आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
जेम्स बॉंड!
बघायला इंग्लिश चित्रपटातील एक पात्र! पण, जगातील निम्मी जनता या एका पात्राच्या प्रेमात असेल. लेखक इल्यान फ्लेमिंग यांच्या कल्पनेतून हे पात्र साकारले. जेम्स बॉंड सिरीजमधील “Dr. No” नावाचा पहिला चित्रपट आला होता. त्यामध्ये 007 ची भूमिका सीन कॉनरी याने निभावली होती. या सिरीजचे आतापर्यंत एकूण २६ चित्रपट रिलीज झाले आहेत.
प्रत्येक मिशन यशस्वीरित्या पार पडणाऱ्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून जेम्स बॉंडला आपण आजवर पडद्यावर बघितलंय.
पण, लंडनच्या गुप्तहेर विभागात खरंच जेम्स बॉंड नावाचा एक एजंट काम करायचा हे सांगितलं तर तुम्हाल पटेल का?
शीतयु*द्धाच्या काळात पोलंडचे महत्त्व फारच वाढले होते. याकाळात म्हणजेच, १९६०च्या दरम्यान, लंडनचा गुप्तहेर जेम्स बॉंड लंडनमध्ये हेरगिरी करत होता. लंडनच्या आयपीएन (Institute of National Remembrance) या संस्थेच्या सदस्यांना जेव्हा खरोखरच खऱ्याखुऱ्या जेम्स बॉंडची कागदपत्रे हाताशी लागली तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.
या जेम्स बॉंडचे पूर्ण नाव होते जेम्स अल्बर्ट बॉंड, १८ फेब्रुवारी, १९६४ रोजी तो वर्सोवा येथे ब्रिटीश दूतावासातील लेखागार म्हणून दाखल झाला. त्याचे खरे काम होते पोलंडच्या सैन्याची माहिती काढणे.
परंतु तो पोलंडच्या सरहद्दीवर हेरगिरी करताना आढळल्याने पोलंडचा देखील त्याच्यावर डोळा होता. त्याच्यावर संशय आल्याने त्याच्या प्रत्येक हालचालीवर पोलंडची नजर होती. हा खरा जेम्स बॉंड अतिशय बोलका होता, पण बोलतानाही तो नेहमीच सावध असायचा.
त्याने दोनदा पोलंडची लष्करी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने बियास्टॉक आणि ओल्स्टीन प्रांतांना भेट दिली होती. पण त्याच्यावर पोलंडच्या मंत्रालयाला संशय आल्याने आपले हे गुप्त मिशन त्याला लवकरच आटोपते घ्यावे लागले. १९६४ ते १९६५ या काळात तो पोलंडमध्ये होता, अशी माहिती IPNच्या मार्झेन क्रूक यांनी दिली.
पोलंडमध्ये तो थोडंफार फिरला होता, त्यालाही स्त्रियांमध्ये विशेष रस होता, काल्पनिक जेम्स आणि हा खराखुरा जेम्स यांतील हेच एक साम्य. शिवाय, त्याला पॉलिश बिअर आवडायची असं म्हणतात.
पोलंडमध्ये त्याच्यावरच कडक निगराणी ठेवण्यात आली होती, त्यामुळे पोलंडच्या सैन्याविषयी काही विशेष माहिती हाती लागणार नाही असे त्यालाही वाटत होते. म्हणूनच त्याने लवकर परतण्याचा निर्णय घेतला. पोलंडच्या नागरिकांच्या संपर्कातही तो कधी आला नाही, कारण असे केल्याने त्याची अडचण आणखीनच वाढली असती.
१८ फेब्रुवारी १९६४ रोजी तो पोलंडमध्ये हजर झाला आणि २१ जानेवारी १९६५ रोजी तो लंडनला परतला. याकाळात त्याने मिळवलेल्या माहितीचे दस्तावेज आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत.
जेम्स बॉंडचा जन्म डीव्होन येथे १९२८ मध्ये झाला. IPNच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दलची ही माहिती सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर अनेकांच्या नजरा या खऱ्याखुऱ्या जेम्स बॉंडकडे वळल्या.
जेम्स बॉंड मालिकेतील पहिला चित्रपट १९६२ साली आला होता. आता या चित्रपटातील या पात्रावरून जेम्स बॉंड नावाचा अधिकारी गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आला की, या जेम्स बॉंडवरून कल्पनेतील हे पात्र निर्माण करण्य्यात आले आहे, हे मात्र एक गूढ आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.