आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्याला जेव्हा आपल्याला अंगदुखीचा त्रास होतो, त्यावेळी आपण डिस्प्रिन अथवा ॲस्प्रिनची गोळी खातो. ही गोळी घेतल्यानंतर काही वेळातच आपली अंगदुःखी नाहीशी होते. ही साधारण दिसणारी गोळी इतकी परिणामकारक कशी आणि ती आपल्या शरीराला कोणत्या प्रकारे हानी पोहचवते, याबद्दल आपण जाणून घेऊ, शिवाय या गोळीबद्दल जे काही भ्रम पसरले आहे, ते दूर देखील होतील.
डिस्प्रिन कधी कधी घेतली जाते?
- हलकी डोकेदुखी, मायग्रेन, मानदुखी, दातदुखी, तंत्रिकादुखी
- सर्दी, ताप आणि संबंधित आजार
- सांधे दुःखी, लचक – चमक भरणे, अंगदुखी, सांधे सुजने इत्यादी.
डिस्प्रिन कशी काम करते?
डिस्प्रिनच्या प्रत्येक टॅब्लेटमध्ये सिटिसालिसिलिक एसिड असते. हे जेव्हा शरीरात जाते तेव्हा साइक्लो-ऑक्सीजनेज नावाच्या उत्प्रेरकाच्या उत्सर्जनाला चालना देते. या उत्प्रेरकामुळे प्रोस्टाग्लॅंडीन निर्माण होतात. ज्यामुळे अंगदुखी, सूज येणे आणि थ्राम्बाकसेन इत्यादी गोष्टी होतात. यामुळे प्लेटलेट्स एकमेकांना जोडल्या जाऊन ब्लड क्लाॅट तयार करतात. डिस्प्रिंन साइक्लो-ऑक्सीजिनेजमुळे निर्माण होणाऱ्या केमिकलचे उत्सर्जन थांबवते.
३०० एमजी क्षमतेची ही गोळी प्रोस्टाग्लॅंडीनचे उत्सर्जन थांबवून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता देते. युकेच्या नेट डॉक्टर वेबसाईटनुसार ३०० एमजी क्षमतेची ऍस्प्रिन हृदयविकाराचा तीव्र झटक्यापासून वाचण्यास मदत करते. या टॅब्लेटमुळे ब्लड क्लाॅट तयार होत नसतो, ज्यामुळे शरीरातील रक्तपुरवठ्यावर परिणाम होत असतो.
डिस्प्रिन कोणासाठी हानिकारक आहे?
- नवजात बालक आणि १६ वर्षांखालील मुलांना कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय डिस्प्रिन देण्यास मनाई आहे, यामुळे रेयस सिंड्रोम नावाचा आजार उद्भवू शकतो. यामुळे मेंदू आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात
- पोटात अल्सर असलेल्या रुग्णांना ही गोळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.
- एलर्जी रिएक्शन असणाऱ्या पीडितांनी ह्या औषधापासून स्वतःला बचावले पाहिजे.
- खराब किडनी आणि यकृताचे आजार असलेल्या लोकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरते.
- गर्भवती महिलांनी स्वतःला या औषधांपासून वाचवले पाहिजे.
- लहान बाळांना दूध पाजणाऱ्या महिलांनी देखील या गोळ्यांचे सेवन करणे योग्य नाही.
डिस्प्रिनचे साईड इफेक्टस
प्रत्येक औषधाचे जसे गुणकारी गुणधर्म असतात, तसे अपायकारक गुणधर्म देखील असतात. प्रत्येक व्यक्ती जी हे औषध घेते त्याला या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही. फक्त काही विशिष्ट लोकांना मात्र याचा त्रास होतो. डिस्प्रिनचे साईड इफेक्टस पुढीलप्रमाणे आहेत –
- अपचन
- अशक्तपणा
- उलटी होणे
- अंतर्गत रक्तस्राव होणे
- कान वाजणे
- त्वचेवर एलर्जीक रिएक्शन होणे
- ओठ, जीभ आणि गळा सुजने
- अधिक काळासाठी रक्तस्त्राव होणे
डिस्प्रिनचे गुणकारी परिणाम आहेत तर काही तुरळक दुष्परिणाम आहेत, परंतु बहुतांश भारतीयांसाठी अंगदुखीसाठी सर्वात जास्त विश्वसनीय पेन किलर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.