The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आफ्रिकेतून आलेली ‘सफारी’ भारतात स्टेटस सिम्बॉल बनली होती

by द पोस्टमन टीम
20 July 2020
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


आजकाल कपड्याचे ट्रेंड तर दिवसागणिक बदलत असतात. पण, काही कपड्यांचा रुबाब वेगळाच असतो. लग्नकार्याचे इतर सोपस्कार बदलले तरी, माहेरच्या शालूचं महत्व आजही तितकंच आहे. पैठणी, शालू, अशा पारंपारिक वस्त्रांचे ट्रेंड कधीच आऊटडेटेड होत नाहीत.

हे झालं स्त्रियांच्या बाबतीत पण, पुरूषांचं काय?

भारतात तर प्रदेशानुसार पेहरावात बदल आढळून येतो. आजकाल हा फरकही हळूहळू नाहीसा होत चाललाय. पुरुषांच्या पेहरावातही आता बरेच नवीन ट्रेंड पाहायला मिळतात. पण, पूर्वी पुरुषांच्या पेहरावात इतकी विविधता नव्हती. धोतर-शर्ट जाऊन एकतर पँटशर्ट आले किंवा विजार शर्ट. फार काळ यात काही बदल झाला नाही.

परंतु, पूर्वी तर ट्रेंड हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. स्त्रियांसाठी विविध प्रकारची वस्त्र-आभूषणे असली तरी, पुरुषांची गोष्ट वेगळी होती. तरीही पुरुषांचा रुबाब दिसावा म्हणून डोक्यावर फेटा पागोटा, पगडी, खांद्यावर पंचा, असे विविध प्रकार होतेच. कालांतराने यातही बदल होत गेले. पेहरावाची पद्धत बदलत गेली तशी पेहारावाशी निगडीत समजुती देखील बदलत गेल्या. १९७० च्या दरम्यान अशीच एक नवी फॅशन रूढ झाली.

सफरीची फॅशन!

मोठे उद्योगपती, सरकारी नोकर, या वर्गात ही वेशभूषा बरीच लोकप्रिय ठरली. सफारी नुसतीच फॅशन नाही तर एक स्टेट्स सिम्बॉल होतं. एखादा सरकारी नोकर किंवा व्यापारी जेंव्हा घरातून बाहेर पडत असे, तेंव्हा त्याच्या अंगावर सफारीचाच पेहराव असे. सफारी वापरणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये एक आदराची भावना असे.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

कारण, ४० रु. मीटरने सफारीचे कापड विकत घेणे, ही त्याकाळी चैन होती. शिवाय शिंप्याला ४०-५० रुपये शिवणावळ द्यावी लागे.

पण, ही सफारी वर्षानुवर्षे टिकत असे. आज तर या दारात सफारी मिळणे एक स्वप्नच ठरेल. तयार किंवा रेडीमेड सफारी ही बाब तर विसरूनच जा.

सफारी ही त्याकाळी समाजातील उच्चवर्गाची सांस्कृतिक ओळख समजली जात असे. त्यावेळी अगदी लग्नातही सफारीचा आहेर म्हणजे मोठा मानपान समजला जाई. सुशिक्षित मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गात तर याची खूपच क्रेझ होती. आजही अनेक लोक हौसेने सफारी शिवून घेतात. पण, आज तरुणांमध्ये ही फॅशन फारशी रूढ नाही. आजच्या काळात सफारीची फॅशन आउटडेटेड समजली जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिशांच्या प्रभावाचा अंमल तसा फारसा ओसरला नव्हता. भारतातील उष्ण हवामानात सफारी हा एक उत्तम पेहराव असल्याचे समजले जाई. ब्रिटीश काळात सरकारी अधिकारी विशेष करून सफारीच वापरत. सफारी हे श्रीमंतीचे आणि श्रेष्ठतेचे प्रतिक समजले जाई.

फ्रांसच्या स्टाईल हिवन या कंपनीचे डिझायनर टेड लॅपिडस आणि येव्स सेंट लॉरेंट या दोघांना टू पीस सफारी डिझाईन केल्याचे श्रेय दिले जाते.

आफ्रिकेतील जंगलातील सफारी करण्यासाठी पहिल्यांदा सफारीसारखे सूट तयार करण्यात आले. या सूटमध्ये थोडेफार बदल करून दुसऱ्या बोअर युद्धात दक्षिण आफ्रिकेत तळ ठोकून राहिलेल्या ब्रिटीश सैन्यासाठी देखील युनिफॉर्म बनवण्यात आले होते.

