The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

by द पोस्टमन टीम
4 June 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगाच्या इतिहासात अनेक भल्या बुऱ्या घटना घडल्या आहेत. काही रहस्यमयी होत्या. विज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने मानवाने ती रहस्ये उलगडायचा प्रयत्न केला. काही ठिकाणी गुंता सुटला, काही ठिकाणी त्यात अपयश आले. काही रहस्ये रहस्येच राहिलीत, त्याचा कसलाही मागमूस लागू शकला नाही. का? कुणी? कशामुळे? असे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. असंच एक अनुत्तरीत राहिलेलं कोडं मेरी सिलेस्टी या जहाजाच्या बाबत.

बर्म्युडा ट्रँगल हा आजही अनेक रहस्ये पोटात घेऊन राहिलेला प्रदेश आहे. या भागात कित्येक जहाजे, विमाने गायब झालेली आहेत. त्याचं कारण आजही संशोधकांना सापडलेलं नाही. असंच एक आजवर कोडं बनून राहिलेलं एक रहस्य मेरी सिलेस्टी नावाचं जहाज. या जहाजाला भुताटकी झालेलं जहाज असं म्हणतात. काय आहे या भुताटकीच्या जहाजाची कहाणी?

हे जहाज बांधलं तेव्हा याचं नाव मेरी सिलेस्टी नव्हतं. या जहाजाचं नाव ठेवलं होतं अमेझॉन. १८ मे १८६१ रोजी या जहाजाचं निर्मितीचं काम आवरलं आणि मग हे जहाज आपल्या पहिल्यावहिल्या प्रवासाला निघालं. स्पेन्सर बेटावरून कॅनडाकडे हे जहाज रवाना झालं. या जहाजाचा हा पहिलाच पूर्वेकडचा प्रवास होता. पण हे जहाज जागेवरून हलेचना. आणि नंतर या जहाजच्या कप्तानाला न्युमोनिया झाला आणि प्रवास दरम्यान तो मेला.

पुढे बरीच वर्षे हे जहाज अनेक वेळा प्रवासात खराब झाले. त्यात अनेकदा बिघाड झाले. आणि १८६७ साली हे जहाज केप ब्रेटन बेटावरील ग्लेस खाडीतील किनाऱ्यावर रुतले. आणि त्याचे खूप नुकसान झाले. ते इतके भयंकर होते की त्याची दुरुस्ती अतिशय खर्चिक होती. त्यामुळे कुणीही त्या खडकात रुतलेल्या जहाजाला तेथून बाहेत काढायचीही तसदी घेतली नाही.

अलेक्झांडर मॅकबेन या माणसाने पैसा जमा करून त्याची डागडुजी करून घेतली आणि परत एकदा अमेझॉन समुद्र सफारीसाठी सज्ज झाले. त्यानंतर अमेझॉनची मालकी जॉन हॉवर्ड बेट्टी या माणसाकडे गेली. त्याने ते जहाज रिचर्ड हेंस याला विकून टाकले. रिचर्डने अमेझॉनची पुनर्बांधणी केली. आधीचा तळ बदलला. जहाजाचे दोरखंड बदलले. आणि त्याचं नावपण बदलून नाव केलं मेरी सिलेस्टी. पण जॉन बेट्टी इतका कर्जबाजारी झाला की त्याच्या देणेकऱ्यांनी जप्त केली.

त्यानंतर हे जहाज न्युयॉर्क शिपिंग कंपनीला विकण्यात आलं. बेंजामिन स्पूनर ब्रिग्स याला कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं. बेंजामिन हा अतिशय अनुभवी कॅप्टन होता. १८ वर्षे तो खलाशी म्हणून काम करत होता. उत्तम दर्यावर्दी अशी त्याची ओळख होती. हे जहाज बघून तो अतिशय खुश झाला.

७ नोव्हेंबर १८७२ रोजी मेरी सिलेस्टी प्रवासाला निघाले. त्याचवेळी अजून एक कॅनेडीयन जहाज डे ग्राटीया हे पण त्याच मार्गावर जाण्यासाठी सज्ज केले होते. त्या जहाजावर पेट्रोलियमचा साठा ठेवला होतं. दोन्ही जहाजे एकाच वेळी प्रवासाला निघणार होती कारण दोन्ही जहाजाचे कप्तान एकमेकांना चांगले ओळखत होते. प्रवासात काहीही अडचण आल्यास एकमेकांच्या मदतीला जाऊ शकतील. या धोरणाने दोन्ही जहाजे काही अंतराने त्याच मार्गाने प्रवास करणार होती.

