The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

by द पोस्टमन टीम
6 April 2021
in मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home मनोरंजन

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

मुकेश अंबानी म्हणजे फोर्ब्जच्या यादीतील एक अतिश्रीमंत भारतीय व्यक्ती! अंबानींना कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर तिची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाचीच असणार. अब्जावधीची उलाढाल करणारे मुकेश अंबानीना महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये रॉल्स रॉईस, लुंबरगिनी, बेंटली अशा कितीतरी महागड्या गाड्यांचा ताफा आहे. तुम्हाला माहिती आहे का अंबानींच्या या मोठमोठ्या गाड्यांच्या ताफ्यात टेस्ला मॉडेल एस 100डी, ही टेस्लाची ई-कारदेखील आहे.

विशेष म्हणजे अंबानींकडे असणारी ही ई-कार सेकंड हँड आहे. याची किंमत ऐकूनच तुमचे डोळे विस्फारतील. अंबानींनी घेतलेल्या या सेकंड हँड गाडीची किंमत आहे, दीड कोटी रुपये.

तुम्ही ऑनलाईन सर्च केले तरी तुम्हाला आढळेल की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावावर टेस्ला मॉडेल एस 100डीची नोंदणी केलेली आहे, पण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे त्या गाडीचे दुसरे मालक आहेत. तिचे या आधीचे मालक कोणी तरी दुसरे आहेत.

पण, हे कसं शक्य आहे? अंबानींना सेकंड हँड गाडी घेण्याची काय गरज? तेही एवढी मोठी किंमत मोजून? त्यांनी का अशी गाडी घेतली असेल, कुणाकडून घेतली असेल? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच. तर, आम्ही तुम्हाला सांगतो हे कसं शक्य आहे ते. अंबानींनी ही कार स्वतःच्या खाजगी वापरासाठी आयात केली आहे.

कुठलीही कार जेव्हा अशाप्रकारे खाजगी वापरासाठी आयात केली जाते तेव्हा ती आधी ज्या कंपनीने आयात केली आहे त्या कंपनीच्या नावावर रजिस्टर केली जाते. त्यानंतर ती मूळ मालकाकडे हस्तांतरित केली जाते आणि मग मूळ मालकाच्या नावे तिचे रजिस्ट्रेशन केले जाते.

समजा जर तुम्ही वैयक्तिक वापरासाठी एखादी कार आयात करणार असाल, म्हणजे परदेशातून मागवणार असाल तर त्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तेव्हाच ती गाडी तुमच्या नावावर आयात केली जाते. यासाठी खूप धावपळ करावी लागते. पण, या प्रक्रियेत तुमचा पैसा वाचतो. अर्थात जर तुमच्याकडे ही सगळी धावाधाव करण्यास वेळ नसेल तर तुम्ही यासाठी एखादा एजंट नेमू शकता. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला हवी ती गाडी आयात करवून घेतात आणि नंतर तुमच्या नावावर हस्तांतरित करतात. यासाठी ते तुमच्याकडून थोडेफार शुल्क देखील आकारतात. मात्र आलेली गाडी आधी कंपनीच्या नावावर रजिस्टर होते आणि मग कंपनी ती गाडी आपल्याकडे हस्तांतरित करते.

म्हणजे पहिली मालक ती कंपनी आणि दुसरे मालक तुम्ही. अशा तऱ्हेने ही नवी गाडीही सेकंड हँडच ठरते. भारतात तरी वैयक्तिकरित्या कार आयात करताना जास्तीतजास्त वेळा हाच मार्ग अवलंबला जातो.

मुकेश अंबानींच्या मागचा व्याप बघता त्यांना तर एवढी सगळी पूर्तता करण्यासाठी वेळ घालवण्यात काही रस नसणार. म्हणूनच त्यांनी गाडी आयात करण्याची प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या कंपनीमार्फत ही कार आयात करवून घेतली आणि नंतर तिचे हस्तांतरण स्वतःकडे करवून घेतले. या कंपन्या ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास थोडीफार फी आकारतातच. एकदा त्यांची फी दिली की सगळी किचकट प्रक्रिया सोपी होऊन जाते.

