे जिला आपण ‘यूपीएस’ म्हणून ओळखतो. सध्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वसनीय वाहतूक कंपनी. २०१७ मध्ये या कंपनीनं २२० देशांना तब्बल ५ अब्ज पॅकेजेस वितरित केली होती. ४ लाख ५४ हजार लोकांना रोजगार देणारी यूपीएस प्रायव्हेट कंपनी आहे. तरीही बहुतेकांना या कंपनीचा सर्वेसर्वा असलेल्या जिम केसीचं नाव माहित नाही. अनेक जण यूपीएसच्या निर्मिती आणि उदयाच्या रंजक कथेपासून अनभिज्ञ आहेत.

नेवाडा प्रांतातील पिक हँडल गुल्च या ठिकाणी २९ मार्च १८८८ रोजी जिम केसीचा जन्म झाला. किशोरवयात असतानाच त्यानं वॉशिंग्टनमधील सिएटलमध्ये स्थानिक वितरण कंपन्यांसाठी काम केलं होतं. एका मित्रानं त्याला १०० डॉलर्स कर्ज दिल्यानंतर, केसीनं स्वत:च्या मेसेंजर कंपनीची स्थापना केली. ही कंपनी सिएटलमध्ये मेसेंजर आणि डिलिव्हरी सेवा पुरवू लागली. विशेष म्हणजे जेव्हा केसीनं स्वत:ची मेसेंजर कंपनी सुरू केली होती, तेव्हा अमेरिकेच्या पोस्टल सेवेची स्थापना होऊन सहा वर्ष देखील झाले नव्हते. सुरुवातीला जिम केसीनं भाऊ जॉर्ज आणि मित्र रायन यांच्या मदतीनं तळघरातून त्याचा व्यवसाय चालवला. शहरातील पार्सल, कागदपत्रे, सामान आणि रेस्टॉरंटमधील जेवणाचं पायी किंवा सायकलवरून २४ तास त्याची कंपनी वितरण करत होती. १९१७मध्ये केसीनं आपलं पहिलं डिलीव्हरी वाहन घेतलं.

या तरुण उद्योजकांनी किरकोळ विक्रेत्यांसाठी पार्सल वितरित करण्यावर भर दिला. १९१३ मध्ये त्यांनी आपली स्पर्धक कंपनी असलेल्या ‘एव्हर्ट मॅककॅबे’सह हातमिळवणी केली आणि ‘मर्चंट्स पार्सल डिलिव्हरी’ नावाची आणखी एक कंपनी सुरू केली. हळूहळू केसीकडे वाहनांचा ताफा वाढला. पुढे त्यानं सामुहिक वितरण सेवा विकसित केली. कारण एकाच परिसरामधील सर्व पार्सलसाठी एकचं वाहन लोड करणं अधिक कार्यक्षम आणि फायद्याचं होतं.



जिम केसीची कंपनी एकदम सुरळीत सुरु होती. मात्र, त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. १९१९ मध्ये कंपनीने पहिल्यांदा सिएटलच्या बाहेर पार्सल नेलं. त्याचं वर्षी केसीनं कंपनीचं नाव ‘यूपीएस’ करून घेतलं. सुरुवातीच्या काळात मूठभर कुरिअर्स पुरवाणाऱ्या कंपनीनं हळूहळू देशभरात आणि नंतर जगभरात प्रसिद्धी मिळवली.

१९७० च्या दशकात यूपीएसनं अनेक देशांमध्ये आपली कार्यालयं उघडली. १६ ऑगस्ट १९७६ रोजी जर्मनीच्या न्यूसमधील राईनपार्क-सेंटर येथे कंपनीचं अमेरिकेबाहेर पहिलं कार्यालय उभं राहिलं. यामुळं जर्मन डाक सेवा आणि स्थानिक परिवहन कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.

जिम केसीच्या रुपात पहिल्यांदा एखादा अमेरिकन व्यावसायिक जर्मनीमध्ये टिकाव धरू शकला होता. डेटहोल्ड एडेन हे जर्मनीमधील युनायटेड पार्सल सेवेचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते. यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं मंजुरी दिल्यानंतर, १९८८मध्ये यूपीएस अधिकृतपणे एक विमान कंपनी बनली. सध्या ती जगातील दहा सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

यूपीएस आता २०० पेक्षा जास्त देशांमध्ये बिझनेस पार्सल, कागदपत्रांची वाहतूक आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवते. कंपनीचं मुख्यालय अटलांटा येथे आहे तर युरोपातील मुख्यालय ब्रसेल्समध्ये आहे. यूपीएस अजूनही आपला बहुतांश महसूल पार्सल व्यवसायातून मिळवत असलं तरी कंपनीनं लॉजिस्टिक्समध्ये देखील आपला विस्तार केला आहे.

कंपनीच्या या यशामागे जिम केसी नावाची खमकी व्यक्ती होता. त्यानं कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. सुरुवातीपासूनचं ग्राहकांना अनुकूल असलेली धोरणं त्याने अवलंबली होती. विश्वसनीयता, २४-तास सेवा आणि माफक दर या तत्त्वांमुळे केसीनं ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. ‘माफक दरामध्ये सर्वोत्तम सेवा’ हा केसीचा मोटो होता.

केसीनं आपल्या कंपनीला शिस्त लावली होती. याचाच परिणाम म्हणून आजही कंपनी लष्करी शिस्तीप्रमाणं आपली सेवा देते. प्रत्येक ड्रायव्हरला सुरुवातीचे सहा आठवडे यूपीएसमधील मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी देखील कडक नियम लागू केलेले आहेत. जिम केसी नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध होते. कर्मचारी आणि वाहन चालकांच्या जीवावर कंपनी सुरू असल्याचं ठाम मत केसीचं होतं.

६ जून १९८३ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी जिम केसीचं निधन झालं. त्यांनी कंपनीचं आजीवन अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषवलं. निश्चित ध्येय, ठाम विश्वास आणि नियोजनबद्ध काम केल्यास एका तळघरातून सुरू झालेली कंपनी जगातील अग्रणी कंपन्यांपैकी एक होऊ शकते, ही गोष्ट जीम केसी यांनी सिद्ध करून दाखवली. त्यांची ही गोष्ट नक्कीचं आताच्या तरुणांना प्रेरणा देणारी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा अमेरिकन सैनिक ना*झींविरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडून लढला होता

Next Post

त्रावणकोर संस्थानाच्या आर्थिक विकासाला चालना देणारी महाराणी सेतू लक्ष्मी बाई

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

त्रावणकोर संस्थानाच्या आर्थिक विकासाला चालना देणारी महाराणी सेतू लक्ष्मी बाई

मूर्ख वाटतील असे व्यवसाय करून या माणसाने गडगंज संपत्ती कमावली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.