The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्त्रीने गोऱ्या व्यक्तीसाठी सीट रिकामी करायला नकार दिला आणि एक आंदोलन पेटलं

by द पोस्टमन टीम
21 July 2025
in वैचारिक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अमेरिका हा वैचारिक, आर्थिक, राहणीमान, सोयी-सुविधा या सगळ्यांत भारताहून कमीत कमी शंभर वर्षे पुढे असलेल्या देशांपैकी एक आहे. अमेरिका एक महासत्ता असून सगळ्याच देशांची काही ना काही सूत्रे तरी अमेरिकेशी संबंधित आहेतच. पण या देशालासुद्धा महासत्ता बनण्यासाठी स्वतःचे कैक पातळ्यांवर परिवर्तन करावे लागले.

एक जोहरी ज्याप्रमाणे अनावश्यक घटक काढून सुंदर हिरा घडवतो, त्याच प्रमाणे कोणत्याही देशाला प्रगतीपथावर अगदी अग्रेसर होण्यासाठी काळा बरोबर बदलावेच लागते. अमेरिकेने तेच केले.

अमेरिका, इंग्लंड येथील वर्णभेदाशी आपण परिचित आहोतच.

त्वचेचा रंग माणूस स्वतः निवडू शकत नाही, हा त्याच्या क्षमता कक्षेच्या पलीकडील विषय आहे, ही वैज्ञानिक बाब जाणूनसुद्धा, अमेरिकेतील गौरवर्णाची लोकं इतरांना काळे म्हणून हिणवत. या लोकांना अतिशय तुच्छ व अपमानास्पद वागणूक दिली जात असे.

सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासाठी कुठल्यातरी मागच्या रांगेत व्यवस्था केली जात असे. त्यांच्या मुलांना देशातील दुय्यम दर्जाच्या शाळेत जाण्याखेरीज गत्यंतर नव्हते.



इस्पितळे, वाचनालये, सार्वजनिक नळ, वेगळे होतेच पण प्रेयर्ससाठी करण्यासाठी देखील त्यांना वेगळ्या चर्चमध्ये जावे लागायचे.

सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग करणाऱ्या नागरिकांपैकी सत्तर टक्के संख्या ही काळ्या, सावळ्या नागरिकांची असूनही, त्यांना बसच्या मागच्या बाजूस बसण्याचे कडक आदेश सरकारने जाहीर केले होते.

अमेरिकेत वर्णभेदाला संवैधानिक मान्यता होती.

हे देखील वाचा

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

या सगळ्या भेदभावाला, पदोपदी होणाऱ्या छळाला कंटाळून रोजा पार्क्सने आपल्या अधिकारप्राप्तीसाठी उठाव केला.

“मोण्ट्गोमेरी बस बॉयकॉट” ही अमेरिकेचा इतिहास पालटणारी चळवळ पार्क्सच्या ‘मी ही माझी सीट कोणाला का देऊ?’ या प्रश्नामुळे घडली.

रोजा लुईस मॅककॉलीचा जन्म टस्किगि, अलाबामा येथे ४ फेब्रुवारी १९१३ साली झाला. २ वर्षांची रोजा आपल्या आई व वडिलांबरोबर पाईन लेवल, अलाबामा, येथे आपल्या आईच्या पालकांसोबत राहू लागली. त्यानंतर पुढील दोन वर्षांतच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला व रोजा आपल्या आईबरोबर राहू लागली.

तिची आई व्यवसायाने शिक्षिका असल्याने घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. वयाच्या अकराव्या वर्षी तिने मोण्ट्गोमेरित , ‘अलाबामा स्टेट्स टीचर्स कॉलेज फॉर निग्रोज’च्या लबॉरेटोरी स्कुलमध्ये प्रवेश घेतला. पण सोळाव्या वर्षी, ११वी त असतानाच तिला आपल्या अतिशय आजारी आजी व आईची काळजी घेण्यासाठी शिक्षण सोडावे लागले.

एकोणवीसाव्या वर्षी, रेमंड पार्क्स यांच्यासोबत तिचे लग्न झाले.

ते ‘नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ क्लर्ड पीपल (एन.ए.ए.सी.पी.)’ या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते.

रोजाला सगळ्या सामजिक कार्यांसाठी लागणाऱ्या प्रेरणा, प्रोत्साहन व मार्गदर्शनाचे मुख्य स्त्रोत रेमंड होते. पुढे पार्क्स दांपत्य कैक संस्था-संघटनांबरोबर समाज प्रबोधन व सुधारणांचे काम करु लागले.

