The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोष्ट तोंडाला पाणी आणणाऱ्या लोणच्याची !

by द पोस्टमन टीम
17 July 2025
in ब्लॉग, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्यापैकी अनेकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजी, आई, काकू, मावशी, मामी यांच्यासोबत लोणचं तयार केलेलं असेल. निदान लोणचं तयार होताना पाहिलं तरी असेल. आमच्याकडे तर लोणचं तयार करणं हा एक सोहळाच असायचा. लोणच्या योग्य कैऱ्या निवडून आणणं, अडकित्त्यात घालून त्यांच्या व्यवस्थित फाका करणं, त्यांना दोन दिवस सुकवणं आणि मग मसाले टाकून मस्तपैकी माठात ते मुरवण्यासाठी ठेवणं, असा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम होई. आजीला आयते मसाले आवडतं नसतं, त्यामुळं लोणच्याचे मसाले तयार करण्यात सुद्धा मज्जा यायची. अगदी हळदसुद्धा ती घरीच हळकुंड फोडून तयार करायची. काही दिवस लोणचं मुरलं की, मग लेकी-बाळींना बरण्या भरून लोणचं दिलं जायचं.

अशा या लोणच्याशी आपल्यापैकी सगळ्यांच्याच काहीनाकाही आठवणी जोडलेल्या असतील. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का हो की, कित्येक घरांमध्ये जेवणाचा अविभाज्य भाग असलेलं हे लोणचं आलं कुठून?

भारतभर लोणच्याला विविध नावांनी ओळखलं जातं. कन्नडमध्ये उप्पीनाकायी, तेलुगूमध्ये पचाडी, तामिळमध्ये उरुकाई, मल्याळममध्ये उप्पीलीट्टूथू, मराठीमध्ये लोणचं, गुजराथीमध्ये अथानू आणि हिंदीमध्ये अचार या नावांनी लोणचं ओळखलं जातं.

आपल्याकडं लोणचं तयार करणं ही फक्त हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेली एक अन्ननिर्मिती प्रक्रिया नाही, तर ती एक परंपरा आहे. पण, न्यूयॉर्क फूड संग्रहालयातील ‘पिकल्स हिस्ट्री टाइमलाइन’नुसार, केरळमधील टायग्रीस व्हॅलीमध्ये पहिल्यांदा लोणचं तयार करण्यात आलं होतं. इसवीसन पूर्व २०३० मध्ये व्हॅलीतील लोकांनी काकडीचं लोणचं तयार केलं होतं.

‘पिकल’ या इंग्रजी शब्दाचा जन्म डच शब्दकोशातून झालेला आहे. डचमध्ये त्याचा अर्थ ‘खारवणे’ (जास्त प्रमाणात मीठ लावणं) असा होता. ‘अचार’ हा हिंदीमध्ये वापरला जाणारा शब्दसुद्धा मूळचा पर्शियन आहे. पर्शियामध्ये अचार म्हणजे, फळं आणि मसाला मीठ, साखर किंवा मधामध्ये मुरवणं. हजारो वर्षांपासून मुरवणं आणि खारवणं या अन्नपदार्थ टिकवून ठेवण्याच्या सर्वात जास्त लोकप्रिय पद्धती ठरल्या आहेत.



लोणचं हे सर्वात जुनं ‘मोबिल'(सहज कुठेही घेऊन जाता येण्याजोगं) फूड आहे. त्यामुळं प्रवासी आणि खलाशांचा देखील तो आवडता पदार्थ होता. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये अनेक कुटुंबांच्या जेवणाचा आधारही झालेला आहे. बायबल आणि विल्यम शेक्सपियरच्या लिखाणातही लोणच्यानं जागा पटकावलेली आहे. इतकचं काय आपल्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेली राणी क्लिओपात्राच्या सुंदरतेच्या रहस्यांमध्ये देखील लोणचं होतं, असं म्हटलं जातं.

लोणच्याचे अनेक काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत. लोणच्यामुळं खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. लोणच्यामुळं मध्यवर्ती मज्जा संस्था आणि आपल्या मानसिक आरोग्याला चालना मिळत असल्याचंही काही अभ्यासकांच्या लक्षात आलं आहे.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

लहान मुलांना अनेक भाज्या आवडत नाहीत. अशा भाज्या खाणं ते टाळतात. परिणामी त्यांना आवश्यक ती पोषणद्रव्ये मिळत नाहीत. जर त्यांच्या नावडत्या भाज्यांचं लोणचं तयार केलं तर मुलं आवडीनं खातात. लोणच्यामुळं लहान मुलांची इम्युनिटी देखील वाढते.

बहुतांशी गरोदर स्त्रिया मोठ्या आवडीनं लोणचं खातात.

