The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनची आ*ण्विक ताकद जाणून घेण्याच्या भारताच्या प्रयत्नात अमेरिकेने केली होती अभूतपूर्व मदत!

by Tushar Damgude
23 May 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एकीकडे पंडित नेहरू चीनच्या प्रेमात बुडालेले असताना आय.बी.चे प्रमुख भोलानाथ मलिक मात्र जागरूक होते. चीनने तिबेट गिळल्यावर मलिकांनी ‘सी. आय. ए.’शी हात मिळवणी केली. तिबेटी युवकांना सशस्त्र क्रांतीसाठी शस्त्रे पुरवण्याचे ‘सी. आय. ए.’ने कबुल केले. ही शस्त्रे नियोजित निर्जन स्थळी टाकायला मदत व्हावी म्हणून मलिकांनी भारतीय आकाश अमेरिकेच्या विमानांना खुले केले.

हे करताना त्यांनी नेहरुंना हे न कळवण्याचा धोका पत्करला. इथूनच पुढे ‘सी. आय. ए.’शी आपले संबंध प्रस्थापित झाले. केनेडी सरकारच्या काळात आलेल्या शिष्टमंडळात बरेच ‘सी. आय. ए.’ अधिकारी सामील झाले आणि एकीकडे राजकीय चर्चा चालू असताना चीन्यांचे पेकाट मोडण्याची खलबते शिजू लागली.

याचाच एक भाग म्हणून ५,००० तिबेटी तरुणांना देहरादून येथे प्रशिक्षण देण्याचे ठरले तर काही तरुण अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेले.

तिबेटींना ही सगळी मदत वेळोवेळी पुरवताना भारतीय विमाने वापरून चालले नसते. याकामी मदतीला आला एक सच्चा भारतीय नेता तो म्हणजे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री “बिजू पटनायक”. या पेशाने माजी वैमानिक असलेल्या मुख्यमंत्र्याने बनावट विमान कंपनी स्थापन केली. तिचे नाव होते “कलिंग एयरवेज”.

या कंपनीच्या विमानाच्या माध्यमातून शस्त्रास्र पुरवठा करुन चीनच्या मागे “तिबेट’’ ही खरुज कायमची लावून देण्यात आली. या ‘सी. आय. ए.’बरोबरच्या चर्चेतून आणखी एक दल स्थापण्याचा निर्णय झाला ते दल म्हणजे “इंडो तिबेटन बोर्डर पोलिस” या दलात विशेषत: गिर्यारोहक सामील करण्यात आले.



एकीकडे हे सगळं चालू असताना चीन आपली पहिली अ*णु चाचणी घेण्यात मश्गुल होता. ‘सी. आय. ए.’ने यात बरीच विघ्नं आणली, परंतु अपेक्षित यश प्राप्त झाले नाही तेव्हा किमान या अ*णु चाचणीची प्रहार, प्रकार, संख्या जाणून घेणं महत्त्वाचं होतं भारत आणि अमेरिका या दोघांसाठी. ही अ*णुचाचणी होणार होती “लोप नॉर” येथे.

विमाने पाठवून, माणसे पेरून वगैरे मार्गांनी वरील माहिती गोळा करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर काय करावे या चिंतेत सर्वजण होते. अशाच वेळेस गप्पांच्या ओघात एका गिर्यारोहकाने एवरेस्टच्या शिखरावरून चीनचा तिबेट, सिंकियांग प्रदेश नजरेस पडतो असे सांगितले अणि मार्ग सापडला. हिमालयातील एखाद्या शिखरावर इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून टेलिमेट्रिक साधनाने “दोंग फेंग” या क्षेपणास्त्राचा वेग, इंधन, मर्यादा, निर्देशन प्रणाली आदींचा अंदाज कळू शकतो असे वायुदल प्रमुख कार्तीज लिमे यांना जाणवले. मग ते शिखर कोणते?

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

एवरेस्ट तर बाद झाले कारण तिथे वर्षभर पर्यटक असतात. दुसरं होतं ते “कांचनजुंगा” हेच नाव फायनल झालं. तोपर्यंत तिकडे पहिली अ*णुचाचणी घेण्यात चीनने यश मिळवलं. परंतु ही मोहीम बाद करण्यात आली नाही. या मोहिमेसाठी “कमांडर कोहली” यांना निवडण्यात आलं. ते आणि त्यांचे अकरा सहकारी अमेरिकेत पोहचले. तिथे खास बनवण्यात आलेलं SNAP या यंत्राविषयी माहिती देऊन ते कसं बसवायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

पुन्हा भारतात परतल्यावर त्यावेळेस स्वतंत्र देश असलेल्या सिक्कीममधील कांचनजुंगा हे शिखर राजकीय वादविवाद नको यामुळे बाद झालं आणि “नंदादेवी” शिखर फायनल झालं.