काही वर्षांतच रोजाची ‘एन.ए.ए.सी.पी.’च्या सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. १९५५ साली ‘मोण्ट्गोमेरि बस बॉयकॉट’ची मुख्य सूत्रधार असल्याची महत्त्वपूर्ण भूमिका रोजाने पार पडली.

त्या दिवशी कामावरून परतत असताना रोजा सार्वजनिक बसच्या काळ्या लोकांसाठी असलेल्या राखीव सीटवरच बसली होती. पुढच्या रांगेतील गोऱ्या लोकांना जागा कमी पडत असल्यामुळे, रोजाची रांग देखील त्यांना द्यावी म्हणून बस कंडक्टरने रोजा व इतर तीन प्रवाशांना ते स्थान रिक्त करण्यास सांगितले.

इतर तिघे जण उठून उभे राहिले. पण रोजाने आपले स्थान सोडण्यास साफ नकार दिला. बाचाबाची होत असलेली पाहून, त्या बसस्थानकाजवळील दोन पोलीस कर्मचारी तिथे आले.

परिस्थिती पाहून रोजाला कायदाभंग करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

रोजाच्या या अटकेने समस्त कलर्ड लोकांच्या मनात आत्मसन्मान पुन्हा जीवित केला. सायंकाळी, रोजाची जामिनावर सुटका तर झाली, पण समस्त नागरिकांत एक आक्रोश निर्माण झाला होता.

‘मिसेस पार्क्सना जोपर्यंत मुक्त करण्यात येत नाही, तो पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचा आम्ही त्याग करु’ अशी घोषणा स्थानिकांनी केली’. ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली.

या चळवळीला हाताळण्यासाठी ‘मोण्ट्गोमेरि ईम्प्रुवमेंट असोसिएशन’ची ‘ रेव्ह. डॉ मार्टिन लूथर किंग, जुनियर’ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली.

बघता बघता चळवळीने आक्र*मक रूप धारण केले. एन.ए.ए.सी.पी च्या कार्यकर्त्यांवर व त्यांच्या घरांवर ह*ल्ले झाले, पण डळमळीत न होता सगळे खंबीरपणे रोजाच्या पाठीशी उभे राहिले. या चळवळीत सहभागी झाल्यामुळे रोजाला नोकरीसुद्धा गमवावी लागली.

पहिल्या खटल्यात तिला दोषी ठरवण्यात आले पण अमेरिकन सुर्प्रीम कोर्टाने तिला निरपराधी घोषित करून, हा भेदभाव संविधानाविरूध्द असल्याचे जाहीर केले. मोलाचा वाटा असूनसुध्दा या चळवळीच्या इतिहासातून ‘रोजा पार्क्स’ हे नाव पुसून टाकण्याचेसुद्धा प्रयत्न झाले होते.

आपल्या आत्मचरित्रात मिसेस पार्क्स म्हणतात की ‘मी थकले होते म्हणून बसची सीट सोडण्यास नकार दिला, किंवा मी त्या वेळी वयस्कर होते म्हणून उभे राहणे मला शक्य नसल्यामुळे मी बसुनच राहिले, या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत.

मी थकले नव्हते, नेहमीच्या तुलनेत त्या दिवशी कामसुध्दा कमीच केले होते. मी वयस्क तर अजिबात नव्हते. या चळवळी दरम्यान माझे वय फक्त ४२ वर्षे होते. त्यामुळे अंतर्गत राजकारणामुळे या चळवळीत माझी फरशी महत्त्वाची भूमिका नसल्याचे भासवण्यात आले, पण याचा मला खेद नाही. माझे कार्य सार्थक झाले यातच मला समाधान वाटते.’

या बॉयकॉटनंतर रोजा पार्क्स डिट्रॉईट मीचीगन येथे स्थायिक झाल्या व आपले समजाप्रति असलेले कर्तव्य पार पाडू लागल्या.

‘आवाज उठवून आपल्या हक्कांसाठी प्रत्येक माणसाने लढलेच पहिजे. अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो’ या गीतेच्या शिकवणीचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘रोजा पार्क्स!’


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: AmericaRacismUS
ShareTweet
Previous Post

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

Next Post

मालेगाव फिल्म इंडस्ट्री उभी करणारा पडद्यामागचा नायक

Related Posts

विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
वैचारिक

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

11 November 2024
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2026
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2025
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

28 January 2025
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

25 December 2025
Next Post

मालेगाव फिल्म इंडस्ट्री उभी करणारा पडद्यामागचा नायक

कोण आहेत चीनचे उईगर मुस्लीम ? जाणून घ्या त्यांचा इतिहास आणि भीषण वर्तमान

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.