लोणचं ऍसिडीक पदार्थ किंवा मीठाच्या पाण्यात फळं, भाज्या टाकून तयार केलं जातं. जगभरात अगोदर काकडीचं लोणचं तयार केलं जात होतं. प्रामुख्यानं मिठाचा वापर करून काकडीचं लोणचं तयार होतं. काकडी आणि मीठ एकत्र केलं की, लॅक्टिक मायक्रोबीलय ऑरगॅनिझम तयार होतात. यामुळं ते कितीही दिवस ठेवले तरी त्याला बुरशी लागत नाही किंवा ते खराब होत नाही. पुढे जस जसे खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रयोग सुरू झाले तस तसे काकडी सोबत विविध फळांचा आणि भाज्यांचा लोणच्यामध्ये समावेश झाला. आता मीठासोबत व्हिनेगर, साखर यांचा देखील लोणच्यामध्ये वापर केला जातो.

जेव्हा अनेक नाविक विविध पृष्ठभागांचा शोध लावत होते तेव्हा त्यांच्यासोबत लोणचं देखील जगभरात जाऊन पोहचलं. महासागरांवरून प्रवास करताना अनेक नाविकांना विटॅमिन-सीच्या कमतरतेमुळे स्कर्वीचा या रोगाचा त्रास होत असे. यापासून वाचण्यासाठी ख्रिस्तोफर कोलंबसनं आपल्या किराणा सामानात लोणच्याचा देखील साठा केल्याचे संदर्भ मिळतात. समुद्रप्रवासी होण्याअगोदर अमेरिगो व्हेस्पुसी स्पेनच्या सेविलमध्ये मालवाहू जहाजं भरून देण्याचा व्यवसाय करत होता. त्याला ‘पिकल डीलर’ म्हणूनचं ओळखलं जाई.

१६५९पर्यंत युरोपिय लोक अमेरिकेच्या भूमीवर स्थायिक झाले होते. आत्ता ब्रुकलिन नावानं ओळखल्या जाणाऱ्या भागात त्यावेळी डच लोकांनी काकडीचं उत्पादन घेण्यास सुरूवात केली. मोठे-मोठे डिलर्स त्यांच्याकडून काकडी विकत घेत. त्याचं लोणचं तयार करून न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर विकत.

ही जगातील सर्वात मोठ्या ‘पिकल इंडस्ट्री’ची सुरुवात होती.

पुढे १९व्या शतकात ज्यू लोकांनी अमेरिकेत स्थलांतर केलं आणि त्यांच्यासोबत ‘कोशर डील’ हा लोणच्याचा प्रकार अमेरिकेत पोहचला. तोपर्यंत लोणच्याचं उगमस्थान असलेल्या भारतात तर लोणचं प्रत्येकाच्या जेवणाचं अविभाज्य घटक झालं होऊन बसलं होतं.

लोणचं आणि नेपोलियन बोनापार्टचा देखील एक मजेदार किस्सा आहे. त्याच्या सैन्यासाठी जो व्यक्ती सर्वोत्तम लोणचं तयार करून आणले त्याच्यासाठी नेपोलियननं २ लाख ५० हजार डॉलर्सचं बक्षिस घोषित केलं होतं. लोणच्यासाठी मोजली गेलेली ही कदाचित सर्वात मोठी रक्कम असेल. १८०९मध्ये फ्रेंच शेफ आणि मिठाईनिर्मिती करणाऱ्या निकोलस ऍपर्ट यानं नेपोलियनचं हे बक्षिस जिंकलं. त्यानं काचेच्या हवाबंद बरण्यांचा वापर करून, लोणचं, जेली, सिरप, सुप आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा नेपोलियनच्या सैन्याला दिले होते.

१८९३ मध्ये, ‘पिकल पॅकर्स इंटरनॅशनल’ ही व्यापारी संघटना स्थापन झाली. या संघटनेनं ‘आंतरराष्ट्रीय पिकल वीक’ सुरू केला. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन सरकारनं लोणच्याचा समावेश ‘रेशन कार्ड’वरील पदार्थांमध्ये केला. देशातील एकूण उत्पादनांपैकी ४० टक्के लोणचं सैन्याला पुरवण्यात आलं होतं. २००१पासून अमेरिकेत शरद ऋतूमधील एक दिवस ‘पिकल डे’ म्हणून साजरा केला जातो. न्यूयॉर्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित होतो. जगभरातून आलेले खवय्यै याठिकाणी विविध लोणच्यांचा चटकारे-फटकारे लावत आनंद घेतात.

आपल्या सगळ्यांचा आवडत्या लोणच्याचा हा प्रवास कसा वाटलं ते कमेंट्समधून नक्की सांगा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अस्तित्वात नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर आलेला ‘तो’ माणूस कोण होता, अचानक कुठे गायब झाला..?

Next Post

या टिकटॉक स्टारकडे आहे जगातील सर्व अडचणींचं ‘सोल्युशन’!

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
Next Post

या टिकटॉक स्टारकडे आहे जगातील सर्व अडचणींचं ‘सोल्युशन’!

नागार्जुनच्या प्रेमाखातर तब्बूने अजूनही लग्न केलं नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.