अलास्का अमेरिकेला विकण्याची घोडचूक रशियाला लक्षात आली पण तेव्हा उशीर झाला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगात प्रत्येक गोष्ट विकली जाते, फक्त त्यासाठी खरेदी करणारा असायला हवा!

आपण आजवर दोन देशात चालणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींच्या खरेदी-विक्रीविषयी ऐकलं असेल वाचलं असेल पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की एका देशाने दुसऱ्या देशाला आपला एक मोठा भाग विकलाय? एखाद्या देशाने आपला भूभाग दुसऱ्या देशाला विकणे हे ऐकायलाच फार विचित्र वाटतं ना? पण असं घडलंय एका देशाने दुसऱ्या देशाचा भूभाग एका मोठ्या रकमेच्या मोबदल्यात खरेदी केला आहे.

ज्याकाळी लोक एकमेकांच्या भूभागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युद्ध करायचे त्यावेळी अमेरिकेने रशियाकडून पैशाच्या मोबदल्यात अलास्का नावाचा मोठा भूभाग विकत घेतला होता.

हा भूभाग अमेरिकेने का विकत घेतला आणि दोन्ही देशात ही खरेदी विक्री कशी झाली, चला ते आपण जाणून घेऊया..

अलास्का हा अमेरिकेचा एक महत्वपूर्ण भाग आहे. जुनो हे शहर अलास्काची राजधानी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे. अलास्काचा बहुतांश प्रदेश हा हिमाच्छादित असतो, उरलेला भाग हा उंच चिनार वनांनी व्यापलेला आहे.

आज अमेरिकेचा अविभाज्य भाग असलेला अलास्का एकेकाळी रशियन साम्राज्याचा भाग होता. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला अलास्का हा रशियाचा भाग होता. अलास्कामध्ये रशियन साम्राज्याची सीमारेखा होती, पण अमेरिकेने मोठी रक्कम देऊन रशियाकडून अलास्काला विकत घेतलं. ३० मार्च १८६७ रोजी दोन्ही देशात अलास्काचा सौदा करण्यात आला होता. त्यानंतर तो अमेरिकेचा एक महत्वपूर्ण भाग बनला.

अनेक लोक म्हणतात की अमेरीकेने आक्रमण करून रशियाकडून अलास्का जिंकून घेतला होता, पण हे खरं नव्हतं. अलास्काचा खरेदी विक्रीची सौदेबाजी रशिया आणि अमेरिकेत झाली होती. तत्कालीन रशियन वृत्तपत्रात याचे वार्तांकन प्रसिद्ध करण्यात आले होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्या वस्तूला विकत घेतो आणि तिची विक्री करतो त्यावेळी तो त्या वस्तूपासून किती फायदा मिळेल याचा अनुमान लावतच असतो. हिमाच्छादित अलास्कामध्ये ते सर्वकाही होते ज्याची गरज आज मनुष्याला आहे. अगदी ज्यावेळी अलास्का रशियाच्या ताब्यात होता तेव्हा देखील त्याचा वापर व्यापारी तळ म्हणून केला जात होता.

आजही अलास्कामध्ये मोठ्या प्रमाणात चहा आणि कॉफीचे उत्पादन घेण्यात येते. अनेक रशियन लोक यामुळेच अलास्कात स्थायिक झाले होते, त्यांच्या अगोदर काही चिनी लोकांनी अलास्कात वस्ती निर्माण केली होती.

या चिनी लोकांनी तिथे चहाचे आणि कॉफीचे मळे उभारले, जे नंतर रशियन लोकांनी ताब्यात घेतले. अलास्कामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे, अनेक रशियन उद्योगपत्यांनी अंधपणे या खनिज संपत्तीचा वापर करण्यास सुरुवात केली. यायुन रशियाला मोठा महसूल मिळत होता.

अलास्काच्या डोंगररांगामध्ये पिकणारी प्रत्येक वनस्पती, औषधी यांची कोट्यवधी रुपयात विक्री व्हायची. इथल्या डोंगर दऱ्यातील केसर आणि रेशीम यांचा देखील मोठा व्यापार होता. आजही हा व्यापार अस्तित्वात आहे आणि येथे शेकडो कोटी डॉलर्सचे व्यवहार घडून येतात.

१८ व्या शतकात रशियन सरकारला उद्योगपती अलास्काच्या साधन संपत्तीच्या बळावर कोट्यवधी कमवत असल्याचा खुलासा लागला, मग त्यांनी या सर्वच उद्योगांवर कर आकारणी करण्यास सुरुवात केली. सरकारला टॅक्सच्या रुपात कोट्यवधी रुपये मिळू लागले याचे श्रेय होते, अलेक्झांडर बारानोव्हा या व्यक्तीचे, रशियन पिजारो या नावाने प्रसिद्ध असलेला बारानोव्हाने अलास्कात अनेक उद्योगांची आणि शाळांची उभारणी केली होती.

