The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

संशोधकांना एक मिनिट ६० सेकंदांवरून ५९ सेकंदांवर का आणायचा असेल ?

by द पोस्टमन टीम
12 February 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time:1min read
0
Home विज्ञान तंत्रज्ञान

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

मृत्यू आणि ‘कर’ सोडल्यास कोणतीही गोष्ट निश्चित नाही, असं आजच्या जमान्यात म्हटलं जातं. खरं सांगायचं तर अगदी अवकाशात फिरणाऱ्या ग्रह, ताऱ्यांमुळे, संपूर्ण विश्वामुळे आपल्यामध्ये काही ना काही बदल हे नेहमी होतच असतात.

या अनियमित बदलांमध्ये आता वैज्ञानिकांनी एक नवा बदल सुचवला आहे तो असा की:

आपण आपल्या  घड्याळातलं एक मिनिट हे ६० सेकंदांवरून ५९ वर आणावं.

यातून परिणाम असा होईल की, आपण दर वर्षी मिनिटातला एक सेकंद कमी केला, तर यातून आपल्या घड्याळातली आपण बघतो ती रोजची वेळ आणि ती वेळ आपण ज्यावरून ठरवली आहे ते पृथ्वीचं वास्तविक घडून येणारं परिभ्रमण (rotation), त्याच्याशी कमी केलेल्या सेकंदामुळे आपली ‘वेळ जुळून येईल’. कारण एकच की पृथ्वीच्या परिभ्रमणामध्ये दर वर्षी थोड्या थोड्या फरकाने वाढ होत आहे.

वर्षातल्या सरासरी दिवसांपेक्षा आपण वर्षाच्या कॅलेंडरमध्ये मोजत असलेले दिवस हे कमी भरत असल्याची नोंद संशोधकांनी केली. कारण आपण सतत निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी मिनिट वाढवत गेलो (म्हणजे जसं अर्थव्यवस्थेत होणारी तूट भरून काढण्यासाठी सरकार जास्त नोटा छापते तसं संशोधक लोक नैसर्गिकपणे कमी होणारी वेळ भरून काढण्यासाठी घड्याळातलं मिनिट कमी झाल्यावर पुन्हा वाढवत गेले) त्यामुळे आपली घड्याळातली वेळ आहे तशीच दिसू लागली पण निसर्गाची वेळ मात्र कमी होत गेली.

गेल्या कित्येक वर्षात पृथ्वीचं परिभ्रमण (स्वतः भोवती फिरणं) हे आधीपेक्षा वाढत गेलं आहे (म्हणजेच पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग वाढला आहे). एकीकडे वेळ कमी होत आहे आणि दुसरीकडे परिभ्रमण वाढत आहे. जरी हे परस्परावलंबी असलं तरी नक्की आपल्या आसपास हे काय आणि कसं चाललंय हे समजत नाही.

आधी हे बघावं लागेल की संशोधक जे मिनिटाचा एक सेकंद कमी करण्याबद्दल म्हणत आहेत, त्याने खरंच काही फरक पडणार आहे का?

हे देखील वाचा

जांभळा रंग कृत्रिमपणे बनला आणि फॅशनच्या जगात क्रांतीच झाली

हा माणूस नसता तर आपल्याला गणित अजून अवघड गेलं असतं

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

तर हे असं आहे की यातून वास्तविक आपल्या सामान्य जीवनात किंवा सामान्यांना काही फरक पडणार नाही. हा सुचवलेला किंवा केला जाणारा बदल हा संशोधकांसाठी आणि ध्वनीसंबंधित संशोधनात वापरल्या जाणाऱ्या वैज्ञानिक उपकरणात याचा फरक पडावा यासाठी चालू आहे.

सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं घड्याळ जेव्हा रोज मध्यरात्री दिवस संपला की स्वतःची वेळ कमी झालेल्या एका सेकंदाशी पुन्हा जुळवून घेत असेल आणि जास्तीचा वेळ किंवा (नैसर्गिकपणे) कमी झालेला सेकंद जर भरून काढत असेल तर त्यामुळे अपेक्षित गोष्टी घडून येत नाहीत आणि बऱ्याच महत्वाच्या प्रयोगांवर याचा परिणाम दिसून येतो.

आपण लीप वर्ष नावाची संकल्पना नेहमी वापरतो. त्यानुसार आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५.२५ असे कमीजास्त दिवस लागतात. त्यामुळे ते ३६५ करण्यासाठी आपण दर ४ चार वर्षांनी लीप वर्ष घेतो त्यामुळे एकूण दिवसांची गणना एकसारखी होते. त्याचप्रमाणे आपण ‘लीप सेकंद’ अशी संकल्पना जर उपयोगात आणली तर काय फरक पडू शकेल हेही एकदा बघावं लागेल.

न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार: “२०१२ साली असाच एक लीप सेकंद वाढवल्यामुळे रेडिट, येल्प, लिंक्डइन, अशा बऱ्याच इंटरनेट संकेतस्थळांचे सर्व्हर ‘क्रॅश’ झाल्याच्या घटना समोर आल्या. तसंच ज्या संगणकांमध्ये ‘लिनक्स’ ही कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) वापरली जात होती आणि ‘जाव्हा’ ही संगणकीय भाषा वापरली जात होती तिथेच काही समस्या निर्माण झाल्या.”

