जगातील सर्वात जास्त जुळे राहतात केरळमधील ‘या’ गावात

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

जगात आपल्या सारखी दिसणारी एखादी व्यक्ती अस्तित्वात असते असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. एका आख्यायिकेनुसार जगभरात एकसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. जुळी भावंडं एक सारखीच दिसत असतात. पण जुळ्या भावंडांच्या जन्माचं प्रमाण हे खूप कमी असतं. पण केरळमध्ये एक गाव आहे जिथे प्रत्येक घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला असून जगातील सर्वाधिक जुळ्यांची संख्या या गावात आहे.

केरळच्या अतिदुर्गम भागात असलेल्या कोधीनी याठिकाणी २००० कुटुंबीयांचा निवास असून, या गावात तब्बल २२० जुळे आहेत. एकाच गावात इतकी जुळी मुलं असणं हा चमत्कार मानला गेला असून वैज्ञानिकांनी यामागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या गावात जुळ्यांचा जन्माची संख्या ही जागतिक सरासरीच्या सहापट आहे.

२००८ साली येथील ३०० बायकांनी मुलांना जन्म दिला त्यापैकी १५ जुळी होती. या गावातील लोकसंख्येचा आढावा घेतल्यास लक्षात आले की पाच वर्षात तब्बल ६० जुळे जन्माला आले आहेत. महत्वाचं म्हणजे जुळ्यांचा जन्मदर दिवसेंसदिवस वाढतच चालला आहे.

केरळस्थित डॉ. कृष्णन श्रीबाजू जे जुळ्यांच्या जन्मावर संशोधन करत आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून कोधीनी मधल्या जुळ्यांच्या जन्माचं रहस्य शोधत आहेत. त्यांच्यानुसार नोंदणी केल्यापेक्षा जास्त जुळ्यांची संख्या गावात आहे. त्यांच्यामते कोधीनी गावाच्या आसपासच्या भागात ३०० च्या आसपास जुळ्यांची संख्या आहे आणि ज्या गतीने वर्षागणिक जुळ्यांची संख्या वाढत चालली आहे ते बघता काही वर्षात जुळ्यांची संख्या दुप्पट होऊ शकते.

गावकऱ्यांच्या मताने जुळ्यांचा जन्म होण्याची सुरुवात तीन पिढ्यांपूर्वी झाली असून, डॉ श्रीबाजू यांच्या मतानुसार या चमत्काराची सुरुवात ६० -७० वर्षांआधी झाली.

महत्वाचं म्हणजे ज्या गतीने जुळ्यांच्या जन्मदरात वाढ होते आहे ही गावकऱ्यांना देखील आचंबित करून सोडणारी आहे.

डॉ. श्रीबाजूंच्या मते गावाच्या परिसरातल्या तयार होणाऱ्या अन्नात अथवा पाण्यात काही विशेष रसायनं अथवा द्रव्य आहे, ज्याचा परिणाम स्त्रियांवर होत असून त्यामुळे जुळे जन्माला येत आहेत. परंतु ते स्पष्ट देखील करतात की अजूनही कुठली बायोकेमिकल चाचणी न केल्यामुळे काही निष्पन्न होऊ शकलेलं नाही.

जर या भागात जन्मदर वृद्धीला कारणीभूत असलेले फॅक्टर्स लक्षात घेतले आणि त्यांचा वापर करणे शक्य झाले तर कित्येक निपुत्रिक दाम्पत्यांचं त्यामुळे भलं होऊ शकतं. विज्ञानाला अनभिज्ञ असणाऱ्या एका द्रव्यामुळे आज या गावावर ही परिस्थिती ओढवली आहे, असं डॉ.श्रीबाजू आपली भूमिका मांडताना स्पष्ट करतात.

भारतातच नव्हे तर आशिया खंडात जुळ्यांचा जन्मदर जगाच्या इतर भागांच्या तुलनेत कमी आहे. इतर भागात कृत्रिम इन्सेमिनेशनमुळे जुळ्यांचा जन्मदर वाढला आहे. सोबतच जगभरात जुळी मुलं हि प्रौढ स्त्रिच्या पोटी जन्माला येतात. पण कोधीनी मध्ये अगदी १८ वर्षाच्या मुलीच्या पोटी देखील जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.

अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की याठिकाणी जुळ्यांचा मतांची उंची ही ५ फूट ३ इंच इतकी कमी असून यापेक्षा जास्त उंची असलेल्या मातेच्या पोटी जुळ्या मुलांचा जन्म झालेला नाही.

कोधीनीच्या ग्रामस्थांनी त्यांच्या गावाचे नामकरण ‘ट्वीन टाऊन’ असे केले असून तिथे जुळ्या मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी तसेच मातांना आरोग्य सहायता मिळावी यासाठी ‘ट्वीन्स अँड किन्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे.

या असोसिएशनच्या माध्यमातून तेथील जुळ्या मुलांच्या मातांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो. ह्या असोसिएशनने कोधीनी गावातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यास हातभार लावला आहे.

twin town 3 postman
History TV

कोधीनी गावचा एक नागरिक ३० ते ४० जुळ्या भावंडासोबत एकाच वर्गात शिकल्याचा आठवणी देखील रंगवून सांगत असतो. गावचे अनेक मुलं आपल्या जुळ्या भावंडांसोबत आपल्या शाळेत जातात. शाळेतील शिक्षकांची बऱ्याचदा या जुळ्यांमुळे तारांबळ उडत असते. या गावातील एका शिक्षकाच्या मते जर एकाला प्रश्न विचारला तर दुसऱ्याकडे बोट दाखवला जातो.

बऱ्याचदा ही मुलं इथल्या शिक्षकांसमवेत थट्टा मस्करी देखील करत असतात. सोबतच लोकांची गंमत करण्याचे प्रकार देखील या जुळ्यांमुळे वाढीस लागले आहे.

डॉ.श्रीबाजू मात्र आपल्या संशोधनात व्यस्त असून, आता जेव्हापासून ह्या गावाची कीर्ती जगभर पसरली आहे, तेव्हापासून जगभरातील संशोधक या गावाच्या चमत्कारिक घटनांचा मागोवा घेत असून आता विविध देशातील शास्त्रज्ञांनी या मागील कारणं शोधण्यासाठी डॉ.श्रीबाजू यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

जोपर्यंत या गावातील जुळ्यांच्या जन्मामागचे विज्ञान उलगडले जात नाही, तोपर्यंत तरी हा चमत्कार असणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!