The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीरा आणि वेदिकाला दिलेल्या या इंजेक्शनची किंमत १६ कोटी एवढी का आहे..?

by द पोस्टमन टीम
20 June 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२०२१ साली कोरोनाच्या बातम्यांमध्ये एक वेगळीच बातमी पुढे येताना दिसली. मुंबईतील चिमुरडी तीरा कामथ आणि पुण्यातील वेदिका शिंदे यांना एक वेगळ्याच आजाराने गाठले आणि त्या आजारासाठी औषध म्हणून अत्यावश्यक असलेल्या Zolgensma नावाच्या इंजेक्शनची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे.

भारतीय समाजमन हे एकात्मतेच्या एका पक्क्या धाग्यावर माळले गेले असल्याचा पुन्हा एकदा अनुभव येथेही आला आणि अनेक नागरिकांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. तीरा आणि वेदिकाच्या पालकांना असाध्य वाटणारे हे आव्हान लवकर पूर्ण झाले. दोघींच्याही जीवाला असलेला धोका सध्या कमी झाला आहे.

या नव्या रोगाच्या निमित्ताने असा कोणता हा रोग आहे ज्याला एवढे महाग इंजेक्शन लागते? दुसरे कोणतेच उपचार यासाठी उपयुक्त नाहीत का? असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून विचारले जात आहेत. या लेखात आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

काय आहे Zolgensma इंजेक्शन?

Zolgensma हे नोव्हार्टीस फार्मास्यूटिकल या कंपनीचे US FDA मान्यताप्राप्त जीन थेरेपीसाठी वापरले जाणारे एकमेव इंजेक्शन आहे. जीन हे अनुवंशिकतेचे मूलभूत एकक आहे. जीन DNAने बनलेले असते मानवीय शरीरात काही जीन प्रोटीन सिंथेसिसच्या माध्यमातून सर्व अवयवांसाठी आवश्यक असलेले प्रथिने तयार करतात. DNA सिन्थेसिसची प्रक्रिया विस्कळीत झाली की प्रोटीन सिंथेसिसवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे अनेक जनुकीय रोग होऊ शकतात.



जीन सिंथेसिस प्रक्रियेमध्ये काही चुकीचे कोडिंग आले की जेनेटिक डिसॉर्डेर होऊन काही रोग होतात SMA 1 (स्पायनल मस्क्युलर अट्रोपी टाईप 1) हा त्यातील एक रोग होय. या रोगासाठी एकमेव औषध आहे म्हणून Zolgensma हे इंजेक्शन एवढे महागडे आहे.

काय आहे SMA 1?

स्पायनल मस्क्युलर अट्रोपी टाईप 1 (SMA 1) हा न्यूरोमस्कुलर आजार आहे जो केंद्रीय मज्जासंस्थेतील मोटर न्यूरॉन निकामी झाल्यामुळे होतो. मोटर न्यूरॉन हा मज्जासंस्थेचे एक महत्त्वाचे कार्य बजावणारा घटक आहे, जो स्नायू, विविध ग्रंथी व अवयवांना जोडून ठेवण्यात मदत करतो. थोडक्यात केंद्रीय मज्जासंस्थेच्या माध्यमातून पूर्ण शरीराला पाठवण्यात येणारे संकेत या मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून पाठवले जातात.

या जेनेटिक डिसऑर्डरमुळे जन्माला आलेले अभ्रक सामान्यतः अशक्तपणा, चालू न शकणे आणि फुफुसाच्या रोगांना सामोरे जाते. या रोगाचा योग्यतो उपचार केला नाही तर रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

हा रोग शरीरातील SMN जीनमध्ये तयार झालेल्या म्युटेशनमुळे होतो. या म्युटेशनमुळे आवश्यक ते SMN प्रोटीन तयार होत नाही व त्याच्या अभावापायी हा रोग होतो. या रोगावर Zolgensma हे एकच इंजेक्शन उपलब्ध आहे म्हणून देखील त्याची किंमत जास्त आहे. हे इंजेक्शन शरीरात जाऊन करते तरी काय? जाणून घेऊया.

Zolgensma इंजेक्शनची कार्य करण्याची यंत्रणा

Zolgensma हे इंजेक्शन AAV 9 आधारित जीन थेरेपी आहे. यामध्ये AAV 9 या वेक्टरचा उपयोग करून SMN प्रोटीन तयार करणारा जीन शरीरात सोडतात. SMA 1 हा रोग SMN हा प्रोटीन तयार होत नाही म्हणून होतो. जेव्हा हे प्रोटीन तयार करणारे जीन AAV 9 या वेक्टरच्या आधारे शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपोआप प्रोटीन सिंथेसिस व्हायला सुरुवात होते आणि मोटर न्यूरॉन कार्यरत होऊन रुग्ण बरा होतो. हे इंजेक्शन ५ ml च्या छोट्या बाटल्यांमध्ये उपलब्ध असते. हे इंजेक्शन रुग्णाच्या शिरेत दिले जाते.

Mechanism Of action of Zolgensma

तीरा कामथ आणि वेदिका शिंदे या चिमुकल्यांच्या निमित्ताने भारताला जरी आत्ता आत्ता या रोगाची माहिती झाली परंतु अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये दरवर्षी या रोगाचे सरासरी ६० रुग्ण सापडतात. जगाच्या पाठीवर जीन थेरेपी या उपचार पद्धतीवर भरपूर संशोधन चालू आहे अजूनही होण्याची आवश्यकता आहे. असाध्य रोगांवर इलाज हा जीन थेरेपीच्या माध्यमातून शक्य होऊ शकतो.

जास्त अभ्यास आणि संशोधन झाले तर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जीन थेरेपीची औषधी उपलब्ध होईल. भारतामध्ये या दोन चिमुकल्या आजारी पडल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. अनेक समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात मदत करून भारतीय समाजमनाच्या संस्कारात स्वात्मभावाचे दर्शन घडवून आणले. या एकात्मतेच्या संस्काराच्या धाग्यावर भारत असे अनेक संकटे चुटकीसरशी सोडवतो हे नक्की परंतु औषाधोपचार पद्धती अजून सोपी आणि स्वस्त व्हावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहेच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या CIA ने भारतीय हिमालय रांगात हरवलेलं न्यू*क्लिअर डिव्हाईस अजून सापडलं नाही

Next Post

इंग्लंडच्या टीमने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट मॅच खेळली होती..!

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

इंग्लंडच्या टीमने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट मॅच खेळली होती..!

१९६५ पर्यंत भारतात एकाच वेळी दोन पंतप्रधान असायचे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.