आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शांती आणि स्थैर्याची जगातील प्रत्येक व्यक्ती कामना करते, पण आपला इतिहास हा यु*द्धात आपले प्राण गमावणाऱ्या अनेक वीरांच्या रक्ताने माखलेला आहे, हे सत्य आपण कधीच नाकारू शकत नाही. आज जगातील अनेक देशांनी यु*द्धभूमीचे रूप घेतले आहे. जे देश प्रत्यक्ष यु*द्ध लढत नाहीत, ते भविष्यात होणाऱ्या यु*द्धासाठी स्वतःची सैन्यशक्ती मजबूत करत आहेत. ते आपल्या सैन्यावर आणि ह*त्यारांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहेत.
खरंतर कुठलंही यु*द्ध हे ह*त्यारांच्या बळावर जिकंता येत नाही. यु*द्ध जिंकण्यासाठी एक कुशल रणनीती असणे आवश्यक असते.
प्राचीन चीनमध्ये सून त्सु नावाचा जनरल यु*द्धनीतीची गरज जाणून होता, त्याने काही अशा रणनित्या आखल्या होत्या की अनेक मोठ्या सम्राटांनी व त्यांच्या सैन्यांनी सून त्सु समोर सपशेल शरणागती पत्करली होती. आजच्या काळातही सून त्सु यांची तितकीच प्रभावी आहे.
यु*द्धनीती आखण्यात सून त्सु यांच्या इतका प्रभावी नेता चीनच काय पण जगाच्या धर्तीवर कोणी झाला नसेल, इतक्या त्या भेदक होत्या. त्यांनी आपल्या युद्धनीतीला इतके सुव्यवस्थित आणि प्रभावी बनवले होते की त्यांची योजना सफल करण्यासाठी त्यांनी त्यांच्या महालातील दोन स्त्रियांचा आपल्या रणनीतीसाठी बळी दिला होता.
सून त्सु म्हणतात की, “जर आदेश सैन्याला व्यवस्थितपणे समजला नाहीतर ती संपूर्णतः सैन्याच्या जनरलची चूक असते. पण जर स्पष्ट आदेश देण्यात आला असेल आणि कोणी त्याचे पालन करत नसेल तर ती सैनिकांची चूक असते आणि अशी चूक युद्धाच्या मैदानात खपवून घेतली जात नाही.”
चीनमधील वू साम्राज्यात सून त्सु यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलूखाच्या रक्षणासाठी अनेक रणनीतींची आखणी केली होती, याच रणनीतीच्या आधारावरच ‘द आर्ट ऑफ वॉर’ हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
त्यांच्या पुस्तकाच्या तेराव्या अध्यायात सून त्सु म्हणतात की, यु*द्धात विजयासाठी तीन प्रकारच्या रणनीत्या अत्यावश्यक असतात. यापैकी पहिल्या नीतीनुसार आपल्यापेक्षा आपल्या शत्रूची अधिक माहिती आपल्याला असली पाहिजे, यामुळे शत्रूच्या ताकदीचा अंदाज येतो आणि यु*द्धात त्याच्या हातून आपला पराभव टाळता येतो. दुसऱ्या नीतीनुसार तुम्ही शंभरवेळा जरी शत्रूचा पराभव केला तरी जोपर्यंत तुम्ही शत्रूला पूर्णपणे निष्प्रभ करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे तुम्ही विजयी झालेला नसतात. तिसऱ्या नीतीनुसार यु*द्ध हे फक्त शक्तिप्रदर्शन करण्यासाठी केले जात नाही तर, यु*द्ध हे फक्त आणि फक्त विजयासाठीच केले जातात.
यु*द्धनीतीच्या आखणीत सून त्सु यांचे काम इतके अभिनव आहे की त्यांच्या ‘आर्ट ऑफ वॉर’ या पुस्तकाला सदैव मागणी असते. सुरुवातीच्या काळात फक्त निवडक लोकांना वाचायला उपलब्ध असलेले हे पुस्तक आता सर्वांना वाचायला उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कुठल्याही यु*द्धात मनुष्य स्वतःला वाचवण्यासाठी लढत असतो. यु*द्ध जितके लांबत जाते तितकी संसाधनांची कमतरता भासू लागते. यामुळे सैनिकांचे मनोबल खच्ची होण्याचा धोका असतो. साधनांच्या कमतरतेचा सर्वाधिक भार हा सामान्य सैनिकांवर पडतो, यामुळे शत्रू बळकट होत जातो.
