The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याच्या इतका क्रू*र सीरिअल किलर आजवर झाला नसेल

by नंदकुमार कारभारी
10 June 2025
in ब्लॉग
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१ फेब्रुवारी, १९७४ :

लिंडा हेली ही २१ वर्षीय युवती घरात झोपली असताना तिच्यावर एका अज्ञात व्यक्तीने ह*ल्ला केला तिला जखमी करून तिचं अपहरण करण्यात आलं. वर्षभराच्या तपासातून काहीच निष्पन्न झालं नाही. सरतेशेवटी १९७५ मध्ये ‘टेलर माऊंटन साईट’ (अमेरिकेतील मानव वसाहतीपासून लांब असलेलं एक निर्जन स्थळ) इथे तिच्या हाडाच्या सांगाड्याचा काही भाग आढळून आला.

१२ मार्च, १९७४:

डोना मॅनसन ही १९ वर्षाची विद्यार्थिनी आपल्या कॉलेजमधील कार्यक्रमाला रस्त्याने चालत जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तपासाअंती तिचाही थांगपत्ता लागला नाही.



१७ एप्रिल, १९७४ :

सुझन रॅनकोर्ट, वय १८ वर्षे, विद्यार्थिनी

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

६ मे, १९७४:

रोबर्टा पार्क, वय २० वर्षे, विद्यार्थिनी

१ जून, १९७४ :

ब्रेनडा बॉल, वय २२ वर्षे, विद्यार्थिनी

६ मे, १९७५ :

लीनेट कुलवर, वय १२ वर्षे, शाळकरी मुलगी.

९ फेब्रुवारी, १९७८ :

किंबरले लीच, शाळकरी मुलगी.

ही यादी न संपणारी आहे. वरील पीडित मुलींसारख्याच अजून ३० पेक्षा जास्त मुली १९७४ ते १९७८ या ४ वर्षांच्या काळात अमेरिकेतील ७ राज्यांच्या वेगवेगळ्या शहरांतून, गावातून नाहीशा झाल्या, ज्या कधी त्यांच्या घरी परतु शकल्या नाहीत, कारण त्या जिवंतच राहिल्या नाहीत. घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी त्याच्यामध्ये काही समान दुवे होते. जसं गुन्हा करताना वापरलेली पद्धत (Modus Operendi) ही जवळपास प्रत्येक गुन्ह्यात एकसारखीच होती.

सर्व पीडिता या विशिष्ट वयोगटातल्या होत्या. प्रामुख्याने किशोरवयीन, तरुणी. पण एक दुवा जो कोणाच्याही लक्षात आला नाही किंबहुना जर तो लक्षात आला असता तर अर्ध्यापेक्षा जास्त पीडित तरुणींना प्राणास मुकावं लागलं नसतं. तो दुवा म्हणजे हे भयानक कृत्य एकाच नराधमाने केलं होतं.

त्याचं नाव होतं टेड बंडी

एक अमेरिकन गुन्हेगार. गुन्हेगार म्हणण्यापेक्षा एक थंड रक्ताचा, भावनाशून्य क्रू*रकर्मा म्हणणं योग्य.

गुन्ह्यांचं स्वरूप : अपहरण, बला*त्कार आणि ह*त्या.

गुन्ह्यांचा काळ : १९७४-१९७८

पीडित : १६ ते २६ वयोगटातील युवती आणि महिला.

पीडितांचा आकडा : ३०. युवतीचं अपहरण करून त्यानंतर बला*त्कार आणि शेवटी ह*त्या केल्याचं त्यानं खुद्द स्वतः कबूल केलंय.

थिओडोर बंडी हे त्याचं मूळ नाव. एका कुमारी मातेच्या पोटी जन्म झालेल्या टेडचं बालपण हे त्याच्या आजोळी गेलं. त्याचं बालपण जरी सामान्य परिस्थितीत गेलेलं नव्हतं तरी ते वाईट गेलं असं म्हणता येणार नाही. त्याच्या विचित्र स्वभावाची चुणूक त्याच्या नातेवाईकांना, आप्तांना आणि मित्रमंडळींना त्याच्या किशोरावस्थेतच आली होती. पण ही चुणूक पुढे एवढं किळसवाणे, रक्तरंजित रूप धारण करेल आणि क्रौर्याचीही सीमा ओलांडेल असं त्यांना नक्कीच वाटलं नसेल.

आपल्या सुंदर दिसण्याचा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. तो पीडित युवतींबरोबर सार्वजनिक ठिकाणी ओळख करून घेत असे आणि मग त्यांच्यावर पाळत ठेवत असे, मग त्या मुली एकट्या असल्या की ह्या ना त्या कारणाने त्यांच्याशी बोलून त्यांचं अपहरण करायचा. निर्जन स्थळी नेऊन, त्यांना जखमी करून त्यांच्यावर बला*त्कार करत असे आणि नंतर त्यांची क्रू*र पद्धतीने ह*त्या करत असे. मृतदेहाची विल्हेवाट तो विरळ वस्ती असलेल्या ठिकाणी जाऊन दुर्गम भागात करत असे आणि धक्कादायक बाब अशी की तो मृतदेह टाकलेल्या ठिकाणी नंतरही कित्येक दिवस भेट देत असे. पीडित मुलींच्या वेदनेने, त्यांचे किंचाळणे, विव्हळणे यातून त्याला असुरी आनंद मिळत असे.

