The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

हा ब्रिटीश अधिकारी युद्धात “अनकिलेबल सोल्जर” म्हणून ओळखला जायचा

by द पोस्टमन टीम
10 December 2020
in इतिहास
Reading Time:1min read
0
Home इतिहास

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

युद्ध म्हटले की त्याच्यातून अनेक पराक्रमाच्या गाथा जन्म घेतातच. पराक्रमी वीर पुरुषांच्या साहसाच्या आणि बलिदानाच्या या कथा ऐकून आपल्यात वीरश्री संचारते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पराक्रमी योद्ध्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्याने आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष युद्धभूमीवर अनेकदा जवळून मृत्यूचे दर्शन घेतले. जो अनेकदा मृत्युच्या दाढेतून सुखरूप परत आला. त्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि स्फूर्ती पाहून कित्येकांना आयुष्यातील समस्या म्हणजे निव्वळ क्षुल्लक तक्रारी वाटतील. अशा प्रसंगाशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळेल. त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या अडचणी आणि त्यावर त्याने जिद्दीने केलेली मात याची ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हालाही तुमच्या अडचणी म्हणजे, ‘किस झाड की पत्ती’ असे वाटेल.

लेफ्टनंट जनरल एड्रियन कार्टन डी वायर्ट यांच्या आयुष्यातील या प्रसंगावर कुणाचाही अजिबात विश्वास बसणार नाही. एड्रियन असे सैनिक होते ज्यांनी अनेकदा प्रत्यक्षात मृत्यूशी झुंज दिली. परंतु शत्रूच्या गोळीने त्यांचा मृत्यू व्हावा हे कदाचित नियतीलाच मंजूर नव्हते. एड्रियन यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि विजीगिषु वृत्तीनेच ते अमर झाले. जाणून घेऊया सर एड्रियन कार्टन डी वायर्ट यांची ही असामान्य शौर्य गाथा.

बेल्जियमच्या ब्रसेल्समधील एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात ५ मे १८८० रोजी त्यांचा जन्म झाला. एड्रीयन ६ वर्षांचे असतानाच त्यांची आई त्यांना सोडून कायमची निघून गेली. आपल्या वडिलांसोबत ते इजिप्तची राजधानी कैरो येथे राहू लागले. एड्रियन यांनी इजिप्तमध्ये अरबी भाषेचा अभ्यास सुरु केला.

त्यांना पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंड येथील कॅथोलिक बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. प्राथमिक शिक्षण बोर्डिंग स्कूलमधूनच पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी ऑक्सफर्डमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु एड्रियन यांना तर युद्धज्वराने पछाडले होते. म्हणून शिक्षण अर्धवट सोडूनच त्यांनी ब्रिटीश सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. घरातून तर त्यांना कधीच याची परवानगी मिळाली नसती, त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना कसलीही कल्पना न देता कॉलेजचे शिक्षण सोडून दिले आणि ते ब्रिटीश सैन्यात भरती होण्यास पोहोचले.

त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व नव्हते न त्यांचे वय सैन्यात भरती होण्यासाठी अनुकूल होते. सैन्यात भरती होण्यासाठी तर वयाची २५ वर्षे पूर्ण असावी अशी अट असूनही त्यांनी २०व्या वर्षीच सैन्यात प्रवेश केला.

यासाठी त्यांनी चक्क आपले वय वाढवून घेतले. ब्रिटीश नागरिकत्व नसताना त्यांनी नागरिकत्वाबाबतही खोटीच माहिती सादर केली.

एकदा सैन्यात भारती झाल्यावर त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. युद्धात सहभागी होण्याच्या कल्पनेनेच त्यांच्यात जोश संचारला होता. युद्ध भूमीतही ते अत्यंत त्वेषाने लढत होते. पण, शत्रूच्या बंदुकांनी त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना पोटावर गोळ्या लागल्या होत्या आणि त्यांची अवस्था अगदीच गंभीर बनली होती. ज्या त्वेषाने ते शत्रूशी लढत होते, त्याच त्वेषाने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आणि त्यांनी चक्क मृत्यूलाही शह दिला. या गंभीर अवस्थेतून ते बचावले होते. पण, त्यांना पुन्हा युद्ध भूमीवर जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांना इंग्लंडमध्ये परत पाठवण्यात आले आणि तिथूनच सैन्याची सेवा करण्याचे आदेश देण्यात आले.

हे देखील वाचा

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

१९०१ साली ते रॉयल ड्रॅगन गार्डसचे लेफ्टनंट बनले होते. १९१० साली त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. १९१३ साली त्यांना ब्रिटीश नागरिकत्वही देण्यात आले. यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना दोन कन्यारत्नांची प्राप्ती झाली.

१९१४ साली पहिले विश्वयुद्ध सुरु झाले तेंव्हा त्यांना सोमालियामध्ये कॅमल कोरसोबत नेमण्यात आले. इथल्या लढाईतही ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची तुकडी ज्या किल्ल्यात थांबली होती त्या किल्ल्यावर शत्रूने जोरदार हल्ला चढवला. सगळीकडून गोळ्यांचा तुफान मारा सुरु होता. यातच एड्रियन यांना पुन्हा गोळ्या लागल्या. यावेळी तर त्यांना गेल्या वेळीपेक्षाही गंभीर जखमा झाल्या. दोन गोळ्या त्यांच्या डोक्याजवळून चाटून गेल्या होत्या. यामुळे त्यांचा डावा डोळा आणि कान कायमचे निकामी झाले. याही अवस्थेतून ते पुन्हा एकदा सुखरूप बाहेर पडले.

