The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या लहान पोराने रात्री घरात घुसलेल्या चोराला असं उल्लू बनवून पोलिसांच्या हवाली केलं होतं

by द पोस्टमन टीम
30 March 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


लहानपणी आपण ज्या गोष्टी वाचतो किंवा जे पाहतो त्यांचा आपल्या मनावर खूपच खोलवर प्रभाव पडलेला असतो. शिकागोतील सोळा वर्षांच्या अल्बर्ट बेकवर देखील तो वाचत असलेल्या गोष्टीतील हिरो डायमंड डिकचा असाच प्रभाव पडला होता. म्हणूनच मध्यरात्री घरात घुसलेल्या दरोडेखोराला त्याने धिटाईने पोलिसांना पकडून दिले. वाचूया अल्बर्ट बेकच्या धाडसाची आणि त्याच्या हजारजबाबी चातुर्याची गोष्ट!

१९०८ सालातील डिसेंबर सुरु होता. आदल्या रात्रीच ख्रिसमस होऊन गेला होता. सोळा वर्षांचा अल्बर्ट बेक आपल्या बिछान्यात पडून झोपेची वाट पाहत होता. त्याची आई कधीचीच झोपली होती. तिच्या घोरण्याचा आवाज अल्बर्टच्या कानावर येत होता. थंडीचे दिवस आल्याने बोचरा वारा होताच सोबतीला. खडकीवर दणकन आदळणाऱ्या वाऱ्याचा आवाजही बेकच्या झोपेत व्यत्यय आणत होता. दिवसभराच्या धावपळीनंतर किमान रात्र तरी शांततेत जाईल अशी अल्बर्टची इच्छा. कशीबशी झोप लागली पण, मध्येच त्याला जाग येत होती. त्याला झोपेचा असा लंपडाव अजिबात आवडत नव्हता.

मध्यरात्री अचानकच कसल्याशा आवाजाने त्याला परत जाग आली. त्याला कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. डोळे उघडून बघितले तर एक आडदांड माणूस जवळपास त्याच्याहून दुप्पट उंच त्याच्या खोलीत शिरला होता.

त्याने बिछान्यात पडलेल्या अल्बर्टवर एक नजर टाकली आणि तो खोली अस्ताव्यस्त विस्कटू लागला. अल्बर्टने आपण गाढ झोपेत असल्याचे नाटक केले. कदाचित आपण जागे आहोत हे त्याला कळले तर तो आपल्याला मारून टाकेल अशी त्याला भीती वाटली.

तो माणूस काही तरी मौल्यवान वस्तू सापडतात का हे शोधत होता. तो पाठमोरा झाल्यावर अल्बर्ट उठला आणि शक्य तितक्या हळू आवाजात म्हणाला, “किती दिवस मी तुझ्या पळतीवर होतोच. तू आज माझ्या तावडीत सापडलास. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. थोडी जरी हालचाल केलीस तरी मी तुला गोळ्या घालून ठार मारीन, मुकाट्याने हात वर कर.”

असे म्हणतच तो आपल्या अंथरुणातून उठला आणि त्याने त्या दरोडेखोराच्या पाठीला आपले बोट टेकवले. त्याला वाटले ती बंदुकीची नळीच असावी. दरोडेखोर खरेच गांगरून गेला आणि भीतीने जागच्या जागीच थिजून उभा राहिला होता.

“हात वर कर आणि अजिबात हलू नको जागचा. नाहीतर इथेच तुला संपवून टाकीन,” आवाजात शक्य तितका कठोरपणा आणत अल्बर्ट बोलला. खोलीत अंधार असल्याने दरोडेखोराला काहीच दिसू शकत नव्हते म्हणून तो जे काही सांगतोय ते त्याला खरेच वाटत होते.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

ADVERTISEMENT

आता अल्बर्टला हे नाटक तोपर्यंत सुरु ठेवावे लागणार होते जोपर्यंत तो त्या दरोडेखोराला खऱ्या पोलिसांच्या हवाली करत नाही. त्या दरोडेखोराला जरा जरी शंका आली किंवा त्याने मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केलाच तर सगळा खेळ खल्लास!

