The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या अशिक्षित बिलेनियरने २५००पेक्षा जास्ती वाचनालय उभे केले आहेत

by द पोस्टमन टीम
4 January 2026
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


यशस्वी उद्योजक होण्यासाठी पैसा नाही तर व्यावसायिक वृत्ती, जिद्द, कष्ट करण्याची तयारी असावी लागते. कुठलेही शिक्षण, आर्थिक पाठिंबा नसतानाही उद्योगात आपले नाव कमावलेल्या अनेक बड्या हस्ती आज जगात आहेत.

अमेरिकेत अशा श्रीमंतांची मोठी रीघ आपल्याला बघायला मिळेल. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरीकेच्या राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नाच्या २ % संपत्ती स्वत:कडे असलेला अँड्रयू कार्नेगी हा उद्योजक जगातील श्रीमंतांच्या यादीत आपले वेगळे स्थान निर्माण करतो.

आपल्या संपत्तीचा बराचसा भाग समाजकार्यासाठी दान करणाऱ्या अँड्रयू कार्नेगीबद्दल बरेचसे कुतुहल आजही जगभरात आहे. रंक ते राजा हा कार्नेगीचा प्रवास आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अँड्रयू कार्नेगीचा जन्म झाला २५ नोव्हेंबर, १८३५ या दिवशी, डनफर्मलाईन या स्कॉटलंड देशातील गावात. वडील हातगिरणी कामगार आणि आई चप्पलांच्या कारखान्यात कामाला. १८४८ मध्ये कार्नेगी परिवार चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात अमेरीकेत स्थायिक झाला.



स्कॉटलंड सोडले तेव्हाच अँड्रयू कार्नेगीचे शिक्षण संपले. अमेरीकेत येताच त्याने एका कापसाच्या कारखान्यात १.२० डॉलर प्रती आठवडा अशा पगाराचे काम करण्यास सुरुवात केली.

ध्येयवादी आणि कष्टाळू असलेल्या अँड्रयूने बरीचशी कामे घेतली. टेलीग्राफ कार्यालयात संदेश वाहक म्हणुन, सहाय्यक, टेलीग्राफ चालक अशी कित्येक कामं त्याने त्यावेळी केली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

ज्या व्यक्तीचा सहाय्यक म्हणुन काम केले त्यालाच डावलुन १८५९ मध्ये कार्नेगी स्वत: रेलरोड विभागाचा मुख्य निरिक्षक झाला. निरिक्षक म्हणुन काम करताना त्याने बऱ्याच छोट्या मोठ्या व्यवसायात फायदेशीर गुंतवणूक केली.

यामध्ये कोळसा, लोखंड, तेल तसेच रेल्वेच्या स्लीपिंग कार बनवणाऱ्या कंपनीतही त्याने गुंतवणुक केली होती.

१८६५ साली निरिक्षक पद सोडल्यानंतरही त्याने उद्योगक्षेत्रात गुंतवणूकीचा आपला सपाटा चालूच ठेवला. अमेरीकन रेलरोड व्यवसाय झपाट्याने वाढत असताना त्याने रेलरोड व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक वाढवली.

किस्टोन ब्रिज कंपनी स्थापन करुन त्याने लोखंडी रेल्वे पूल निर्मीती सुरु केली. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी तो आपल्या आधीच्या नोकरीतील ओळखींचा वापर करत असे. स्वत:ची एक टेलीग्राफ फर्मही त्याने स्थापन केली. ३०च्या वयातच कार्नेगी एक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ओळखला जाऊ लागला.

१८७० च्या दशकाच्या सुरुवातीला कार्नेगीने स्वत:च्या पहिल्या स्टील कंपनीची स्थापना भागीदारी तत्वावर पिट्सबर्ग इथे केली. पुढच्या काही दशकात त्याने मागे वळुन न पाहता स्वत:चे स्टीलचे साम्राज्य उभे केले.

अमाप नफा मिळवून तो अतिशय धनाढ्य बनला. १८९२ साली त्याने स्वत:च्या कमाईतुनच कार्नेगी स्टील कंपनीची स्थापना केली.

कामगार वर्गासाठी महत्त्वाचा माणुस म्हणुन अँड्रयू कार्नेगी ओळखला जाऊ लागला. सगळे सुरळीत चालू असतानाच कार्नेगीच्या उद्योजक कारकिर्दीला कलाटणी देणारी एक घटना घडली.

कार्नेगीच्या घराजवळील एका स्टीलच्या कारखान्यात कामगारांनी संप पुकारला. पगारातील कपातीविरोधात असलेला हा संप संपुष्टात आणण्याचे काम त्यावेळी कार्नेगी स्टीलचा महाव्यवस्थापक असलेला हेन्री क्ले फ्रिक याच्याकडे देण्यात आले.

त्याने कामगारांना कारखान्यात बंद करुन घेतले. फ्रिकने यावेळी ३०० सशस्त्र पोलिस अधिकारी बोलवून घेतले. यावेळी कारखान्याच्या आवारात भांडण आणि मारामारीस सुरुवात झाली.