व्हिएतनाम यु*द्ध हे १९५५ ते १९७५ इतक्या दीर्घकाळासाठी सुरु होते. अफगाण यु*द्ध आणि दुसऱ्या महायु*द्धाचा यानंतर समावेश होतो. ज्या लढाया दीर्घकाळ चालतात, त्यात कोणी एक विजयी होत नाही, त्यामुळे जेवढ्या लवकर यु*द्ध समाप्त होईल तितके ते चांगले असते.
यु*द्धातून समोर येणाऱ्या परिणामासाठी आपण सदैव तयार असायला हवे, असे सून त्सुचे म्हणणे आहे. त्यांच्या मते ज्याला परिणामाची माहिती नसते असा माणूस कधीच यु*द्ध जिंकू शकत नाही. यु*द्धाच्या परिणामांचा विचार करून एखादा चांगला रणनीतीकार सर्वप्रथम आपल्या यु*द्धाला अनुकूल असलेल्या संसाधनाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतो. यु*द्ध सुरु असते त्यावेळी हे संसाधन कमी पडायला नको याची काळजी घेणे गरजेचे असते. कारण यु*द्धाचा व्यापारावर परिणाम होतो, बाजारपेठा ठप्प होतात, आर्थिक मंदी येते, या सर्वच गोष्टींचा प्रभाव यु*द्धावर पडतो. त्यामुळे बऱ्याचदा शत्रूच्या संसाधनांना ताब्यात घेऊन यु*द्ध लढण्याचीसुद्धा तयारी ठेवता आली पाहिजे.
सून त्सु म्हणतात की यु*द्धात सैनिकांना उत्साही ठेवण्यासाठी त्यांना सदैव पुरस्कार देत रहायला हवे.
सून त्सु यांनी यु*द्धामध्ये गुप्तहेरांच्या भूमिकेवर विशेष लक्ष देताना म्हटले आहे की शत्रूचा ठावठिकाणा हा फक्त गुप्तचरांना माहिती असतो. त्यांनी गुप्तचरांचे पाच भागात वर्गीकरण केले आहे. पहिले आहेत स्थानिक गुप्तहेर जे यु*द्धजन्य भागात राहतात व पैशासाठी गुप्तहेर होतात. गुप्तचर हा आपली ओळख लपवून शत्रूच्या शिबिरातील प्रत्येक घडामोडीविषयी आपल्याला सांगत असतो. सून त्सु यांनी या प्रकारातील गुप्तचरांना महत्वाचे स्थान दिले आहे. सून त्सु म्हणतात की शत्रूच्या पक्षातील गुप्तहेर हे देखील आपल्यासाठी काम करतात, त्यांना फितवून पैसे दिले की ते आपल्याच मालकाच्या गुप्त बातम्या आपल्यापर्यंत पोहचवतात. शत्रूच्या गुप्तहेरांना आजच्या आधुनिक युगात फार महत्व आहे, त्यांच्याकडून शत्रूची बारीक सारीक गोष्ट देखील माहिती पडते.
सून त्सु यांच्या आर्ट ऑफ वॉर या पुस्तकाला आज हजार वर्षांचा काळ लोटला आहे. यु*द्ध व त्याच्या पद्धतीत बदल आज घडून आले असले तरी अजूनही सून त्सुच्या रणनीतीचे शास्त्र यु*द्धासाठी वापरण्यात येते. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांनी सून त्सुच्या रणनीतीच्या बळावरच चीनमधील कोमिंगटांग आणि चँग काय शेक यांची सत्ता उलथवली होती. अमेरिकेने गल्फच्या यु*द्धात देखील सून त्सुच्या रणनीतीचा अभ्यास केला होता. ‘सून त्सु’च्या बऱ्याच रणनीती फक्त युद्धापुरता मर्यादित नसून व्यवसाय, खेळ आणि राजकारणात देखील तितक्याच प्रभावी आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.