ADVERTISEMENT

हे होण्यामागची कारणं शोधली असता असं समोर आलं की बऱ्यापैकी सगळ्या संगणक कार्य प्रणाली आणि संगणकीय भाषा या प्राथमिक पातळीवर बनवलेल्या असतात आणि त्यातल्या ‘वेळा’ या संगणकातल्या बेसिक घड्याळी हार्डवेअरद्वारे कायमस्वरूपी निश्चित केलेल्या असतात.

चालू वेळेच्या नियमानुसार संगणकाने जागतिक वेळनियंत्रक प्रणालीशी जसे बदल होतील तसं जुळवून घेतलं पाहिजे अशीच त्याची रचना केलेली असते. पण असा अख्खा सेकंद कमी करण्यापेक्षा वेगळा बदल त्यात केला गेला. जेव्हा संगणकातल्या घड्याळाला लक्षात येईल की आता लवकरच १२ वाजणार वाजणार आहेत, तेव्हा त्याच्यापुढे प्रति सेकंद काही लाखो, करोडो बाईट्सच्या स्वरूपात डेटाचं आदान-प्रदान CPUमध्ये चालू असतं आणि जेव्हा असा काही सेकंदी बदल केला जातो तेव्हा मोठी समस्या निर्माण होण्याचा संभव असतो.

हे म्हणजे असं झालं की तुम्ही नुकतंच एखादी मोठी शिडी चढायला सुरुवात केली आणि वर बघितलं तर तुम्ही एखाददुसरी पायरी चढल्यावर लगेच शिडीच्या शेवटच्या पायरीवर पोहोचला आहात, मध्ये किती पायऱ्या चढलात, किंवा नाहीत, हेच न समजणं. असंच काहीसं मधला सेकंद गाळला तर संगणकाचं होईल.

पृथ्वी प्रत्येक वेळी हे असं वेगळ्याच प्रकारे का परिभ्रमण करत असेल ? ही खरंतर एक नैसर्गिक बाब आहे. ती बाब समजून घेणे अधिकच कठीण काम.

पृथ्वीवर सतत सर्व बाजूंनी कोणतं ना कोणतं तरी बल कार्य करत असतं. ते अगदी चंद्राचं पृथ्वीवर असे, सूर्याचं पृथ्वीवर असेल किंवा विश्वातल्या बाकी गोष्टींनी पृथ्वीवर लावलेलं बल असेल आणि यातूनच समुद्राच्या लाटा कशा निर्माण होतात हे समजतं. हेच काहीसं कारण पृथ्वीच्या बदलत्या परिभ्रमणामागे आणि कमी होणाऱ्या वेळेमागे आहे. पण सध्याचं एकूण चलनवलन पाहता कमी होणारं परिभ्रमण म्हणजे लीप सेकंदात बदल करणं यातून दोन महत्वाच्या बदलांना फाटा देता येणार होता: मिनिटातला एखादं सेकंद वाढवणे किंवा कमी करणे,जे ज्या त्या वर्षावर अवलंबून होतं.

लीप सेकंद वापरून घड्याळात बदल करणे ही गोष्ट एका दृष्टीने वादग्रस्तही ठरू शकते. त्यामुळे संशोधकांच्या मते रोज मध्यरात्री घड्याळात मायक्रोसेकंदाने बदल करणं जास्त सोयीचं ठरू शकेल.

पण बाकी सर्व शास्त्रीयदृष्ट्या नियंत्रित मापदंड,उपाय तयार करणारं असं एक नियामक मंडळ असेल जे हे सगळं वेळेचं गणित नियमित करेल. या सगळ्या प्रकरणात कदाचित पुढे २०२३मध्ये ‘वेळकरी’ लोक एकत्र येऊन याचा नक्कीच काहीतरी निकाल लावतील.

तोपर्यंत आपण एकच काम करू, ते म्हणजे रोजचा येणारा आणि जाणारा दिवस मोजत राहू…

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान मिळवणारे मोरारजी हे एकमेव व्यक्ती आहेत

Next Post

भारतातील स्थानिक भाषा संकटात का आहे ?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

जांभळा रंग कृत्रिमपणे बनला आणि फॅशनच्या जगात क्रांतीच झाली
विज्ञान तंत्रज्ञान

जांभळा रंग कृत्रिमपणे बनला आणि फॅशनच्या जगात क्रांतीच झाली

9 April 2021
हा माणूस नसता तर आपल्याला गणित अजून अवघड गेलं असतं
विज्ञान तंत्रज्ञान

हा माणूस नसता तर आपल्याला गणित अजून अवघड गेलं असतं

1 April 2021
या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे
विज्ञान तंत्रज्ञान

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

30 March 2021
अमेरिकन मिलिटरीने एकदा चंद्रालाच उडवून टाकायचा प्लॅन केला होता
विज्ञान तंत्रज्ञान

अमेरिकन मिलिटरीने एकदा चंद्रालाच उडवून टाकायचा प्लॅन केला होता

1 April 2021
या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय
आरोग्य

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

27 March 2021
चीनी हॅकर्सनी गुगलसह ३४ अमेरिकी कंपन्यांचा टप्प्यात कार्यक्रम केला होता
विज्ञान तंत्रज्ञान

चीनी हॅकर्सनी गुगलसह ३४ अमेरिकी कंपन्यांचा टप्प्यात कार्यक्रम केला होता

26 March 2021
Next Post
भारतातील स्थानिक भाषा संकटात का आहे ?

भारतातील स्थानिक भाषा संकटात का आहे ?

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाड लावण्याची एक जपानी कला

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाड लावण्याची एक जपानी कला

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

8 March 2021
मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

26 March 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

10 April 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!