नाटकाची संदिग्धता वाढवण्यासाठी त्याने नाटकात आणखी एक अदृश्य पात्र घुसवले. बाजूच्या खोलीतील एखाद्या व्यक्तीशी बोलल्याप्रमाणे थोड्या मोठ्या आवाजात तो म्हणाला, “कॅप, माझी फोर्टी-फोर कोल्ट दे आणि तू कपडे घालून तयार हो, आपल्याला एका अर्जंट मोहिमेवर जायचे आहे.”

हे ऐकून तर तो दरोडेखोर चांगलाच हादरला. पण, अल्बर्टला वेगळीच चिंता होती. त्याला वाटू लागले माझा आवाज ऐकून जर आई जागी झाली आणि ती जर किंचाळत बाहेर आली तर सगळ्या नाटकावर पाणी पडेल. म्हणून घाईघाईत त्याने मिळेल ते कपडे अंगावर चढवले आणि त्या दरोडेखोराला पुढे घालून आपल्या अपार्टमेंटमधून बाहेर पडला.

रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून ते तिघेच जण चालत होते, अल्बर्ट, तो दरोडेखोर आणि अल्बर्टचा अदृश्य पोलीस सहकारी. रस्त्यावरून जाताना तो त्या दरोडेखोराला म्हणाला, “आता आपण पोलीस स्टेशनला जातो आहोत. मुकाट्याने तिथपर्यंत चल. पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर इथेच तुला संपवून टाकीन.”

तो थोड्या थोड्या वेळाने असाच त्याला धमकावत होता. सोबत त्या अदृश्य साथीदाराला काही सूचना देत होता. “नो, नो कॅप, त्याला आत्ताच मारायचा नाही आपल्याला, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर बघू त्याचं काय करायचं ते.”

असेच दटावत धमकावत त्याला ट्वेंटी-सेकंड स्ट्रीट पोलीस स्टेशन पर्यंत न्यायाचा असा अल्बर्टच्या डोक्यात विचार सुरूच होता इतक्यात त्यांना एक खराखुरा पोलीस भेटला आणि त्याने त्या दरोडेखोराला आपल्या ताब्यात घेतले. आतापर्यंत आपण एका छोट्या पोराच्या बतावणीला घाबरून इथपर्यंत आलो, हे पाहिल्यानंतर त्या दरोडेखोरालाही आश्चर्याचा धक्का बसला. त्या दरोडेखोराचे नाव होते जॉर्ज वॉल. त्याला खरेच वाटत होते की कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्याने खरेच आपल्याला पकडले आहे, शेवट पर्यंत त्याला कळलेच नाही की, मघापासून जे काही सुरु होते ते केवळ नाटक होते. तो पूर्णतः फसला होता.

वॉलला सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. अल्बर्ट बेकच्या धाडसाची ही कथा शिकागो ट्रिब्युनच्या पहिल्या पानावर छापून आली. त्याच्या आईवडिलांना या धडासी आणि हुशार मुलाचा खूपच अभिमान वाटत होता.

अल्बर्ट जेंव्हा पासून वाचायला शिकला होता, तेंव्हापासून त्याने डायमंड डिकच्या कथाच वाचल्या होत्या. या कथा मालिकेतील एकही कथा त्याने वाचायची सोडली नव्हती. या शूर साहसी नायकाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता आणि त्याने आपल्या या कथेतील हिरोलाच आपली प्रेरणा मानले होते. या कथा वाचल्यामुळेच त्या कथेतील नायकाप्रमाणे तो नेमक्या प्रसंगी हुशारी आणि धाडस दाखवू शकला. मुलांच्या हातात योग्य वयात योग्य वस्तू आल्या तर ते काय करू शकतात, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून अल्बर्टच्या या साहस कथेकडे पहिले पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

Next Post

ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा ‘रनमशीन’ स्लमडॉग मिलेनियर

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
मनोरंजन

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

14 April 2022
Next Post

ख्रिस गेल - वेस्ट इंडिजचा 'रनमशीन' स्लमडॉग मिलेनियर

अमेरिकेने त्यादिवशी ओमाहा बेट तर जिंकले, पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)