आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
व्हिन्टेज कारमध्ये रस असलेल्या आसामींना जनरल मोटर्स हे नाव निश्चितच माहित असेल. जनरल मोटर्स सर्वोत्कृष्ट डिजाइन असलेल्या गाड्या तयार करत. जनरल मोटर्सच्या पॉण्टियक गाड्या या विशेष लोकप्रिय होत्या.
नेहमीच्या काच, धातू आणि रबर यांबरोबरच काहीतरी भव्य आणि वेगळं वापरून त्या गाड्यांचं डिजाइन करण्यात आलं होतं. डिजाइनर्सने आपलं तन-मन अर्पून पॉण्टियक या गाडीचं डिजाइन केलं होतं. पॉण्टियकचं उत्पादन जरी थांबलं असलं तरी, त्या डिजाइनच्या दृष्टीने सार्वोत्कृष्ट असलेल्या या वाहनांची शैली नेहमी लक्षात राहील.
व्यावसायिक यशाच्या उत्तुंग शिखरावर असलेल्या जनरल मोटर्स कंपनीच्या पॉण्टियक विभागाला एके दिवशी एका ग्राहकाचं पत्र आलं. या पात्रात त्याने चक्क गाडीबद्दल तक्रार केली होती, “माझ्या पॉण्टियक कारला व्हॅनिला आइस्क्रीम आवडत नाही.” पॉण्टियक विभागाने या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. साहजिकच होतं. त्यांना वाटलं असेल कोणीतरी चेष्ठा करण्यासाठी असं पात्र पाठवलं आहे.
त्या ग्राहकालाही आपली तक्रार फारच क्षुल्लक असल्याचा साक्षात्कार झाला असावा, म्हणूनच त्याने कंपनीला दुसरं सविस्तर पत्र लिहिलं. या पात्रात त्याने सांगितलं, त्याच्या कुटुंबातील सर्व लोक रोजच्या रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खातात आणि दररोज रात्री वेवेगळ्या फ्लेवर्सची फर्माइश केली जाते, त्याप्रमाणे पुढच्या दिवशी तो त्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणतो. पण पॉण्टियक कार विकत घेतल्यानंतर त्याला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. त्याने आपल्या पात्रात लिहिलं होतं,
“दुसऱ्या वेळी मी तुम्हाला पत्र लिहीत आहे, माझ्या या आधीच्या पात्राला उत्तर न दिल्याबद्दल मी तुम्हाला दोषी ठरवत नाही, कदाचित ते थोडं विचित्रच वाटलं असेल. परंतु हे खरं आहे की रात्रीच्या जेवणानंतर मिष्टान्न म्हणून आईस्क्रीम खाण्याची परंपरा आमच्या घरी आहे. रोज आईस्क्रिमचं फ्लेवर बदलतं, मग सगळ्या कुटुंबाचं मत जाणून घेऊन कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रिम उद्या खायचं हे ठरतं. अलीकडेच मी एक नवी पॉण्टियक कार खरेदी केली आहे आणि तेव्हापासूनच दुकानाच्या फेऱ्यांमध्ये एक समस्या उद्भवली आहे. तुम्ही येऊन बघा, प्रत्येक वेळी जेव्हा मी व्हॅनिला आइस्क्रीम विकत घेतो आणि घरी जाण्यासाठी गाडी परत सुरू करतो तेव्हा माझी कार सुरू होत नाही. जर मला इतर कोणत्याही प्रकारचे आइस्क्रीम मिळाले तर गाडी अगदी सुरळीत सुरू होते. ‘पॉण्टियकमध्ये असे काय आहे जे मला व्हॅनिला आइस्क्रीम घेतल्यावर सुरू होऊ शकत नाही आणि जेव्हा मी इतर फ्लेवर घेतो तेव्हा सुरू करणे सोपे होते?’ मी या प्रश्नाबद्दल गंभीर आहे, कितीही मूर्ख वाटलो तरी.”
लोक त्याला वेडा समजायचे.
