The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

by द पोस्टमन टीम
5 April 2021
in इतिहास
Reading Time:1min read
0
Home इतिहास

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्तीही आपल्यातील हुशारी, धाडस आणि चातुर्याच्या जोरावर खूप मोठी झेप घेऊ शकतो, हे आपण आजवर अनेक उदाहरणातून पाहिलं आहे, वाचलं आहे, ऐकलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असाच एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ब्रिटिशांसाठी गुप्तहेराचे काम करत होता. सुरुवातीला त्याने जेंव्हा ब्रिटीश अधिकाऱ्याकडे या कामासाठी चौकशी केली तेंव्हा वारंवार त्याला नकार देण्यात आला. पण म्हणतात ना, “जब सिधी उंगली से घी ना निकले, तो उंगली टेढी करनी पडती हैं,” त्याने असंच काहीसं केलं. नंतर खुद्द ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला शोधून आपल्या गुप्तहेर खात्याचा डबल एजंट बनवला.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेराचे काम करणाऱ्या गार्बो या गुप्तहेराची ही रसभरीत कहाणी वाचल्यानंतर तुम्हीही आश्चर्याने थक्क व्हाल.

त्याचा जन्म १९१२ मध्ये एका स्पॅनिश कुटुंबात झाला. वयाच्या १६व्या वर्षी त्याने शाळा सोडली आणि हाताला मिळेल ते काम करू लागला. अनेक व्यवसाय करून पहिले पण त्याला कशातच यश मिळाले नाही. शेवटी गृहयुद्धाच्या काळात सक्ती करण्यात आल्याने तो स्पॅनिश सैन्यात भरती झाला. एकीकडे हुकुमशाही राजवट आणि दुसरीकडे कम्युनिस्ट राजवट या दोन्हीतील फोलपणा लक्षात आल्याने काही काळ तो अगदी निराश झाला होता.

दुसरे महायुद्ध सुरु झाले तेंव्हा त्याने ठरवले की आपण ब्रिटिशांना मदत करायची. तीन वेळा तो ब्रिटनला गेला आणि आपण ब्रिटनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले पण, प्रत्येकवेळा त्याला नकार देण्यात आला. दरवेळी नकार ऐकून त्याने एक वेगळीच शक्कल लढवली.

त्याने आपण एक नाझी-समर्थक असल्याची वेगळी ओळख आणि त्यासाठी वेगवेगळे पुरावे तयार केले. आवश्यक त्या कागदपत्रांसह तो जर्मनीमधे पोहोचला. जर्मन अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्याने आपण जर्मनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.

त्याने सादर केलेल्या सर्व कागदपात्रांची तपासणी केल्यानंतर जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला जर्मनसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची परवानगी दिली. त्याला आवश्यक ते सगळे प्रशिक्षणही जर्मनीत दिले गेले. शिवाय, त्याला पैसे आणि इतर आवश्यक त्या सुविधाही पुरवण्यात आल्या. त्याने स्वतःसाठी ॲलरिक हे सांकेतिक नाव घेतले.

इंग्लंडमध्ये जाऊन तिथे इंग्लंडची गुप्त माहिती काढून देणाऱ्या एजंटची साखळी बनवण्याचे त्याला आदेश देण्यात आले. खरे तर त्याला जर्मनीसाठी काम कारायचे नव्हतेच. ती त्याची फक्त एक खेळी होती. तो इंग्लंडला न जाता पोर्तुगालला गेला. तिथल्या पेपरमधून, रेडीओवरून सांगण्यात येणाऱ्या बातम्यांतून तो जर्मनीला इंग्लंडबद्दल काही ना काही माहिती देऊ लागला.

हे देखील वाचा

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

त्यामुळे त्यांचाही याच्यावर विश्वास बसला. त्यांना वाटले की हा खरोखरच इंग्लंडमध्ये आहे आणि हा इंग्लंडच्या खऱ्याखुऱ्या बातम्या आपल्याला पुरवत आहे. इकडे इंग्लंडलाही अशी माहिती मिळाली की कोणीतरी तोतया जर्मन गुप्तहेर बनून इंग्लंडविषयी जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत आहे. पण त्यांना नेमक्या व्यक्तीचा शोध लागत नव्हता.

त्याने आपण इंग्लंडमध्ये एजंटचे जाळे निर्माण केल्याचा आभासही जर्मनी सैन्याला करवून दिला होता. विशेष म्हणजे रेल्वेतून येणाऱ्या वर्तमानपत्रातून त्याला इंग्लडबद्दल जी काही माहिती मिळेल त्यावरच त्याच्या या सगळ्या खोट्या नाटकाचा डोलारा उभा होता.

शेवटी, १९४२च्या सुरुवातीला तो लिस्बनमधील अमेरिकेच्या लष्करी कार्यालयाला भेट देण्यासाठी गेला. अमेरिकेचे नौदल अधिकारी पॅट्रिक डिमॉरेस्ट यांनी त्याला भेटताक्षणीच त्याची क्षमता ओळखली. त्याने केलेल्या सगळ्या कामाची माहिती घेतली आणि त्यांनी ब्रिटिशांना त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली. यामुळे ब्रिटीश नेमके ज्याला शोधत होते त्या व्यक्तीबद्दल त्यांनाही माहिती मिळाली. त्यांना या जर्मनी गुप्तहेराचा शोध लागताच तातडीने त्याला ब्रिटनला बोलावून घेतले आणि त्याच्या या भन्नाट योजनेबद्दल त्याचे कौतुक केले. शिवाय, त्याचे ॲलरिक हे जर्मन नाव बदलून त्याचे पुन्हा एकदा नवे नामकरण करण्यात आले. त्याला बोव्रील असे नवे नाव मिळाले.