आफ्रिकेच्या उष्ण वातावरणात शरीरात हवा खेळती राहील अशा प्रकारचे कापड सैनिकांसाठी हवे होते. कॉटनपासून तयार केलेले कापड थंड राहते. या “बटन डाऊन शर्ट”ला छातीवर आणि कमरेला मोठमोठे खिसे होते. सैनिकांना बुलेट, शस्त्रे, दुर्बिणी आणि पाण्याची बाटली ठेवण्यासाठी यांचा उपयोग होईल या हेतूने हे खिसे लावण्यात आले होते. या शर्टला मोठे कॉलर होते आणि कमरेला बेल्टदेखील. ज्यामुळे सगळे साहित्य एकत्र बांधून ठेवणे सहज शक्य होते. सोबत पँटला पण मोठमोठे खिसे होते.

ADVERTISEMENT

अ‍ॅडम गेझी आणि विक्की करमिनास यांनी लिहिलेल्या फॅशन अँड मॅस्क्युलॅनिटीज या पुस्तकात हळूहळू हा पेहराव लोकप्रिय संस्कृतीत कसा स्वीकारला गेला याचे वर्णन करण्यात आले आहे.

१९३०च्या काळात या सूटला भरपूर प्रसिद्धी मिळाली. १९७०पर्यंत सफारी एक स्टेटस सिम्बॉल म्हणून रूढ होती.

इंदिरा गांधीच्या सचिवालयात कुंवर नटवर सिंग नावाचे एक तरुण इसम होते. जे नेहमी सफारीत असत. त्यांच्यासोबत आणखी सहा लोक होते. जे विविध वयोगटाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. पण, त्यांच्यात एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे सफारी.

आणखी एक राजकारणी एसएमआय अस्सीर यांनी देखील एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्याकडे सफारीचे २५ सूट आहेत. मोठे उद्योगपती राहुल बजाज यांचा वॉर्डरोब सफारीनेच भरून गेला आहे. रिषभ खंडेलवाल यांच्यामते सफारी शर्ट एकदम कम्फर्टेबल वाटतो. या सूटमध्ये व्यक्तीची सभ्यता दिसून येते आणि भारतीय हवामानात तर सफारी अधिक चांगली सूट होते. खंडेलवाल हे हंगर या क्लोथिंग ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. रेमंड, विमल आणि डीसीएम या काही कंपन्या देशात सफारी सूटचा चांगला पुरवठा करत होत्या.

आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील नेहमी बंद गळ्याच्या सफरी घालणं पसंत करतात. सफारी आजही एक फॅशन स्टेटस आणि स्टेटस सिम्बॉल आहे.

९०च्या दशकातील खाउजा धोरणामुळे अनेक परकीय व्यवसाय भारतात स्थिरावले. या दशकात देशाने अनेक बदल अनुभवले. स्वातंत्र्यपूर्व काळात आपले कपडे किंवा पेहराव हे आपल्या विचारांचे प्रतिक असत.

उदाहरणार्थ, खादीने स्वातंत्र्य चळवळीला दिलेले प्रोत्साहन आणि त्यामुळे देशवासीयांमध्ये निर्माण झालेली स्वातंत्र्याची भावना हीच स्वातंत्र्य चळवळीची खरी उर्जा होती. खादी हे राष्ट्रवादाचे प्रतिक होते.

आज खादी आणि सफारी दोन्हींचाही वापर खूपच मर्यादित वर्तुळात पाहायला मिळतो.

अर्थात, अलीकडच्या काही काळात सफारीची मागणी वाढत असल्याचे रिषभ खंडेलवाल यांचे म्हणणे आहे. आज टीव्ही आणि चित्रपटातील स्टार मंडळींना कॉपी करण्याचे दिवस आहेत. अनेक फिल्म फेअर फेस्टिवलमध्ये अलीकडे शाहरुख खानलासुद्धा तुम्ही सफारीमध्ये पाहिले असेल.

देशातील आणि परदेशातील डिझायनर आज पुन्हा एकदा सफारीची कॉपी करत साध्या डिझाईन्सचे फॉर्मल कपडे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पारंपारिक रंग, पॅटर्न, कट्स आणि डिझाईन्स आज कालबाह्य वाटत असले तरी त्यात काही नाविन्यपूर्ण कल्पना वापरून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांना पुन्हा ट्रेंडमध्ये आणणे सहज शक्य असल्याचेही खंडेलवाल म्हणतात.

प्रत्येक व्यक्तीची गरज, आवड आणि स्टाईल वेगवेगळी असते, हे ध्यानात ठेवून जरडिझायनर्सनी काम केले तर, सफारी पुन्हा एकदा नव्या रुपात ट्रेंडमध्ये आणली जाऊ शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

एकसंध भारताच्या निर्मितीत सरदार पटेलांइतकच योगदान या व्यक्तीचं देखील आहे

Next Post

विदेशी कोक-पेप्सीला कॅम्पा कोला हे स्वदेशी उत्तर होतं

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
Next Post

विदेशी कोक-पेप्सीला कॅम्पा कोला हे स्वदेशी उत्तर होतं

गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी तब्बल १२ किमी धावून या स्निफर डॉगने रेकॉर्ड बनवलंय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)