२३,७५० फुट उंचीच्या शिखरावर ५६ किलोचा सरंजाम वाहून नेऊन हे अवघड दिव्य पार पाडायला २४ सप्टेंबर १९६५ रोजी सुरवात झाली तिसरा पाडाव २१००० फुटावर असताना जिम नावाच्या परदेशी हेराने या SNAP यंत्राशी खेळायला सुरवात केली.

हे यंत्र म्हणजे एक प्रकारची अ*णुभट्टीच असते, ज्यात प्लुटोनीयम असते. या प्लुटोनियममुळेच हे यंत्र सतत २ वर्षे चालू रहाणार होते. इकडे हे लोक शेवटच्या टप्प्यापासून ८५५ फुटावर असताना निसर्गाने रौद्ररूप धारण केलं. इकडे हिमवर्षाव सुरु, दुसरीकडे एकाच्या मुर्खपणामुळे अ*णुभट्टी सुरु आणि मुक्काम वाढल्यामुळे अन्न पदार्थ संपायला लागले, अशा अवस्थेत ती अ*णुभट्टी तिथेच लपवून ही टिम निराश मनाने माघारी परतली ती पुन्हा येण्याचा निश्चय करुन.

माघारी आल्यावर अपयशाची उलटतपासणी झाली. या चर्चेतून “नंदाकोट” हे कमी उंचीचं शिखरही चालू शकेल हे बाहेर आलं आणि पुन्हा एक टिम लपवून ठेवलेली अ*णुभट्टी शोधायला पाठवली गेली. शेर्पांच्या या टिमला तिथे फक्त अस्ताव्यस्त झालेली वस्तू सापडल्या पण SNAP यंत्राचा पत्ता नव्हता. हिम प्रपातामुळे हे घडले होते. परंतु हे प्लुटोनियम हिमनदीमुळे गंगेत मिसळले आणि कलकत्त्यातील लाखो लोकांचा जीव धोक्यात आलेला होता.

अत्यंत गुप्ततेने शोध मोहिमेसाठी लाखो करोडो रुपये खर्चून देखील ते SNAP यंत्र सापडले नाही. नंदादेवी शिखर खाजगी पर्यटनासाठी बंद करण्यात आलं. नंदाकोटच्या शिखरापर्यंत दुसरं SNAP यंत्र पोहचवण्यासाठी कमांडर कोहलींना ३० मे १९६६ उजाडला.

१९६७ च्या जून महिन्यात चीनने घेतलेल्या हायड्रोजन बॉ*म्बच्या चाचणीच्या वेळी मात्र चीनी गुपित भारतीय लष्करी कार्यालयात वेळेवर अचूक पोहचलं होतं, ते फक्त वरील मोहिमेत सहभागी असणाऱ्या कमांडर कोहली आणि त्यांचे सहकारी हरीश रावत, सोनम वाग्याल सोनम ग्यात्सो, थोन्दुप, पेद्रो त्रिपाठी, गुरुचरण भंगु ही गिर्यारोहक गुप्तहेर टीम, आणि इतर लोक म्हणजे भोलानाथ मलिक, बिजू पटनायक, आणि भारतीय सुपर स्पाय रामेश्वरनाथ कावो !


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Indian SpyIntelligence BureauJawaharlal Nehru
ShareTweet
Previous Post

दरोडेखोरांच्या एका टोळीने सरकारला ‘ईंटेलिजन्स ब्युरो’ ची स्थापना करण्यास भाग पडले होते

Next Post

सरपंच पदाची निवडणूक हरलेला उमेदवार ते सरपंच पदामुळेच पद्मश्री मिळालेलं व्यक्तिमत्व

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

सरपंच पदाची निवडणूक हरलेला उमेदवार ते सरपंच पदामुळेच पद्मश्री मिळालेलं व्यक्तिमत्व

इस्पीकचा राजा - बदामची राणी : पत्त्यांच्या खेळात हे राजा, राणी, गुलाम कुठून आले?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.