त्याने सुरू केलेल्या ह*त्यांची मालिका तो पकडला जाईपर्यंत सुरूच होती.

सुदैवाने १९७५ साली त्याला अपहरणाच्या अपयशी प्रयत्नाच्या आरोपाखाली अटकही झाली होती पण संधीचा फायदा घेत बंडीने पोलीस स्टेशनमधून पळ काढला. अशाप्रकारे त्याने दोन वेळा पोलिसांना गुंगारा दिला आणि या दोन्ही वेळेस पोलिसांनी त्याला एक सामान्य गुन्हेगार समजण्याचा हलगर्जीपणा केला.

राज्या-राज्यातील पोलीस यंत्रणेतील असलेला समन्वयाचा अभाव बंडीच्या पथ्यावर पडला. त्याकाळी राज्यातील गुन्ह्यांचं रजिस्टर, संशयित याची माहिती दुसऱ्या राज्यातील पोलिसांना सहजगत्या मिळण्याची यंत्रणाच नव्हती.

१९७५ सालापासून बंडीने ह*त्या केलेल्या पीडितांच्या मृतदेहाचे राहिलेले हाडांचे सांगाडे डोंगर, दऱ्या, नदी, जंगल, तलाव अशा निर्जन स्थळी सापडायला सुरुवात झाली. एकट्या ‘टेलर माऊंटन साईट’ या ठिकाणी ट्रेकिंगला गेलेल्या टीमला ७-८ मानवी (महिला) हाडांचे सांगाडे सापडले.

१९७८ साली त्याला फ्लोरिडामध्ये अटक करण्यात आली आणि निरागस तरुणींचे प्राण घेणारी ही मालिका खंडित झाली.

या प्रकरणाला माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळाली होती. दररोज वृत्तपत्रांमध्ये गुन्ह्यांचे लेख, त्याच्या न्यायालयातील सुनावणी दरम्यानच्या छायाचित्रांबरोबर छापून येत असे. त्याने केसचा निकाल लागेपर्यंत गुन्हा कबूल तर केला नाहीच उलट आपल्यालाच कसं या प्रकरणात गोवलं याच्या उलटसुलट गोष्टी तो न्यायालयात सांगत असे. त्याने स्वतःची बाजू मांडण्यासाठी वकील ही घेतला नाही तो स्वतःच स्वतःची बाजू न्यायालयात मांडत असे.

न्यायालयात वावरताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तो किती पाषाणह्रदयी, निष्ठूर आणि पाशवी मनोवृत्तीचा आहे याची कल्पना देत होते.

न्यायालयाने त्याला ह*त्या करण्यासाठी दोषी ठरवून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. ५-६ वर्षे कैदेत राहिल्यानंतर त्याने आपण गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि जीवाचा थरकाप उडवणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला. त्याने पोलिसांना कल्पना नसलेल्या पण त्याने केलेल्या दुसऱ्या ह*त्यांचीही माहिती दिली. तो मृतदेहाची विल्हेवाट लावल्यांनंतरही त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाऊन त्या मृतदेहांवर अनैसर्गिक कृत्य करत असे. पण तो असं का करत असे हे त्याने कधीच स्पष्ट केलं नाही.

त्याने ३० ह*त्या केल्याचं कबुल केलं असलं तरी खरा आकडा हा त्याच्यापेक्षाही जास्त आहे. काही ह*त्या या त्याने काही कारणास्तव लपून ठेवल्याचं सांगितलं जात. १९८९ साली मरेपर्यंत इलेक्ट्रिक शॉक देऊन त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी केली गेली.

२०१९ साली नेटफ्लिक्स या मनोरंजनाची सेवा देणाऱ्या (OTT) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर “कॉन्वरसेशन विथ किलर : द टेड बंडी टेप्स” नावाची चार भागांची मालिका प्रदर्शित करण्यात आली.

या मालिकेमध्ये टेड बंडीचे मुलाखतीदरम्यान दिलेले आणि रेकॉर्ड केलेले कबुलीजबाब आपण ऐकू शकतो. ही मालिका या पूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकते आणि या हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांसाठी एक श्रद्धांजली अर्पण करते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजच्या लिव्ह इन रिलेशनची सुरुवात राजस्थानच्या नातं लग्न प्रथेमध्ये सापडते

Next Post

हंगेरी: द राईज अँड फॉल ऑफ डेमॉक्रॅसी

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

हंगेरी: द राईज अँड फॉल ऑफ डेमॉक्रॅसी

शिखांच्या निहंग दलाचे पहिले जथेदार बाबा बिनोद सिंग

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.