आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
आजवर इतिहासात जेव्हा जेव्हा क्रांती झाली आहे, तिचा उद्देश हा बदल घडवणे हाच राहिला आहे. १७८९ साली फ्रान्समधील एका जनभावनेचे रूपांतर क्रांतीत झाले होते. १७९९ सालापर्यंत हा क्रांतीचा काळ सुरु होता. या काळात फ्रान्समध्ये असंख्य बदल घडले. फ्रान्ससाठी हा काळ संक्रमणाचा होता. राजेशाही, कुळाचार आणि चर्च यांची सत्ता यावेळी उ*ध्वस्त करण्यात आली होती. पण हा विजय इतका सोपा नव्हता. यासाठी हजारो फ्रेंच नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. क्रांतीदरम्यान असंख्य लोकांनी स्वतःला राष्ट्रासाठी अर्पण केले होते.
रॉबेस्पियर हा देखील त्या लोकांपैकीच एक होता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या या आंदोलनकारी वकिलाच्या कारकिर्दीवर नजर टाकूया..
रॉबेस्पियरचा जन्म फ्रान्सच्या आरास येथे १७५८ साली झाला. तो ६ वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या आईचे निधन झाले. काही वर्षांनी त्याच्या वडिलांचे देखील निधन झाले. त्याच्या आजी-आजोबांनी त्याचा सांभाळ केला. तो लहानपणासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता.
१७८१ साली कायद्याचे शिक्षण पूर्ण करून तो वकील बनला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी मिळाली आणि लवकरच तो एक निष्णात वकील म्हणून सर्वदूर प्रसिद्ध झाला.
त्याने कायमच सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उठवला होता, यामुळेच त्याच्यासाठी राजकारणाचे दरवाजे उघडले. राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि त्याच्या उल्लेखनीय कार्यामुळे वयाच्या ३०व्या वर्षीच त्याची विधिमंडळाच्या इस्टेट जनरलपदी नेमणूक करण्यात आली.
इथे त्याला स्वतःला प्रस्थापित करण्याची उत्तम संधी मिळाली. त्याने या पदाचा वापर करत फ्रेंच राजेशाहीवर ह*ल्ले करण्यास सुरुवात केली. त्याला लोकशाही आणायची होती. यासाठी त्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकशाहीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. राजेशाहीने पिचलेल्या समाजासाठी तो एखाद्या देवदूतापेक्षा कमी नव्हता
रॉबेस्पियरने मृत्युदंड आणि गुलामगिरीच्या प्रथांचा तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. तो लोकांचे हित साधू पाहत होता. पुढे त्याला फ्रान्सच्या राष्ट्रीय संविधान सभा आणि जॅकेबीन राजकीय गटात अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली.
१७९२ साली गिरोडीवाडी नेत्यांनी विधानसभेत फ्रान्सवर आक्र*मण करण्याची घोषणा केली. रॉबेस्पियरने याचा कडाडून विरोध केला. त्याच्यानुसार हे यु*द्ध सामान्य नागरिकांच्या हितसंबंधांच्या विरोधात होते. यामुळे फ्रान्सचे मोठे नुकसान होऊ शकते. हा आपल्या क्रांतीच्या आदर्शांचा प्रसार करण्याचा योग्य मार्ग नसल्याचे म्हटले होते.
तो म्हणाला की सशस्त्र मिशनरींचा जगात अपमान करण्यात येतो.
फ्रान्सच्या संविधान निर्मितीत रॉबेस्पियरने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने यात मानवाधिकार व त्यांच्या जतनावर विशेष लक्ष दिले होते. तो फ्रान्समध्ये रिपब्लिक ऑफ व्हर्च्यू स्थापन करू इच्छित होता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी सोळाव्या लुईला त्याने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
राजेशाहीच्या पतनानंतर फ्रेंच क्रांतिकारी नेत्यांवर अराजकाला दाबण्यासाठी स्थिर सरकार देण्याची जबाबदारी होती. यानुसार १७९३ साली एका कन्व्हेन्शननुसार जेकोबिन्सच्या क्रांतिकारी ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली. यासाठी ९ सदस्यांच्या टीमची नेमणूक करण्यात आली होती. रॉबेस्पियर या समितीचा सदस्य होता. सामान्य सुरक्षा समितीने अंतर्गत पोलीस प्रबंधनाचे कार्य केले. हा असा काळ होता ज्यावेळी सर्वत्र द*हश*तीचे राज्य होते. जे सरकार आणि क्रांतीच्या विरोधात होते त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येत होती.
यातच रॉबेस्पिअरच्या समितीने हेबर्टीस्ट पार्टीचा सर्वनाश करण्याचे ठरवले. या अंतर्गत त्यांनी मोठी कारवाई केली. या संघर्षात ३ लाख शत्रूंना अटक करण्यात आली. १७ हजारापेक्षा जास्त ठार लोकांना मारण्यात आले. रक्तपाताच्या तांडवात रॉबेस्पिअरने आपल्या अनेक शत्रूंना संपवले. ज्यावेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले तो म्हणला की त्याचा आणि समितीचा निर्णय अगदी योग्य आहे.
तो म्हणाला की द*हश*तीशिवाय सद्गुण दुर्गुण आहे आणि सद्गुणांशिवाय द*हश*त दुर्गुण आहे. त्याचा हा तर्क पुढे त्याच्यावरच उलटला.
काही काळाने लोकांनी त्याच्या शासनावर प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यास सुरुवात केली. रॉबेस्पिअर आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात नवीन संघटना आकारास येऊ लागल्या. शेवटी रॉबेस्पियर आणि त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
पण रॉबेस्पिअर जेलरच्या मदतीने तिथून निसटला आणि पॅरिस सिटी हॉलमध्ये जाऊन लपला. पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने आत्मह*त्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. काही काळाने त्याने राष्ट्रीय कन्व्हेन्शनच्या सैनिकांवर ह*ल्ला केला आणि पुन्हा पकडण्यात आले.
बघायला गेलं तर रॉबेस्पिअर हा हिं*सक नव्हता. तो फ्रेंच राज्यक्रांतीच्या काही महत्वपूर्ण नेत्यांपैकी एक आहे. पण त्याने हिं*सेचा मार्ग अवलंबला आणि हेच त्याला महागात पडले. तो आपल्या विरोधकांना संपवण्यात यशस्वी ठरला होता. पण स्वतःला वाचवू शकला नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.