..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी या संस्थेची स्थापना ७ एप्रिल, १९४८ ला केली गेली. परंतु सध्या जगात माजलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल या संघटनेची सध्या जगभरात अवहेलना केली जात आहे. 

चीनबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या आरोप करत संघटनेचे अध्यक्ष असलेले ‘टेड्रोस ए घेब्रेयसस’ यांच्यावर जगभरातुन टीका केली जात आहे. कोरोनाच्या प्रसारात चीनचा हात होता ही बाब दाबुन टाकण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत केला जात आहे असा आरोप संघटनेच्या अध्यक्षांवर केला गेला आहे.

संघटनेचे अध्यक्ष ‘टेड्रोस ए घेब्रेयसस’ यांच्यावर त्यांचा संबंध दहशतवादी संघटनांशी आहे असाही आरोप करण्यात आला आहे. आज आपण याच आरोपांचा लेखाजोखा बघणार आहोत.

टेड्रोस हे एक कम्युनिस्ट नेते होते. ‘पॉलिटिकलाइट पोर्टल’ने टेड्रोस यांच्या जुन्या छायाचित्रांबरोबर छापलेल्या वृत्ताचे शिर्षक आहे- “जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष एक इथोपियन दहशतवादी आहेत”. या वृत्तानुसार टेड्रोस यांना ‘टिगरे पीपल्स लिबरेशन फ्रंट/आर्मीचे सदस्य म्हटले आहे आणि ते या संघटनेत असताना तिसरे महत्त्वपुर्ण अधिकारी होते असेही या वृत्तात नमुद केले आहे.

खरे तर या संघटनेला इथियोपियामध्ये राजकिय पक्ष म्हणून ओळखले जाते. परंतु, १९९० च्या दशकात अमेरिकेने या संघटनेस दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले होते. ‘द हिल’ वृत्तपत्राच्या आत्ताच आलेल्या वृत्तानुसार हा पक्ष काही संघर्षानंतर सत्तेत आला होता आणि नंतर ९०च्या दशकाच्या सुरवातीस या पक्षास वैश्विक दहशतद्यांच्या सुचीमध्ये टाकण्यात आले. या पक्षाशी असलेल्या संबंधामुळेच ‘टेड्रोस’ यांना दहशतवादी म्हणुन संबोधले जात आहे.

युध्दनिती बरोबरच भेदभाव आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन असे अनेक आरोप या संघटनेवर केले गेले. ‘पॉलिटिकलाइट’च्या मते या पक्षाच्या कारकीर्दीत आरोग्य मंत्री असलेल्या टेड्रोस यांच्या काळात अमहारा प्रजातीच्या लोकांचा जन्मदर अतिशय कमी झाला. त्याच बरोबर जनगणनेच्या वेळी याच प्रजातीच्या २० लाख लोकांना गायब करण्यात आले.

सन २००० आणि २०१० मध्ये इथियोपियामध्ये आलेल्या कॉलराच्या साथीच्या वेळीही टेड्रोस यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप लावला गेला पण तो त्यांनी फेटाळून लावला. तसेच विदेश मंत्री असताना एका ब्रिटिश नागरिकावर बळजबरी केल्याचा आरोप झाला होता. नक्षली हिंसेच्या बाबतीत ‘मानवाधिकार वॉच’ने इथियोपिया सरकारवर ४०० मृत्यू, ७० हजार आंदोलकांची अटक आणि १५ हजार लोकांच्या स्थलांतरासाठी जिम्मेदार धरले होते.

‘पॉलिटिकलाइट’ आणि ‘द हिल’ दोघांच्या वृत्तानुसार २०१७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर टेड्रोस यांनी झिंबाब्वेचा माजी हुकुमशहा ‘रॉबर्ट मुगाबे’ याला जागतिक आरोग्य संघटनेचा सदिच्छादुत म्हणुन निवडले. या नियुक्तीवरही वाद उद्भवले होते, ज्याचा परीणाम म्हणून ‘मुगाबे’ला पदावरुन हटविण्यात आले होते.

कोरोनाच्या जागतिक प्रसारात चीनची चूक नसल्याचे स्पष्टीकरण देऊन टेड्रोस यांनी चीनची पाठराखण केली आहे. इथियोपियामध्ये चीनच्या असलेल्या भरघोस गुंतवणूकीमुळे टेड्रोस चीनची पाठराखण करत आहेत असा अंदाज जगभर वर्तवला जात आहे. ‘द हिल’नेही या गोष्टीस दुजोरा दिला आहे.

चीनबाबत असणाऱ्या वादांबरोबरच अजुनही बरेचसे वाद जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत आज चालू आहेत. कोरोना विषाणू जगभरात पसरला असुन हजारो मृत्यू होत आहेत. कोरोना विषाणूला हाताळण्यात जागतिक आरोग्य संघटना पुर्णपणे निष्फळ ठरल्याचा आरोप संघटनेवर केला जात आहे. अमेरिकेच्या नेहमीच निशाण्यावर असलेले टेड्रोस आता बाकी संयुक्त राष्ट्र सदस्यांच्या नजरेतही आले आहेत.

टेड्रोस यांच्याबरोबरच संघटनेच्या भविष्यावरही आता टांगती तलवार आहे. कोरोना विषाणूमुळे टेड्रोस यांची कारकिर्द आता धोक्यात आली आहे एवढे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!