पॉण्टियकच्या अध्यक्षांना त्या पत्राबद्दल शंका होती परंतु तरीही तपासण्यासाठी त्यांनी एका अभियंत्याला पाठवले. रात्रीच्या जेवणानंतर त्या ग्राहकाने अभियंत्याची भेट घेतली आणि दोघेही आईस्क्रिमच्या दुकानाकडे रवाना झाले. ग्राहकाने वॅनिला आईस्क्रिम घेतले, आणि खरंच गाडी सुरु होत नव्हती.
अभियंत्याने आणखी तीन रात्री तसंच करून पाहिलं. पहिल्या रात्री चॉकलेट आईस्क्रिम घेतले. गाडी सुरू झाली. दुसऱ्या रात्री स्ट्रॉबेरी आईस्क्रिम घेतले. गाडी सुरू झाली. तिसऱ्या रात्री त्याने व्हॅनिला आईस्क्रीम मागवल. पण यावेळी मात्र गाडी सुरु झाली नाही.
आता अभियंत्यालाही आश्चर्य वाटले, कारण त्या ग्राहकाची तक्रार खरी ठरली होती. अभियंत्याने वॅनिला आईस्क्रीम घेतल्यानंतर कार खरंच सुरु झाली नाही. त्याने गाडीचा एकूण एक भाग तपासला, पण सगळं काही व्यवस्थित होतं. मग गाडी अशी अचानक बंद का पडत असावी? तो अभियंता तार्किक असल्याने त्याने विचार केला. त्याने सगळं तपासून पाहिलं, गाडीमध्ये वापरण्यात येणार गॅस, ड्रायविंगला लागणारा वेळ, इत्यादी.
पण समस्येचं कारण गाडीत नव्हे तर दुकानाच्या व्यवस्थापनात होतं!
अंतिमतः त्या अभियंत्याला समजले, आईस्क्रीमचे अन्य फ्लेवर्स हे दुकानाच्या आत, काहीशा लांब अंतरावर ठेवले गेले आहेत. वॅनिला फ्लेवर मात्र दुकानाच्या समोरच ठेवला आहे. त्यामुळे गाडीच्या मालकाला अन्य फ्लेवर्स आणण्यासाठी वेळ लागतो, तर वॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम आणण्यासाठी त्याला काहीच वेळ लागत नसे. “वेळ” हा त्याला आवश्यक असलेला महत्वाचा सुगावा होता.
सततच्या थांबण्यामुळे आणि सुरु होण्यामुळे इंधनाचे वाफेत रूपांतर होते, या वाफेची सिस्टिममध्ये हालचाल थांबली. ज्यामुळे इंजिन बंद पडत होतं, व्हॅनिला आइस्क्रीम खरेदी करण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने, इंजिनला थंड होण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळेच गूढ उकलले गेले. इंजिन थंड होत नसल्याने गाडी सुरु होत नव्हती.
पॉण्टियक कंपनीची स्थापना १९६२ साली जनरल मोटर्सच्या ऑकलंडचा सहकारी ब्रँड म्हणून झाली आणि लवकरच पॉण्टियकने शेवरलेटचा सहकारी ब्रँड बनून जनरल मोटर्सला मागे टाकले. अनेक वर्षांपासून जनरल मोटर्सची परफॉर्मन्स डिव्हिजन म्हणून पॉण्टियक प्रसिद्ध झाली. त्यांनी ग्राहकांना परफॉर्मन्स-ओरिएंटेड कार्सची विक्री केली.
जनरल मोटर्सने २७ एप्रिल २००९ रोजी पोन्टियाक बंद करण्याची घोषणा केली.
जनरल मोटर्सच्या मालकीचा, त्यांनी बनवलेला आणि विकलेला पॉण्टियक हा सर्वोत्कृष्ट कार ब्रँड होता. पॉण्टियकचं चिन्ह असलेली शेवटची गाडी डिसेम्बर २००९ मध्ये तयार झाली होती आणि शेवटची कार २०१० मध्ये सर्वांसमोर आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.