The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

महायुद्धाच्या दरम्यान नाझींनी लुटलेल्या खजिन्याचं पुढे काय झालं?

by द पोस्टमन टीम
13 April 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीच्या राजकारणात एका सामान्य कार्यकर्त्याचं असामान्य नेत्यामध्ये रूपांतर होत गेलं. पुढे तोच नेता दुसऱ्या महायुद्धात प्रभावी ठरला आणि तो म्हणजेच जर्मनीचा क्रूर हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर. त्याच्या या साम्राज्याला जर्मनीत सर्वोच्च स्थान प्राप्त झालं होतं. हिटलरने अनेक सरकारी आणि खाजगी संस्था, बँका, आपल्या हातात घेतल्या. त्यातून मोठी मालमत्ता त्याने कमावली आणि लुटलीही !

दुसरं महायुद्ध भडकलं, त्यात हिटलर जिंकण्याच्या इराद्यानेच उतरला होता. नाझी सैन्य जर्मनीच्या बाजूने लढत होतच पण त्यांचा टिकाव लागू शकला नाही. अमेरिका, सोव्हिएत रशिया, ब्रिटन अशा मित्र राष्ट्रांनी सर्व बाजूंनी पूर्ण शक्ती पणाला लावून जर्मनीच्या नाझी सैन्याचा पाडाव केला.

जर्मनीच्या पतनानंतर नाझींच्या संपत्तीला कोणीही वाली राहिला नव्हता. मग यावर त्यांनी नामी युक्ती शोधून काढली. ७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमतीचे सोने, प्रचंड पैसा आणि लुटीच्या हजारो मौल्यवान कलाकृती लपवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. खुद्द जर्मनीतून आणि नंतर बळकावलेल्या देशांमधून, प्रदेशांमधून उचललेला कोट्यवधी किंमतीचा माल नाझी पक्षाच्या लुटीमध्ये होता.

युद्ध संपतानाही ब्रिटन, अमेरिकेकडून जर्मनीवर अनेक हल्ले झाले. महायुद्ध संपल्यानंतर ३ फेब्रुवारी १९४५ ला बर्लिनवर २,२६५ टन स्फोटकांचा मारा केला गेला. यात दोनेक हजार लोक मारले गेले आणि सव्वा लाख लोक बेघर झाले. बर्लिन आणि आसपासचा संपूर्ण परिसर नष्ट झाला.

या हल्ल्यांचं प्रमाण कमी होता होता हल्ल्यांची तीव्रता वाढत गेली. अशातच जर्मनीच्या प्रमुख असलेल्या राईश बँकेच्या इमारतीवर हवेतून २१ स्फोटकांचा मारा केला गेला आणि ती संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. हा भयंकर हल्ला थांबल्यानंतर राईश बँकेचे सर्व कामगार आणि त्याचे अध्यक्ष डॉ. वॉल्थर फंक वाचले होते; पण युद्धात सापडलेल्या या राष्ट्राच्या महत्त्वाच्या केंद्राचा, या बँकेचा नाश झाला.

ऑपरेशन सेफ हेवन आणि गायब झालेल्या खजिन्याचा शोध

राईश बँकेच्या तळघरात नाझी जर्मनीच्या सोन्याचा बहुतेक साठा होता, तो अर्थातच सुरक्षित राहिला कारण व्यवस्थातच तशी केली गेली होती. जमिनीत कित्येक फूट खाली या सोन्याचा, पैशांचा साठा व्यवस्थित लपवून ठेवण्यात आला होता. वरची इमारत कोसळली पण पुढचे दोन महिने या संपत्तीकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही, तोवरच जोवर अमेरिकन सैन्याची तिथे धाड पडली नव्हती. जर्मन सेनेला हे माहिती नव्हतं की मित्र राष्ट्रांच्या एजन्सी या लुटलेल्या सोन्याच्या मागावर फार पूर्वीपासून होत्या. युद्धाच्या समाप्तीनंतर लगेचच मित्र राष्ट्रांनी ‘ऑपरेशन सेफ हेवन’ सुरु केलं.

