नेटफ्लिक्स – एक सीडीचं दुकान ते जगातला सगळ्यात मोठा ओन्लाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सध्याच्या डिजिटल युगात आपल्यापैकी किती लोक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातात? हळूहळू ती संख्या कमी होते आहे. याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्स, हॉटस्टार यासारख्या स्ट्रीमिंग ऍप्सची चलती.

भारतात २०१५ मध्ये जीओने आपलं इंटरनेट लॉन्च केलं आणि इंटरनेटच्या जगात खूप बदल घडून आला. २ GB इंटरनेट डेटा महिनाभर वापरणारे आता एका दिवसात १ GB डेटा संपवू लागले.

4G मुळे फास्ट आणि भरपूर इंटरनेट डेटा उपलब्ध झाल्याने विविध ऑन डिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंग ऍप आले ज्यात तुम्ही सिरीयल पाहू शकता टीव्ही शो पाहू शकता इतकेच काय तर तिथे विविध चित्रपटसुद्धा उपलब्ध आहेत.

आणि हे सगळं आपण आज मोबाईलवर पाहू शकतोय याचं कारण म्हणजे जीओने डिजिटल क्षेत्रात घडवलेली क्रांती. जिओने कमी पैशात भरपूर इंटरनेट वापरण्याची सुविधा दिल्यावर बाकी कंपन्यांनासुद्धा या स्पर्धात्मक जगात मागे राहून कसे चालेल. मग त्यांनीसुद्धा आपले दर जिओच्या बरोबरीत आणले आणि अशा प्रकारे भारतात 4G डेटा वापरकर्त्याचा संख्येत वाढ झाली.

या चालू झालेल्या बऱ्याच ऍप सोबतच आलेलं ऍप म्हणजे नेटफ्लिक्स. जर तुम्हाला ऑन डिमांड विडिओ स्ट्रीमिंग ही पद्धत माहिती असेल तर तुम्हाला नेटफ्लिक्स नक्कीच माहिती असावं. तरीसुद्धा सामान्य भाषेत हे सांगायचं झालं तर ही एक अशी कंपनी आहे ज्यांच्या ऍपद्वारे तुमच्या आवडत्या तुम्हाला हव्या त्या फिल्म्स, मालिका, आवडत्या मॅच अशा सगळ्या गोष्टींच प्रक्षेपण केलं जातं.

ही सुविधा देणारे अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5 सारखे अनेक पुरवठादार आहेत पण यात नेटफ्लिक्स कित्येक पटींनी वरचढ आणि चांगलं मानलं जातं.

भारतात गेल्या काही वर्षांत या कंपनीने आपला चांगलाच जम बसविला असून आता तर बॉलिवूडच्या जास्तीत जास्त वेब सिरीज याच नेटफ्लिक्सच्या ऍपवर रिलीज केल्या जात आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या सैफ अली खानच्या सेक्रेड गेम्स मुळे तर नेटफ्लिक्स भारतात चांगलंच प्रसिद्ध झालं.

या कंपनीची विशेष बाब म्हणजे यांनी खूप कमी काळात जवळजवळ ६० देशांत आपले ७० करोड ग्राहक तयार केले आहेत. नेटफ्लिक्सच्या सर्व्हिसचा वापर मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटवर करू शकतात पण यासाठी तुमच्याकडे फास्ट इंटरनेट असणं गरजेचं आहे. टीव्ही किंवा स्मार्ट टीव्हीवर सुद्धा तुम्ही हे ऍप वापरू शकता पण त्यासाठी एक्सबॉक्स 360 सारखे यंत्र गरजेचे आहे.

अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. घराघरांत D2H चे सेटटॉपबॉक्स लावण्यास सांगितले जात होते. पण नेटफ्लिक्स आणि यासारख्या कंपन्या आल्याने ही परिस्थिती खूपच बदलली आहे. पण एवढ्या कमी वेळात ही कंपनी भारतीयांच्या घराघरात कशी काय पोहचली ? तर आपण जरा आता या कंपनीच्या इतिहासाकडे पाहूया.

नेटफ्लिक्स या कंपनीची सुरवात ही CD विकणारी कंपनी म्हणून चालू झाली होती. हा तो काळ होता जेव्हा इंटरनेटसारख्या गोष्टींचा लवलेशसुद्धा नव्हता. तेव्हा डी व्ही डी प्लेयर भाड्याने आणून त्यात CD टाकून कार्यक्रम पाहिले जात असे.

जेव्हा इंटरनेट घराघरात पोहचले तेव्हा यांनी त्याच CD ऑनलाइन विकणं चालू केलं. आणि यातूनच नेटफ्लिक्स हे नाव आपल्याला माहित झालं. जेव्हा यांचा बाजारात जम बसला तेव्हा मग त्यांनी व्हिडिओ ऑन डिमांडची सुविधा आणली. ही सुविधा लोकांना खूप आवडली.

डी व्ही डी घेऊन सिनेमा पाहण्यापेक्षा ग्राहकांना ऑन डिमांड स्ट्रीमिंग ची सुविधा जास्त सोयीस्कर वाटली. वेळेचं बंधन नाहीसं झालं म्हणजे जो कार्यक्रम संध्याकाळी 7 ला असेल तो दुसऱ्यादिवशी किंवा कधीही तुम्ही पाहू शकत होते.