अँड्रयू कार्नेगी यावेळी स्कॉटलंडमध्ये सुट्टीवर गेला असला तरी त्याने फ्रिकला पाठिंबा दिला होता असे म्हटले जाते. या घटनेत १० लोकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने हस्तक्षेप करुन त्यावेळी परिस्थिति हाताळली. संपातील महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. कामगारांना काढुन टाकण्यात आले.

१९०१ साली बँकर असलेल्या जॉन पियरपॉंट मॉर्गनने कार्नेगी स्टील विकत घेतली. ४८० मिलियन अमेरीकन डॉलर्सला कंपनी विकुन अँड्रयू कार्नेगी रातोरात त्यावेळच्या श्रीमंत लोकांपैकी एक बनला.

त्याच वर्षी मॉर्गनने कार्नेगी स्टीलला बाकीच्या अमेरीकन स्टील कंपन्यांमध्ये सामील केले. पुढे जाउन यु. एस. स्टील असे या समुहाचे नामकरण झाले. पुढे जाउन हाच यु. एस. स्टील जगातील पहिला बिलियन डॉलर्स समुह बनला.

कंपनी विकल्यानंतर अँड्रयू कार्नेगीने आपले लक्ष समाजसेवेकडे वळवले. व्यवसायातुन निवृत्ती घेऊन त्याने स्वत:ची संपत्ती समाजसेवेसाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. १८८९ मध्ये लिहिलेल्या त्याच्या “गॉस्पेल ऑफ वेल्थ” या निबंधात तो लिहितो,

“सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आपल्या संपत्तीची वाटप करणे ही श्रीमंतांची नैतिक जबाबदारी आहे.” म्हणून श्रीमंत म्हणून  मरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा नैतिकतेच्या विरोधात आहे असे तो म्हणत असे.

कार्नेगीने आपल्या संपत्तीतील ३५० मिलियन डॉलर्स दान केले. आजच्या अमेरीकन डॉलर्समध्ये ही किंमत बिलियनच्या घरात जाईल. २५०० पेक्षा जास्त वाचनालये त्याने उभारली होती.

७६०० पेक्षा जास्त अवयव त्याने वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था तसेच चर्चला दान केले. विज्ञान, शिक्षण, जागतिक शांततेसाठी काम करणारया हजारो संस्थांना त्याने आर्थिक मदत केली. न्यूयॉर्कमधील कार्नेगी हॉलच्या बांधकामासाठी, जमीन खरेदीसाठी त्याने ११ लाख डॉलर्स खर्च केला. या प्रेक्षागृहाचे उद्घाटन १८९१ मध्ये करण्यात आले.

कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, कार्नेगी मेलॉन यूनिवर्सिटी, कार्नेगी फॉऊंडेशन या सगळ्यामागे अँड्रयू कार्नेगीच्या आर्थिक मदतीचा हात होता. आजही अमेरीकन इतिहासात सार्वजनिक वाचनालयाला सर्वात पैसे दान देणारा व्यक्ती म्हणून कार्नेगी ओळखला जातो.

कौटुंबिक स्तरावर बघितलं तर कार्नेगीवर त्याच्या आईच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. १८८६ साली त्याच्या आईचा मृत्यू झाला तोपर्यंत ते बरोबर राहत होते. १८८७ मध्ये ५१ वर्षीय अँड्रयू कार्नेगी याने लुईस व्हिटफील्ड हिच्याशी लग्न केले. लुईस त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान होती.

त्यांना पुढे जाउन मार्गारेट नावाचा एक मुलगा झाला. त्यांचे कुटुंब मॅनहॅटनमधील एका मोठ्या महालात रहात होते. सुट्टीसाठी ते स्कॉटलंडमधील त्यांच्या स्किबो महालात जाउन राहत असत. हा महाल सुमारे २८००० एकरांवर वसलेला होता यावरुन कार्नेगीच्या संपत्तीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या कार्नेगीचा मृत्यू ११ ऑगस्ट, १९१९ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी झाला. आधुनिक अमेरिकेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या कार्नेगीला ‘अमेरिकन टायटन्स’पैकी एक समजले जाते.

आपल्या व्यवसायिक बुद्धीचा वापर करुन कमवलेल्या संपत्तीचा वापर जनसामान्यांसाठी करणारा कार्नेगी आजच्या धनाढ्य लोकांसाठी एक आदर्श आहे एवढं नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जमीनदारी विरोधात नक्षलवाद पुकारणारा स्वतःसुद्धा जमीनदार होता

Next Post

विदेशी गाड्यांना टक्कर देण्यासाठी हिंदुस्थान मोटर्सने ही कार बनवली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

विदेशी गाड्यांना टक्कर देण्यासाठी हिंदुस्थान मोटर्सने ही कार बनवली होती

हवामानबदल - ९० वर्षात पहिल्यांदाच या डेथ व्हॅलीचं तापमान एवढं वाढलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.