The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

by द पोस्टमन टीम
2 June 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गुलामगिरी हा मानवतेला लागलेला कलंक आहे. सामान्यपणे जगणं मुष्कील असलेल्या वंचित घटकांना केवळ जगण्यापुरतं अन्न आणि लज्जारक्षणापुरती वस्त्र एवढ्याच मोबदल्यात ढोरासारखं राबवून घेणं म्हणजे गुलामगिरी. पूर्वीच्या काळी गुलामगिरी ही सर्रास चालणारी बाब होती. अमेरिकेत मूठभर श्वेतवर्णीयांनी बहुसंख्य कृष्णवर्णीयांना जबरदस्तीने वेठबिगार बनवलं होतं.

जगातल्या आदर्श राज्यकर्त्यांपैकी आघाडीचे राज्यकर्ते म्हणून मानले गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी मोडीत काढण्याचं श्रेय दिलं जातं. लिंकन १८६० मध्ये अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वास्तविक अध्यक्षपदाचा कारभार हाती घेण्यापूर्वी लिंकन यांना गुलामगिरीच्या समस्येचं गांभीर्य आणि व्याप्ती पुरेशा प्रमाणात माहिती नव्हतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं.

मग असं काय घडलं की सुरुवातीच्या काळात गुलामगिरीच्या प्रथेबाबत उदासीन असलेले लिंकन या प्रथेचे कडवे विरोधक बनले आणि महत्प्रयासाने त्यांनी ही अमानवी प्रथा मोडीत काढली?

थॉमस जेफरसन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर कार्यरत असताना त्यांनी अमेरिकेच्या जनगणनेच्या आधारे राज्यांमधल्या गुलामांच्या लोकसंख्येचं प्रमाण दर्शवणारा नकाशा तयार करण्याचं काम एका एजन्सीकडे सोपवलं. त्यानुसार या एजन्सीने राज्याराज्यांमधल्या गुलामांच्या संख्येचं प्रमाण दर्शवणारा नकाशा तयार केला. हा नकाशा तयार होईपर्यंत अध्यक्षपदाची सूत्र लिंकन यांच्याकडे आली होती.

‘यूएस कोस्ट सर्व्हे १८६१’ म्हणून हा नकाशा (अथवा अहवाल) ओळखला जातो. हा नकाशा पाहून लिंकन यांचा स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना.

या नकाशात दर्शविल्याप्रमाणे अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये गुलामगिरीचं स्वरूप फारच विक्राळ होतं. विशेषतः मध्यभागातल्या आणि पश्चिमेकडच्या काही राज्यात तर एकूण लोकसंख्येच्या ९० टक्क्यांहून अधिक संख्या गुलामांची होती. नकाशातली आकडेवारी अतिशयोक्त असल्याची शंका आल्याने लिंकन यांनी त्याची वैधता पुन्हा तपासून घेतली. त्या वेळी ही आकडेवारी योग्य असल्याचं दिसून आलं. त्यावरून जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीनं आयुष्य जगणाऱ्या लाखो गुलामांचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेलं आणि त्यांनी गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा चंगच बांधला.

गुलामगिरी नष्ट करण्याचं काम फारसं सोपं नाही याची लिंकन यांना जाणीव होती. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या हातात काही अधिकार निश्चितपणे होते. मात्र, गुलामांचा व्यापार करणारे लोक आणि गुलामांना कपाशीच्या शेतीमध्ये राबवून घेणारे जमीनदार लोक यांचं मन वळवणं खूपच कठीण होतं. कारण या लोकांचा उद्देश मोठा नफा कमावण्याचा होता.

हे देखील वाचा

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

ज्या ज्या राज्यांमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात होती, त्याच राज्यांमध्ये गुलामांची संख्या अधिक असल्याचं या नकाशावरून दिसून आलं. या मुळावर घाव घातल्याशिवाय गुलामगिरी संपणार नाही; हे लिंकन यांच्या लक्षात आलं.

खरं तर सन १८६२ पर्यंत लिंकन यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा, सचिवांचा आणि सल्लागारांचा गुलामगिरी निर्मूलन कायद्याला ठाम विरोध होता. मात्र, लिंकनही आपल्या निर्णयावर ठाम होते. अँटिटेम युद्धातल्या विजयानंतर मात्र बहुतेक सहकाऱ्यांनी त्यांना पाठींबा दर्शवला. त्यानुसार लिंकन यांनी गुलामांच्या मुक्ततेसाठी कायदा संमत करून घेतला.

अमेरिकेतल्या सर्व गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आल्याची उद्घोषणा १ जानेवारी १८६३ मध्ये करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका अमानुष प्रथेचा कायद्याने अंत झाला.

गृहयुद्धाच्या काळात गुलामांच्या मुक्तीचा अमेरिका एकसंध ठेवण्यात महत्वाचा वाटा होता. लिंकन यांना याची जाणीव होती की, गुलामांची बहुसंख्या असलेली सीमावर्ती राज्य, विशेषतः मेरीलँड, डेलावेअर, मिसूरी आणि केंटकी यांना युनियनमध्ये ठेवणं महत्वाचं आहे.

गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांनी अमेरिकेतून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. तसंच त्यांची बहुसंख्य असलेल्या राज्यांनी संघराज्यातून बाहेर पडण्याची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली. त्यांना संघराज्यात टिकवून ठेवण्यासाठी मुक्त झालेल्या गुलामांना शासकीय नोकऱ्यांमध्ये, विशेषतः सैन्यदलात सामावून घेण्याचा निर्णय लिंकन प्रशासनाने घेतला.

या निर्णयाचा लाभ उठवून मोठ्या संख्येने कृष्णवर्णीय संरक्षणदलात सहभागी झाले. अमेरिकन गृहयुद्ध संपुष्टात आलं तेव्हा अमेरिकन सैन्यामध्ये कृष्णवर्णीयांची संख्या १ लाख ८० हजार; म्हणजे एकूण संख्येच्या सुमारे १० टक्के एवढी होती.

या शिवाय नौदलामध्ये २० हजार कृष्णवर्णीय नौसैनिक कार्यरत होते. अर्थात खास कृष्णवर्णीयांसाठी स्वतंत्र पलटणी स्थापन करण्यात आल्या असल्या तरी त्याचं नेतृत्व गौरवर्णीय अधिकाऱ्यांककडेच होतं. कृष्णवर्णीयांच्या पलटणींना प्रामुख्याने गस्त घालण्याचं किंवा किल्ले बांधण्याचं काम दिलं जायचं.

वास्तविक, गुलामांच्या मुक्ततेचा कायदा संघराज्याच्या विरोधात बंड करणाऱ्या सीमावर्ती राज्यांपुरताच मर्यादित होता. मात्र, या कायद्याच्या प्रभावाने सर्वसामान्य जनतेमध्ये गुलामगिरी प्रथेच्या अनिष्टतेबाबत जाणीवजागृती निर्माण झाली. कृष्णवर्णीय गुलामांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण झाली आणि कालांतराने संपूर्ण अमेरिकेतून गुलामगिरीची प्रथा समूळ नष्ट होण्यास प्रेरणा मिळाली.

अमेरिकन गृहयुद्धाची दिशाच गुलामगिरी निर्मूलनाच्या कायद्यामुळे बदलून गेली. सुरुवातीच्या काळात अमेरिकन संघराज्य एकसंध ठेवणं हा गृहयुद्धाचा एकमेव उद्देश होता. मात्र, गुलामगिरी निर्मूलनाच्या कायद्यानंतर गुलामांची गुलामगिरीतून मुक्तता; हे या युद्धाचं प्रमुख उद्दीष्ट ठरलं.

गुलामगिरी निर्मूलनाच्या कायद्याचा अमेरिकेला एक अप्रत्यक्ष मात्र, महत्वाचा फायदा मिळाला. ब्रिटन आणि फ्रान्स ही त्या काळातली समृद्ध आणि बलवान राष्ट्र उत्तर गोलार्धात आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात होती. त्यासाठी गुलामगिरीच्या प्रथेला विरोध हे साधन म्हणून वापरण्याचा त्यांचा डाव होता. गुलामांना न्याय मिळवून देण्यासाठी; त्यांना गुलामीतून मुक्त करण्याच्या नावाखाली अमेरिकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा या देशांचा प्रयत्न होता. मात्र, लिंकन यांनी गुलामगिरी कायद्याने नष्ट केल्यामुळे त्यांचा हा डाव सफल होऊ शकला नाही.

अमेरिकन संघराज्याचे संरक्षक म्हणून लिंकन यांना ओळखलं जात असलं तरी गुलामगिरीचं निर्मूलन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहाम लिंकन यांचं सर्वात महत्वाचं आणि ऐतिहासिक कार्य मानलं जातं. लिंकन स्वतः देखील याच कामाबद्दल स्वतःला कृतार्थ समजत असत.

ADVERTISEMENT

‘माझ्या आत्म्याचा संदेश ऐकून मी गुलामगिरी निर्मूलनाचा विडा उचलला. इतिहासात जर माझ्या नावाची नोंद कधी घेतली जाणार असेल, तर ती याच कार्यासाठी घेतली जाईल; असं त्यांनी नमूद करून ठेवलं आहे. एकेकाळी गुलामगिरीबाबत उदासीन असलेल्या लिंकन यांना गुलामगिरी निर्मूलनाचं ऐतिहासिक कार्य करण्याची प्रेरणा द्यायला कारणीभूत ठरला तो एक नकाशा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

Next Post

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
इतिहास

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

15 April 2022
इतिहास

दुसऱ्या महायुद्धादरम्यान फिनलंडमधून ८०००० मुलांना असं बाहेर काढण्यात आले!

18 April 2022
Next Post

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)