मग २००७ साली नेटफ्लिक्सने ऑन डिमांड विडिओ स्ट्रीमिंग ही सेवा बाजारात आणली. पण ती ग्राहकांपर्यंत पोहचली ती २०१२ ला. आत्तापर्यंत नेटफ्लिक्स जे दुसऱ्यांचे कार्यक्रम दाखवत होते त्यांनी स्वतः एक सिरीज प्रोड्युस केली जीच नाव होतं ‘लिलिहैमर’

नेटफ्लिक्सची ही पहिली सिरीज कमालीची प्रसिद्ध झाली. आता नेटफ्लिक्स चित्रपट आणि वेब सिरीज स्वतःच निर्माण करू लागले. २०१६ साली ही कंपनी ओरिजिनल साहित्य पुरवणाऱ्या चॅनेल/नेटवर्कच्या श्रेणीत जाऊन पोहचली.

या काळात या कंपनीकडून १२६ चित्रपट/सिरीज प्रदर्शित करण्यात आल्या. एका रिपोर्टनुसार नेटफ्लिक्सचे २०१८ पर्यंत १२.८ करोड Subscribers निर्माण झाले होते.

ऍपलच्या आयफोनने एक डेटा जाहीर केला ज्यात असं म्हटलं आहे की आयफोनवर सगळ्यात जास्त वापरलं जाणार ऍप हे फेसबुक आहे. पण कमाईच्या बाबतीत नेटफ्लिक्स सर्वात पुढे आहे.

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या अभिनेत्रींमुळे बॉलीवूडची आज जागतिक स्तरावर ओळख आहे. आणि अशातच नेटफ्लिक्सचा भारतात येण्यात बराच फायदा होता. २०१६ मध्ये नेटफ्लिक्सने भारतात आपली सेवा देण्यास सुरुवात केली. याची सुरुवात काही टीव्ही शो, आणि चित्रपटांपासून झाली होती. आणि याच्या नंतर केवळ २ वर्षातच नेटफ्लिक्सने भारतात वेब सिरीज प्रकाशित केली जीच नावं होतं सेक्रेड गेम्स. ही सिरीज आली आणि बाजारात नेटफ्लिक्सला एक वेगळीच उंची मिळाली.

सेक्रेड गेम्स ही ती सिरीज होती ज्या सिरीजने सैफ अली खानच्या करियरच्या बुडत्या नावेला तारलं होतं. हाय रिसॉल्यूशनमध्ये अल्ट्रा HD फिल्म पाहण्याची वेगळीच मजा भारतीयांनी तेव्हा अनुभवली होती. याच्यानंतर सुद्धा नेटफ्लिक्सने बऱ्याच दर्जेदार सिरीज दर्शकांना दिल्या.

नेटफ्लिक्स हे एका Youtube प्रमाणे काम करतं ते सुद्धा स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तरीसुद्धा. इथे साहित्याला ब्राऊजर व्हर्जन प्रमाणे ब्राउज करता येते. स्ट्रीम करता येते तसेच तो कंटेंट सेव्ह सुद्धा करता येतो.

वरती म्हटल्याप्रमाणे भारतात नेटफ्लिक्सचा जास्त वापर होण्यामागे जिओ हे कारण आहे हे तर जगजाहीर आहे. टेलिकॉम टॉकच्या एका सर्व्हेचा अंदाज घेतला तर ४५ टक्के युजर्स हे ३ MBPS चं इंटरनेट कनेक्शन वापरतात. ३० टक्के युजर्स 1 MBPS किंवा त्यापेक्षा कमी स्पीडचं इंटरनेट वापरतात. तर 50 MBPS चं इंटरनेट वापरणारे १ टक्का सुद्धा नाहीयेत.

आता जर नेटफ्लिक्सची गोष्ट करायची झाली तर HD सर्व्हिस घेण्यासाठी 8 MBPS चे इंटरनेट कनेक्शन आणि १०० GB इतकं इंटरनेट गरजेचं आहे. आणि या इंटरनेट सेवेसाठी तुम्हाला कमीतकमी २००० रुपये मोजावे लागतील. ही रक्कम भारतीय किमतीच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे पण तरीसुद्धा दिवसेंदिवस नेटफ्लिक्सचे युजर्स वाढतच आहेत.

भारतात नेटफ्लिक्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्या TVF प्ले Alt Balaji, हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि अमेझॉन प्राईम या आहेत ज्या टक्कर देऊन नेटफ्लिक्सला शर्यतीच्या बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. पण इथे मोठी शर्यत जी आहे ती Eros या कंपनीसोबत.

२००० चित्रपटांचा संग्रह असलेली ही लायब्ररी नेटफ्लिक्सप्रमाणेच भारतीय दर्शकांना ताजे व दर्जेदार साहित्य पुरवत असते. ही लायब्ररी जुनी असल्याने इथे वापरकर्त्यांना पर्याय जास्त उपलब्ध आहेत आणि याच कारणाने ही कंपनी घोडदौडीत आघाडीवर आहे.

आता Eros या कंपनीची अशी इच्छा आहे की बॉलिवूड आणि इतर भारतीय भाषेतील चित्रपट सुद्धा ऑनलाइन केले जावेत. Eros कंपनी वर्षभरात तब्बल ७० सिनेमे प्रकाशित करते.

संपूर्ण भारतात एका वर्षात ८०० हुन जास्त चित्रपट तयार होतात आणि ते जगभरात पाहिले जातात. हे चित्रपट लोकांना आवडतात सुद्धा. आणि हेच कारण आहे ज्यामुळे नेटफ्लिक्सच भारतात येणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!