हे देखील वाचा

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

मॅक-लारेनसारख्या गाड्या ज्या भारत सरकार आयात करत नाही त्या खरेदी करताना ग्राहकांना हीच पद्धत अवलंबवावी लागते. खरे मालक हे मात्र कागदपत्रावर सेकंड हँड मालकच राहतात. मग हे मालक जेव्हा ही गाडी दुसऱ्याला विकायला काढतात तेव्हा मात्र या गाड्यांची किंमत खूपच कमी करून मागितली जाते. पण, अतिमहागड्या गाड्यांच्या बाबतीत सहसा असा गोंधळ होत नाही.

अंबानींच्या ताफ्यात नव्याने जमा झालेली टेस्ला मॉडेल एस 100डी ही गाडी अतिशय दमदार आहे. याचे फीचर्सही खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या गाडीची चाके खूपच मजबूत आहेत. इलेक्ट्रिक मोटार असलेली ही कार ४२३ पीएस पॉवर आणि ६६० एनएम जनरेट करते. फक्त ४.३ सेकंदात ही गाडी १०० किमी/तास इतका वेग पकडू शकते. यासाठी या गाडीला फक्त एकदा चार्ज करण्याची गरज आहे. एकदा केलेल्या चार्जिंगवरच ही गाडी इतके ॲव्हरेज देऊ शकते.

या गाडीची बॅटरीदेखील खूपच पॉवरफुल आहे. १०० किलोवॅट क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जरने चार्ज केल्यास फक्त ४२ मिनिटांत फुल चार्ज होते. या गाडीही लांबी ४.९७८ मीटर, तर रुंदी २.१९ मीटर आहे. याची चाके २.९ मीटर रुंद आहेत. मजबूत चाकांमुळे या गाडीला वेग खूप आहे.

अमेरिकन बाजारपेठेनुसार या कारची किंमत आहे, ९९,९९०$. भारतीय रुपयामध्ये ही रक्कम परावर्तीत करायचे झाल्यास या गाडीची किंमत ७३ लाखाच्या आसपास जाईल. भारतात आयात केल्यानंतर, त्याचा आयात कर द्यावा लागतो, जो १००% पेक्षा जास्त आहे. कराची रक्कम पकडून या गाडीची किंमत होते १.५ कोटी रुपये. तरीही यात रजिस्ट्रेशनसाठी लागणारी फी आणि गाडीच्या विम्याची रक्कम समाविष्ट करण्यात आलेली नाही.

टेस्लाचे हे मॉडेल इलेक्ट्रॉनिक असल्याने या गाडीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जास्तीची रक्कम खर्च करावी लागत नाही. सरकारने अलीकडच्या काळात तसा नियमच बनवला आहे. इलेक्ट्रॉनिक गाड्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने त्याचे रजिस्ट्रेशन शुल्क पूर्णतः माफ केले आहे.

ADVERTISEMENT

मुकेश अंबानींना वेगवेगळ्या गाड्या वापरण्याची आवड आहे. इलेक्ट्रॉनिक गाड्यांमुळे प्रदूषणाची समस्याही आटोक्यात येते. त्यांना सेकंड हँड गाडी घेण्याची तशी गरज नाही, पण आयातीचे कायदेशीर नियम आणि त्यासाठी करावी लागणारी कागद पात्रांची पूर्तता या बाबी खूपच किचकट असल्याने त्यांनी हा मार्ग निवडला.

तर मुकेश अंबानींनी सेकंड हँड गाडी का विकत घेतली असेल याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले असेलच!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

Next Post

आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोल नेमकं काम कसं करतं..? त्यांना काय टार्गेट असतं..?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती
इतिहास

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !
इतिहास

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

8 April 2021
या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत
इतिहास

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

7 April 2021
‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !
मनोरंजन

‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

5 April 2021
या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !
मनोरंजन

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

5 April 2021
एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !
मनोरंजन

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

3 April 2021
Next Post
आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोल नेमकं काम कसं करतं..? त्यांना काय टार्गेट असतं..?

आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोल नेमकं काम कसं करतं..? त्यांना काय टार्गेट असतं..?

कोहिनूर सोडा, ही आहे भारतातून चोरून जगभरातील संग्रहालयात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी

कोहिनूर सोडा, ही आहे भारतातून चोरून जगभरातील संग्रहालयात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

8 March 2021
मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

26 March 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

10 April 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!