हे देखील वाचा

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

मेरी सिलेस्टीने इटली येथील जीनोआकडे कूच केले. या जहाजावर इंडस्ट्रीअल अल्कोहोलची १७०० बॅरेल्स होती. या बॅरेल्सची डिलिव्हरी इटलीमध्ये करायची होती. या जहाजावर कप्तान ब्रिग्स, त्याची पत्नी सारा, दोन वर्षांची मुलगी सोफिया आणि ७ अधिकारी सोडून इतर खलाशी होते.

जवळ जवळ एक महिना झाला आणि ४ डिसेंबर १८७२ रोजी कॅनेडीयन जहाज डे ग्राटीयाच्या टीमला पोर्तुगीज बेट अझोर्सच्या पूर्वेला ४०० मैल अंतरावर मेरी सिलेस्टी दिसले. पण त्यांना कसलेही सिग्नल मिळाले नाहीत. निश्चल असलेले ते जहाज पाहून डे ग्राटीयाच्या खलाशांना शंका आली. त्यांनी आपल्या जहाजामधील तीन जणांना मेरी सिलेस्टीवर पाठवले. त्या जहाजामध्ये कुणीही आढळले नाही. तपास केला असता १७०० पैकी फक्त ९ बॅरेल्स रिकामी आढळली.

सहा महिने पुरेल इतका अन्न आणि पाण्याचा साठा तासाच्या तसा होता. कसल्याही झटापटीच्या खुणा जहाजावर दिसत नव्हत्या. फक्त एक लाईफ बोट गायब होती. आणि क्रोनोमीटर, सेक्सटंट, एक रजिस्टर हे पण गायब होते. लॉगबुकमध्ये शेवटची नोंद होती २५ नोव्हेंबर १८७२ ची सकाळी ८ वाजता. 

त्यात असं उल्लेख केलेला होता की मेरी सिलेस्टी संता मारिया या अझोर्सच्या दक्षिणेकडील बेटापासून केवळ ६०० मैलावर होते. एकंदर परिस्थिती पाहून एक निष्कर्ष काढला गेला सिलेस्टीवर जे काही घडले ते सकाळी ८ नंतर घडले. डे ग्राटीयाच्या लोकांनी मेरी सिलेस्टीला जिब्राल्टर येथे आणले. तेथूनच ८०० मैल पूर्वेला हे जहाज भरकटलेल्या अवस्थेत सापडले होते. मेरी सिलेस्टीची थोडीफार डागडुजी करून ते जहाज विकून टाकले.

तरीही हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला, मेरी सिलेस्टीवर असलेल्या लोकांचे काय झाले?

त्यासठी वेगवेगळ्या शक्यता पडताळून पहिल्या. समुद्री चाचे त्या जहाजवर आले असावेत. पण तसं असतं तर लोकांशी झालेली झटापट, वस्तूची नासधूस काहीतरी दिसलं असतं पण तिथे तशी एकही खूण सापडली नव्हती.

कुणी कुणी डे ग्राटीयाच्या नाविक दलावर पण संशय व्यक्त केला. पण त्यातही फारसे तथ्य आढळले नाही. मग मेरी सिलेस्टीच्या खालाशानीच ९ पिंप अल्कोहोल संपवला असेल का? असाही एक तर्क बांधला. पण डे ग्राटीयाचा कप्तान मेरी सिलेस्टीच्या कप्तानाला खूप चांगला ओळखत होतं तो असं करणार नाही किंवा आपल्या खलाशांना असं काही करू देणार नाही याची त्याला खात्री होती.

आणखी एक शक्यता वर्तवली गेली मेरी सिलेस्टी प्रवासाला निघाल्यावर त्याच महिन्यात समुद्रात भूकंप झाला होता. तो ८.५ इतक्या तीव्रतेचा होतं. त्यामुळे त्याची पूर्वसूचना मिळाली असेल पण ती जहाजच्या रेकॉर्डवर आली नसेल. पण हा तर्कही सुसंगत वाटत नव्हता.

भूकंप झाल्यावर जहाजातील वस्तू विस्कटायला हव्या होत्या. पण तसा काहीही दिसत नव्हतं. सारं काही जागच्या जागी होतं. मग नेमकं काय झालं? कुठे गेले सारे लोक? हे कोडं आज दीडशे वर्षानंतर पण कायम आहे.

हे जहाज बांधणी झाल्यापासून सतत वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देत राहिलं, शेवटी कप्तान आणि खलाशी त्याच्यावरून गायब झाले. एकंदर हे जहाज शापित म्हणूनच ओळखलं गेलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

Next Post

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

26 September 2023
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

25 September 2023
मनोरंजन

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

25 September 2023
मनोरंजन

तब्बल नऊ तास वाहतुक कोंडी निर्माण करणारा ‘बर्निंग मॅन’?

11 September 2023
मनोरंजन

आपण सर्रास वापरतो त्या इमोजीज आल्या कुठून हे माहिती आहे का?

6 September 2023
Next Post

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)