जनरल जॉर्ज एस. पॅटनच्या नेतृत्वाखाली अमेरिकी सैन्य जर्मनीच्या राईश बँकेच्या भागात पुढच्या दीड महिन्यात दाखल झालं. ४ एप्रिल १९४५ च्या दिवशी अमेरिकन्स आले आणि त्यांनी ही संपत्ती कोठे लपविली गेली हे मोठ्या प्रयत्नांती शोधून काढलं. ७ तारखेला अमेरिकी अधिकाऱ्यांनी राईश बँकेच्या जागेत लिफ्ट बसवून ती ६४० मीटर खोल नेली, जिथे त्यांना एक अब्ज जर्मन नाणी सापडली.

जमिनीपेक्षा जवळपास ७०० मीटर खोल असं छोटं बांधकाम अमेरिकन सैन्याला सापडलं. तिथे काही खोल्या बांधल्या गेल्या होत्या. तिथला एक लोखंडी दरवाजा तोडल्यावर तिथे ४०० पेक्षा जास्त, पैशांनी भरलेल्या थैल्या सापडल्या. या गुप्त गोदामात ८,५२७ सोन्याच्या विटा, सोन्याची नाणी आणि नोटांचा बराच मोठा साठा सापडला.

हे देखील वाचा

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

ADVERTISEMENT

राईश बँकेचा अध्यक्ष डॉ. फंक याने ताबडतोब लुटलेल्या आणि लपवलेल्या सोन्याचा आणि पैशाचा साठा विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि थेट राजधानीपासून ३२० किलोमीटरवर असलेल्या कैसेरोडा शहरातील मिठाच्या खाणीत हस्तांतरित करून लपवून ठेवण्याचा आदेश दिला. सुमारे १०० टन सोने आणि नोटांच्या १०० बॅग एवढा तो माल होता. हा माल मोठ्या प्रमाणात गुप्तपणे पाठवण्यासाठी तो किमान १३ ते १४ ट्रेनमधून पाठवावा लागणार होता. पण इस्टरच्या सुट्टीमुळे संपूर्ण खजिना कैसेरोडामध्ये पाठवता आला नाही. नोटांनी भरलेल्या ६०० पिशव्या आणि बरंच सोनं मागं राहीलं.

अमेरिकी सैन्य जर्मनीत उतरल्यापासून सर्वच भागात सैनिकांचा खडा पहारा होता. एके रात्री काही सैनिकांना दोन अनोळखी बायका रस्त्यावरून चालताना दिसल्या. त्यांच्या संशयास्पद हालचाली बघून त्यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांच्याकडूनच सैन्याला एका मोठ्या अड्ड्याचा शोध लागला. या बायका वेषांतर करून फिरत होत्या. काही दिवसांपूर्वीच या भागातून अनेक ट्रक आणि मालगाड्या बरंच सामान घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं. या गाड्या कैसेरोडा शहरातल्या खाणीच्या दिशेने गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

कैसेरोडा शहरातील मिठाच्या खाणीत शोध घेतला गेला. जमिनीच्या खाली ७५ फूट खोल आणि १५० फूट रुंद अशा जागेत नाझी सरकारने लपवून ठेवलेली लूट समोर आली. ९ कोटी किमतीचे फ्रेंच फ्रँक्स सापडले.

सोन्याने भरलेली ७००० पोती तिथे दिसून आली. मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणीही होती. मिठापासून बनवलेल्या घडकांमध्ये ४०० टन वजनाच्या अनेक जर्मन कलाकृती सापडल्या, ज्यात जर्मन संग्रहालयातील १५ चित्रे आणि अनेक दुर्मिळ पुस्तकांचाही समावेश होता. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे हिटलरने ज्यूंसाठी बनवलेल्या छळछावण्यातल्या बळींकडून चोरीला गेलेले हिरे, मोती आणि इतर मौल्यवान गोष्टींनी भरलेल्या सुटकेस आणि त्याच बळींच्या ‘सोन्याच्या दातांनी’ भरलेल्या पिशव्याही होत्या.

आजवर जगाच्या इतिहासात विविध ठिकाणी घातल्या गेलेल्या छाप्यांमध्ये सगळ्यात जास्त संपत्ती या एकातच सापडली.

हिटलरचा प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्स याच्या मते, राईश बँकेच्या अध्यक्षाच्या निष्काळजीपणामुळेच मित्र राष्ट्रांच्या हातात हा (लपवलेला) राष्ट्रीय खजिना पडला. गोबेल्सचं म्हणणं होतं की राईश बँकमध्ये शिल्लक असलेल्या अधिकृत सोन्याच्या साठ्यापैकी काही भाग बव्हेरियाला पाठवावा. त्यासाठी मग पैसे दोन गाड्यांमध्ये भरले गेले.