एवढ्या गंभीर अवस्थेतून बाहेर आल्यानंतर आणि एक डोळा गमावल्यानंतरही एड्रियन यांच्यातील युद्धाविषयीचे आकर्षण जराही कमी झाले नव्हते. आपला डोळा कायमचा गेला याच्या दुखापेक्षा इंग्लंडने सोमालिया जिंकून घेतले याचा आनंद त्यांच्यासाठी कैक पटीने मोठा होता. या विजयाने त्यांच्यात पुन्हा एकदा वीररस संचारला आणि पुन्हा एकदा आपण युद्धभूमीवर जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. युद्धाने त्यांना दोनदा चक्क मृत्यूशी भेट घडवून आणली होती, तरीही त्यांचे युद्धप्रेम जराही कमी झाले नव्हते.

ते इंग्लंडला परतले. एक डोळा कायमचा काढला गेल्याने त्यांना चष्मा वापरण्याचे सुचवले होते. पण, एड्रियन चष्मा न लावता त्या काढलेल्या डोळ्याच्या ठिकाणी काळी पट्टी लावत असत. अगदी एखाद्या समुद्रीडाकू प्रमाणे. १९१५ साली पुन्हा एकदा ते युद्धभूमीवर जाण्यासाठी सज्ज झाले.

पहिल्या महायुद्धात ते सात वेळा जखमी झाले होते असे म्हंटले जाते. यात त्यांना डोके, पाय, गुडघा, हात आणि कानावर गोळी लागली होती. बंदुकीच्या गोळीमुळे त्यांचा एक हातही निकामी झाला. त्यांनी जितक्यावेळा मृत्यूशी पंगा घेतला तितक्या वेळा मृत्यूशी लढण्याचे धाडस क्वचितच कुणी दाखवले असेल. इतक्या वेळा त्यांना बंदुकीच्या गोळीने जखमी केले पण, त्यांचा जीव घेऊ शकेल अशी एकही गोळी शत्रूकडे नव्हती.

एकदा तर त्यांच्या हाताला अशी गंभीर जखम झाली होती की त्यांचा हात कधीच काम करू शकणार नव्हता. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की तो हात कायमचा काढून टाकावा. पण, डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तेंव्हा त्यांनी स्वतःहून तो हात काढला. या घटनेबद्दल यांनी ‘हॅप्पी ओडिसी’ या त्यांच्या आत्मकथेतही लिहिले आहे, “मी डॉक्टरांना विनंती केली की तो हात काढून टाका. पण, त्यांनी ऐकले नाही. मग मीच माझा हात ओढला आणि तो शरीरापासून अलग केला. असे करताना मला जराही वेदना झाल्या नाहीत.”

१९१६ साली त्यांना ‘विक्टोरिया क्रॉस’ या ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना इतक्या वेळा गोळ्या लागल्या होत्या, डोळा गमावला होता, कानाला गंभीर इजा झाली होती, इतकेच काय एक हातही गमवावा लागला, तरीही त्यांनी लिहिले आहे, “खरे सांगायचे तर, मी युद्धाचा आनंद घेतला, युद्धाने मला काही वाईट क्षण, वाईट अनुभव दिले. पण, त्याशिवाय काही चांगले आणि भरपूर उत्साहाचे आनंदाचे क्षणही दिले.”

ADVERTISEMENT

१९४१ साली त्यांना युगोस्लाव्हिया येथील ब्रिटीश सैन्याच्या एका खास अभियानासाठी पाठवले गेले. यावेळी त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले. हे विमान भूमध्य सागरी समुद्रात कोसळले. परंतु एड्रियन यातूनही बचावले. ते पोहत पोहत समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इथे त्यांना इटालियन सैन्याने ताब्यात घेतले. यावेळी एड्रियन ६० वर्षांचे होते. इटालियन सैन्याने त्यांना बंदी बनवून ठेवले होते. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह, उर्जा, लढण्याची उर्मी जराही कमी झाली नव्हती. या कैद्यांच्या कॅम्पमधून अनेकदा पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. शेवटी ब्रिटीश सरकारने एड्रियन यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना इंग्लंडला परत आणण्यात आले. यानंतरही काही काळ ते सैन्यातच होते. नंतर मात्र त्यांनी लष्करी सावेतून निवृत्ती पत्करली.

वयाच्या ८३ व्या वर्षी ५ जून १९६३ रोजी त्यांचे निधन झाले. एड्रियन यांचे अख्खे आयुष्य म्हणजे धाडस, उत्साह आणि सकारात्मकतेचे अद्भुत उदाहरण आहे. इतिहासात आजही ते अनकिलेबर सोल्जर म्हणून प्रसिद्ध आहेत. एक असा सैनिक ज्याला शत्रूच्या कुठल्याच गोळीमुळे मरण आले नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

Next Post

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
इतिहास

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

3 January 2021
इतिहास

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

3 January 2021
लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत
इतिहास

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

3 January 2021
इतिहास

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
Next Post
सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण...

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!