बारानोव्हाच्या रशियन-अमेरिकन उद्योगाला अलास्कातून अब्जावधीचा नफा होत होता. पण पुढे त्याला कारभार बघणं शक्य नव्हतं म्हणून त्याने राजीनामा दिला. अलेक्झांडर बारानोव्हा जोपर्यंत अलास्कात होता तोपर्यंत तिथे शांतता नांदत होती.

त्याच्या ताब्यात अलास्का होती तेव्हा अलास्कन मजुरांकडून मोठं मोठ्या कंपन्या सामान विकत घेत आणि तो मोठ्या किंमतीत बाजारपेठेत विक्री करत. अलास्का त्यावेळी फक्त व्यापारासाठी प्रसिद्ध होते पण बारानोव्हाच्या राजीनाम्यानंतर परिस्थिती बदलत गेली.

बारानोव्हा गेल्यानंतर तिथे रशियन नेव्हीचा प्रमुख हेगमिस्टर येऊन उभा राहिला जो अत्यंत मूर्ख आणि सैनिकी मेंदूचा माणूस होता. रशियन सरकारला अलास्कातुन मोठा फायदा मिळतो हे त्याला माहिती होते म्हणून त्याने तिथल्या व्यापारावर, उद्योगांवर कर आकाराला सुरुवात केली. कराचे प्रमाण इतके जास्त होते की अनेक व्यापारी मजूर – कामगारांना कमी वेतन देऊ लागले. अत्यंत कमी पैसे मिळतात म्हणून अनेकांनी काम करणे बंद केले. त्यावेळी रशियन सैन्याने तिथल्या नागरिकांवर जोर जबरदस्तीचा वापर करण्यास सुरुवात केली. रशियन सैन्य आणि हेगमिस्टरच्या जाचाला कंटाळून अनेकांनी अलास्कातुन पलायन केले. यामुळे रशियन सरकारला मिळणाऱ्या निधीत मोठी घट झाली. सैन्याचा वर्तणुकीवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली.

एकीकडे निधी न मिळाल्याने वैतागलेल्या रशियन सरकारसमोर क्रिमियन युद्धाने अजून मोठी समस्या निर्माण झाली. ब्रिटन, फ्रान्स आणि टर्की या देशांनी रशियाच्या विरोधात हत्यारं उपसली. त्यांनी रशियावर अलास्कामध्ये असलेले सैन्य मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अनेकांनी व्यापारी करार तोडण्याची भाषा केली.

ब्रिटनने तर अलास्का आणि ब्रिटन दरम्यानचा जलवाहतूक मार्गावर बंदी आणायची घोषणा केली. आता सर्वदूर असा दबाव निर्माण झाल्यामुळे अलास्काचा व्यापार ठप्प झाला. एकेकाळी उद्योगांची खाण असलेला हा प्रदेश रशियन सरकारसाठी पांढरा हत्ती बनला होता.

रशियन सैन्याने अलास्कात सैन्य तैनाती आणि नौदल उभारल्यामुळे अलास्काच्या सागरी सीमा लागून असलेल्या देशांचा रशियावर आक्रमण करण्याचा धोका निर्माण होईल, याची भीती तत्कालीन रशियन शासकांना होती. याचाच परिणाम म्हणून पांढरा हत्ती पाळण्यापेक्षा त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा या दृष्टीने रशियाने अलास्काला विकायला काढले. त्यावेळी भौगोलिकदृष्ट्या अलास्का फक्त अमेरिकेच्या जवळ होता. त्यामुळेच आधीपासून एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले अमेरिका आणि रशिया, एकत्र बसले आणि रशियाने अलास्का अमेरिकेला विकण्याचा निर्णय घेतला.

३० मार्च १८६७ रोजी ७२ लाख डॉलर्सला अलास्काचा सौदा करण्यात आला.

रशियन सरकारने परस्पर अमेरिकेला अलास्का विकला यामुळें तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारण्यास नकार दिला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अमेरिकेने रशियाकडून अलास्का ताब्यात घेतला आणि तिथे असंख्य प्रकल्प उभारले. तिथे सीमा रेखा अमेरिकेने आखली. नागरिकांचा नाईलाज झाला आणि त्यांना अलास्कात वास्तव्य करावे लागले.

भविष्यात रशियाला अलास्का अमेरिकेला विकण्याचा आपला निर्णय किती मूर्खपणाचा होता, हे कळून चुकले, पण तोवर खूप वेळ झाला होता. आज अमेरिकेने अलास्कामध्ये असंख्य प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने उभी केली आहेत. आज अलास्कात रशियाचा मागमूस देखील नाही, जे काही आहे ते फक्त नि फक्त अमेरिकन आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!