सोन्याच्या अंगठ्या आणि नाणी घेऊन जाण्यासाठी ट्रकचा मोठा ताफा तयार करण्यात आला. पण पुढच्या काही काळात, मित्र राष्ट्रांच्या बॉम्बहल्ल्यांनी जर्मनीतलं दळणवळण पुरतं विस्कळीत केलं आणि मागे राहिलेली ही प्रचंड संपत्ती परत आणण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. तरीही या युद्धाच्या गोंधळात मग म्युनिकला जाण्यासाठी काही गाड्या तयार केल्या गेल्या. या गाड्यांना बर्लिन ते म्युनिक ८०० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी दोन आठवडे गेले.

डॉ. फंक आणि इतर प्रमुख नाझी अधिकार्‍यांना लवकरच मित्र राष्ट्रांच्या सैन्याने अटक केली पण त्या काळात न सापडलेल्या सोन्याचा साठा कुठे लपविला गेला हे त्यांना माहीत असल्याची साक्ष कोणीही दिली नाही.

पण उरलेले सोन्याचे साठे म्युनिक जवळच्या एका दाट जंगलातल्या सुरक्षित ठिकाणी दफन करण्यात आले. मग नोटांचे चलन तीन ठेवींमध्ये विभागून तीन वेगवेगळ्या पर्वतशिखरांवर लपवले गेले. मग बाकी ट्रकमधून पैसे, सोन्याची नाणी आणि विदेशी चलन बव्हेरियन आल्प्समधील एका छोट्या गावात नेले गेले आणि गाड्या म्युनिककडे पाठवल्या.

दरम्यान, हान्स आल्फ्रेड व्हॉन रोसेनबर्ग लिपिंस्की या राईश बँकेच्या अधिकाऱ्याने परदेशी चलनाची बॅग आणि सोन्याने भरलेल्या पाच लहान क्रेट ‘काही’ कारणासाठी ताब्यात घेतले. कदाचित नाझी जर्मनीच्या पराभवामुळे, बँकेच्या या काही अधिकाऱ्यांनी आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी हा प्रकार केला असावा. इतर जे पक्ष नाझी पक्षाचा भाग होते त्यांनीही असाच काही माल मधल्या मध्ये उचलला.

अमेरिकी सैन्याने राईश बँकेच्या तळघरातून सुमारे १४ दशलक्ष डॉलर किमतीचे काही सोने आणि ४१ दशलक्ष डॉलर किमतीचे सोने इतर जर्मन सरकारी संस्थांकडून परत मिळवले पण त्या एका जंगलात लपवलेली संपत्ती अखेरपर्यंत त्यांना सापडली नाही.

पुढची चार वर्ष, अमेरिकी अधिकारी हे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करत होते, ही संपत्ती शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सुमारे ३.५ दशलक्ष (आजच्या काळातले ४६.५ दशलक्ष ) डॉलर एवढ्या किंमतीचं सोनं आणि सुमारे २ दशलक्ष नोटा, यांचा शोध न लागल्याची नोंद केली गेली.

यातला काही भाग पुढे काही छोट्या मोठ्या गावांमधून आणि घरांमधूनच हस्तगत केला गेला. काही माजी नाझी अधिकाऱ्यांच्या वारसांनी त्या अधिकाऱ्यांनी लंपास केलेलं सोनं आणि काही जर्मन कलाकृती जेव्हा विकायला काढल्या त्यावेळी त्यांचा शोध लागला आणि त्यांचा ताबा सरकारने घेतला. १९९० साली टेक्सासच्या एका छोट्या गावात यातला काही भाग सापडला. तरीही याव्यतिरिक्त लपवला गेलेला किंवा गायब केलेला असा खजिना सापडलाच नाही.

हिटलरच्या नाझी राजवटीतल्या दहशतीमध्ये अब्जावधी किमतीचं सोनं, देशी आणि विदेशी चलन लुटलं गेलं. आणि अखेरपर्यंत या खजिन्याचा जेवढा भाग सापडला त्याहूनही मोठा भाग अज्ञातच राहिला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

Next Post

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

2 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
इतिहास

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

15 April 2022
Next Post

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

पृथ्वीवरच्या नंदनवनाला संघर्ष आणि हिंसाचाराचा शाप कशामुळे लागलाय...?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)