ज्यासाठी त्याने इतके सगळे नाटक रचले आणि इतकी जोखीम पत्करली ते काम आता यशस्वी झाले होते. त्याच्या इच्छेनुसार त्याला ब्रिटीश सैन्यात गुप्तहेराचे काम मिळाले होते. नुसते गुप्तहेर नाही तर तो आता ब्रिटीशांसाठी डबल एजंटचे काम करणार होता. 

त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटले की त्याच्यातील उत्तम अभिनय क्षमतेला योग्य ठरेल असे काही तरी वेगळे नाव त्याला दिले पाहिजे. शेवटी सुप्रसिद्ध अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिच्या नावावरून त्याला गार्बो हे नाव देण्यात आले.

ब्रिटनमध्ये राहूनच तो जर्मन सैन्याला ब्रिटनबद्दल चुकीची माहिती पुरवत राहिला. त्याने उभे केलेली तोतया गुप्तहेरांची एजन्सी इतकी किचकट होती की जर्मनीला देखील त्याच्या मदतीसाठी आणखी एखादा अधिकारी पाठवण्याची गरज वाटली नाही. त्याने जर्मन अधिकाऱ्यांचाही पूर्ण विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याच्या या आभासी गुप्तहेर एजन्सीचे कामही सुरळीतपणे चालत राहिले. १९४४ साली त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात संपूर्ण युद्धाला कलाटणी देणारे काम केले.

१९४४ साली जर्मनीला एका मोठ्या हल्ल्याची बातमी लागली. आणि त्यांनी गार्बोला म्हणजेच जर्मनीचा ॲलरिक या हल्ल्याची सगळी माहिती पुरवण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गार्बोने या हल्ल्याची चुकीची माहिती देणारे ५०० संदेश जर्मनीला पाठवले. इतकी सारी चुकीची माहिती सातत्याने भरावाल्याने जर्मनीलाही त्यावर विश्वास बसला. याला त्याने ऑपरेशन फोर्टीट्युड असे नाव दिले.

त्याने जर्मनीला अशी माहिती दिली की हा हल्ला स्ट्रेट ऑफ डोव्हर येथे होणार आहे. या सगळ्या माहितीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याने नॉर्मंडी येथे झालेल्या जुन्या हल्ल्याची माहिती दिली. जर्मन सैन्य त्याच्या माहितीवरच विसंबून राहिले. त्याने जर्मनीला असे भासवले की त्याने दिलेला अहवाल वेगवेगळ्या गुप्तहेरांच्या माहितीवर आधारलेला आहे.

त्याने जर्मनीला फ्रांसमधील कॅले येथे होणाऱ्या हल्ल्याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

इथे अमेरिकेचे तोतया सैनिक जर्मनशी भिडले जर्मन सैन्याला कळले देखील नाही की हे खरे सैनिक नाहीत. त्यांना वाटले की त्यांची सरशी झाली. यामुळे त्यांना खरा हल्ला परतवून लावण्यास वेळच मिळाला नाही.

पण जेंव्हा युद्ध संपले तेंव्हा जर्मन आणि ब्रिटीश दोन्ही सैन्यांनी गार्बोचे कौतुक केले. संपूर्ण युद्धात गार्बो एकटाच असा असेल ज्याचे दोन्हीकडूनही कौतुक झाले. परंतु जेंव्हा युद्ध संपले तेंव्हा नाझी सैनिकांच्या भीतीने तो परागंदा झाला आणि त्याने आपल्याच मृत्यूची खोटी अफवा पसरवली.

शेवटी रुपर्ट ॲलसन या एका ब्रिटीश लेखकाला अशी शंका आली की गाब्रो मेलेला नाही, तो जिवंत आहे. त्याने गार्बोचा शोध घेण्यास सुरुवात केली. १९८० मध्ये गार्बोची खरी ओळख पटली. त्याचे खरे नाव होते जुआन पुजोल गार्सिया. व्हेनेझुएलातील एका खेड्यात तो स्वतःचे छोटेसे पुस्तकाचे दुकान आणि गिफ्ट शॉपी चालवत होता. १९८८ साली व्हेनेझुएलाच्या कॅराकस या ठिकाणी त्याचे निधन झाले.

गार्बोच्या धाडसाची ही कथा वाचल्यानंतर खरोखरच आवाक व्हायला होते. युद्ध संपेपर्यंत तो जर्मन सैन्याला गुंगारा देत राहिला. त्याच्या साहसाचे आणि बुद्धीमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

Next Post

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती
इतिहास

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं
इतिहास

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय
इतिहास

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
या मुस्लिम योद्ध्याने ख्रिश्चनांकडून जेरुसलेम ताब्यात घेतले होते, पण…
इतिहास

या मुस्लिम योद्ध्याने ख्रिश्चनांकडून जेरुसलेम ताब्यात घेतले होते, पण…

10 April 2021
उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय..? त्यांना ही नावं कशी पडली? जाणून घ्या!
इतिहास

उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय..? त्यांना ही नावं कशी पडली? जाणून घ्या!

9 April 2021
शून्य फक्त गणितातच नाही तर भारतीय संस्कृतीतसुद्धा महत्त्वाचा आहे..!
इतिहास

शून्य फक्त गणितातच नाही तर भारतीय संस्कृतीतसुद्धा महत्त्वाचा आहे..!

9 April 2021
Next Post
अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

'एलोन मस्क'पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

8 March 2021
मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

26 March 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

10 April 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!